माझ्या मराठीची गोडी

वाचकांना वाचनाची एक पर्वणी मिळावी . मराठी भाषेची गोडवी कळावी यासाठी केवळ हा एक प्रयत्न आहे कुणाला काही शंका असल्यास कृपया राग व्यक्त न करता कमेंटमध्ये सांगा व योग्य ते मार्गदर्शनही करा .

Breaking

रविवार, ३१ मे, २०२०

पुस्तकांचा दवाखाना

📌💊❤️✍🏻🔏🧰 🔦🩸🩺
*महाराष्ट्रातील पहिला पुस्तकांचा दवाखाना रायपूर येथे सुरू* - *वेच्या गावित.*
   
     आज दिनांक ८ मार्च २०२० राेजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नंदुरबार जिल्हयाच्या नवापुर तालुक्यातील रायपूर या गावी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत गावातील साै. पुष्पा गावित, साै.नैना गावित, साै. सुमित्रा गावित या महिलांचा साै. बेबी जयराम गावित -- माता पालक संघ अध्यक्षा यांच्या हस्ते शाल,श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. 
   या दिनाचे आैचित्य साधून शाळेत *'पुस्तकांचा दवाखाना'* या नवीन उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. 
   *पुस्तकांचा दवाखाना ही  संकल्पना काय आहे?* जाणून घेवूया...... 
   रायपूर हे हजार बाराशे लाेकवस्ती असलेले गाव आहे. गावात रस्त्यालगत जिल्हा परिषदेची केंद्र शाळा आहे. या शाळेतून शिकून गेलेले माजी विदयार्थी अनेक पदांवर काम करत आहे. काही शेतीव्यवसायात यशस्वी हाेतांना दिसत आहे. गावात डी. एड. एम. ए. बी. एड. झालेले काही तरूण ही आहेत.  
 वेच्या रूध्या गावित यांनी पंधरा दिवसापूर्वी अशा सुशिक्षित तरूणांपैकी अल्पेश गावित याला *पुस्तकांचा दवाखाना* या कल्पनेविषयी समजावून दिले हाेते. 
   आज जागतिक महिला दिनानिमित्ताने प्रत्यक्ष या कल्पनेचा शुभारंभ करायचा हाेता. शाळेत मुख्याध्यापक शालिम सर, देसाई मॅडम. विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सदस्य, अधिकारी ग्रामस्थ, माजी विदयार्थी उपस्थित हाेते. आज आपल्या शाळेत पुस्तकांचा दवाखाना चालवणारे डॉक्टर साहेब अर्ध्या- एक तासात येणार आहे. असे वेच्या गावित यांनी सांगितल्यावर सर्व विचार करायला लागले? काही जण विचारत हाेते की, मुलांची पुस्तके दवाखान्यात घेवून जायचे का? की डॉक्टरांची आरोग्य विषयक पुस्तके असतात ती मुलांना वाटायची? नेमके काय आहे? पुस्तकांचा दवाखाना चालवतात? ते डॉक्टर काेण आहे? त्यांचे शिक्षण किती असेल? कुठून येणार असतील? अशी आपआपसात चर्चा सुरू हाेती. सर्व जण कुतूहलाने डॉक्टरांची वाट पहात हाेते? सर्वांची उत्सुकता शिगेला पाेहचल्यानंतर डॉक्टर अल्पेश गावित हे बाईकवर दवाखान्याचा बॉक्स घेवून शाळेत आले. सर्वांनी त्यांना पाहून अरे हे का? डॉक्टर ! या ..या तुमचीच आम्ही वाट पहात हाेताे. डॉक्टरांनी पुस्तकांचा दवाखाना लिहिलेला बॉक्स विद्यार्थ्यांसमाेर ठेवला. या *पुस्तकांचा दवाखाना* काय आहे? या कल्पनेविषयी वेच्या गावित यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केले. हे ऐकून सर्वांना खूप आश्चर्य वाटले.