माझ्या मराठीची गोडी

वाचकांना वाचनाची एक पर्वणी मिळावी . मराठी भाषेची गोडवी कळावी यासाठी केवळ हा एक प्रयत्न आहे कुणाला काही शंका असल्यास कृपया राग व्यक्त न करता कमेंटमध्ये सांगा व योग्य ते मार्गदर्शनही करा .

Breaking

प्रसिद्ध व्यक्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रसिद्ध व्यक्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २४ जून, २०२०

जून २४, २०२०

मी कसा आहे

www.readfist.blogspot.com    कृपया लेख पूर्ण वाचा आपले सर्व व्यर्थ अहंकार गर्विष्ठपणा नक्की गळून पडेल याची 100% खात्री देतो                                                                                      *मी कसा आहे?*


         आपल्याच देशातल्या एका सुप्रसिद्ध उद्योगपतींची ही कहाणी आहे. एक दिवस हे उद्योगपती सकाळी तयार होऊन कामाला जाण्यासाठी निघाले होते. तेवढ्यात त्याच्या समोर घरमालक येऊन उभा राहिला. "आज कसं येणं झालं ?" उद्योगपतींनी त्या माणसाला विचारले. कामाच्या नादात ते विसरून गेले होते की,समोर त्यांचा घरमालक उभा आहे.घरमालक विनम्रपणे म्हणाला, "मी भाडं वसूल करायला आलो आहे. दर महिन्याला तुम्ही पाठवता. यावेळेला कामाच्या गडबडीत राहन गेलेलं दिसतं." उद्योगपती वरमले आणि म्हणाले, "हे घ्या तुमचं घरभाडं. उशीर झाल्याबद्दल क्षमा करा." एवढे बोलून उद्योगपतींनी खिशात हात घालून पैसे काढले व घरमालकाला दिले.घरमालक   उद्योगपतींलना म्हणाला," तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून भाड्याच्या घरात राहता,याचे मला आश्चर्य वाटते." यावर उद्योगपती हसले व
म्हणाले, "मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे याला महत्त्व आहे. माझ्या
काही तत्त्वांमुळे मी भाड्याच्या घरात राहतो." घरमालक काही समजला नाही.तो भाडे घेऊन निघून गेला.

     हा प्रसंग त्या उद्योगपतींचा ड्रायव्हर पाहत होता. उद्योगपती गाडीत बसले व आपल्या परदेश प्रवासासाठी तिकीट काढायला एका एअरलाईनच्या  ऑफिसात गेले. तिथे बरीच गर्दी होती. उद्योगपती एका सामान्य माणसासारखे रांगेमध्ये उभे राहिले, तेवढयात एअरलाईनच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहिले, ते घाईने पुढे आले आणि म्हणाले,"सर, तुम्ही रांगेत का उभे आहात? आम्ही तुमचे तिकीट काढून तुम्हाला आणून देतो. तुम्ही समोरच्या सोफ्यावर आरामात बसा.तुम्ही रांगेत उभे राहून आम्हाला लाजवू नका.उद्योगपती म्हणाले, "आत्ता मी उद्योगपती म्हणून इथे उभा नाही, तुम्ही एवढी धावपळ करण्याची आवश्यकता नाही. उद्योगपती हे माझ्या नावासमोर लावलेले विशेषण आहे. मी कोण आाहे यापेक्षा मी कसा आहे? हे अधिक महत्त्वाचे आहे." एअरलाईनचा स्टाफ हे उत्तर ऐकून चकित झाला. 

       तिकीट काढून उद्योगपती आपल्या ऑफिसकडे निघाले. रस्त्यात त्यांना अनेक माणसे धावतपळतआपापल्या कार्यालयाकडे जाताना दिसली. त्यांना लाज वाटली की, आपण एवढ्या अलिशान गाडीमधून एकटे प्रवास करीत आहोत. सामान्य माणसे मात्र किती कष्टाने ऑफिसला पोहोचतात. त्या दिवसापासून त्यांनी आपल्या गाडीत लोकांना लिफ्ट द्यायला सुरुवात केली. लिफ्ट मिळालेल्या लोकांचा आनंद पाहून उद्योगपतींना समाधान वाटायचे.

