माझ्या मराठीची गोडी

वाचकांना वाचनाची एक पर्वणी मिळावी . मराठी भाषेची गोडवी कळावी यासाठी केवळ हा एक प्रयत्न आहे कुणाला काही शंका असल्यास कृपया राग व्यक्त न करता कमेंटमध्ये सांगा व योग्य ते मार्गदर्शनही करा .

Breaking

रविवार, ३१ मे, २०२०

माणसे ओळखण्यातील धोका

*कधी कधी माणसाची ओळख करण्यात किती मोठा धोका होतो.*

अवश्य वाचा

 अमेरिकेतील जगप्रसिद्ध हॉर्वर्ड विद्यापिठाच्या प्रेसिडेंटना भेटण्यासाठी म्हणून एक वृद्ध जोडपे अपॉईंटमेंट न घेता भेटायला आले. 
त्या जोडप्याचा वेश नुसताच साधा नव्हता तर गबाळा पण होता. म्हातारीबाईंनी घातलेला फ्रॉक अगदी साधा, चुरगळलेला आणि थोडासा मळलेला हेता. तर म्हाताऱ्याबुवांनी घातलेला सूट पण घरी शिवलेला, ढगाळ, गबाळा आणि इस्त्री न केलेला होता. प्रेसिडेंटच्या केबिनबाहेर पॉश काऊंटरवर बसलेल्या सेक्रेटरीकडे ते जोडपे आले. 

‘आम्हाला प्रेसिडेन्ट साहेबांची फक्त दहा मिनिटेच भेट हवी आहे! मिळेल का?’ त्या आजीबाईंनी नम्रपणे विचारले. 

त्या जोडप्याचा तो गबाळा अवतार बघून ती सेक्रेटरी थोडीशी नाराज झाली. तिला वाटले हे एक गरीब जोडपे आहे. एकतर भीक मागायला, म्हणजे डोनेशन मागायला आले असेल किंवा मुलाच्या फी मध्ये सवलत मागायला आले असेल. अशा लोकांना कसे टोलवायचे हे तिला चांगलेच ठाऊक होते. 

‘प्रेसिडेन्ट साहेब सध्या कामात आहेत! ते लगेच भेटू शकणार नाहीत!’ तिने उर्मटपणे सांगीतले. तिला वाटले तिच्या या उत्तराने ही दोघे म्हातारे एकदाची टळेल. 

‘ठीक आहे! आम्ही वाट बघू! पण त्यांना भेटूनच परत जाऊ!’ त्या आजी नम्रपणे म्हणाल्या आणि ते जोडपे तेथे ठेवलेल्या सोफ्यावर जाऊन बसले. 

प्रेसिडेन्ट साहेब खरच बिझी असावेत. दोन चार वेळा ते केबिनच्या बाहेर आले. त्यांनी ऊंची सूट घातला होता, पायात चकचकीत बूट होते, चेहऱ्यावर अधिकाराचा रुबाब होता. त्यांनी त्या म्हाताऱ्या जोडप्याकडे पाहिले न पाहिल्यासारखे केले पण त्यांची काही दखल घेतली नाही. बघता बघता दिवस संपायला आला. संध्याकाळ व्हायची वेळ आली. तरी सुद्धा ते वृद्ध जोडपे बसूनच होते. शेवटी त्या सेक्रेटरीलाच दया आली असावी. 

‘ते वृद्ध जोडपे सकाळपासून तुम्हाला भेटायची वाट बघत आहेत. तुम्ही त्यांना पाच मिनीटे तरी भेटावेत’ सेक्रेटरीने प्रेसिडेन्टला सांगीतले. प्रेसिडेन्टला घरी जयची घाई होती तरी पण केवळ पाच मिनिटेच भेटायला ते एकदाचे तयार झाले!

‘काय काम आहे?’ प्रेसिडेन्ट साहेब केबिनच्या बाहेर आले आणि त्या वृद्ध जोडप्याला विचारू लागले. चेहऱ्यावर बऱ्याचपैकी नाराजी होतीच.