आम्हाला वाटले खराेखरच एखाद्या आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना बाेलवले आहे की काय? छान कल्पना आहे. डॉक्टर अल्पेश गावित यांनी कु. अशप्रित गावित इयत्ता पहिली याच्या जास्त फाटलेला 'शिकूया आनंदे' या पुस्तकावर तातडीने इलाज केला. कारण ही केस अतितात्काळ हाेती. त्वरित इलाज करणे अपेक्षित असल्याचे डॉक्टर अल्पेश गावित यांनी सांगितले. डॉक्टरांनी ही केस पहिली घेतली. चिकटपट्टी लावून, फेविकॉलने पुस्तक चांगले चिकटवून दिले.अशप्रित च्या पुस्तकावर उपचार केल्याने ताे खूप आनंदीत झाला हाेता. नंतर 
ग्रेसी, राेशनी, स्नेहल, अमिंदा, शमिंदा या मुलांच्या फाटक्या पुस्तकांवर इलाज केला. कुठलीही फि न आकरता, पुस्तकांवर माेफत उपचार केले. या प्रसंगी उपस्थित मान्यवर यांची मनाेगते........पाहूया. 
🩸 *मा. श्री.रिनेश गावित साहेब नायब तहसीलदार तळाेदा* यांनी अल्पेश गावित यांचे काैतुक करून अभिनंदन केले. वेच्या गावित यांनी हा उपक्रम आपल्या गावातील शाळेसाठी सुचवल्याबद्दल विशेष आभार मानले. आणि शाळेच्या विकासासाठी १०, ०००/रूपये  देणगी दिली. 
 🩸 *मा. श्री.अनिल वळवी साहेब. सेल टैक्स ऑफिसर धुळे* यांनी पुस्तकांचा दवाखाना हा उपक्रम अतिशय नाविण्यपूर्ण असून याचा उपयाेग शिक्षणक्षेत्राला सातत्याने हाेत राहणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ रायपूरच्या जिल्हा परिषद शाळेतून हाेत आहे. याचे साक्षीदार आम्हाला हाेता आले. वेच्या गावित सर व डॉक्टर अल्पेश गावित यांचे मनपूर्वक अभिनंदन.
 🩸 *श्री. सुहास गावित सर माध्यमिक शिक्षक सिन्नर,नाशिक* - हा उपक्रम इतरांनी शाळेत राबविण्यासाठी प्रेरणा देणारा आहे. जूनपासून मीही हा उपक्रम राबवणार आहे. 
  🩸 *साै. पुष्पा रिनेश गावित माध्य. शिक्षिका वनिता विद्यालय नवापूर* --- हा उपक्रम मुलांच्या आवडीचा असून त्यांच्यावर सुसंस्कार करणारा असल्याचे सांगितले. 
 🩸 *साै. सुमित्रा वेच्या गावित* शिक्षणक्षेत्रात दाेरी वाचन सारखा हा उपक्रम देखील अतिशय नाविण्यपूर्ण आहे. 
 🩸 *साै. बेबी जयराम गावित माता पालक संघ अध्यक्ष* -- पुस्तकांचा दवाखाना सुरू झाल्याने मुले पुस्तके चांगले सांभाळतील. कागद फाटू नये म्हणून नेहमी काळजी घेतील ही शिकवण लहानपणीच मिळत आहे. 
 🩸 *डॉक्टर अल्पेश गावित  पुस्तकांचा दवाखाना रायपूर.*--- मला ही कल्पना वेच्या सरांनी सांगितल्यावर मी लगेच हाेकार दिला. साहित्याची जमवाजमव करून बॉक्स तयार केला. पुस्तकांचा दवाखाना सुरू करतांना मला खूप आनंद हाेत आहे. परंतु पेशंट वाढू नये म्हणजे मुलांनी पुस्तके जास्त फाडू नये. माझा दवाखाना जास्त चालला नाही तरी चालेल. आठ दहा किंवा पंधरावीस दिवसांनी मी स्वतः शाळेत येवून पुस्तके चांगली करून देईन. मुलांनी भरपूर पुस्तके हाताळावी. खूप शिकावे आणि माेठे व्हावे यासाठी माझी तळमळ आहे. तुम्ही सर्वांनी उपस्थित राहून मला प्राेत्साहन दिले त्याबद्दल सर्वांचे आभार. 