       एके दिवशी हे उद्योगपती परदेश प्रवासासाठी निघाले होते.त्या दिवशी एक प्रसंग घडला. हवाई सुंदरीच्या हातून त्यांच्या अंगावर चुकून पेय पडले.त्यामुळे ती घाबरली.तिने पाणी व कपडा आणून त्यांचा ड्रेस स्वच्छ केला.ती त्यांना ओळखत असल्याने तिने शतदा त्यांची क्षमा मागितली. तिला भीती वाटत होती की, या चुकीबद्दल तिला शिक्षा घडणार उद्योगपतींनी तिच्याकडे पाहिले व तिला विचारले, "तू माझ्या अंगावर काय सांडलेस ?'" हवाई सुंदरी भीत भीत म्हणाली, "माझ्या हातून तुमच्या कपड्यांवर फळांचा रस सांडला, मला क्षमा करा.उद्योगपती हसले व म्हणाले, "पुढच्या वेळेला माझ्या अंगावर सोडा,व्हिस्की सांड.", उद्योगपतींचे बोलणे ऐकून हवाई सुंदरी खुदुकन हसली. तिच्या मनावरचा सगळा ताण एका क्षणात उतरला.

असे अनेक प्रसंग उद्योगपतींच्या ड्रायव्हरने पाहिले होते.त्याची उत्सुकता चाळविली गेली. तो उद्योगपतींना म्हणाला, "साहेब, तुम्हाला इतके साधे राहणे व वागणे कसे काय जमते ?आम्ही तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतो. तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून तुम्ही किती साधे जगता??."
उद्योगपती म्हणाले, "अरे, मी लहान असताना फार उद्दाम होतो. मला सांभाळायला एक दाई होती. एकदा माझ्या मनाविरुद्ध काही घटना घडली तेव्हा मी तिला चक्क लाथ मारली होती. ते पाहून माझे वडील एवढे संतापले होते की, त्यांनी मला बदडून काढले. ते मला म्हणाले होते, *"तू कोण आहेस हे बिलकूल महत्त्वाचे नाही; पण तू कसा आहेस हे फार महत्त्वाचे आहे.आयुष्यभर माझे हे वाक्य स्मरत राहा."*

"तेव्हापासून मी वडिलांचे शब्द स्मरत आलो आहे. मला हे पटले आहे की,
खरोखरच आपण कोण आहोत हे महत्त्वाचे नसतेच. आपण कसे आहोत यावर आपली किंमत ठरते. जगात जेवढे थोर पुरुष होऊन गेले, सगळे साधेच होते."

'या उत्तुंग उद्योगपतीचे नाव 

*रतन टाटा.* 

खरंच,जगात जेवढी उत्तुंग
माणसे होऊन गेली ती सगळी बोलायला, वागायला अत्यंत साधी कुठलीही गुंतागुंत नसलेली अशी असतात. खरेतर साधे राहणे, हेच कठीण असते. व्यक्तींच्या जीवनाचे आपण अनुकरण करायला हवे.    


   
कृपया पोस्ट वाचून झाल्यानंतर नक्की शेअर करा आपल्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप ग्रुप वर नक्की शेअर करा हो कमेंट करायला विसरू नका
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


शनिवार, १३ जून, २०२०

जून १३, २०२०

टी.एन्.शेषन्

*टी.एन्.शेषन् भारताचे मुख्यनिवडणूक आयुक्त होते.त्ंच्या जीवनात घडलेला प्रसंग !*
एकदा ते आपली पत्नी जयलक्ष्मी शेषन् यांच्याबरोबर फिरायला बाहेर पडले होते.उत्तरप्रदेशातल्या एका सुंदर रस्त्यावरून गाडी जात होती.रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी होती.वर्दळीचा रस्ता नसल्यामुळे की काय ,पक्ष्यांची अनेक ,सुंदर घरटी झाडांची शोभा वाढवत होती.
जयलक्ष्मी यांना हे दृष्य खूप आवडलं .त्यांना वाटायला लागलं आपल्या घराच्या बागेसाठी यातली दोन घरटी नेली ,तर बाग किती शोभून दिसेल.त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली.
गाड्या थांबल्या.त्यांच्यासाठी जे संरक्षक पोलीस दल होते ,ते इकडे तिकडे शोधायला लागले.तिथे एक मुलगा गुरं चरायला आला होता.त्याला बोलावलं.तो सरकारी इतमाम पाहून कोणीतरी मोठी अधिकारी व्यक्ति आलीय ,हे त्यानी ओळखलंच.त्यांनी मुलाला दोन घरटी काढून आणायला सांगितली ,आणि प्रत्येक घरट्याचे १० रु.देऊ असंही सांगितलं.त्या मुलानं खाली मान घालून नकारार्थी मान हलवली. "दहा रुपये कमी वाटतायंत का ,५०रुपये देऊ प्रत्येक घरट्याचे."
यावर तो मुलगा म्हणाला ,"सरजी,पैशाचा सवालच नाहीए .कितीही पैसे दिलेत तरी ती घरटी मी झाडावरून उतरवणार नाही."
"का रे बाबा?"
*"त्यात पक्ष्याची पिल्लं शांतपणे आणि विश्वासानी झोपली आहेत.सायंकाळी त्यांची आई चोचीत दाणे घेऊन पिल्लांच्या ओढीनं येईल ,पिल्लं सापडली नाहीत तर ती सैरभैर होईल ,आक्रोश करेल,ते माझ्याच्यानं पाहवणार नाही.कोणाचं घर मोडायचं पाप आहे ना सर जी."*
हे ऐकून शेषन् व त्यांची पत्नी थक्क झाले.
शेषन् म्हणाले ,"कोणीतरी डोळ्यात अंजन घातल्यासारखं वाटलं. *माझं पद ,माझी पदवी ,उच्च शिक्षण सार्‍या सार्‍याचा अभिमान क्षणार्धात गळून पडला ,वितळून गेला.जे शिक्षण , संस्कृती आणि संस्कार या मुलानं निसर्गाकडून शिकलेत. ते शिक्षण कोणत्याच विद्यापीठात मिळणार नाही."*