‘हे पहा! आमचा एकुलता एक मुलगा काही वर्षांपूर्वी या विद्यापिठाचा स्टुडंट होता. आता दुर्दैवाने तो नाही. विद्यापिठाच्या आवारात त्याचे एखादे स्मारक असावे असे आम्हाला वाटते. म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलो!’ ती वृद्ध महिला नम्रपणे म्हणाली

‘स्मारक? कसले स्मारक? म्हणजे तुम्हाला ईथे त्याचा पुतळा वगैरे उभारायचा आहे काय? ते शक्य नाही.  आम्ही जर मृत पावलेल्या प्रत्येक माजी विद्यार्थ्याचा पुतळा येथे उभारू लागलो तर आमच्या युनिव्हर्सिटिचे स्मशान व्हायला वेळ लागणार नाही!’ प्रेसिडेन्ट साहेब काहिश्या वैतागानेच म्हणाले. 

‘नाही नाही! तसे नाही!’ त्या आजीबाई परत बोलू लागल्या, ‘आम्हाला येथे त्याचा पुतळा वगैरे उभारायचा नाही. त्याचे स्मारक म्हणून तुमच्या विद्यापीठाला एखादी चांगली ईमारत वगैरे बांधुन देण्याचा विचार आहे!’ 

त्या आजीबाईंच्या चुरगळलेल्या, मळक्या कपड्यांकडे बघून प्रेसिडेन्ट साहेबांना हसूच आले.’ ईमारत? ईमारत बांधायला किती पैसे लागतात ठाऊक आहे का? तुम्हाला म्हणून सांगतो. या विद्यापिठाच्या कॅम्पसमधील ईमारती बांधायला आम्हाला 75 लाख डॉलर्स लागले!’ प्रेसिडेन्ट साहेब सांगत असतातना या जोडप्याच्या खिशात 75 डॉलर्स तरी असतील की नाही याची त्यांना खात्री वाटत नसावी असा त्यांचा चेहरा होता. 

‘युनिव्हर्सिटी काढायला एवढेच पैसे लागतात?’ त्या आजीबाई हळूच त्या म्हाताऱ्याबुवांच्या कानात कुजबुजल्या. प्रेसिडेन्ट साहेबांचे आभार मानून मिस्टर आणि मिसेस लेलॅन्ड स्टॅनफोर्ड नावाचे हे वृद्ध जोडपे तेथून बाहेर पाडले. 
पुढे ते कॅलिफोर्निया राज्यातील पालो आल्टो या गावी आले आणि स्वतःच्या मुलाच्या नावाने युनिव्हर्सिटी चालू केली. हीच आहे जगप्रसिद्ध स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी!

आज स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ही जगातील नंबर एकची युनिव्हर्सिटी म्हणून ओळखली जाते. 8180 एकर जमीनीवर या युनिव्हर्सिटीचा परिसर पसरला आहे.
 या युविव्हर्सिटिचे वार्षिक बजेट भारत सरकारच्या वार्षिक बजेटच्या तिपटीहून जास्त असते. जगात सगळ्यात जास्त ‘नोबेल लॉरिएट्स’ (नोबेल पारितोषिक विजेते) या युनिव्हर्सिटीसाठी काम करतात. आज या युनिव्हर्सिटीत 32 नोबेल लॉरियटस प्रोफेसर म्हणून काम करत आहेत. 

अनेक जणांना माणसाची पारख ही त्याच्या कपड्यांवरून किंवा बाह्य रुपावरून करायची सवय असते. पण अनेकदा ही सवय घातक ठरते. पॉश किंवा फॅशनेबल कपडे घालणारा माणूस हा खऱ्या अर्थाने    श्रीमंत किंवा चांगल्या कॅरेक्टरचा असतोच असे नाही. तसेच सामान्य कपडे घालणारा, सामान्यपणे राहणारा माणुस हा गरीब, दरिद्री किंवा ‘लो कॅरेक्टर’चा असतो असेही नाही. अनेक वेळा आपण माणसाच्या कपड्यांवरून किंवा बाह्य रुपावरून चुकीची पारख करतो आणि एखादा चांगला मित्र, हितचिंतक किंवा गि-हाईक कायमचे हातचे घालवून बसतो. 

माणसाच्या

कपड्यांवरून किंवा बाह्य रुपावरून त्याची पारख करायची घातक सवय, असल्यास, ती सोडून द्या! 

अर्थात असे करायचे की नाही हे तुमचे तुम्ही ठरवा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..