🩸 *श्री. शालिम सर मुख्याध्यापक रायपूर* -- माझ्या नाेकरीच्या २५ वर्षात सेवाकाळात मी पाहिलेला हा पहिलाच सुंदर उपक्रम आहे. माझ्या जीवनात ह्या क्षणांना मी कधीच विसरणार नाही. रायपूरच्या ग्रामस्थांचे सहकार्य पाहून मी भारावून गेलाे आहे. 
एका डी. एड. झालेल्या शिक्षकालाही डॉक्टर हाेता येते ही या उपक्रमाची ताकत आहे. शिक्षक ही दवाखाना काढू शकताे हे आज समजले. 
    आमच्या रायपूर गावातील अल्पेश रमेश गावित हा पंचवीशीतील तरूण अतिशय आनंदी, उत्साही शिक्षणक्षेत्राची प्रचंड आवड असणारा आहे. विशेषत:ताे डी. एड. असल्याने त्याला मुलांशी नाते जाेडायला आवडत असलेला आहे. त्याचे हे गुण याच गावातील वेच्या रूध्या गावित. विषय सहाय्यक मराठी प्रादेशिक विद्या प्राधिकरण, मुंबई यांच्या लक्षात आले. अल्पेश गावित याच्याकडील ज्ञानाचा उपयाेग आपल्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना व्हावा. ह्या उद्देशाने *पुस्तकांचा दवाखाना* सुरू करण्याचे ठरले. अल्पेश गावित डी. एड. असला तरी त्याने डॉक्टर बनावे आणि एक बॉक्स बनवून त्याने त्यात लहानमाेठ्या कातरी,(कैची) फेविकॉल, सुई दाेरा, चिकट पट्टी (सेलाे टेप), स्टॉपलर, पिना, पट्टी, दाभण, इत्यादि वस्तू खरेदी करून ठेवाव्या. शाळेच्या दिवशी शाळेत जावून ज्या विद्यार्थ्यांची पुस्तक ,वही फाटलेली आहे ती त्याने स्वत: शिवून द्यायची. पुस्तके दुरूस्ती करून दिली की ती मुलांनी व्यवस्थित सांभाळायची असा हा नवीन विचार हाेता. ताे आज जागतिक महिला दिनानिमित्ताने प्रत्यक्ष अंमलात आणला. या कल्पनेच्या शुभारंभ प्रसंगी रायपूर गावातील अनेक मान्यवर उपस्थित हाेते. 
    मुख्याध्यापक शालिम सर व देसाई मॅडम यांनी रविवार सुट्टीचा दिवस असूनही शाळेत उपस्थित आले हाेते.ज्या मुलांची पुस्तके हाताळून फाटलेली हाेती अशा मुलांना शाळेत बाेलवण्यात आले हाेते. आज रविवार सुट्टीचा दिवस असूनही मुले आवडीने शाळेत आले हाेते. 
   *महाराष्ट्रातील पुस्तकांचा पहिला दवाखाना'* रायपूर येथे सुरू झाल्यामुळे सगळ्यांना वेगळा आनंद देवून गेला.सस्नेह भाेजनानंतर आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री.फिलीप गावित शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांचे विशेष सहकार्य लाभले. *पुस्तकांच्या दवाखान्याचा* उपयाेग यापुढे रायपूर केंद्र शाळेअंतर्गत येणा-या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना हाेणार आहे. 
  
                       *वेच्या गावित*
                               रायपूर.
         तालुका नवापुर जिल्हा नंदुरबार.
    📧 vechya@gmail.com
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 कृपया पोस्ट वाचून झाल्यावर कमेंट नक्की करा तसेच सबस्क्राइब करायला विसरू नका व नक्की फॉरवर्ड करा , म्हणजे अधिकाधिक लोकांना पोस्ट वाचायला मिळेल
धन्यवाद


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..