माझ्या मराठीची गोडी

वाचकांना वाचनाची एक पर्वणी मिळावी . मराठी भाषेची गोडवी कळावी यासाठी केवळ हा एक प्रयत्न आहे कुणाला काही शंका असल्यास कृपया राग व्यक्त न करता कमेंटमध्ये सांगा व योग्य ते मार्गदर्शनही करा .

Breaking

व्यक्तिमत्व विकास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
व्यक्तिमत्व विकास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २ ऑगस्ट, २०२०

ऑगस्ट ०२, २०२०

वाचनीय लेख - आत्मविकास

readfist.blogspot. com

  गोष्ट क्रमांक एक

   प्रलोभनाचा क्षण

    एका शाळेचे  शिक्षक निवृत्त झाले . मग शासनाने तालुक्यातून नवीन शिक्षक नेमला. शिक्षक शाळेत रुजू होण्यासाठी एसटी बसने गेले, कंडक्टरला पैसे दिले..आणि ते  जागेवर बसले .कंडक्टरने तिकिटाचे पैसे घेतले आणि बाकीचे शिक्षकांना परत केले .
   दुर्बद्धी ते मना।कदा नुपजे नारायणा।।{तु}

        शिक्षकाने विचार केला की आता कंडक्टर घाईत आहे. थोड्या वेळाने पैसे परत करू, थोडा वेळ झाला तरी कंडक्टर अजूनही कामात  होता. शिक्ष काना वाटले  असे गृहीत धरू की 10 रुपयांनी फायदा झाला. चला त्याचा काही चांगला उपयोग करूया.
     हा संघर्ष शिक्षकाच्या मनात चालू असतानाच शाळा आली. एसटीतून बाहेर पडत असताना अचानक शिक्षकाचा हात त्याच्या खिशात गेला. त्यातून 10 रुपयांची नोट बाहेर आली आणि ती कंडक्टरला परत केली.
           कंडक्टर हसला आणि म्हणाला, "गुरुजी! तुम्ही या गावाचे नवीन शिक्षक आहात का?" शिक्षक म्हणाले हो..त्यावर कंडक्टर बोलू लागले,गुरुजी,मी मुद्दाम  10रु जास्त दिले होते.ज्या वर्गात राष्ट्र घडते ते मला खरोखर पाहायचे होते. त्या वर्गाचा शिल्पकार जसे बोलतो तसे तो शिकवतो तसे वागतो का?
म्हणुन मी मुद्दाम 10रु जास्त दिले होते.मला आता कळून चुकले आहे की या गावांने ही कोवळी मुल ज्याच्या ताब्यात दिली आहेत.ती नक्कीच घडणार .'गुरुजी मला क्षमा करा!एवढे बोलून कंडक्टरने बेल वाजवली........
    गुरुजींना आता घाम फुटला होता. त्याने आकाशाकडे बघितले आणि म्हणाला, देवा, मला 10 रुपयांचा किती मोह झाला होता . देवा, तू खरोखर दयाळू आहेस. तुम्ही कामाच्या पहिल्या दिवशी माझी चाचणी घेतली आणि मला पात्र केले!
    "स्वार्थ, मोह, वाईट आहे. ज्या क्षणी मोह मनाला व्यापून टाकतो, ज्या क्षणी मनुष्य अधोगतीमध्ये फेकला जातो..

    गोष्ट क्रमांक 2

             खांदा ....

मृत व्यक्तीला खांदा देण्याचे काम कितीही पवित्र आणि परोपकारी असले तरी, मृत व्यक्तीला त्याचा काही उपयोग नाही ...

पण किती माणसांना खांदा देण्यात आला आहे यापेक्षा किती  लोकांना हात  देण्यात आला आहे यावर आपली मानवता अवलंबून आहे ....

एखादी व्यक्ती मेली आहे हे कळल्यावर धावून जाणारे लोक, _
तो जिवंत असताना, तो संकटात असताना धावून का जात नाही .. ??

किंबहुना, लोकांनी मृत्यूनंतर धावणे निरुपयोगी आहे, कारण तुम्ही गेला नाही तरी लोक त्याला जाळल्याशिवाय राहणार नाहीत....... पण ही व्यर्थ धावपळ करणारेच खूप आहेत ...
खरं तर, आजच्या खोट्या ढोंगांच्या शर्यतीत, तुम्ही मोठे आहात की मी मोठा, ही क्षणिक संपत्ती माणसाला, माणसाला, माणसापासून दूर नेत आहे .
जीवंतपणी,
जिवंत माणसासाठी 
जिवंत असणाऱ्या,
अडचणीत सापडलेल्या ,
एकाला तरी आयुष्यात खरा हात द्या..
झालं गेलं विसरून, माणुस व्हा
मरेपर्यंत त्याचा अभिमान वाटेल.........,

बुधवार, २४ जून, २०२०

जून २४, २०२०

मी कसा आहे

www.readfist.blogspot.com    कृपया लेख पूर्ण वाचा आपले सर्व व्यर्थ अहंकार गर्विष्ठपणा नक्की गळून पडेल याची 100% खात्री देतो                                                                                      *मी कसा आहे?*


         आपल्याच देशातल्या एका सुप्रसिद्ध उद्योगपतींची ही कहाणी आहे. एक दिवस हे उद्योगपती सकाळी तयार होऊन कामाला जाण्यासाठी निघाले होते. तेवढ्यात त्याच्या समोर घरमालक येऊन उभा राहिला. "आज कसं येणं झालं ?" उद्योगपतींनी त्या माणसाला विचारले. कामाच्या नादात ते विसरून गेले होते की,समोर त्यांचा घरमालक उभा आहे.घरमालक विनम्रपणे म्हणाला, "मी भाडं वसूल करायला आलो आहे. दर महिन्याला तुम्ही पाठवता. यावेळेला कामाच्या गडबडीत राहन गेलेलं दिसतं." उद्योगपती वरमले आणि म्हणाले, "हे घ्या तुमचं घरभाडं. उशीर झाल्याबद्दल क्षमा करा." एवढे बोलून उद्योगपतींनी खिशात हात घालून पैसे काढले व घरमालकाला दिले.घरमालक   उद्योगपतींलना म्हणाला," तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून भाड्याच्या घरात राहता,याचे मला आश्चर्य वाटते." यावर उद्योगपती हसले व
म्हणाले, "मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे याला महत्त्व आहे. माझ्या
काही तत्त्वांमुळे मी भाड्याच्या घरात राहतो." घरमालक काही समजला नाही.तो भाडे घेऊन निघून गेला.

     हा प्रसंग त्या उद्योगपतींचा ड्रायव्हर पाहत होता. उद्योगपती गाडीत बसले व आपल्या परदेश प्रवासासाठी तिकीट काढायला एका एअरलाईनच्या  ऑफिसात गेले. तिथे बरीच गर्दी होती. उद्योगपती एका सामान्य माणसासारखे रांगेमध्ये उभे राहिले, तेवढयात एअरलाईनच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहिले, ते घाईने पुढे आले आणि म्हणाले,"सर, तुम्ही रांगेत का उभे आहात? आम्ही तुमचे तिकीट काढून तुम्हाला आणून देतो. तुम्ही समोरच्या सोफ्यावर आरामात बसा.तुम्ही रांगेत उभे राहून आम्हाला लाजवू नका.उद्योगपती म्हणाले, "आत्ता मी उद्योगपती म्हणून इथे उभा नाही, तुम्ही एवढी धावपळ करण्याची आवश्यकता नाही. उद्योगपती हे माझ्या नावासमोर लावलेले विशेषण आहे. मी कोण आाहे यापेक्षा मी कसा आहे? हे अधिक महत्त्वाचे आहे." एअरलाईनचा स्टाफ हे उत्तर ऐकून चकित झाला. 

       तिकीट काढून उद्योगपती आपल्या ऑफिसकडे निघाले. रस्त्यात त्यांना अनेक माणसे धावतपळतआपापल्या कार्यालयाकडे जाताना दिसली. त्यांना लाज वाटली की, आपण एवढ्या अलिशान गाडीमधून एकटे प्रवास करीत आहोत. सामान्य माणसे मात्र किती कष्टाने ऑफिसला पोहोचतात. त्या दिवसापासून त्यांनी आपल्या गाडीत लोकांना लिफ्ट द्यायला सुरुवात केली. लिफ्ट मिळालेल्या लोकांचा आनंद पाहून उद्योगपतींना समाधान वाटायचे.

       एके दिवशी हे उद्योगपती परदेश प्रवासासाठी निघाले होते.त्या दिवशी एक प्रसंग घडला. हवाई सुंदरीच्या हातून त्यांच्या अंगावर चुकून पेय पडले.त्यामुळे ती घाबरली.तिने पाणी व कपडा आणून त्यांचा ड्रेस स्वच्छ केला.ती त्यांना ओळखत असल्याने तिने शतदा त्यांची क्षमा मागितली. तिला भीती वाटत होती की, या चुकीबद्दल तिला शिक्षा घडणार उद्योगपतींनी तिच्याकडे पाहिले व तिला विचारले, "तू माझ्या अंगावर काय सांडलेस ?'" हवाई सुंदरी भीत भीत म्हणाली, "माझ्या हातून तुमच्या कपड्यांवर फळांचा रस सांडला, मला क्षमा करा.उद्योगपती हसले व म्हणाले, "पुढच्या वेळेला माझ्या अंगावर सोडा,व्हिस्की सांड.", उद्योगपतींचे बोलणे ऐकून हवाई सुंदरी खुदुकन हसली. तिच्या मनावरचा सगळा ताण एका क्षणात उतरला.

असे अनेक प्रसंग उद्योगपतींच्या ड्रायव्हरने पाहिले होते.त्याची उत्सुकता चाळविली गेली. तो उद्योगपतींना म्हणाला, "साहेब, तुम्हाला इतके साधे राहणे व वागणे कसे काय जमते ?आम्ही तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतो. तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून तुम्ही किती साधे जगता??."
उद्योगपती म्हणाले, "अरे, मी लहान असताना फार उद्दाम होतो. मला सांभाळायला एक दाई होती. एकदा माझ्या मनाविरुद्ध काही घटना घडली तेव्हा मी तिला चक्क लाथ मारली होती. ते पाहून माझे वडील एवढे संतापले होते की, त्यांनी मला बदडून काढले. ते मला म्हणाले होते, *"तू कोण आहेस हे बिलकूल महत्त्वाचे नाही; पण तू कसा आहेस हे फार महत्त्वाचे आहे.आयुष्यभर माझे हे वाक्य स्मरत राहा."*

"तेव्हापासून मी वडिलांचे शब्द स्मरत आलो आहे. मला हे पटले आहे की,
खरोखरच आपण कोण आहोत हे महत्त्वाचे नसतेच. आपण कसे आहोत यावर आपली किंमत ठरते. जगात जेवढे थोर पुरुष होऊन गेले, सगळे साधेच होते."

'या उत्तुंग उद्योगपतीचे नाव 

*रतन टाटा.* 

खरंच,जगात जेवढी उत्तुंग
माणसे होऊन गेली ती सगळी बोलायला, वागायला अत्यंत साधी कुठलीही गुंतागुंत नसलेली अशी असतात. खरेतर साधे राहणे, हेच कठीण असते. व्यक्तींच्या जीवनाचे आपण अनुकरण करायला हवे.    


