पुत्र सुख कशात आहे ? हा एक न सुटलेला प्रश्न आहे कारण की बऱ्याच जणांना अनेक मुलं असूनही त्यांना पुत्र सुख प्राप्त झालेलं नाही व काही निपुत्रिक असूनही आपल्या वागण्याने व आत्मसंयमाने त्यांनी पुत्रसुख मिळवले आहे ते आपण या लेखामध्ये बघूया .
लेख आवडल्यास नक्की शेअर करा व सबस्क्राईब करा
🌹 *पुत्रसुख* ...! 🌹
कंडक्टरनं एस.टी.चं दार उघडलं..आणि सामंतकाका दारापाशी आले.हातात एक गोंडस बाल गणेशाची मुर्ती...कंडक्टरनं ते पाहिलं आणि काकांना आधार देत आंत घेतलं.मागून दोन पॅसेंजर चढले..! एस.टी.सुरु झाली.कंडक्टरनं ड्राईव्हरला ओरडून सांगितलं, " थांबा जरा ..गणपती मुर्ती आहे....!" त्यानं गाडी थांबवली.लोकांनी मागे वळून मुर्तीकडं पाहिलं.. ती मूर्ती इतकी सुंदर होती की तिचे ते गोंडस रुप पाहून काही जणांचे हांत नकळत जोडले गेले.कंडक्टरनं शेवटी सामंतकाकांना आपल्या शेजारी बसायला सांगितलं ..डबलबेल दिली.एस.टी.सुरु झाली..!
कंडक्टर इतरांची तिकीटं काढून येऊन काकांपाशी बसला...!
काकांच्या पँटच्या खिशात पैसे होते.पण मांडीवर मुर्ती असतांना त्यांना पैसे काढता येईनात तिकीटासाठी.त्याची ती धडपड पाहून
कंडक्टर म्हणाला, "राहू दे काका.उतरतांना द्या.एस.टी.थांबवून माझ्या या सीटवर मुर्ती ठेऊ.तेव्हा द्या."
थोडं अंतर जाताच कंडक्टरनं विचारलं, "काका एक विचारु? तुमच्या गावात गणेशमुर्ती मिळत असेलच ना ? मग दुस-या गावांतून ही मूर्ती घेऊन येणं ;तेही एस.टी.च्या प्रवासाची दगदग करुन? "
सामंतकाकांनी स्मित केलं..मग म्हणाले, " आमच्या गांवात मिळतात मुर्त्या..पण अशी नाही ..ही मुर्ती पाहिलीत नं? कशी गोंडस आहे? अगदी जिवंत वाटते..अगदी लहान बाळच..!"
कंडक्टरनं होकारार्थी मान हलवली व अगदी अंत:करणापासून पुन्हा हांत जोडले..हलकेच स्पर्शही केला.
" आम्हा नवरा-बायकोला मूलबाळ नाही.सगळे उपाय करुन थकलो..मग प्रारब्ध म्हणून सोडून दिलं..माझी पत्नी या गावी पंधरा वर्षापूर्वी आली होती कामानिमित्त. तिनं अशी मुर्ती इथं पाहिली अन् तिचं वात्सल्य जागं झालं जणूकाही ..तिचे डोळे भरुन वाहू लागले.तोंडातून नकळत शब्द फुटले "माझं बाळ "..हे असं घडल्यापासून..ह्या गांवातून मुर्ती नेणं हा प्रघात सुरु झाला.हिला सांधेदुखीनं आता प्रवास झेपत नाही. म्हणून मी आणतो "
कंडक्टर हे ऐकून स्तिमीत झाला..थोड्यावेळानं त्यानं विचारलं " पण काका तुमच्या तिथं दाखवून घ्यायची, मोल्ड बनवून गावांत .."
" ते ही केलं पण ..जास्त मुर्त्या केल्या तरच त्यांना इंटरेस्ट..आणि असे भाव येतीलच शाश्वती नाही "
हे संभाषण एव्हाना आजूबाजूचे ऐकत होते..एका स्त्रीनं विचारलं "काका मग विसर्जित करायचीच नाही मुर्ती ..!"
सामंतकाका फिकटसे हसले व म्हणाले," विरहामुळं प्रेम उदंड पाझरतं तिचं..!आत्ताही दारात वाट पहात बसली असेल.रांगोळी काय ..आंब्याची तोरणं काय..!भाकरतुकडा काय..,दृष्ट काढण्यासाठी ..!! त्याच्या कपड्यांची छोटी बॅग आहे.छोटा तांब्या भांडं काय.....विचारु नका..मला तिचं ते सुख हिरावून घ्यायचं नाहीए. "
यांवर कुणाचे डोळे पाणावले.कुणी स्मित केले..नंतर मौन राहिलं.काकांचं गांव आलं.एका व्यक्तीनं पुढं होऊन मुर्ती हातात घेतली..म्हणाला "काका तुम्ही तिकीट काढा.तोपर्यंत धरतो मी.." काहीजण त्या मुर्तीकडं जवळून पहात राहिले..आता लोकांची नजरच बदललेली....
सामंतकाकांनी कंडक्टरला पैसे दिले " दिड तिकिट द्या.एक हाफ आणि एक फुल "
कंडक्टरनं आश्चर्यानं विचारलं " दिड ? तुम्ही तर एकटेच आला आहात नं? "
काकांनी स्मित केलं, " दोघं नाही का आलो? मी आणि हा बालगणेश आमचा? "
हे ऐकून सगळे एकमेकांकडं पाहू लागले..!
काका म्हणाले, " असे कोड्यात का पडलांत बरें? त्याला नमस्कार केलात.त्याला आपला देव मानता..व प्राणप्रतिष्ठेपूर्वी तो केवळ माती आहे का हो? तो आपल्यापेक्षा जास्त जिवंत नाहीए का? तुमचा भाव जागृत झाला नं? आपणच त्याला मातीची मुर्ती याच भावाने भजतो;पूजतो..अगदी पूजा केल्यावरही ...
पण त्याला एकाचीच गरज प्रेमाची..आपल्या अलिंगनाची ..द्या दिड तिकिट..!'' हे बोलतांना काकांचा गळा दाटून आला होता.कंडक्टरनं दिड तिकीट दिलं..!
सामंतकाका जेव्हा एस.टी.तून उतरले तेव्हा एस.टी.तील प्रवाशांचे डोळे पाणावलेले व हांत जोडले गेले ...
अगदी अनाहूतपणे ...!!
चैनलला नक्की सबस्क्राईब करा. पोस्ट शेअर करायला अजिबात विसरू नका
👨🏻🦳👨👩👧👦🙆🏻♂
पोस्ट आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा व त्यांनाही वाचनाचा आनंद घेऊ द्या . सबस्क्राइब करायला विसरू नका आपल्या व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम इत्यादी सोशल मीडियावर नक्की शेअर करा धन्यवाद
-
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खूपच छान कथा
उत्तर द्याहटवामस्त बालगणेश
उत्तर द्याहटवा