*इथून पुढे फक्त त्यांनाच दीर्घ आयुष्य मिळेल !--------------------------------*तुम्हीच सांगा ........**हल्ली.. आपलं आजारी पडण्याचं प्रमाण थोडं जास्तच वाढलं का नाही ?**कधी पोटच दुखतं , कधी बी.पी.च वाढतो , कधी शुगर वर खाली होते**कधी हृदयाचे ठोके वाढून चक्करच येते**करमत नाही , मन लागत नाही**छातीत धडधड , मनात**भीती ....अशा एक ना अनेक तक्रारी .....!**कारणं काय तर म्हणे ....**मग ......**मग वॉटर प्युरीफायर आलं , रूम फ्रेशनर आलं , डास प्रतिबंधक वड्या , उदबत्त्या , एवढंच काय घरा घरात डास मारण्याच्या बॅटी सुद्धा आल्या .....**काय परिणाम झाला ?**डासं मेले पण आजारपण गेलं का ?**नाही ........**मग...?**तुम्ही आम्ही काय केलं आहे...**जाणते अजाणते पणे सर्वांशी कट्टी धरली आहे !**हल्ली माणसं एकमेकाला मोकळेपणाने बोलतच नाहीत ......हे खरं कारण आहे आजारी पडण्याचं !**सख्खे , चुलत , मावस**आई वडील , बहीण भाऊ**शेजारी , सहकारी ...या सर्वांशी आपण अबोला धरला आहे !**ओळख आहे पण संवाद नाही**नातं आहे पण माया नाही**अवांतर , मोक्कार विषयावर आपण खूप गप्पा मारतो पण खरं दुःख कुणीही कुणाला सांगत नाही ......हे एक आपल्या वारंवार आजारी पडण्याचं कारण असू शकतं !**सगे सोयरे , घरकुल , गोकुळ**नातीगोती , हॅपी फॅमिली , आपली माणसं**.....अशा गोंडस नावांनी आपण Whats app चे ग्रुप बनवले ....**पण त्यावर मनमोकळा संवाद होतोय का ?**मी दुःख सांगितल्यावर मला हसतील का ? अशी जर भीती वाटत असेल ....**मी Good news सांगितल्यावर आनंदी होतील का नाही ? अशी जर भीती वाटत असेल .....**तर असे ग्रुप ,अशी नाती काय कामाची ?**लक्षात ठेवा हिलस्टेशनला , युरोप टूरला जाऊन relax होता येईल ....पण हलकं वाटू शकेल का ?**टेन्शन कमी होईल का ?**त्यामुळे वारंवार आजारी पडण्याची कारणे कदाचित ही तर नसतील ......**मनातल्या भावनांचा निचरा न होणे ...,**सकारण , विनाकारण प्रत्येक नात्या सोबत झालेली कट्टी ...,**खूप बोलावं वाटणे ...पण व्यक्त होण्यासाठी जागाच न उरणे ....**मग आता काय करावं ?**ज्या वादा मध्ये , अबोल्या मध्ये , फारसं तथ्य नाही असे वाद मिटवण्यासाठी स्वतः होऊन पुढाकार घ्यावा ....**व्यक्त व्हा , बोला , दो करा**कदाचित आपलं वारंवार आजारी पडणं थोडं कमी होईल**लक्षात ठेवा इथून पुढे फक्त त्याच माणसांना दीर्घ आयुष्य मिळेल .....जी माणसं हसण्याच्या आणि रडण्याच्या जास्तीत जास्त जागा निर्माण करू शकतील*पोस्ट वाचून झाल्यावर नक्की शेअर करा व इतरांनाही वाचनाचा आनंद घेऊ द्या तसेच ब्लॉग ला सबस्क्राइब करायला विसरू नका म्हणजे नवीन पोस्ट टाकल्यानंतर लगेच तुम्हाला माहिती मिळेल धन्यवाद.
शुक्रवार, १९ जून, २०२०
इथून पुढे फक्त त्यांनाच दीर्घ आयुष्य मिळेल !
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..