   
कृपया पोस्ट वाचून झाल्यानंतर नक्की शेअर करा आपल्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप ग्रुप वर नक्की शेअर करा हो कमेंट करायला विसरू नका
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


मंगळवार, २३ जून, २०२०

जून २३, २०२०

तत्वनिष्ठ बाप...शरदराव

*कृपया कितीही Busy असाल तरी,*
*ही पोस्ट एकदा नक्की वाचा अगदी निवांत तुमच्या जिवनात 1000% फरक पडनार* 🙏
              पोस्ट चे लेखक माहीत नाहीत .
      
            *तत्त्वनिष्ठ*
 
"अहो ऐकलंत का? राहूलचा डबा नेऊन देता का जरा कंपनीत?"

"का राहूलने नेला नाही डबा?" शरदरावांनी विचारलं.

" आज राहूलच्या कंपनीचे चेअरमन येत आहेत म्हणून राहूल सकाळी सातलाच गेलाय कंपनीत."त्यामुळे सकाळी लवकर  डबा तयार नाही झाला.

"ठीक आहे. देतो मी नेऊन."
शरदरावांनी हातातला पेपर बाजूला ठेवला आणि ते कपडे घालण्यासाठी आतमध्ये गेले.
पुष्पाबाईंनी सुटकेचा निःश्वास सोडला.

शरदराव तयार झाले म्हणजे त्यांचा आणि राहूलचा झालेला वाद त्यांनी ऐकला नव्हता. वाद कसला, राहूलचं नेहमीप्रमाणे आपल्या वडिलांवर आगपाखड करणं आणि पुष्पाबाईंचं नवऱ्याची बाजू घेणं. विषयही तोच 'वडिलांनी आमच्यासाठी काही केलं नाही.' काय केल माझ्यासाठी बापाने हा चुकीचा समज त्याच्या मनात रुजला होता,

"आई माझ्या मित्राचे वडीलही शिक्षक होते, पण किती मोठा बंगला बांधलाय् बघ. नाहीतर नाना! अजूनही आम्हांला भाड्याच्या घरात ठेवत आहेत."
राहूल तावातावाने बोलत होता.

"राहूल तुला माहीत आहे की नाना घरात मोठे. त्यामुळे दोन बहिणी आणि दोन भावांची लग्नं त्यांनाच करावी लागली. शिवाय तुझ्या बहिणींची लग्नंही त्यांनीच केली. आपल्या शेताच्या कोर्टकचेऱ्या सुरू होत्या. अशा सगळ्या जबाबदाऱ्या होत्या. कुणी पार पाडल्या त्या?"

 "काय उपयोग झाला त्याचा?त्यांचे भाऊबहीण बंगल्यात राहात आहेत. कधीतरी वाटतं का त्यांना की आपला भाऊ आपल्यासाठी खस्ता खाताना साधं घर बांधू शकला नाही तर आपण त्याला घर बांधून द्यावं?"

क्षणभर पुष्पाताईच्या डोळ्यातून पाणी आले, काय बोलावं जन्म दिलेला मुलगा बापाने काय केले माझ्यासाठी विचारतोय . मग म्हणाल्या,
"तुझ्या वडिलांनी त्यांचं कर्तव्य केलं. भावाबहिणींकडून कधीही अपेक्षा बाळगली नाही."

"राहूल मुर्खा सारखे म्हणत होता बरं ते ठीक आहे. हजारो मुलांच्या नानांनी ट्युशन्स घेतल्या. त्यांच्याकडून जर फी घेतली असती तर आज नाना पैशात लोळले असते. आजकालचे क्लासवाले पाहा. इंपोर्टेड गाड्यांत फिरतात."

"हे तू बरोबर म्हणतो आहेस. पण नानांचं तत्त्व होतं, ज्ञानदानाचे पैसे घ्यायचे नाहीत म्हणून. या त्यांच्या तत्त्वामुळेच तर ते किती प्रसिद्ध होते. किती पुरस्कार मिळाले आहेत त्यांना कल्पना आहे तुला?"

ते ऐकताच राहूल एकदम संतापला. "काय चाटायचे आहेत ते पुरस्कार आई? त्या पुरस्कारांनी घर थोडीच बांधता येतं? पडले आहेत धूळ खात!कोणी विचारत नाही त्यांना!"

तेवढ्यात दार वाजलं. राहूलने दार उघडलं तर शरदराव उभे होते. वडिलांनी आपलं बोलणं ऐकलं तर नाही ना या भीतीने राहूलचा चेहरा उतरला. पण शरदराव न बोलता आत निघून गेले आणि तो वाद तिथंच संपला.
हे होते पुष्पाताई व राहूलचे कालचे  भांडण , पण आज 
शरदरावांनी सायकलला डबा अडकवला आणि भर उन्हात ते औद्योगिक वसाहतीतल्या राहूलच्या कंपनीकडे निघाले. सात किलोमिटरवरच्या कंपनीत पोहचता पोहचता त्यांना चांगलीच धाप लागली होती. कंपनीच्या गेटवर पोहचल्यावर सिक्युरिटी गार्डने त्यांना अडवलं.

"राहूल पाटील साहेबांना डबा द्यायचा होता. जाऊ का आत?"

"आता नाही देता येणार.." गार्ड म्हणाला, "चेअरमनसाहेब आलेत. त्यांच्यासोबत मिटींग सुरू आहे. कोणत्याही क्षणी ते मिटींग संपवून बाहेर येतील. तुम्ही बाजूला थांबा. चेअरमनसाहेबांना तुम्ही दिसायला नको."

शरदराव थोड्या दूर अंतरावर उन्हातच उभे राहिले. आजूबाजूला कुठेही सावली नव्हती. थोडा वेळ म्हणता म्हणता एक तास उलटून गेला. पाय दुखायला लागले म्हणून शरदराव तिथेच एका तापलेल्या दगडावर बसणार तोच गेटचा आवाज आला. बहुदा मिटींग संपली असावी.

चेअरमनसाहेबांच्या पाठोपाठ अधिकारी आणि त्यांच्यासोबत राहूलही बाहेर आला. उभ्या असलेल्या वडिलांकडे पाहून तो मनात चरफडला.

चेअरमनसाहेबांनी गाडीचं दार उघडलं आणि बसता बसता त्यांचं लक्ष शरदरावांकडे गेलं. गाडीत न बसता ते तसेच बाहेर थांबले.

"ते समोर कोण उभे आहेत?" त्यांनी सिक्युरिटीला विचारलं.

"आपल्या राहूल साहेबांचे वडील आहेत. जेवणाचा डबा द्यायला आलेत." सिक्युरिटीने घाबरल्या आवाजात सांगितलं.

"बोलवा त्यांना."

नको ते घडलं होतं. राहूलच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. संताप आणि भीतीने डोकं फुटेल असं त्याला वाटू लागलं.

सिक्युरिटीने आवाज दिल्यावर शरदराव जवळ आले. चेअरमनसाहेब पुढे होऊन त्यांच्याजवळ गेले.

"तुम्ही पाटील सर ना? डी.एन. हायस्कूलमध्ये तुम्ही शिक्षक होता?"

"हो. तुम्ही कसं ओळखता मला?"

काही कळायच्या आत चेअरमनसाहेबांनी शरदरावांचे पाय धरले. सगळे अधिकारी आणि राहूलही ते दृश्य पाहून अवाक् झाले.

"सर, मी अतिश अग्रवाल. तुमचा विद्यार्थी होतो. बघा तुम्ही मला घरी शिकवायला यायचात."

"हो. हो. आठवलं. बाप रे बरेच मोठे झालात की तुम्ही..."

चेअरमन हसले. मग म्हणाले, "सर तुम्ही इथे उन्हात काय करताय? चला आतमध्ये बसू. खूप गप्पा मारायच्यात तुमच्याशी. सिक्युरिटी तुम्ही यांना आत का नाही बसवलंत?" सिक्युरिटीने शरमेने मान खाली घातली.

ते पाहून शरदरावच म्हणाले, "त्यांची काही चूक नाही. तुमची मिटींग चालू होती. तुम्हांला त्रास नको म्हणून मीच बाहेर थांबलो."

"ओके... ओके...!"
चेअरमनसाहेबांनी शरदरावांचा हात धरला आणि ते त्यांना आपल्या आलिशान चेंबरमध्ये घेऊन गेले. "बसा सर." आपल्या खुर्चीकडे बोट दाखवत चेअरमन म्हणाले.

"नाही. नाही. ती खुर्ची तुमची आहे." शरदराव गडबडून म्हणाले.

"सर, तुमच्यामुळे ती खुर्ची मला मिळालीय्. तेव्हा पहिला हक्क तुमचा."

चेअरमनसाहेबांनी बळजबरीनेच त्यांना आपल्या खुर्चीत बसवलं.

"तुम्हांला माहीत नसेल पवार सर.." जनरल मॅनेजरकडे पाहत चेअरमन म्हणाले, "पाटील  सर नसते तर आज ही कंपनी नसती आणि मी माझ्या वडिलांचं धान्याचं दुकान सांभाळत बसलो असतो."

राहूल आणि जी.एम. दोघंही आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिले.

"शाळेत असताना मी अतिशय 'ढ' विद्यार्थी होतो. कसाबसा ढकलत शाळेने मला नववीपर्यंत आणलं. शहरातल्या सर्वोत्तम क्लासेसमध्ये मला टाकलं गेलं. पण मला शिकण्यातच गोडी नव्हती. त्यातून श्रीमंत बापाचा लाडका लेक. दिवसभर शाळेत माऱ्यामाऱ्या करायच्या. आणि संध्याकाळी क्लासेस चुकवून मुव्ही पाहायच्या हे माझे उद्योग. आईला ते सहन होईना. त्या वेळी पाटील सर कडक शिस्तीचे आणि उत्कृष्ट शिकवणारे म्हणून प्रसिद्ध होते. आईने त्यांच्याकडे जाऊन मला शिकवण्याची विनंती केली. पण सरांच्या छोट्याशा घरात बसायला जागा नव्हती, म्हणून सरांनी नकार दिला. आईने सरांच्या विनवण्या केल्या आणि आमच्या घरी येऊन शिकवायची विनंती केली. मागाल ती फी देण्याची तयारी दाखवली. सरांनी फी घ्यायला नकार दिला पण आढेवेढे घेत घरी येऊन शिकवायला तयार झाले. पहिल्या दिवशी सर आले. मी नेहमीप्रमाणे खोड्या करायला सुरुवात केली. सरांनी मला चांगलं बदडून काढलं. मी मुकाट्याने बसायला सुरुवात केली. तुला सांगतो राहूल पहिल्याच आठवड्यात मला अभ्यासात गोडी वाटायला लागली. नंतर तर अभ्यास केल्याशिवाय मला करमायचं नाही. सर इतके छान शिकवायचे इंग्लिश, गणित, सायन्स हे विषय जे मला कठीण वाटायचे ते खूप सोपे वाटायला लागले. सर कधी आले नाहीत तर मला अस्वस्थ वाटायचं. नववीत मी वर्गात दुसरा आलो. आईवडिलांना खूप आनंद झाला. मी तर हवेत तरंगत होतो. दहावीत मी सगळे क्लासेस सोडले आणि फक्त पाटील सरांकडे शिकू लागलो. आणि दहावीत मेरीटमध्ये येऊन मी सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला."

"माय गुडनेस...! पण सर मग तुम्ही सरांना तरीसुद्धा फी दिली नाहीत?" जनरल मॅनेजरनी विचारलं.

"मी आईवडिलांसोबत सरांकडे पेढे घेऊन गेलो. वडिलांनी सरांना एक लाखाचा चेक दिला. सरांनी तो घेतला नाही. सर त्या वेळी काय म्हटले ते अजूनही माझ्या लक्षात आहे. ‌सर म्हणाले, 'मी काहीही केलेलं नाही. तुमचा मुलगाच हुशार होता. मी फक्त त्याला मार्ग दाखवला. आणि मी ज्ञान विकत नाही, मी ते दान करतो'. नंतर मी सरांच्या मार्गदर्शनाखालीच बारावीत परत मेरीटमध्ये आलो. पुढे बी. ई. झाल्यावर मी अमेरिकेत जाऊन एम.एस. केलं. आणि आपल्याच शहरात ही कंपनी सुरू केली. एका दगडाला सरांनी हीरा बनवलं. आणि मीच नाही तर सरांनी असे असंख्य हिरे घडवले आहेत. सर तुम्हांला कोटी कोटी प्रणाम...!!"

चेअरमनसाहेबांनी डोळ्यांत आलेलं पाणी रुमालाने पुसलं.
‌"पण कमालच म्हटली पाहिजे. बाहेर शिक्षणाचा आणि ज्ञानदानाचा बाजार भरलेला असताना एक रुपया न घेता हजारो विद्यार्थ्यांना शिकवणं, नुसतं शिकवणं नाही तर त्यांच्यात अभ्यासाची गोडी निर्माण करणं. व्वा सर, मानलं तुम्हांला..." शरदरावांकडे पाहत जी. एम. म्हणाले.

‌"अहो सर, ही माणसं तत्त्वनिष्ठ होती. पैशाची, मानसन्मानाची भुकेली नव्हती. विद्यार्थ्यांचं भलं व्हावं हा एकमेव उद्देश असायचा." चेअरमनसाहेब म्हणाले.

"माझे वडिलही त्यातलेच. 'एक वेळ उपाशी राहू, पण धान्यात भेसळ करून विकणार नाही' हे त्यांचं तत्त्व होतं. आयुष्यभर त्यांनी ते पाळलं. सचोटीचा व्यापार केला. त्याचा फायदा आज माझ्या भावांना होतोय."

‌बराच वेळ कुणी बोललं नाही. मग चेअरमननी शरदरावांना विचारलं, ‌"सर, तुम्ही घर बदललंय की त्याच घरात राहता?"

‌"त्याच जुन्या घरात राहतोय् सर!"
‌शरदरावांऐवजी राहूलनेच त्यांचं उत्तर दिलं. त्या उत्तरातील वडिलांविषयीची चीड चेअरमनसाहेबांच्या लगेच लक्षात आली.

‌"ठरलं तर मग. सर आज मी तुम्हांला गुरुदक्षिणा देणार आहे. याच शहरात मी काही फ्लॅटस् घेऊन ठेवलेत. त्यांतला एक थ्री बीएचकेचा फ्लॅट तुमच्या नावावर करतोय सर...!"

‌"काय्य?" शरदराव आणि राहूल एकाच वेळी ओरडले. ‌"नको नको. एवढी मोठी गुरुदक्षिणा मला नकोय." शरदराव निग्रहाने म्हणाले.

‌चेअरमनसाहेबांनी शरदरावांचे हात हातात घेतले. ‌"सर, प्लीज.. नाही म्हणू नका आणि मला माफ करा. कामाच्या व्यापात तुमची गुरुदक्षिणा देण्यात मी खूप उशीर केला."

‌मग राहूलकडे पाहत त्यांनी विचारलं, ‌"राहूल तुझं लग्न झालंय?"

‌"नाही सर, ठरलंय. पण जोपर्यंत मोठं घर होत नाही तोपर्यंत लग्न होणार नाही अशी सासरच्यांची अट होती. त्यामुळे अजून तारीख नक्की केली नव्हती आणि हाॅलही बुक केला नव्हता."

‌चेअरमननी फोन उचलला. कोणाशी तरी बोलले. मग समाधानाने फोन खाली ठेवून म्हणाले. ‌"तुमच्या मंगल कार्यालयाचं काम झालं. सागर लाॅन्सं माहित आहे ना?"

‌"सर, ते तर खूप महाग..."

‌"अरे, तुला कुठे पैसे द्यायचे आहेत? ‌अरे, सरांचे विद्यार्थी सरांसाठी काहीही करू शकतात. सरांनी फक्त शब्द टाकायला हवा. पण सर तत्त्वनिष्ठ आहेत ते तसं करणार नाहीत. या लाॅन्सचा मालक सरांचाच विद्यार्थी आहे. त्याला मी शब्द टाकला. नुसता हाॅलच नाही, तर जेवणासकट संपूर्ण लग्नच लावून द्यायची जबाबदारी त्याने घेतलीय... तीही मोठ्या आनंदाने. तुम्ही फक्त तारीख सांगा आणि सामान घेऊन जा."

‌"खूप खूप धन्यवाद सर!" राहूल अत्यानंदाने हात जोडत म्हणाला.

‌"धन्यवाद मला नाही तुझ्या वडिलांना दे राहूल! ही त्यांचीच पुण्याई आहे. आणि मला एक वचन दे राहूल, सरांच्या अंतिम श्वासापर्यंत तू त्यांना अंतर देणार नाहीस आणि त्यांना दुखावणार नाहीस. मला फक्त कळू दे तू त्यांना त्रास देतो आहेस. या कंपनीतून तुला डच्चू तर मिळेलच पण अख्ख्या महाराष्ट्रात तुला कुठे नोकरी मिळणार नाही याची मी व्यवस्था करीन." चेअरमन कठोर आवाजात म्हणाले.

‌"नाही सर. मी वचन देतो तसं होणार नाही." ‌राहूल हात जोडत म्हणाला.
‌संध्याकाळी राहूल घरी आला तेव्हा शरदराव पुस्तक वाचत होते. पुष्पाबाई जवळच भाजी निवडत होत्या. राहूलने बॅग ठेवली आणि शरदरावांचे पाय धरले.

‌"नाना, मी चुकलो. मी तुम्हांला वाटेल ते बोलत होतो. मला माहीत नव्हतं नाना तुम्ही इतके मोठे असाल."

‌शरदरावांनी त्याला उठवून छातीशी धरलं.

‌आपला मुलगा का रडतोय हे पुष्पाबाईंना कळेना. पण काहीतरी नक्कीच चांगलं घडलयं म्हणून तर बापलेकात प्रेम उमळून आलंय हे पाहून त्यांचेही डोळे अश्रूंनी भरून आले.
.....................................
*एक विनंती*
  ☝ *वरील कथा वाचल्यावर तुमच्या डोळ्यातुन अश्रुचा १ थेंब जरी ओघळला असेल तरच हि पोष्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा ! ✍✍✍✍✍✍ आणि कृपा करुन आपल्या बापाला कधी कोणी विचारु नका काय केलेस काय कमवून ठेवले माझ्यासाठी , जे कमवायचे आहे ते स्व;ता कमवा, त्यांनी जे शिक्षण व संस्कार दिले आहेत ते तेच तुम्हाला कमवायला शिकवतील*
😊😊😊😊😊😊😊😊😊😊

 


कमेंट करायला विसरू नका व सबस्क्राइब करा
😊😊😊😊😊😊😊😊😊😊

शुक्रवार, १९ जून, २०२०

जून १९, २०२०

इथून पुढे फक्त त्यांनाच दीर्घ आयुष्य मिळेल !



*इथून पुढे फक्त त्यांनाच दीर्घ आयुष्य मिळेल !
--------------------------------

*तुम्हीच सांगा ........*
*हल्ली.. आपलं आजारी पडण्याचं प्रमाण थोडं जास्तच वाढलं का नाही ?*
*कधी पोटच दुखतं , कधी बी.पी.च वाढतो , कधी शुगर वर खाली होते*
*कधी हृदयाचे ठोके वाढून चक्करच येते* 
*करमत नाही , मन लागत नाही* 
*छातीत धडधड , मनात*
*भीती ....अशा एक ना अनेक तक्रारी .....!*

*कारणं काय तर म्हणे ....*
*अशुद्ध पाणी , कचरा , रासायनिक खतं , डासांची संख्या वाढणे ....वगैरे , वगैरे ...!*

*मग ......*
*मग वॉटर प्युरीफायर आलं , रूम फ्रेशनर आलं , डास प्रतिबंधक वड्या , उदबत्त्या , एवढंच काय घरा घरात डास मारण्याच्या बॅटी सुद्धा आल्या .....*
*काय परिणाम झाला ?* 
*डासं मेले पण आजारपण गेलं का ?* 
*नाही ........*
*मग...?*

*तुम्ही आम्ही काय केलं आहे...* 
*जाणते अजाणते पणे सर्वांशी कट्टी धरली आहे !*

*हल्ली माणसं एकमेकाला मोकळेपणाने बोलतच नाहीत ......हे खरं कारण आहे आजारी पडण्याचं !*
*सख्खे , चुलत , मावस*
*आई वडील , बहीण भाऊ*
*शेजारी , सहकारी ...या सर्वांशी आपण अबोला धरला आहे  !*
*ओळख आहे पण संवाद नाही*
*नातं आहे पण माया नाही*

*अवांतर , मोक्कार विषयावर आपण खूप गप्पा मारतो पण खरं दुःख कुणीही कुणाला सांगत नाही ......हे एक आपल्या वारंवार आजारी पडण्याचं कारण असू शकतं !*

*सगे सोयरे , घरकुल , गोकुळ*
*नातीगोती , हॅपी फॅमिली , आपली माणसं*  
*.....अशा गोंडस नावांनी आपण Whats app चे ग्रुप बनवले ....*
*पण त्यावर मनमोकळा संवाद होतोय का ?*
*मी दुःख सांगितल्यावर मला हसतील का ? अशी जर भीती वाटत असेल ....*
*मी Good news  सांगितल्यावर आनंदी होतील का नाही ? अशी जर भीती वाटत असेल .....*
*तर असे ग्रुप ,अशी नाती काय कामाची ?*

*लक्षात ठेवा हिलस्टेशनला , युरोप टूरला जाऊन relax होता येईल ....पण हलकं वाटू शकेल का ?*
*टेन्शन कमी होईल का ?*
*त्यामुळे वारंवार आजारी पडण्याची कारणे कदाचित ही तर नसतील ......*
*मनातल्या भावनांचा निचरा न होणे ...,*
*सकारण , विनाकारण प्रत्येक नात्या सोबत झालेली कट्टी ...,*
*खूप बोलावं वाटणे ...पण व्यक्त होण्यासाठी जागाच न उरणे ....*

*मग आता काय करावं ?*
*ज्या वादा मध्ये , अबोल्या मध्ये , फारसं तथ्य नाही असे वाद मिटवण्यासाठी स्वतः होऊन पुढाकार घ्यावा ....*
*व्यक्त व्हा , बोला , दो करा*
*कदाचित आपलं वारंवार आजारी पडणं थोडं कमी होईल*
*लक्षात ठेवा इथून पुढे फक्त त्याच माणसांना दीर्घ आयुष्य मिळेल .....जी माणसं हसण्याच्या आणि रडण्याच्या जास्तीत जास्त जागा निर्माण करू शकतील*
पोस्ट वाचून झाल्यावर नक्की शेअर करा व इतरांनाही वाचनाचा आनंद घेऊ द्या तसेच ब्लॉग ला सबस्क्राइब करायला विसरू नका म्हणजे नवीन पोस्ट टाकल्यानंतर लगेच तुम्हाला माहिती मिळेल धन्यवाद.

बुधवार, १७ जून, २०२०

जून १७, २०२०

व्यक्तिमत्व सुधारण्याचे दहा मार्ग

१० असे मार्ग ज्यामुळे तुम्ही तुमचं व्यक्तीमत्व सुधारु शकता



     🎙आरोग्यदूत हेल्थकेयर.... व्यक्तीमत्व विकास🎯

*चांगले श्रोते (Listener) बना*.


चांगले श्रोते बनणे म्हणजेच काय तर समोरचा माणूस जेव्हा बोलत असेल तेव्हा त्यांच्या डोळ्यात बघणे , त्यांचा प्रत्येक शब्द काळजीपूर्वक ऐकणे आणि त्यांना जाणवून देणे कि त्यांच बोलण आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे. आपण काहीतरी बोलत असू आणि समोरचा माणूस आपल न ऐकता दुसरीकडे लक्ष देत असेल तर साहजिकच ते आपल्याला आवडणार नाही पण तेच जर कोणी आपलं बोलण काळजीपूर्वक ऐकत असेल तर आपल्याला आपल बोलण मांडण सोप जातं.


*जास्तीत जास्त वाचा अणि ज्ञान वाढवा*.


जसं तुमचं वाचन वाढेल तुम्हाला विविध विषयांमधे आवड निर्माण होईल तुमचं ज्ञान वाढेल आणि ज्ञान वाढलं कि लोकांना तुमच्या ज्ञानाबद्दल कुतुहल निर्माण होईल. जेव्हा तुम्ही नविन माणसांना भेटाल ही संधी असेल तुमच्यासाठी तुमचे विचार त्यांच्यासमोर मांडण्याची आणि त्यांच्याकडील नवीन विचार आत्मसात करुन घेण्याची.


*चांगल संभाषण करायला शिका*


तुम्ही किती चांगलं संभाषण करू शकता हे तुम्ही किती वाचन करता यावर अवलंबून असतं.जेव्हा तुमच्याकडे एखाद्या विषयाबद्दल माहीती असेल तेव्हाच तुम्ही त्या विषयावर बोलायला शिकू शकता. कोणीही एखाद्या विषयाबद्दल पुर्णपणे वाचू किंवा माहीती ठेवू शकत नाही , पण जर आपल्याकडे संभाषण कला असेल तर त्या गोष्टी आपण दुसर्‍यांकडून शिकू शकतो ज्या वाचण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो. जर तुम्ही बोलायला लाजत असाल तर तुम्ही टोस्टमास्टर सारखे ग्रुप जॉईन करु शकता जे तुम्हाला बोलायला प्रोत्साहित करतील.

*स्वत:च मत ठेवा*


ज्याला स्वतःचं मत नाही अशा व्यक्तिशी बोलणे यापेक्षा दुसरी कंटाळवाणी गोष्ट नाही. अशा संभाषणांना कहीच अर्थ नसतो. मताशिवाय संभाषण म्हणजे दिशा विरहीन होऊन चालणं. तेच जर एखाद्या विषयावर दोन व्यक्तींची वेगवेगळी मतं आणि मुद्दे असतील तर तेच संभाषण अधिक मनोरंक बनतं .

*नवीन लोकांना भेटा*


नवनवीन लोकांना भेटण्याचा प्रयत्न करा. खासकरुन अशा लोकांना भेटा ज्यांचे स्वभाव आणि विचार तुमच्या स्वभाव आणि विचारांपेक्षा वेगळे असतील. यामुळे तुम्हाला फक्त त्यांच्या संस्कृतिबद्दल नाही तर एकच गोष्ट् करण्याचे वेगवेगळे मार्ग सापडतील.

*स्वतः जसे आहात तसे रहा*


स्वतःच मत नसणे यासारखीच दुसरी कंटाळवाणी गोष्ट म्हणजे जे आपण नाही ते बनण्याचा प्रयत्न करणे. स्वतःला दुसर्‍यासाठी किंवा दुसर्‍यासारख बनण्यासाठी बदलणे याचे परिणाम नेहमीच उलट होतात. प्रत्येक जण वेगळा असतो आणि आपण आपला वेगळे पणा दाखवला तरच इतरांच्या नजरेत मोठे होतो. दुसर्‍याची कार्बन कॉपी बनण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आपल्यातला खरेपणा घालवण्यासारखं आहे.

*सकारात्मक विचार आणि दृष्टीकोन ठेवा*


कोणालाच अशा लोकांबरोबर रहायला आवडत नाही ज्यांचे विचार नकारात्मक असतात ,ज्यांना खुप तक्रारी असतात किंवा ज्यांना चांगल बोलण माहीतच नसतं. खरं तर अशा माणसांपासून आपण एक हात लांबच राहण पसंत करतो. म्हणूनच असा माणूस बना जो आपल्या विचारांनी वातावरण सकारात्मक करतो आणि हे आपण तेव्हाच करु शकतो जेव्हा आपण प्रत्येक माणसामध्ये आणि इतर गोष्टींमध्ये चांगल बघण्याचा प्रयत्न करु.

*आनंदी रहा आणि विनोदी वृत्ती  ठेवा*


कोणालाही अशा माणसांची संगत जास्त आवडते जे विनोदी वृत्तीचे असतात. गंभीर वृत्तीच्या माणसांबरोबर तुम्हाला जास्त माणसं कधीच दिसणार नाहीत. त्यामुळेच कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंदी रहायला शिका. गंभीर परिस्थितीकडे सुध्दा विनोदी दृष्टीकोनातून पाहता आलं पाहीजे.

*दुसर्‍यांना मदत करा*


दुसर्‍यांना मदत करणे हा एक महत्त्वाचा गुण आहे आपलं व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी . जस तुम्हाला एखाद्या माणसाने मदत केली तर आवडतं तसच तुम्हीही दुसर्‍याची मदत करा जेव्हा एखाद्याला तुमच्या मदतीची गरज असते. प्रत्येकालाच अशी माणसं आवडतात जी आपल्यावर विश्वास ठेवतात. आपण कधी पडलो तर उठायला मदत करुन पुढे जाण्यासाठी प्रोत्साहीत करतात.

*इतरांचा आदर करा*


दुसर्‍यांकडून आदर आणि प्रशंसा हवी असेल तर आपल्या शब्दांबरोबर खरं आणि प्रामाणिक राहता आलं पाहीजे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी फक्त दुसर्‍यांसाठीच नाही तर स्वतः बद्दल सुध्दा आदर असला पाहीजे. एक माणूस म्हणून आपल्याकडे ती क्षमता आहे कि आपण आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देऊ शकतो. जेव्हा आपण स्वतःला विकसित करण्यासठी आपल्याकडून होणारे सगळे प्रयत्न करतो तेव्हा आपण स्वतः बरोबरच दुसर्‍यांच्या आनंदात योगदान देत असतो.

================
...आरोग्यदूत हेल्थ केअर ।।।!
 एकपाऊल प्रगतीकडे.......🎯🎯
===============

धन्यवाद,
टिम आरोग्यदूत हेल्थ केयर, नवापुर

कृपया सबस्क्राईब करा , पोस्ट फॉरवर्ड करा व इतरांनाही वाचनाचा आनंद घेऊ द्या.

रविवार, १४ जून, २०२०

जून १४, २०२०

आश्चर्यकारक पारशी समाज

पतेती विशेष

आश्चर्यकारक पारशी समाज


✍प्रसाद जोशी कडेकर
भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ०.००७% असणारा पारशी समाज. देशाच्या प्रगतीत मात्र या समाजाच योगदान प्रचंड मोठे आहे.
कुठेलेही क्षेत्र घ्या.या समाजाचा माणूस त्यात सगळ्यात पुढेच दिसणार.

राजकारणात दादाभाई नौरोजी,फिरोजशहा मेहता,भिकाजी कामा,दिनशॉ पेटीट

उद्योगात रतन टाटा,आदी गोदरेज,सायरस मिस्त्री,शापुरजी पालनजी,रूसी मोदी

सायन्स व टेक्नॉलॉजी
होमी भाभा,होमी सेठना

संगीत
झुबीन मेहता,फ्रेडी मर्क्युरी


क्रिकेट
नरी कॉट्रक्टर,फारूख इंजीनीअर,

कायदेपंडित
नानी पालखीवाला,सोली सोराबजी,फली नरीमन,जमशेद कामा


अभिनय
सोहराब मोदी,बोमण इराणी,जॉन अब्राहम,

लेखन
रोहींग्टन मिस्त्री,फिर्दोस कांगा,फारूख धोडी,बाप्सी सिधवा

पत्रकारिता
रूसी करंजिया,बेहराम कॉट्रँक्टर,बाची करकरीया,केकी दारूवाला

रेसींग 
सायरस पुनावाला

नृत्य
श्यामक डावर

ज्योतिष
जगप्रसिध्दी ज्योतिषी बेजान दारूवाला

सैन्य
फिल्ड मार्शल सँम मानेकशा,जनरल एफ एऩ बिलीमोरीया,मेजर जनरल सायरस पिठावाला,जनरल खंबाटा

इ,खुप मोठी यादी आहे.
समाज थोडा पण कर्तबगारांची संख्या खूप मोठी.

काय वेगळे केले या लोकांनी की जेणेकरून ते मोठे नाव कमावू शकले.

आयत बसुन खाल्ल नाही
कष्ट केले,मेहनत केली
मुख्य म्हणजे देवाने दिलेली बुध्दी वापरली.

ना कुठल आरक्षण मागीतले,ना नौकर्या.
कधी स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवून घेतला ना कोणत्या सरकारच्या नावाने खडे फोडले.
ना मोर्चे काढले ना दंगेधोपे केले.गुन्हेगारीत तर त्यांचे नाव चुकुनही नाही.

शांतताप्रिय,अग्नीपूजक समाज.
कँलेंडरमध्ये या समाजाच्या वाट्याला आलीय फक्त एक सुट्टी.फक्त एक.पण ती सुट्टीसुध्दा या समाजातील कर्तृत्ववान माणसांची यशोगाथा वाचायला कमी पडेल ईतका पुढे गेलेला हा समाज.

आजची सुट्टी एनजॉय करणार्यांनी हे लक्षात घ्यावे की माणसे केवळ स्वकर्तृत्वानेच मोठी होतात.दुसर्यापुढे मागणीचा गळा काढून रडल्याने नव्हे.

ज्याला काही शिकायचय त्याने या समाजाकडून हे जरूर शिकून घ्यावे.🙏
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
कृपया पोस्ट वाचून झाल्यानंतर नक्की शेअर करा


शनिवार, १३ जून, २०२०

जून १३, २०२०

टी.एन्.शेषन्

*टी.एन्.शेषन् भारताचे मुख्यनिवडणूक आयुक्त होते.त्ंच्या जीवनात घडलेला प्रसंग !*
एकदा ते आपली पत्नी जयलक्ष्मी शेषन् यांच्याबरोबर फिरायला बाहेर पडले होते.उत्तरप्रदेशातल्या एका सुंदर रस्त्यावरून गाडी जात होती.रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी होती.वर्दळीचा रस्ता नसल्यामुळे की काय ,पक्ष्यांची अनेक ,सुंदर घरटी झाडांची शोभा वाढवत होती.
जयलक्ष्मी यांना हे दृष्य खूप आवडलं .त्यांना वाटायला लागलं आपल्या घराच्या बागेसाठी यातली दोन घरटी नेली ,तर बाग किती शोभून दिसेल.त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली.
गाड्या थांबल्या.त्यांच्यासाठी जे संरक्षक पोलीस दल होते ,ते इकडे तिकडे शोधायला लागले.तिथे एक मुलगा गुरं चरायला आला होता.त्याला बोलावलं.तो सरकारी इतमाम पाहून कोणीतरी मोठी अधिकारी व्यक्ति आलीय ,हे त्यानी ओळखलंच.त्यांनी मुलाला दोन घरटी काढून आणायला सांगितली ,आणि प्रत्येक घरट्याचे १० रु.देऊ असंही सांगितलं.त्या मुलानं खाली मान घालून नकारार्थी मान हलवली. "दहा रुपये कमी वाटतायंत का ,५०रुपये देऊ प्रत्येक घरट्याचे."
यावर तो मुलगा म्हणाला ,"सरजी,पैशाचा सवालच नाहीए .कितीही पैसे दिलेत तरी ती घरटी मी झाडावरून उतरवणार नाही."
"का रे बाबा?"
*"त्यात पक्ष्याची पिल्लं शांतपणे आणि विश्वासानी झोपली आहेत.सायंकाळी त्यांची आई चोचीत दाणे घेऊन पिल्लांच्या ओढीनं येईल ,पिल्लं सापडली नाहीत तर ती सैरभैर होईल ,आक्रोश करेल,ते माझ्याच्यानं पाहवणार नाही.कोणाचं घर मोडायचं पाप आहे ना सर जी."*
हे ऐकून शेषन् व त्यांची पत्नी थक्क झाले.
शेषन् म्हणाले ,"कोणीतरी डोळ्यात अंजन घातल्यासारखं वाटलं. *माझं पद ,माझी पदवी ,उच्च शिक्षण सार्‍या सार्‍याचा अभिमान क्षणार्धात गळून पडला ,वितळून गेला.जे शिक्षण , संस्कृती आणि संस्कार या मुलानं निसर्गाकडून शिकलेत. ते शिक्षण कोणत्याच विद्यापीठात मिळणार नाही."*

कृपया पोस्ट वाचून झाल्यानंतर अधिकाधिक शेअर करा व इतरांनाही वाचनाचा आनंद घेऊ द्या. धन्यवाद
जून १३, २०२०

अर्थ

*प्रत्येक वाक्यात किती अर्थ आहे*

"अश्रु" _सांगून जाते,_ "दुःख"  किती आहे ?

"विश्वास" _सांगून जातो,_ "जोडीदार"  कसा आहे?

"गर्व" _सांगून जातो,_ "पैशाचा माज"  किती आहे?

"संस्कार" _सांगून जातात,_ "परिवार"  कसा आहे?

"वाचा" _सांगून जाते,_ "माणूस"  कसा आहे?  

"संवाद" _सांगून जातात,_ "ज्ञान"  किती आहे?

"ठेच" _सांगून जाते,_ "लक्ष"   कुठे आहे?

"डोळे" _सांगून जातात,_ "व्यक्ती"  कशी आहे ?

"स्पर्श" _सांगून जातो,_ "मनात"  काय आहे ?

आणि "वेळ" _दाखवते,_ "नातेवाईक"  कसे आहेत.


भावकीतली चार माणसं *" एका दिशेने "* तेव्हाच चालत असतात जेव्हा पाचवा खांद्यावर असतो. 

संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो की *" लोक काय म्हणतील " ?* आणि म्हणून धम्म सांगतो *" मृत्यु हा शाश्वत आहे तर मग जिवंत आसताना माणसाशी  माणसासारखे वागा"*..........

           माणसाची कदर करायची असेल तर जिवंतपणीच करा. 

कारण तिरडी उचलण्याच्या वेळी तिरस्कार करणारे सुद्धा रडतात. 

मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे. 
म्हणून माणसांना जिवंतपणीच समजून घ्या. 

मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो .......
   
        चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवतो. 
कारण औषध जरी कडू असलं तरी ते आपल्या फायद्याचे असते. 

चांगल्या माणसांच सुद्धा अगदी तसचं असतं .........
प्रवीण🙏

🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐💐💐💐💐💐
कृपया पोस्ट वाचून झाल्यानंतर नक्की शेअर करा म्हणजे इतरांनाही वाचनाचा आनंद घेता येईल.
जून १३, २०२०

रतन टाटा यांचे विचार

*************************
*उद्योग रत्न मा.रतनजी टाटांनी लंडन मध्ये दिलेल्या व्याख्यानातील सुंदर ओळी!*

✍🏻1. श्रीमंत होण्यासाठी तुमच्या मुलांना शिकवू नका तर त्यांना आनंदी राहण्यासाठी शिकवा ज्यामुळे मोठ झाल्यावर त्यांना वस्तूंचं महत्त्व आणि मूल्य कळेल किंमत नाही.
2. 🌷तुमचं जेवण तुम्ही तुमचं औषध समजून घ्या नाहीतर औषधच तुम्हाला जेवण म्हणून घ्यावं लागेल.
3. 🌷जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते ती तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही कारण तुम्हाला सोडून जाण्याची शंभर जरी कारणं असली तरीही त्या व्यक्तीला एकच कारण असं सापडेल की ज्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला सोडून जाणार नाही.
4. 🌷मानव असणं आणि मानवता असणं या मध्ये खूप फरक आहे.
5. 🌷ज्या वेळी तुमचा जन्म होतो त्यावेळी तुमच्या वर प्रेम केलं जातं आणि ज्यावेळी तुम्ही मृत व्हाल त्या वेळी ही तुमच्या वर प्रेम केलं जाईल. मधील काळात तुम्हाला असच चालवून घ्यावं लागेल.
6. 🌷तुम्हाला वेगात चालायच असेल तर एकटं चाला पण दूरवर चालत जावे लागणार असेल तर एकत्र चाला.
7. 🌷जगातील सर्वात चांगले सहा डॉक्टर १) सूर्यप्रकाश २) विश्रांती ३) व्यायाम ४) योग्य आहार ५) आत्मविश्वास ६) मित्र.......
     आयुष्याच्या सगळ्या टप्प्यांवर यांना सांभाळा आणि आरोग्यदायी जीवन जगा.
8. 🌷जेव्हा तुम्ही चंद्र पाहता त्यावेळी तुम्ही देवाचं सौंदर्य पाहता, जेव्हा तुम्ही सूर्य पाहता त्या वेळी तुम्ही देवाचं सामर्थ्य पाहता,ज्यावेळी तुम्ही आरसा पाहता त्यावेळी तुम्ही परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती पाहता.... म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा!
     आपण सगळे जण प्रवासी आहोत आणि परमेश्वर हा या प्रवासाचा प्रतिनिधी(एजंट) आहे त्यानं आपला सर्व मार्ग आणि आपला अंतिम मुक्काम आधिच ठरवलेला आहे म्हणूनच त्याच्यावर विश्वास ठेवा आणि हे जीवन ही एक सहल समजून आनंद घ्या!

        🍁 🙏🙏🍁😊


कृपया वाचून झाल्यानंतर शेअर करा. इतरांनाही वाचनाचा आनंद घेऊ द्या व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद

शुक्रवार, १२ जून, २०२०

जून १२, २०२०

मायकल जॅक्सन

'#मृत्यू - एक अटळ सत्य 


मायकल जॅक्सनला १५० वर्षे जगायचं होतं. 

कोणाशी हात मिळवायचा तर तो आधी हातात मोजे घालत असे. जेव्हा त्याला लोकांमध्ये जावं लागत असे तेव्हा तोंडावर तो आधी मुखवटा (mask) घालत असे. 

त्याची काळजी घेण्यासाठी त्याने त्याच्या घरी १२ डॉक्टर नियुक्त केले होते. हे डॉक्टर त्याच्या केसांपासून ते अगदी पायाच्या नखांपर्यंत सगळ्या अवयवांची रोज तपासणी करीत असत. 

त्याचे जेवणखाण प्रयोगशाळेत तपासल्यानंतरच त्याला खायला घातले जायचे. 

त्याच्याकडून व्यायाम करून घेण्यासाठी १५ लोक तैनात असायचे. 

मायकल जॅक्सन गोरा नव्हता. त्याने १९८७ मध्ये प्लॅस्टिक सर्जरी करवून घेत आपली त्वचा गोरी केली होती. गोरा झाल्यावर त्याने आपले काळे आईवडील, काळे मित्र यांना सोडलं आणि गोर्‍या आईवडिलांना भाड्याने घेतलं. मित्र जवळ केले ते ही त्यांचा गोरा रंग बघूनच. लग्न केलं ते ही गोर्‍या मुलींबरोबर. 

दीडशे वर्षे जगण्याचं उद्दिष्ट ठेवलेला मायकल नेहमी प्राणवायूच्या बिछान्यावर झोपत असे. त्याने स्वतःसाठी शरीराचे अवयव दान करणारे दाता तयार ठेवले होते. त्यांचा खर्च तो स्वतः करत असे म्हणजे त्याला गरज पडल्यावर मूत्रपिंड, फुप्फुस, डोळे किंवा इतर कुठलेही अवयव हे दाता येऊन त्याला देऊ शकतील. 

त्याला वाटायचं की तो पैसा आणि आपला प्रभाव यामुळे मृत्यूलाही चकवा देईल पण हे शक्य झालं नाही आणि २५ जून २००९ या दिवशी त्याची हृदयगती बंद पडू लागली. त्यावेळी त्याच्या घरी १२ डॉक्टर होते पण कोणीही परिस्थिती सावरू शकलं नाही. हे बघता शहरातील सगळे डॉक्टर त्याच्या घरी जमा झाले. या सगळ्यांनी प्रयत्न केले पण कोणीही त्याला वाचवू शकलं नाही. 

त्याने २५ वर्षे डॉक्टरांना विचारल्याशिवाय कधीही काहीही खाल्लं नाही. त्याचा शेवटचा काळ जसजसा जवळ येत गेला तसतशी त्याची शारीरिक स्थिती बिघडू लागली. ज्याला १५० वर्षे जगायचं होतं पण त्याची पन्नाशीतच शारीरिक अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली. आयुर्मान वाढावं म्हणून त्याने जी काही सोय केली होती, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. 

जेव्हा त्याच्या शवाचं विच्छेदन करण्यात आलं तेव्हा डॉक्टर म्हणाले की त्याचं शरीर म्हणजे फक्त हाडांचा सापळा झाला होता. तो टकला होता. त्याच्या बरगड्या, खांदा यांची हाडं तुटलेली होती. त्याच्या शरीरावर असंख्य सुई टोचल्याचे निशाण होते. प्लॅस्टिक सर्जरी केल्याने जो त्याला त्रास व्हायचा, त्यावर उपाय म्हणून त्याला रोजच्या रोज antibiotics ची अनेक injections घ्यावी लागत असे. 

मायकल जॅक्सनची अंत्ययात्रा २५० कोटी लोकांनी थेट प्रक्षेपणात पाहिली. ही आत्तापर्यंतची थेट प्रक्षेपणात सर्वात जास्त पाहिली गेलेली घटना आहे. 

मायकल जॅक्सन याच्या मृत्यूच्या दिवशी म्हणजेच २५ जून २००९ या दिवशी दुपारी ३.१५ वाजता विकिपीडिया, ट्विटर आणि AOL चं instant messenger हे सगळं क्रॅश झालं होतं. याच्या मृत्यूची बातमी येताच ८ लाख लोकांनी गुगलमध्ये मायकल जॅक्सन म्हणून शोधाशोध केली आणि ही शोध मोहीम फारच सुरू झाल्याने गुगलवर सगळ्यात मोठा ट्रॅफिक जॅम झाला आणि मग गुगलही क्रॅश झालं. त्यावेळी अडीच तास गुगल बंद राहिलं. 

मृत्यूला चकवा देण्याचा ज्यांचा विचार असतो, त्यांना मृत्यूच चकवतो, हेच खरं. 

चार दिवसांचा थाट, ऐश, पैसा, श्रीमंती आणि यामुळे येणारा माज.. कशाला तो ! स्मशानात जाणार तेव्हा हाताची साधी मूठही रिकामीच असणार आहे. हे कधी समजणार लोकांना ! कदाचित कधीच नाही.
_______________________*********************

बुधवार, १० जून, २०२०

जून १०, २०२०

मुलांना वळण लावताना घ्यावयाची काळजी

आपल्या मुलांना वळण लावताना घ्यायची काळजी..*


प्रत्येक पालकांनी वाचवा असा शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांचा सकाळ वृत्तपत्रांमधील लेख

पालकत्व म्हणजे काय? *मुलांना वाढवायचे म्हणजे नक्की काय करायचे?* मुलांना बुध्दीमान कसे करायचे? सर्वात महत्वाचे मुलांचा मेंदू घडतो कसा? असे असंख्य प्रश्‍न आज स्त्रीयांना (आईंना) पडत असतात. या प्रश्‍नाचे आपण शास्त्रीय उत्तर शोधुया.

*या शतकातला शिक्षणक्षेत्रामधला सर्वात मोठा शोध जर कोणता असेल तर तो म्हणजे बालकाचा मेंदू घडतो कसा?*

मेंदू मानसशास्त्र सांगत की बाळ जन्मल्यापासून तर पहिल्या सहा वर्षापर्यंत बालकाच्या मेंदूची जडण-घडण सर्वात जास्त होत असते. या काळात बालकाच्या मेंदूच्या पेशीतील जुळणी चालू असते. *ही पेशींची जुळणी जेवढी घट्ट, मजबुत आणि जेवढी अधिक होईल तेवढा बालकाचा मेंदू सक्षम बनेल.*

सहावर्षापर्यंत ते बारावर्षापर्यंत सुध्दा मेंदूतील पेशींची जुळणी चालू असते. पण त्यांचे प्रमाण पहिल्या सहा वर्षात जेवढ्या अधिक प्रमाणात होते तेवढे सहा ते बारा वर्षाच्या टप्प्यामध्ये प्रमाण कमी असते.

म्हणजे आपल्या पाल्याला हुशार, बुध्दीमान बनवायचे असेल तर जन्मापासून ते पहील्या सहा वर्षाच्या हा पहिला टप्प्यामध्ये मेंदू मधील करोडो पेशींची कनेक्शन जुळणी दुसऱ्या सर्व पेशी बरोबर होणे आवश्यक आहे. पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे ६ ते १२ वर्षाच्या वयामध्ये सुध्दा मेंदूच्या पेशींची जुळणी होत असते. पण त्याचा विकास पहिल्या टप्प्यावर अवलंबून असतो. *थोडक्यात जन्मापासून ते १२ वर्षापर्यंत बालकाच्या मेंदूचा विकास हा अधिक होत असतो.*

आता हा विकास कसा होतो? *मेंदूतील पेशींची जुळणी कशा मुळे होते?* पालकत्वामध्ये काय काय बदल करावे लागेल जणे करून बालमेंदूची जडण घडण उत्तम होईल?

सर्वात पहिले आपण समजवून घेऊ की मेंदूच्या पेशींची जुळणी कशा मुळे होते? कारण जुळणी घट्ट व उत्तम झाली तर मेंदूचा विकास होणार आहे. अर्थात झाली तर मेंदूचा विकास होणार आहे अर्थात बालक बुध्दीमान बनणार आहे.

*मेंदूच्या पेशींची बांधणी ही लहानपणी त्याला तीला मिळालेल्या अनुभवांवर अवलंबून असते.* लहानपणी जेवढे विविध अनुभव पाल्यांना मिळतील तेवढे त्यांचे विविध क्षमतांचा विकास होणार आहे. जेवढे विविध अनुभव तेवढी विविध बुध्दीमत्तांचा विकास होण्याची शक्यता वाढते.

*बालकाच्या पाच ज्ञानेंद्रीयांना विविध अनुभव मिळाले तर बालकाच्या मेंदूची जडण-घडण उत्तम रितीने होते.* डोळे, कान, नाक, जिभ व त्वचाच्या माध्यमातून मुलांना विविध अनुभव मिळाले तर मेंदूतील पेशींना चालना मिळते व  त्यांची जुळणी घट्ट होते. मुलांना कुठकुठले अनुभव देता येतील याच्या संदर्भासाठी काही ऍक्टीव्हीटी सुचवतो पण पालकांनी वया नुसार व त्यांच्या कलेनुसार यासारख्या असंख्य ऍक्टीव्हीटी पाल्याकडून करून घेऊ शकतात.

शारीरीक व भावनिक संवेदनाचा वापर करून मेंदूची कार्यक्षमता व त्याला चालना देता येते. उदा. पाल्यांना सांगणे डोळे बंद करून केसे विंचर, डोळे बंद करून कपडे घालणे, डोळे बंद करून आंघोळ करतांना डोके धुवायचे, एकाच वेळी क्लासिकल गाणे ऐकायचे आणि फुलांचा वास घ्यायाचा, पावसात भिजत पावसाचा आवाज ऐकत बोटांनी वेगळा आवाज करायचा, ढगाकडे बघत क्ले किंवा चिकनमाती घेवून वेगवेगळे आकार करायचे, न बोलता डोळ्यांनी आणि हातवारे करून बोलायचे अशा विविध ऍक्टीव्हीटी करून पाल्यांना कृतीशील करू शकता.

*मुलांना हुशार बनवायचे असेल तर मुलांना भरपूर कृतीशील अनुभव द्या.* घरात उत्साही वातावरण ठेवायचे. मुलांना सातत्याने चॅलेंज द्या. मुलांना विविध भाषेचें संस्कार  दया. सातत्याने संगित ऐकायला द्या. मुलांची कल्पना शक्ती वाढवायची असेल तर आईने पाल्यांना रोज एक तरी गोष्ट सांगायला हवी. जेव्हा आई मुलाला मांडीवर घेवून थापडते, प्रेम करते, जवळ घेवून गोष्ट सांगते तेव्हा आईच्या स्पर्शाच्या संवेदना मुलांसाठी अविस्मरणीय असतात. अशा संवदेनामधील ऑक्सिटोसीन नावाचे हार्मोन्स स्त्रावते.

शिक्षणतज्ञ रमेश पानसे सांगतात, या होर्मोन्सचा व्यक्तिच्या स्वभावावर खूप मोठा परीणाम होतो. ऑक्सिटोसीन हार्मोन्स असल्यामुळे  विश्‍वासाचे नाते प्रस्तापित होते. *जर शरीरामध्ये ऑक्सिटोसिनचे प्रमाण बरोबर असेल तर व्यक्ती विचारी, शांत व विश्‍वासू स्वभावाची बनु शकते.* या उलट जर ऑक्सिटोनीचे प्रमाण कमी असेल  तर व्यक्ती चिडचिडी, संतापी व संशयी बनते. म्हणून आईचा दररोजचा प्रेमाचा स्पर्श जवळ मांडीवर घेऊन गोष्टी सांगणे आवश्यक आहे.

*मुलांची निरक्षणक्षमता विकसीत करण्यासाठी मुलांचे व्हिज्युअल कॉन्टॅक्स विकसीत होणे आवश्यक आहे.* लहानपणी जितक्या गोष्टींचा अनुभव डोळ्यांना येईल तेवढे व्हिज्युअल  कॉरटेक्स पेशी उत्तेजित होत असतात.

*त्यासाठी जाणिवपूर्वक मुलांना बाहेरचे जग दाखवा.* झाडे, पक्षी, घरे, रस्ते, खेळणारी मुले, येणारी जाणारी वाहने, वेगवेगळयारंगाचे कपडे, नक्षीकाम, रंगकाम अशा विविध  गोष्टी मुलांना तीन वर्षापर्यंत दाखवा. गोष्टी दाखवतांना मुलांना प्रश्‍न विचारुन निरक्षण करायला सांगा. उदा. दोन वर्षाच्या मुलाला गाय दाखवली तर त्याला विचार गाय कशी बघते, शेपटी कशी हलवते व कशी चालते, पोळी कशी खाते? तुला काय म्हणाली का? अशा पध्दतीने प्रश्‍न विचारले तर बरोबरच मुलांची निरक्षण क्षमता नक्कीच वाढते. मी तुम्हाल एक उदाहरण दिले, तुम्ही या पध्दीने जत्रेमध्ये, बाजारामध्ये सन-वार विविध कार्यक्रम यापध्दतीने निरीक्षण करायला लावू शकता.

*मुलांना मनमोकळी मस्ती करू द्या.* त्यासाठी शक्यतो जमीनीवर गादी टाकून झोपा. बेडवर मस्ती केली तर पडण्याच्या भितीने आपण त्यांना सतत रागवत असतो. मुलांना रोज संध्याकाळी जवळच्या गार्डनमध्ये, मैदानावर किमान दोन तास खेळायला पाठवणे गरजेचे आहे. यावयात शारीरीक वाढ सर्वात जास्त होत असते. आणि त्यासाठी घाम येईपर्यंत खेळणे गरजेचे आहे. पण आजकाल मुलं संध्याकाळी टीव्ही समोर असतात किंवा ट्युशला तरी असतात. यामध्ये अमुलाग्र बदल होणे आवश्यक आहे.

*आजकाल विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर चांगले नसते त्यांना लिहीण्याचा कंटाळा येतो त्याचे मुख्य कारण पहिल्या सहा वर्षामध्ये त्यांच्या हातांच्या बोटांचे फाईन-ग्रॉस मोटार डेव्हलपमेंट व्यवस्थित झाले नसतात.* त्यासाठी मुलांना घरची सर्व कामे करु दया. झाडू मारायला द्या, पीट मळायला द्या, फरशी फडक्याने साफ करायला द्या. त्यांना त्यांचे कपडे धुवायला द्या. हाताच्या बोटांनी फळे सोलायला द्या, कुंडीमध्ये झाडांना पाणी टाकू द्या अशी छोटी मोठी कामे मुलांनी करणे गरजेचे आहे.

प्रत्येक अनुभव हा पाच ज्ञानेंद्रियातून जाणे आवश्यक आहे. जसे कान! मुलांना विविध संगीत ऐकवा, मुलांना विविध अर्थपूर्ण आवाज ऐकवा, डोळे बंद करुन विविध भांड्याचा आवाज ओळखायला द्या.

जसं कानाचे अनुभव तसेच जिभेचे अनुभव द्या, त्यांना सर्व प्रकारच्या चवी ओळखायला द्या, मुलांना स्पर्श ज्ञान द्या त्यासाठी वेगवेगळे सरफेसला हात लावू द्या. ग्रॅनाईट, मार्बल, टाईल्स, लाकूड, शहाबादी फरशी, दोरी यांच्यामधील स्पर्शातील फरक ओळखणे, कागदाचे, कापडाचे वेगवेगळे मटेरीअल ओळखणे, द्रव सुरुपातील केरोसीन, ऑईल, दुध, पेट्रोल यांचे स्पर्श हाताला कसा जाणवतो. वेगवेगळी झाडांची पाने  जसे की, ओले पान, सुकलेले पान, मोठे-छोटे पानं, वडाची, पिंपळाची, केळीची पानं या सर्वांच्या स्पर्शाचा अनुभव लहानपणीच द्या.

यातून मुलांच्या मेंदूच्या पेशींना चालना मिळते, तो/ती जसे मोठे होतील तेव्हा त्यांना सांगितले की, हे केळीचे पान आहे तर त्याला फक्त माहिती मिळेल, पण मेंदू जडण घडण काळात दाखवले, स्पर्श करू दिला तर त्याच्या मेंदूतील पेशींची जुळणी होते.

*मुलांना विविध वास ओळखायला द्या.* वेगवेगळ्या फुलांचा सुंगधापासून तर विविध अंतरापर्यंत सर्व वास नाकाला जाणीव पूर्वक घेवू द्या. *किचन हे सर्वात उत्तम घरामधली शाळा आहे.* स्वयंपाक खोलीमध्ये मुलं विविध गोष्टी शिकू शकतात.

थोडक्यात काय तर विविध  अनुभवांनी पाल्याला घडवा. भरपुर किल्ले दाखवा, निसर्ग दाखवा, शेतामध्ये काम करू द्या, नदीचा पुर दाखवा, भाजी-मंडई मध्ये घेऊन जा, मानसिक अभिव्यक्ती होण्यासाठी भरपूर चित्र काढायला द्या, मुलांना भरपूर नाटके दाखवा, व्यवहार ज्ञान द्या, या अन् अशा प्रकारच्या कितीतरी गोष्टी तुम्ही करु शकतात. पण आजकाल पालकांनकडे वेळ नसतो. स्वत: पालकच ताण-तणावा खाली वावरत असतात. सातत्याने घाई व त्यातून होणारी चिडचिड हे या सर्व गोष्टी मुलं तुमच्याकडून शिकत असतात. आपण कसेही असलोतरी आपण आपल्या मुलांसाठी आदर्श असतो.

*आपलं वागणं हेच संस्कार असतात.* मग आपण लहानमुलांशी कसं वागतो. नेहमी वैतागलेलो, कंटाळलेलो तर मग ते आपल्याकडून हेच शिकणार, आजकाल मुलं खूप लवकर बोर होतात. जर आपले पालकत्त्व अनुभव संपन्न असले तर मुलं बोर होणार नाहीत. आणि त्यांचा शारीरीक, मानसिक व बौध्दिक विकास उत्तम होईल. बाळाचे पहिले सहा ते आठ वर्ष अत्यंत महत्त्वाचे असतात. ह्या वयात पाया भरला जात असतो. पण पालक पाया भक्कम करण्याकडे दुर्लक्ष करतात आणि मोठं झाल्यावर कळस बांधण्याकडे वेळ देतात. पालकांनो पाया भक्कम असेल तर मंदिर भक्कम बनते आणि सुंदर कळस बांधला जातो.

*आता आपण निट विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल वरील सर्व अनुभव पुर्वीच्या काळी एकत्र कुटुंबात सहज होत होते.* पण संस्कृती बदलली. टिव्ही मोबाईल बघण्याचे प्रमाण वाढले. विभक्त पध्दत उदयास आली आणि मुलांना हे अनुभव मिळणे कमी झाले. या जमाण्यात मुलांना मिळतात ते फक्त मॉल संस्कृतीचे अनुभव. टच स्क्रिनचे अनुभव, सर्वच गोष्टी डिजीटल झाल्याने मुलांच्या मेंदू विकासासाठी लागणारे खाद्य कमी होत चालले. *सातत्याने टीव्ही, मोबाईल गेम, व्हिडीओ गेम यामधुन मुलांन मध्ये विविध आजार निर्माण होत चालले.* जसे ए. डी. एच. डी हॅपर ऍक्टिव पणा वाढत चालला आहे. मुलांमध्ये एकाग्रता समस्या वाढताय. फास्ट फुड मुळे मुलांमध्ये आरोग्य समस्या निर्माण होत आहे हे सर्व पालकत्वांची संस्कृती मध्ये बदल होत असल्याने झाले आपले आजी-आजोबा मुलांना मन मोकळ्या पध्दतीने वाढवायचे सुचविलेल्या ऍक्टिव्हीटी एकत्र कुटुंबात सहज होत होत्या.

आज मी प्रयोगशील शाळा चालवतो, यापैकी सर्व ॲक्टीव्हीटी अनुभव मुलांना जाणीवपूर्वक देत असतो. हे सर्व अनुभव शाळा आणि घरातून सातत्याने होणे आवश्यक आहे

*आजही ग्रामीण भागातील मुलांना उच्च शिक्षण मिळाले तर ते मोठे  व्यावसायिक, अधिकारी होेतात.* भारतातील बहुतांश आय. एस. एस. अधिकारी, कलेक्टर हे ग्रामीण भागातून असतात. कारण लहानपणी ते निसर्गात वाढतात, शेतात खेळतात, मातीशी नाळ जोडली असते. शास्त्र सांगते त्यांच्या मेंदूची जडण घडण उत्तम झाली असते. *हेच शहरातील मुलांना कुठलेही अनुभव मिळत नाही. ते फक्त पुस्तकी ज्ञानावर अवलंबून असतात.* थोडक्यात आपल्याला पालकत्वाच्या मुळ संस्कृतीकडे येणे आवश्यक आहे. आपलं पालकत्व अनुभवसंपन्न असेल तर येणारी पिढी ही उत्तम घडेल. 

*सचिन उषा विलास जोशी*
शिक्षणअभ्यासक
(पोस्ट शेअर करू शकता)

कृपया पोस्ट वाचून झाल्यानंतर लोकांना शेअर करा त्यामुळे जास्तीत जास्त पालकांना मुलांशी वागताना कोणती काळजी घ्यावी हे कळेल.

🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺
 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐


जून १०, २०२०

जॉनी लिव्हर

जॉनी लिवर.....कसा घडला तो..

जगातील सर्वात मोठी म्हणून गाजलेल्या धारावी झोपडपट्टी मध्ये एक १०-१२ वर्षांचा, काळासावळा व दिसायलाही ओबडधोबड असा 'जॉन प्रकाश ' लहानाचा मोठा झाला.
घरात पाच भावंड होती. तीन बहिणी,दोन भाऊ. त्यात तो सर्वात मोठा. घरची गरीब परिस्थिती. त्यामुळे सातवी उत्तीर्ण झाल्यावर त्याला शाळा सोडावी लागली. २-३ वर्षे तो मुंबईत रस्त्यावर पेन विकायचा.तेव्हा तो वेगवेगळ्या सिनेकलाकारांचे आवाज काढायचा. त्यामुळे पेन खरेदी करण्यासाठी नव्हे तर ते आवाज ऐकण्यासाठी खूप गर्दी जमायची.
त्याचे वडील 'हिंदुस्तान लिवर 'मध्ये मजुरी करायचे.

त्यांनी त्यालाही वयाच्या बाराव्या वर्षी मजूर म्हणून तिथे चिकटवला. लंच टाईममध्ये तो मिमीक्री करून कामगारांची खूप करमणूक करायचा. त्यामुळे तो सर्वांचाच आवडता झाला होता. धारावीमध्ये सगळ्याच गणेशोत्सवात त्याला मिमीक्रीसाठी बोलावलं जाई. पोट धरून हसायला लावणारी त्याची कॉमेडी ऐकून श्रोते त्याच्यावर अक्षरशः फिदा होत.
अनेकांनी त्याला शोसाठी आमंत्रण दिलं. कंपनीमध्येही विशेष समारंभ असला की तो त्याची कला सादर करायचा.कामगारांनी तर त्यांच्या हिंदुस्तान लिवर कंपनीमधील 'लिवर' त्याच्या नावाला जोडून त्याला 'जॉनी लिवर' हे टोपण नाव दिलं. तेव्हा जॉनी लिवर हे नाव देशातील लाखो करोडो जणांना पोट धरून हसायला लावणार आहे व तो शेकडो चित्रपटात अभिनय करणार आहे, असं स्वप्नातही कुणाला वाटलं नसणार.अनेक ठिकाणी मिमीक्रीचे शो केल्यामुळे एक दिवस जॉनी लिवर संगीतकार कल्याणजी आनंदजींच्या नजरेस पडला.त्याच्या मिमीक्रीवर ते इतके फिदा झाले,की त्यांनी त्याला त्यांच्या "कल्याणजी आनंदजी शो " साठी परदेश दौ-यावर नेलं आणि जॉनी लिवर नाव देश विदेशातही गाजू लागलं. आजही जॉनी लिवर त्यांना त्यांचा 'गॉडडफादर ' मानतो. त्यांच्यामुळेच त्याला १९८० मध्ये चित्रपटात भूमिका मिळाली.

पण मिमीक्री कलाकार चांगला कलाकार असू शकत नाही असा ठाम समज असलेल्या बॉलीवूडने त्याला नंतर भूमिका दिल्या नाहीत. तब्बल बारा वर्षे त्याला त्यासाठी अथक संघर्ष करावा लागला.१९९२ मध्ये आलेल्या 'बाजीगर' मधील त्याच्या भूमिकेमुळे अनेक निर्माते त्याचे उंबरठे झिजवू लागले होते. तब्बल १३ वेळा त्याला 'फिल्मफ़ेअर' पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं. दोन वेळा त्याला ते मिळालही. तोपर्यंत जॉनी एका चित्रपटासाठी मोजून तीस लाख घेऊ लागला होता. दरवर्षी तो ५-६ चित्रपटात तरी असायचाच.

यशाच्या शिखरावर असतानाही तो धारावीतील त्याच्या गरीब मित्रांना खूप मदत करायचा. कोणाच्याही अडीअडचणीला सढळ हाताने मदत करायचा. तब्बल ३०० चित्रपटांमध्ये त्याने विनोदी भूमिका केल्या. जॉनीचं विमान गगनात भरारी घेतच होतं. पण अकस्मात त्याच्यावर आभाळच कोसळलं. त्याच्या १० वर्षाच्या मुलाला २००० मध्ये कॅन्सर झाला व जॉनी कोसळून पडला. मुलाच्या मानेवरील ट्युमर दिवसेंदिवस वाढू लागला. जॉनीने काम करणच बंद केलं. नानावटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ट्युमर काढला तर मुलाला पैरालिसिस होईल किंवा त्याची वाचा जाऊ शकते,हे सांगितलं.

त्या दिवशी देशातील करोडो लोकांना पोट धरून हसवणारा जॉनी ढसाढसा रडला.
मानेवरचा ट्युमर मुलगा शाळेत जाताना कॉलरमागे लपवायचा तेव्हा जॉनी शोकाकुल व्हायचा. एक दिवस त्याला कोणीतरी अमेरिकेतील डॉक्टर जतिन शाहंचं नाव सांगितलं व जॉनी त्याच्या मुलाला घेऊन अमेरिकेला गेला. त्यांनी ऑपरेशन करायचा निर्णय घेतला पण देवाची प्रार्थना करायला सांगितली.त्या दिवशी जॉनी देवाला अक्षरशः शरण गेला. भरलेल्या डोळ्यांनी त्याने देवाकडे मुलासाठी प्रार्थना केली. खरोखरच जॉनीला देव पावला. ऑपरेशन यशस्वी झालं. त्यानंतर मुलगा बरा झाला. त्या दिवसापासून जॉनीने कधी दारूला स्पर्श केला नाही. सिगारेट कधी हातात धरली नाही. डोक्यात कधी वाईट विचारांना थारा दिला नाही.

मित्रानो, आम्ही कुठल्या परिस्थितीत जन्मलो, यामुळे खरं तर काही फरक पडत नाही. आमच्यातील अंगभूत गुणच आम्हाला यशाकडे घेऊन जात असतात. फक्त त्या गुणांना चांगलं खत पाणी घालून प्रचंड मेहनत घ्यायची एवढच लक्षात
ठेवायचं. कठीण परिस्थितीत जॉनी लिवरने जे यश मिळवलं, ते आम्हाला नक्कीच प्रेरणा देत राहील व संकटाचा सामना करताना देवावर विश्वास ठेऊन हिंमत न हारता लढत राहाण्याचं बळ देईल...??? 

हे वाचल्यावर तुमच्या जगण्याला नवी दिशा मिळेल.
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
कृपया पोस्ट वाचल्यानंतर शेअर करायला विसरू नका इतरांनाही वाचनाचा मराठी भाषेच्या गोडीचा आनंद घेऊ द्या

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

रविवार, ३१ मे, २०२०

मे ३१, २०२०

माणसे ओळखण्यातील धोका

*कधी कधी माणसाची ओळख करण्यात किती मोठा धोका होतो.*

अवश्य वाचा

 अमेरिकेतील जगप्रसिद्ध हॉर्वर्ड विद्यापिठाच्या प्रेसिडेंटना भेटण्यासाठी म्हणून एक वृद्ध जोडपे अपॉईंटमेंट न घेता भेटायला आले. 
त्या जोडप्याचा वेश नुसताच साधा नव्हता तर गबाळा पण होता. म्हातारीबाईंनी घातलेला फ्रॉक अगदी साधा, चुरगळलेला आणि थोडासा मळलेला हेता. तर म्हाताऱ्याबुवांनी घातलेला सूट पण घरी शिवलेला, ढगाळ, गबाळा आणि इस्त्री न केलेला होता. प्रेसिडेंटच्या केबिनबाहेर पॉश काऊंटरवर बसलेल्या सेक्रेटरीकडे ते जोडपे आले. 

‘आम्हाला प्रेसिडेन्ट साहेबांची फक्त दहा मिनिटेच भेट हवी आहे! मिळेल का?’ त्या आजीबाईंनी नम्रपणे विचारले. 

त्या जोडप्याचा तो गबाळा अवतार बघून ती सेक्रेटरी थोडीशी नाराज झाली. तिला वाटले हे एक गरीब जोडपे आहे. एकतर भीक मागायला, म्हणजे डोनेशन मागायला आले असेल किंवा मुलाच्या फी मध्ये सवलत मागायला आले असेल. अशा लोकांना कसे टोलवायचे हे तिला चांगलेच ठाऊक होते. 

‘प्रेसिडेन्ट साहेब सध्या कामात आहेत! ते लगेच भेटू शकणार नाहीत!’ तिने उर्मटपणे सांगीतले. तिला वाटले तिच्या या उत्तराने ही दोघे म्हातारे एकदाची टळेल. 

‘ठीक आहे! आम्ही वाट बघू! पण त्यांना भेटूनच परत जाऊ!’ त्या आजी नम्रपणे म्हणाल्या आणि ते जोडपे तेथे ठेवलेल्या सोफ्यावर जाऊन बसले. 

प्रेसिडेन्ट साहेब खरच बिझी असावेत. दोन चार वेळा ते केबिनच्या बाहेर आले. त्यांनी ऊंची सूट घातला होता, पायात चकचकीत बूट होते, चेहऱ्यावर अधिकाराचा रुबाब होता. त्यांनी त्या म्हाताऱ्या जोडप्याकडे पाहिले न पाहिल्यासारखे केले पण त्यांची काही दखल घेतली नाही. बघता बघता दिवस संपायला आला. संध्याकाळ व्हायची वेळ आली. तरी सुद्धा ते वृद्ध जोडपे बसूनच होते. शेवटी त्या सेक्रेटरीलाच दया आली असावी. 

‘ते वृद्ध जोडपे सकाळपासून तुम्हाला भेटायची वाट बघत आहेत. तुम्ही त्यांना पाच मिनीटे तरी भेटावेत’ सेक्रेटरीने प्रेसिडेन्टला सांगीतले. प्रेसिडेन्टला घरी जयची घाई होती तरी पण केवळ पाच मिनिटेच भेटायला ते एकदाचे तयार झाले!

‘काय काम आहे?’ प्रेसिडेन्ट साहेब केबिनच्या बाहेर आले आणि त्या वृद्ध जोडप्याला विचारू लागले. चेहऱ्यावर बऱ्याचपैकी नाराजी होतीच.

‘हे पहा! आमचा एकुलता एक मुलगा काही वर्षांपूर्वी या विद्यापिठाचा स्टुडंट होता. आता दुर्दैवाने तो नाही. विद्यापिठाच्या आवारात त्याचे एखादे स्मारक असावे असे आम्हाला वाटते. म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलो!’ ती वृद्ध महिला नम्रपणे म्हणाली

‘स्मारक? कसले स्मारक? म्हणजे तुम्हाला ईथे त्याचा पुतळा वगैरे उभारायचा आहे काय? ते शक्य नाही.  आम्ही जर मृत पावलेल्या प्रत्येक माजी विद्यार्थ्याचा पुतळा येथे उभारू लागलो तर आमच्या युनिव्हर्सिटिचे स्मशान व्हायला वेळ लागणार नाही!’ प्रेसिडेन्ट साहेब काहिश्या वैतागानेच म्हणाले. 

‘नाही नाही! तसे नाही!’ त्या आजीबाई परत बोलू लागल्या, ‘आम्हाला येथे त्याचा पुतळा वगैरे उभारायचा नाही. त्याचे स्मारक म्हणून तुमच्या विद्यापीठाला एखादी चांगली ईमारत वगैरे बांधुन देण्याचा विचार आहे!’ 

त्या आजीबाईंच्या चुरगळलेल्या, मळक्या कपड्यांकडे बघून प्रेसिडेन्ट साहेबांना हसूच आले.’ ईमारत? ईमारत बांधायला किती पैसे लागतात ठाऊक आहे का? तुम्हाला म्हणून सांगतो. या विद्यापिठाच्या कॅम्पसमधील ईमारती बांधायला आम्हाला 75 लाख डॉलर्स लागले!’ प्रेसिडेन्ट साहेब सांगत असतातना या जोडप्याच्या खिशात 75 डॉलर्स तरी असतील की नाही याची त्यांना खात्री वाटत नसावी असा त्यांचा चेहरा होता. 

‘युनिव्हर्सिटी काढायला एवढेच पैसे लागतात?’ त्या आजीबाई हळूच त्या म्हाताऱ्याबुवांच्या कानात कुजबुजल्या. प्रेसिडेन्ट साहेबांचे आभार मानून मिस्टर आणि मिसेस लेलॅन्ड स्टॅनफोर्ड नावाचे हे वृद्ध जोडपे तेथून बाहेर पाडले. 
पुढे ते कॅलिफोर्निया राज्यातील पालो आल्टो या गावी आले आणि स्वतःच्या मुलाच्या नावाने युनिव्हर्सिटी चालू केली. हीच आहे जगप्रसिद्ध स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी!

आज स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ही जगातील नंबर एकची युनिव्हर्सिटी म्हणून ओळखली जाते. 8180 एकर जमीनीवर या युनिव्हर्सिटीचा परिसर पसरला आहे.
 या युविव्हर्सिटिचे वार्षिक बजेट भारत सरकारच्या वार्षिक बजेटच्या तिपटीहून जास्त असते. जगात सगळ्यात जास्त ‘नोबेल लॉरिएट्स’ (नोबेल पारितोषिक विजेते) या युनिव्हर्सिटीसाठी काम करतात. आज या युनिव्हर्सिटीत 32 नोबेल लॉरियटस प्रोफेसर म्हणून काम करत आहेत. 

अनेक जणांना माणसाची पारख ही त्याच्या कपड्यांवरून किंवा बाह्य रुपावरून करायची सवय असते. पण अनेकदा ही सवय घातक ठरते. पॉश किंवा फॅशनेबल कपडे घालणारा माणूस हा खऱ्या अर्थाने    श्रीमंत किंवा चांगल्या कॅरेक्टरचा असतोच असे नाही. तसेच सामान्य कपडे घालणारा, सामान्यपणे राहणारा माणुस हा गरीब, दरिद्री किंवा ‘लो कॅरेक्टर’चा असतो असेही नाही. अनेक वेळा आपण माणसाच्या कपड्यांवरून किंवा बाह्य रुपावरून चुकीची पारख करतो आणि एखादा चांगला मित्र, हितचिंतक किंवा गि-हाईक कायमचे हातचे घालवून बसतो. 

माणसाच्या

कपड्यांवरून किंवा बाह्य रुपावरून त्याची पारख करायची घातक सवय, असल्यास, ती सोडून द्या! 

अर्थात असे करायचे की नाही हे तुमचे तुम्ही ठरवा!