कृपया पोस्ट वाचून झाल्यानंतर अधिकाधिक शेअर करा व इतरांनाही वाचनाचा आनंद घेऊ द्या. धन्यवाद
जून १३, २०२०

रतन टाटा यांचे विचार

*************************
*उद्योग रत्न मा.रतनजी टाटांनी लंडन मध्ये दिलेल्या व्याख्यानातील सुंदर ओळी!*

✍🏻1. श्रीमंत होण्यासाठी तुमच्या मुलांना शिकवू नका तर त्यांना आनंदी राहण्यासाठी शिकवा ज्यामुळे मोठ झाल्यावर त्यांना वस्तूंचं महत्त्व आणि मूल्य कळेल किंमत नाही.
2. 🌷तुमचं जेवण तुम्ही तुमचं औषध समजून घ्या नाहीतर औषधच तुम्हाला जेवण म्हणून घ्यावं लागेल.
3. 🌷जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते ती तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही कारण तुम्हाला सोडून जाण्याची शंभर जरी कारणं असली तरीही त्या व्यक्तीला एकच कारण असं सापडेल की ज्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला सोडून जाणार नाही.
4. 🌷मानव असणं आणि मानवता असणं या मध्ये खूप फरक आहे.
5. 🌷ज्या वेळी तुमचा जन्म होतो त्यावेळी तुमच्या वर प्रेम केलं जातं आणि ज्यावेळी तुम्ही मृत व्हाल त्या वेळी ही तुमच्या वर प्रेम केलं जाईल. मधील काळात तुम्हाला असच चालवून घ्यावं लागेल.
6. 🌷तुम्हाला वेगात चालायच असेल तर एकटं चाला पण दूरवर चालत जावे लागणार असेल तर एकत्र चाला.
7. 🌷जगातील सर्वात चांगले सहा डॉक्टर १) सूर्यप्रकाश २) विश्रांती ३) व्यायाम ४) योग्य आहार ५) आत्मविश्वास ६) मित्र.......
     आयुष्याच्या सगळ्या टप्प्यांवर यांना सांभाळा आणि आरोग्यदायी जीवन जगा.
8. 🌷जेव्हा तुम्ही चंद्र पाहता त्यावेळी तुम्ही देवाचं सौंदर्य पाहता, जेव्हा तुम्ही सूर्य पाहता त्या वेळी तुम्ही देवाचं सामर्थ्य पाहता,ज्यावेळी तुम्ही आरसा पाहता त्यावेळी तुम्ही परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती पाहता.... म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा!
     आपण सगळे जण प्रवासी आहोत आणि परमेश्वर हा या प्रवासाचा प्रतिनिधी(एजंट) आहे त्यानं आपला सर्व मार्ग आणि आपला अंतिम मुक्काम आधिच ठरवलेला आहे म्हणूनच त्याच्यावर विश्वास ठेवा आणि हे जीवन ही एक सहल समजून आनंद घ्या!

        🍁 🙏🙏🍁😊


कृपया वाचून झाल्यानंतर शेअर करा. इतरांनाही वाचनाचा आनंद घेऊ द्या व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद