माझ्या मराठीची गोडी

वाचकांना वाचनाची एक पर्वणी मिळावी . मराठी भाषेची गोडवी कळावी यासाठी केवळ हा एक प्रयत्न आहे कुणाला काही शंका असल्यास कृपया राग व्यक्त न करता कमेंटमध्ये सांगा व योग्य ते मार्गदर्शनही करा .

Breaking

गुरुवार, १८ जून, २०२०

जून १८, २०२०

सुंदरता

एक अती सुन्दर महिला ने विमान में प्रवेश किया और अपनी सीट की तलाश में नजरें घुमाईं। 

उसने देखा कि उसकी सीट एक ऐसे व्यक्ति के बगल में है। जिसके दोनों ही हाथ नहीं है।

 महिला को उस अपाहिज व्यक्ति के पास बैठने में झिझक हुई। 

उस 'सुंदर' महिला ने एयरहोस्टेस से बोला "मै इस सीट पर सुविधापूर्वक यात्रा नहीं कर पाऊँगी।

 क्योंकि साथ की सीट पर जो व्यक्ति बैठा हुआ है उसके दोनों हाथ नहीं हैं।

" उस सुन्दर महिला ने एयरहोस्टेस से सीट बदलने हेतु आग्रह किया। 

असहज हुई एयरहोस्टेस ने पूछा, "मैम क्या मुझे कारण बता सकती है..?"

'सुंदर' महिला ने जवाब दिया "मैं ऐसे लोगों को पसंद नहीं करती। मैं ऐसे व्यक्ति के पास बैठकर यात्रा नहीं कर पाउंगी।"

दिखने में पढी लिखी और विनम्र प्रतीत होने वाली महिला की यह बात सुनकर एयरहोस्टेस अचंभित हो गई। 

महिला ने एक बार फिर एयरहोस्टेस से जोर देकर कहा कि "मैं उस सीट पर नहीं बैठ सकती। अतः मुझे कोई दूसरी सीट दे दी जाए।"

एयरहोस्टेस ने खाली सीट की तलाश में चारों ओर नजर घुमाई, पर कोई भी सीट खाली नहीं दिखी। 

एयरहोस्टेस ने महिला से कहा कि "मैडम इस इकोनोमी क्लास में कोई सीट खाली नहीं है, किन्तु यात्रियों की सुविधा का ध्यान रखना हमारा दायित्व है।

 अतः मैं विमान के कप्तान से बात करती हूँ। कृपया तब तक थोडा धैर्य रखें।" ऐसा कहकर होस्टेस कप्तान से बात करने चली गई। 

कुछ समय बाद लोटने के बाद उसने महिला को बताया, "मैडम! आपको जो असुविधा हुई, उसके लिए बहुत खेद है |

 इस पूरे विमान में, केवल एक सीट खाली है और वह प्रथम श्रेणी में है। मैंने हमारी टीम से बात की और हमने एक असाधारण निर्णय लिया। एक यात्री को इकोनॉमी क्लास से प्रथम श्रेणी में भेजने का कार्य हमारी कंपनी के इतिहास में पहली बार हो रहा है।"

'सुंदर' महिला अत्यंत प्रसन्न हो गई, किन्तु इसके पहले कि वह अपनी प्रतिक्रिया व्यक्त करती और एक शब्द भी बोल पाती... 

एयरहोस्टेस उस अपाहिज और दोनों हाथ विहीन व्यक्ति की ओर बढ़ गई और विनम्रता पूर्वक उनसे पूछा 

"सर, क्या आप प्रथम श्रेणी में जा सकेंगे..? क्योंकि हम नहीं चाहते कि आप एक अशिष्ट यात्री के साथ यात्रा कर के परेशान हों।

यह बात सुनकर सभी यात्रियों ने ताली बजाकर इस निर्णय का स्वागत किया। वह अति सुन्दर दिखने वाली महिला तो अब शर्म से नजरें ही नहीं उठा पा रही थी।

तब उस अपाहिज व्यक्ति ने खड़े होकर कहा, 

"मैं एक भूतपूर्व सैनिक हूँ। और मैंने एक ऑपरेशन के दौरान कश्मीर सीमा पर हुए बम विस्फोट में अपने दोनों हाथ खोये थे। 

सबसे पहले, जब मैंने इन देवी जी की चर्चा सुनी, तब मैं सोच रहा था। की मैंने भी किन लोगों की सुरक्षा के लिए अपनी जान जोखिम में डाली और अपने हाथ खोये..? 

लेकिन जब आप सभी की प्रतिक्रिया देखी तो अब अपने आप पर गर्व हो रहा है कि मैंने अपने देश और देशवासियों के लिए अपने दोनों हाथ खोये।"

और इतना कह कर, वह प्रथम श्रेणी में चले गए।

'सुंदर' महिला पूरी तरह से अपमानित होकर सर झुकाए सीट पर बैठ गई।

अगर विचारों में उदारता नहीं है तो ऐसी सुंदरता का कोई मूल्य नहीं है।

मैरे पास ये कहानी आई थी। 

उम्मीद करता हूँ कि आप लोगों भी कहाणी बहुत पसंद आएगी। ।

🇮🇳R🇮🇳🙏🏻जय हिन्द🙏G🇮🇳🇮🇳
पोस्ट आवडल्यास वाचून झाल्यानंतर नक्की शेअर करा व इतरांनाही वाचनाचा आनंद घेऊ द्या
सबस्क्राईब करायचं विसरू नका

#Nochina

बुधवार, १७ जून, २०२०

जून १७, २०२०

व्यक्तिमत्व सुधारण्याचे दहा मार्ग

१० असे मार्ग ज्यामुळे तुम्ही तुमचं व्यक्तीमत्व सुधारु शकता



     🎙आरोग्यदूत हेल्थकेयर.... व्यक्तीमत्व विकास🎯

*चांगले श्रोते (Listener) बना*.


चांगले श्रोते बनणे म्हणजेच काय तर समोरचा माणूस जेव्हा बोलत असेल तेव्हा त्यांच्या डोळ्यात बघणे , त्यांचा प्रत्येक शब्द काळजीपूर्वक ऐकणे आणि त्यांना जाणवून देणे कि त्यांच बोलण आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे. आपण काहीतरी बोलत असू आणि समोरचा माणूस आपल न ऐकता दुसरीकडे लक्ष देत असेल तर साहजिकच ते आपल्याला आवडणार नाही पण तेच जर कोणी आपलं बोलण काळजीपूर्वक ऐकत असेल तर आपल्याला आपल बोलण मांडण सोप जातं.


*जास्तीत जास्त वाचा अणि ज्ञान वाढवा*.


जसं तुमचं वाचन वाढेल तुम्हाला विविध विषयांमधे आवड निर्माण होईल तुमचं ज्ञान वाढेल आणि ज्ञान वाढलं कि लोकांना तुमच्या ज्ञानाबद्दल कुतुहल निर्माण होईल. जेव्हा तुम्ही नविन माणसांना भेटाल ही संधी असेल तुमच्यासाठी तुमचे विचार त्यांच्यासमोर मांडण्याची आणि त्यांच्याकडील नवीन विचार आत्मसात करुन घेण्याची.


*चांगल संभाषण करायला शिका*


तुम्ही किती चांगलं संभाषण करू शकता हे तुम्ही किती वाचन करता यावर अवलंबून असतं.जेव्हा तुमच्याकडे एखाद्या विषयाबद्दल माहीती असेल तेव्हाच तुम्ही त्या विषयावर बोलायला शिकू शकता. कोणीही एखाद्या विषयाबद्दल पुर्णपणे वाचू किंवा माहीती ठेवू शकत नाही , पण जर आपल्याकडे संभाषण कला असेल तर त्या गोष्टी आपण दुसर्‍यांकडून शिकू शकतो ज्या वाचण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो. जर तुम्ही बोलायला लाजत असाल तर तुम्ही टोस्टमास्टर सारखे ग्रुप जॉईन करु शकता जे तुम्हाला बोलायला प्रोत्साहित करतील.

*स्वत:च मत ठेवा*


ज्याला स्वतःचं मत नाही अशा व्यक्तिशी बोलणे यापेक्षा दुसरी कंटाळवाणी गोष्ट नाही. अशा संभाषणांना कहीच अर्थ नसतो. मताशिवाय संभाषण म्हणजे दिशा विरहीन होऊन चालणं. तेच जर एखाद्या विषयावर दोन व्यक्तींची वेगवेगळी मतं आणि मुद्दे असतील तर तेच संभाषण अधिक मनोरंक बनतं .

*नवीन लोकांना भेटा*


नवनवीन लोकांना भेटण्याचा प्रयत्न करा. खासकरुन अशा लोकांना भेटा ज्यांचे स्वभाव आणि विचार तुमच्या स्वभाव आणि विचारांपेक्षा वेगळे असतील. यामुळे तुम्हाला फक्त त्यांच्या संस्कृतिबद्दल नाही तर एकच गोष्ट् करण्याचे वेगवेगळे मार्ग सापडतील.

*स्वतः जसे आहात तसे रहा*


स्वतःच मत नसणे यासारखीच दुसरी कंटाळवाणी गोष्ट म्हणजे जे आपण नाही ते बनण्याचा प्रयत्न करणे. स्वतःला दुसर्‍यासाठी किंवा दुसर्‍यासारख बनण्यासाठी बदलणे याचे परिणाम नेहमीच उलट होतात. प्रत्येक जण वेगळा असतो आणि आपण आपला वेगळे पणा दाखवला तरच इतरांच्या नजरेत मोठे होतो. दुसर्‍याची कार्बन कॉपी बनण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आपल्यातला खरेपणा घालवण्यासारखं आहे.

*सकारात्मक विचार आणि दृष्टीकोन ठेवा*


कोणालाच अशा लोकांबरोबर रहायला आवडत नाही ज्यांचे विचार नकारात्मक असतात ,ज्यांना खुप तक्रारी असतात किंवा ज्यांना चांगल बोलण माहीतच नसतं. खरं तर अशा माणसांपासून आपण एक हात लांबच राहण पसंत करतो. म्हणूनच असा माणूस बना जो आपल्या विचारांनी वातावरण सकारात्मक करतो आणि हे आपण तेव्हाच करु शकतो जेव्हा आपण प्रत्येक माणसामध्ये आणि इतर गोष्टींमध्ये चांगल बघण्याचा प्रयत्न करु.

*आनंदी रहा आणि विनोदी वृत्ती  ठेवा*


कोणालाही अशा माणसांची संगत जास्त आवडते जे विनोदी वृत्तीचे असतात. गंभीर वृत्तीच्या माणसांबरोबर तुम्हाला जास्त माणसं कधीच दिसणार नाहीत. त्यामुळेच कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंदी रहायला शिका. गंभीर परिस्थितीकडे सुध्दा विनोदी दृष्टीकोनातून पाहता आलं पाहीजे.

*दुसर्‍यांना मदत करा*


दुसर्‍यांना मदत करणे हा एक महत्त्वाचा गुण आहे आपलं व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी . जस तुम्हाला एखाद्या माणसाने मदत केली तर आवडतं तसच तुम्हीही दुसर्‍याची मदत करा जेव्हा एखाद्याला तुमच्या मदतीची गरज असते. प्रत्येकालाच अशी माणसं आवडतात जी आपल्यावर विश्वास ठेवतात. आपण कधी पडलो तर उठायला मदत करुन पुढे जाण्यासाठी प्रोत्साहीत करतात.

*इतरांचा आदर करा*


दुसर्‍यांकडून आदर आणि प्रशंसा हवी असेल तर आपल्या शब्दांबरोबर खरं आणि प्रामाणिक राहता आलं पाहीजे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी फक्त दुसर्‍यांसाठीच नाही तर स्वतः बद्दल सुध्दा आदर असला पाहीजे. एक माणूस म्हणून आपल्याकडे ती क्षमता आहे कि आपण आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देऊ शकतो. जेव्हा आपण स्वतःला विकसित करण्यासठी आपल्याकडून होणारे सगळे प्रयत्न करतो तेव्हा आपण स्वतः बरोबरच दुसर्‍यांच्या आनंदात योगदान देत असतो.

================
...आरोग्यदूत हेल्थ केअर ।।।!
 एकपाऊल प्रगतीकडे.......🎯🎯
===============

धन्यवाद,
टिम आरोग्यदूत हेल्थ केयर, नवापुर

कृपया सबस्क्राईब करा , पोस्ट फॉरवर्ड करा व इतरांनाही वाचनाचा आनंद घेऊ द्या.

रविवार, १४ जून, २०२०

जून १४, २०२०

दुर्दैवाने कधी आयुष्यात सेटबॅक आलाच*

*दुर्दैवाने कधी आयुष्यात सेटबॅक आलाच* 

अचानक कंपनी बंद पडणं , 
जॉब जाणं,
व्यवसाय अडचणीत येणं, 
उत्पन्न एकदम कमी होण, 
एखादं मोठं आजारपण ,
अपघात होणं,

हे कोणाच्याही 
आणि केंव्हाही वाट्याला येऊ शकतं 
त्रास होणं , झोप उडन , काळजी वाटणं स्वाभाविक आहे 
पण हिंमत हारू नका !

मात्र काही निर्णय ताबडतोब घ्यावे लागतील
चार रूम मध्ये राहात असाल दोन रूम मध्ये रहा 
दोन मध्ये रहात असाल एक मध्ये जा 
फोर व्हीलर वापरत असाल 
टू व्हीलर घ्या 
चारिठाव स्वयंपाक होत असेल 
फक्त पोळी-भाजी वर या  
काही loan घेतलेले असेल तर ते Clear करण्याचा प्रयत्न करा !

नातेवाईकाला शिव्या देऊ नका
फालतू डायलॉगबाजी अगोदर बंद करा
वेळच येऊ नये , कुणीच कुणाचं नसतं
त्याच त्या घिस्यापिट्या कॅसेट्स वाजउ नका !
शंभर पैकी दोन चार जण नक्की मदत करत असतात 
त्यांचं नाव घ्या
९६ जणांना नावं ठेवण्या पेक्षा ४ जणांना चांगलं म्हणा !

थोडक्यात काय ,
आपला आर्थिक स्रोत कमी झाला आहे  
हे समजून घ्या 
आणि गरजा कमी करा !

अजून एक महत्वाची गोष्ट 
अशा प्रसंगी .......
बायकोने नवऱ्याला साथ देणे 
खूप गरजेचे आहे 
त्याला टोमणे मारू नका , 
त्याच्या दुर्गुणांवर बोट ठेवण्याची ही वेळ नाही 
हे जरा समजून घ्या 
शाब्दिक बाणांनी सुद्धा माणूस घायाळ होऊन कोलमडून पडू शकतो 
हे नीट समजून घ्या
राम वनवासाला निघाल्यावर , 
सिता आपण होऊन रामा सोबत वनवासाला निघाली 
याचा अर्थ .......
राजवैभव असो किंवा वनवास असो
आहे त्या परिस्थितीत मी तुमची साथ देईल 
तुम्हाला सोडून जाणार नाही 
अवास्तव मागण्या करणार नाही 
असा त्याचा अर्थ असावा !

वाढलेले खर्च कमी कसे करता येतील 
ती पावलं अगोदर उचला 
पोरं जर खूप जास्त फी असणाऱ्या मोठाल्या शाळेत,महाविद्यालयात असतील 
तर त्या बदला 
फी भरतांना ओढाताण होणार नाही 
त्या शाळेत टाका 
लोकांच्या हसण्याचा नाही स्वतःच्या खिशाचा विचार करा !

*दिवस राहत नसतात मार्ग निघत असतात*
 
कोणतंही काम करण्याची 
लाज बाळगू नका 
अगदी भाजी पोळी करण्या पासून ते 
ड्रेस मटेरियल विकण्या पर्यंत काहीही करा 
घरातल्या मोबाईलची संख्या कमी करा 
इतरांशी स्पर्धा करू नका , तुलना करू नका 
कोणाच्याही लग्नाकार्यात उपस्थित राहण्या पेक्षा चार पैसे कमवण्यासाठी वेळ खर्च करा 
कमी पगारावर join व्हायची वेळ आली तरी पटकन हो म्हणा 
हेच मार्ग आहेत संकटातून बाहेर पडण्याचे !
 
नातेवाईकांना , लोकांना शिव्या देऊन काहीही होत नसतं
कोणी न कोणी मदत करतच असतं 
आणि एक गोष्ट लक्षात ठेवा  
उद्या दिवस सुधारल्या नंतर ज्यांनी मदत केली होती 
त्यांच्या वरच तगंड वर करू नका  !
कारण मदत करणाऱ्याचे अनुभव फार चांगले नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे !
हे मत बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा 
सगळं चांगलं होईल 
काळजी करायची नाही आणि 
हिंमत हारायची नाही  !!!

काहि महत्वाच्या टिप्स :-
1. तुम्ही हलाखीत आहात याचा पाढा सर्वांसमोर सतत वाचू नका. लोक तुमच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतील.

2. आपले जवळचे मित्र कोण त्यांच्याकडे मनमोकळेपणाने बोला. खरे मित्र या परिस्थितीत तुमच्या बाजूने उभे राहतात. हीच ती वेळ आहे जेव्हा खरे मित्र अोळखता येतात.

3.नातेवाईक अश्या प्रसंगी दूर जाण्याचा प्रयत्न करतात हे लक्षात ठेवा.

4. कागद व पेन घ्या. तुमच्या कुटूंबासोबत बसून महिन्याचे एकूण खर्च लिहून काढा. कोणते खर्च कमी करता येतील ते ठरवा. यामुळे संपूर्ण कूटूंब तुमच्या मदतीला येते.

5. स्वत:वर विश्चास ठेवा. या जगात फक्त तुम्ही आणि तुम्हीच स्वत:ला सर्वात जवळून अोळखता. 

6. जग काय म्हणेल हे विसरा. जगाला तुमची काही पडलेली नाही. 

7. छोटा व्यवसाय देखील उद्या तुम्हाला मोठ करु शकतो हे लक्षात घ्या.

8. व्यवसाय करताना लाज मनात बाळगू नका. 
*लक्षात घ्या तुम्ही कमवून खात आहात चोरी करुन नाही.*

9. योग्य आर्थिक नियोजन करा. कूटू्ंबाचा मेडीक्लेम व लाईफ ईन्शूरन्स हा एखाद्या तज्ञ आर्थिक सल्लागाराकडूनच करुन घ्या. लक्षात ठेवा योग्य तज्ञ आर्थिक सल्लागार तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकतो.

टिप :- शक्य असेल तर हि पोस्ट तुमच्या मित्रमंडळींना व इतर ग्रुपवर शेअर करा. कदाचित कोणीतरी या पोस्टपासून प्रेरणा घेउन आयुष्यात उभा राहू शकेल.
🙏
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
कृपया पोस्ट वाचून झाल्यानंतर नक्की शेअर करा


जून १४, २०२०

आश्चर्यकारक पारशी समाज

पतेती विशेष

आश्चर्यकारक पारशी समाज


✍प्रसाद जोशी कडेकर
भारताच्या एकूण लोकसंख्येच्या ०.००७% असणारा पारशी समाज. देशाच्या प्रगतीत मात्र या समाजाच योगदान प्रचंड मोठे आहे.
कुठेलेही क्षेत्र घ्या.या समाजाचा माणूस त्यात सगळ्यात पुढेच दिसणार.

राजकारणात दादाभाई नौरोजी,फिरोजशहा मेहता,भिकाजी कामा,दिनशॉ पेटीट

उद्योगात रतन टाटा,आदी गोदरेज,सायरस मिस्त्री,शापुरजी पालनजी,रूसी मोदी

सायन्स व टेक्नॉलॉजी
होमी भाभा,होमी सेठना

संगीत
झुबीन मेहता,फ्रेडी मर्क्युरी


क्रिकेट
नरी कॉट्रक्टर,फारूख इंजीनीअर,

कायदेपंडित
नानी पालखीवाला,सोली सोराबजी,फली नरीमन,जमशेद कामा


अभिनय
सोहराब मोदी,बोमण इराणी,जॉन अब्राहम,

लेखन
रोहींग्टन मिस्त्री,फिर्दोस कांगा,फारूख धोडी,बाप्सी सिधवा

पत्रकारिता
रूसी करंजिया,बेहराम कॉट्रँक्टर,बाची करकरीया,केकी दारूवाला

रेसींग 
सायरस पुनावाला

नृत्य
श्यामक डावर

ज्योतिष
जगप्रसिध्दी ज्योतिषी बेजान दारूवाला

सैन्य
फिल्ड मार्शल सँम मानेकशा,जनरल एफ एऩ बिलीमोरीया,मेजर जनरल सायरस पिठावाला,जनरल खंबाटा

इ,खुप मोठी यादी आहे.
समाज थोडा पण कर्तबगारांची संख्या खूप मोठी.

काय वेगळे केले या लोकांनी की जेणेकरून ते मोठे नाव कमावू शकले.

आयत बसुन खाल्ल नाही
कष्ट केले,मेहनत केली
मुख्य म्हणजे देवाने दिलेली बुध्दी वापरली.

ना कुठल आरक्षण मागीतले,ना नौकर्या.
कधी स्वतःला अल्पसंख्यांक म्हणवून घेतला ना कोणत्या सरकारच्या नावाने खडे फोडले.
ना मोर्चे काढले ना दंगेधोपे केले.गुन्हेगारीत तर त्यांचे नाव चुकुनही नाही.

शांतताप्रिय,अग्नीपूजक समाज.
कँलेंडरमध्ये या समाजाच्या वाट्याला आलीय फक्त एक सुट्टी.फक्त एक.पण ती सुट्टीसुध्दा या समाजातील कर्तृत्ववान माणसांची यशोगाथा वाचायला कमी पडेल ईतका पुढे गेलेला हा समाज.

आजची सुट्टी एनजॉय करणार्यांनी हे लक्षात घ्यावे की माणसे केवळ स्वकर्तृत्वानेच मोठी होतात.दुसर्यापुढे मागणीचा गळा काढून रडल्याने नव्हे.

ज्याला काही शिकायचय त्याने या समाजाकडून हे जरूर शिकून घ्यावे.🙏
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
कृपया पोस्ट वाचून झाल्यानंतर नक्की शेअर करा


जून १४, २०२०

सुख के सब साथी

*

रामराव पाटील  एक निवृत्त शिक्षक आहेत. सकाळी दहा वाजेपर्यंत ते एकदम स्वस्थ दिसत होते. सायंकाळी सात वाजेपर्यंत त्यांना खूप ताप आला व कोरोना संक्रमित रुग्नाची सर्व  लक्षणं त्यांच्यात दिसायला लागली.*

   *परिवारातील सदस्यांच्या चेहऱ्यावर भिती स्पष्ट दिसत होती. त्यांचे अंथरूण घराच्या बाहेर असलेल्या जुन्या खोलीत टाकले गेले जेथे त्यांचा पाळलेला कुत्रा 'मोती' बांधलेला असे.*

 *रामरावांनी काही वर्षांपूर्वी एक लहान, घायाळ पिल्लू रस्त्यातून उचलून आणले होते आणि आपल्या मुलाप्रमाणे त्याला सांभाळून त्याचे नाव मोती ठेवले होते.*
🦮🦮🦮🦮🦮

    *या खोलीत आता रामराव, त्यांचे अंथरूण आणि त्यांचा आवडता मोती आहे. दोघी मुलं- सुनांनी दूर रहाणे पसंत केले आणि नातवांनाही जवळ न जाण्याची तंबी दिली होती.*

   *सरकारने प्रसिद्ध केलेल्या नंबर वर फोन करुन सूचना दिली गेली. बातमी संपूर्ण भागात पसरली होती परंतु कुणीही भेटायला आले नाही. साड़ीचा पदर तोंडावर लपेटून, हातात काठी घेतलेली शेजारची कुणी म्हातारी आई आली आणि रामरावांच्या पत्नीला म्हणाली -"अरे कोणी यांच्याजवळ जेवण दुरुन तरी सरकवून द्या, ती दवाखान्यातील लोकं तर यांना उपाशीपोटीच उचलून नेतील."*

   *आता प्रश्र्न हा होता की, त्यांना जेवण द्यायला कोण जाणार. सुनांनी जेवणाचे ताट आपल्या सासू कडे देउन दिले. आता रामरावाच्या पत्नीचे हात ताट पकडताच थरथरायला लागले, पाय जसे खांबाला बांधल्यासारखे झाले.*

    *हे बघून शेजारची म्हातारी आई म्हणाली, "अरे तुझा तर नवरा आहे, तु पण........ तोंड बांधून जा आणि दूरुन ताट सरकवून दे, तो स्वतः उचलून खाऊन घेईल."*
🍝🍝🍝🍝🍝

   *रामराव सर्व चर्चा गुपचूप ऐकत होते, त्यांच्या डोळ्यात अश्रु होते आणि कापऱ्या ओठांनी ते म्हणाले, "कोणी माझ्याजवळ येऊ नका, मला भूक ही नाही."*
👨🏻‍🦳😢👨🏻‍🦳😢👨🏻‍🦳😢

    *तेवढ्यात अ‍ॅम्बुलंस आली आणि रामरावाना अ‍ॅम्बुलंसमध्ये बसायला सांगितले गेले.*
🚑🚑🚑🚑🚑

   *रामरावानी घराच्या दरवाज्यावर येऊन एकदा मागे फिरून आपल्या घराकडे बघीतले. नात-नातू तोंडावर मास्क लावून पहिल्या मजल्यावरच्या खोलीतून आजोबांकडे बघत होते आणि त्या मुलांच्या मागे डोक्यावर पदर घेऊन त्यांच्या दोन्ही सुना दिसत होत्या. खालच्या मजल्यावर दोन्ही मुलं आपल्या आईसोबत दूर उभे होते.*
👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦👨‍👩‍👧‍👦

    *रामरावाच्या मनात विचारांचे काहूर माजले होते.*
🙆🏻‍♂🙆🏻‍♂🙆🏻‍♂🙆🏻‍♂🙆🏻‍♂

 *त्यांच्या नातीने त्यांच्याकडे बघून हात हलवून Bye केले.एका क्षणासाठी त्यांना वाटले की 'जीवनानेच त्यांना शेवटचा निरोप दिला.'*
🧏🏻‍♀️🙋🏻‍♀️🧏🏻‍♀️🙋🏻‍♀️🧏🏻‍♀️🙋🏻‍♀️

     *रामरावांचे डोळे भरून आले.त्यांनी खाली बसून आपल्या घराच्या उंबऱ्यावर डोकं ठेवलं व अ‍ॅम्बुलंस मध्ये जाऊन बसले.*
👨🏻‍🦳🚑👨🏻‍🦳🚑👨🏻‍🦳🚑
   *त्यांच्या पत्नीने लगेच पाण्याने भरलेली बादली त्या उंबरठ्यावर ओतली,जेथे रामरावाने डोके टेकवून अ‍ॅम्बुलंस मध्ये बसले होते.*

   *याला तिरस्कार म्हणा किंवा मजबूरी, पण हे दृष्य पाहून कुत्र्यालाही रडू आले. आणि रामरावाना घेऊन जाणाऱ्या अॅम्बुलंसच्या मागे-मागे जाऊ लागला.*
🚑🦮🚑🦮🚑🦮

    *रामराव दवाखान्यात चौदा दिवस आॅब्ज़र्वेशन मध्ये राहिले.त्यांच्या सर्व टेस्ट नाॅर्मल आल्या. त्यांना पूर्णतः स्वस्थ घोषित करून सुट्टी देण्यात आली.*
     
*जेव्हा ते दवाखान्यातून बाहेर निघाले तर त्यांना दवाखान्याच्या दरवाजावर त्यांचा कुत्रा मोती बसलेला दिसला. दोघांनी एकमेकाला मिठी मारली. एकाच्या डोळ्यांतून गंगा तर दुसऱ्याच्या डोळ्यातून यमुना वहात होती.*

    *त्यांच्या मुलांची लांबलचक गाडी त्यांना घ्यायला येईपर्यंत ते आपल्या कुत्र्याला घेऊन दुसऱ्या दिशेने निघून गेले होते.त्यानंतर ते कधीच दिसले नाहीत.*
🦮👨🏻‍🦳🦮👨🏻‍🦳🦮👨🏻‍🦳

    *आज त्यांच्या फोटोसह त्यांच्या हरवल्याची बातमी वर्तमानपत्रात छापून आली आहे. लिहिले आहे की 'माहिती देणाऱ्यास ४० हजार रुपये बक्षीस दिले जाईल.'* 

      *४० हजार - हो, वाचून आठवले की एवढी तर त्यांची  मासिक पेंशन येत असे, जी ते हसत खेळत आपल्या परिवारावर खर्च करून टाकत असत.*
💸💷💶💴💵

   *एक वेळ रामरावांच्या जागेवर स्वतःला उभे करा,आणि विचार करा की, या कथेचे पात्र तुम्ही आहात.*
❓🤔❓🤔❓🤔

    *तुमचा सगळा अहंकार आणि सर्व मोहमाया संपुष्टात येईल. म्हणून मी आपणा सर्वांना हात जोडून विनंती करतो की, काही पुण्य कमवा, गरीब, भुकेल्या, लाचारांची मदत करा. जीवनात काही नाही,कुणी आपले नाही. जोपर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंतच सर्व तुमचे आहेत.*

     *जीवन एक प्रवास आहे, मृत्यू त्याचे ठिकाण आहे,हेच अंतिम सत्य आहे.*
💯✅💯✅💯✅
*शेवटी या भजनात सांगितल्या प्रमाणे 👇🏻*
*सुख के सब साथी दुःख में ना कोई......*
🙆🏻‍♂😢👨🏻‍🦳👨‍👩‍👧‍👦🙆🏻‍♂ 
पोस्ट आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा व त्यांनाही वाचनाचा आनंद घेऊ द्या

    !*
🙏🏻😷🙏🏻😷🙏🏻😷
जून १४, २०२०

वडिलांचे मुलास पत्र

बापानं वयात येणा-या मुलाला लिहिलेलं पत्र त्याचा हा मराठी अनुवाद.)_*

*_एका वडिलांनी मुलाला पत्र_*

_नक्की वाचा आणि पटलं तर आपल्या वयात येणाऱ्या मुलांनाही वाचायला द्या. फक्त एकदा नाही तर पुन्हा पुन्हा वाचा आणि पुन्हा पुन्हा वाचायला सांगा.....पुन्हा पुन्हा एवढ्यासाठी कि ज्यावेळी जसा मूड असेल तसा प्रत्येक वेळी वेगळा अर्थ समजून येईल._

_"माझ्या लाडक्या मुला.मी हे असं तुला पत्र लिहितोय बघ, वाच, आणि ठरव...._

           _जगणं, नशीब आणि अपघात या तीन गोष्टी कधी घडतील-बिघडतील सांगता येत नाही. सगळंच अतर्क्य आपण अमुक इतके दिवस जगू हे कुणी सांगू नाही शकत. त्यामुळे काही गोष्टी वेळेवर बोललेल्या बऱ्या._
       
        _मी बाप आहे तुझा, मी तुला जे सांगेन ते इतर कुणी कदाचित कधीच नाही सांगणार._
      
         _मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझे कष्ट, जिवाचे चटके आणि मनाचा त्रास बराच कमी होईल, म्हणून काही गोष्टी तुला सांगतोय._
     
            _माणसांविषयी मनात आकस ठेवू नको, कुणाचा द्वेष करू नकोस. तुझ्याशी कायम चांगलंच वागलं पाहिजे अशी इतर लोकांवर काही आपण सक्ती नाही करू शकत. त्यामुळे ते असंच का वागतात असं म्हणून तणतणू नको. तुझ्याशी कायम चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या आईचीच आहे._ _तेव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात, त्यांच्याशी चांगलं वाग. पण हे कायम लक्षात ठेव की प्रत्येक माणूस प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या हेतूपोटी करतो. त्यामुळे जी माणसं गोड बोलतात, तुझ्याशी कायम चांगलीच वागतात त्यांना तू खरंच आवडतो असं काही नसेलही. जरा माणसं तपासून बघ, पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची घाई करू नकोस._
       
         _जगणं कशानेच कुणामुळेच थांबत नाही. त्यामुळे माणसं तुला सोडून जातील. नाकारतील, झिडकारतील किंवा ज्यांच्यावर तू जीव तोडून प्रेम केलंस तेच तुझ्या आयुष्यातून निघून जातील. तेव्हा हेच कायम लक्षात ठेव की, कुठल्याही माणसामुळे आपलं जगणं थांबत नाही. कधीच नाही._

       _आयुष्य फार छोटं आहे आणि तीच तुझी खरी पुंजी आहे. त्यामुळे आज वाया घालवलास तर उद्या कदाचित जगणंच तुला सोडून जाईल. त्यापेक्षा आज मनापासून, भरभरून जग. आनंदी राहा._

         _प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे. ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणोही बदलते. ज्यांच्यावर तू जिवापाड प्रेम करतोस तेच समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर. काळाच्या मलमानं या जखमाही भरून निघतील. प्रेमात पडलास म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतीव चांगलं असं समजू नकोस आणि प्रेमभंग झाला म्हणून त्या दु:खालाही जास्त कवटाळून बसू नकोस._

      _अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं, तरी ते यशस्वी झाले अशा कहाण्या तू वाचल्या असशीलच ! पण याचा अर्थ असा नाही की, एक शिक्षण सोडलं की तूही यशस्वी होशील. नॉलेज, ज्ञान हे एक शस्त्र आहे हे लक्षात ठेव. शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरंय, पण कुठल्या तरी शून्यापासून आधी सुरुवात तर करायला लागतेच ना._

_माझी अपेक्षाच नाही की मी म्हातारा झाल्यावर तू मला सांभाळावंसं. मीही तुला जन्मभर पोसणार नाहीच. तू स्वत:च्या पायावर उभा राहू शकशील तोर्पयत तुला सपोर्ट करणं ही माझी जबाबदारी. त्यानंतर तुला बसमधून फिरायचं की लिमोझीनमधून, गरीबच राहायचं की श्रीमंत व्हायचं हा निर्णय तुझा तू घ्यायचा._

      _आणखी एक, मीही अनेकदा लॉटरीचं तिकीट काढलं, ते कधीच लागलं नाही. एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही. श्रीमंत व्हायचं तर मेहनत करावीच लागते. जगात फुकट कधीच काहीच मिळत नाही._

            *_- तुझा बाबा_*

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 कृपया पोस्ट वाचून झाल्यानंतर आवडल्यास नक्की शेअर करा व इतरांनाही वाचण्याचा आनंद घेऊ द्या.
जून १४, २०२०

गणितातील काही महत्वाची एकके* :

  • 💢  *गणितातील काही महत्वाची एकेके* :                   
  • (१)    १  मिनिट = ६० सेकंद .
  • (२)    १  तास = ६० मिनिटे .
  • (३)    २४ तास  = १ दिवस .
  • (४)    पाव तास =१५ मिनिटे. 
  • (५)    अर्धा तास =३० मिनिटे. 
  • (६)     पाऊण तास= ४५ मिनिटे .
  • (७)     ७ दिवस = १ आठवडा.
  • (८)     ३० दिवस = १ महिना.
  • (९)     ३६५ दिवस =१ वर्ष .
  • (१०)   १० वर्ष = १ दशक .
  • (११)   अर्धा वर्ष = ६ महिने .
  • (१२)   पाव वर्षे = ३ महिने .
  • (१३)    १ वाजून ३० मिनिटे = दीड वाजतात.
  • (१४)    २ वाजून ३० मिनिटे = अडीच वाजतात .
  • (१५)    एकशे =१००
  • (१६)    अर्धाशे =५०
  • (१७)    पावशे =२५
  • (१८)    पाऊणशे =७५
  • (१९)    सव्वाशे =१२५ 
  • (२०)    दीडशे = १५०
  • (२१)    अडीचशे =२५०
  • (२२)    साडेतीनशे =३५०
  • (२३)    १डझन=  १२ वस्तू 
  • (२४)    अर्धा डझन =६ वस्तू  .
  • (२५)    पाव डझन=३ वस्तू
  • (२६)    पाऊण डझन=९ वस्तू 
  • (२७)    २४ कागद = १ दस्ता
  • (२८)    २० दस्ते=१ रीम
  • (२९)    ४८० कागद = १  रीम
  • (३०)   १ गुंठे=  १०८९ चौ .मी
  • (३१)    १ हेक्टर =१०० आर
  • ३२ )    १एकर= ४००० चौ .मी 
  • (३३)   १मीटर= १०० सेंटिमीटर 
  • (३४)    अर्धा  मीटर= ५० सेंटिमीटर 
  • (३५)    पाव मीटर = २५ सेंटिमीटर 
  • (३६)    पाऊण मीटर =७५ सेंटिमीटर 
  • (३७)   १ लीटर = १००० मिलिलीटर
  • (३८)   अर्धा  लीटर= ५०० मिलिलीटर
  • (३९)    पाव लीटर = २५० मिलिलीटर
  • (४०)    पाऊण लीटर = ७५० मिलिलीटर
  • (४१)    १ किलोग्रॅम = १०००  ग्रॅम
  • (४२)    अर्धा  किलोग्रॅम=५०० ग्रँम 
  • (४३)    पाव किलोग्रॅम=२५० ग्रँम
  • (४४)    पाऊण किलोग्रॅम = ७५० ग्रँम
  • (४५)    १ किलोमीटर = १००० मीटर
  • (४६)    अर्धा  किलोमीटर  =५०० मीटर 
  • (४७)    पाव  किलोमीटर =२५० मीटर
  • (४८)    पाऊण किलोमीटर =७५० मीटर 
  • (४९)   १हजार=१०००
  • (५०)   अर्धा  हजार =५००
  • (५१)   पाव हजार =२५०
  • (५२)   पाऊण हजार  =७५०
  • (५३)   १२ इंच =१ फूट  
  • (५४)   ३ फूट =१ यार्ड
  • (५५)   १ मैल =५२८० फूट 
  • (५६)   १ क्विंटल =१०० किलोग्रॅम 
  • (५७)   अर्धा  क्विंटल =५० किलोग्रॅम 
  • (५८)   पाव क्विंटल =२५ किलोग्रॅम 
  • (५९)   पाऊण क्विंटल = ७५ किलोग्रॅम 
  • (६०)   १ टन= १० क्विंटल 
  • (६१)   १  टन= १००० कि.ग्रॅ
जून १४, २०२०

गणित - जगातील सर्वात सोपा विषय

*Happy Mathematics Day*

*जगातील सर्वात सोपा विषय गणित*

आश्चर्यचकीत झालात काय ?  गणित जगातील सर्वात सोपा विषय आहे. होय पण खरच जगातील सर्वात सोपा विषय गणित होता आहे आणि कायमच राहाणार. आज जागतिक गणित दिन या निम्मित्ताने लिहायला पेन उचलला .गणिततज्ञ रामानुजन यांच्या जन्मदिनानिमित्त आपण गणित दिन साजरा करतो.

*गणित म्हणजे काय हेच आपण समजून घेत नाही* आज लहानापासून अगदी वयस्कर प्रत्येकाला वाटते गणित म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार ,भागाकार आणि भली मोठी अकडेमोड यांच्या पलिकडे कोणी विचारच केला नाही . मित्रांनो गणित म्हणजे काय हे आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊयात. 
गणित म्हणजे काय ?
1) गणित म्हणजे अंदाज बांधणे.
2) गणित म्हणजे फरक करणे.
3) गणित म्हणजे संबध शोधणे.
4) गणित म्हणजे तर्क करणे.
5) गणित म्हणजे शोध घेणे.
6) गणित म्हणजे पट करणे.
7) गणित म्हणजे समस्या सोडवणे.
8) गणित म्हणजे दुवा जोडणे.
9) गणित म्हणजे साम्य शोधणे.
10) गणित म्हणजे जुळवणी करणे.
11) गणित म्हणजे बांधणी करणे.
12) गणित म्हणजे कृती करणे.
13) गणित म्हणजे रचना करणे.
14) गणित म्हणजे जीवन जगणे.
15) गणित हेचे जीवन आणि जीवन हेच गणित.

*गणित विषयात गोडी निर्माण करण्यासाठी*...
   गणित विषयात गोडी निर्माण करण्यासाठी एक छान मार्ग म्हणजे गणिती कोडी , गणिती गमतीजमती समजून घ्या इतरांना सांगा .आज प्रत्येकाने  एक तरी कोड व एक तरी गणित सौंदर्य आपल्या मित्रांशी , विद्यार्थ्यांना नक्की सांगा. आज गणित दिनानिमित्ताने काही गणिती क्लृप्ती आपल्या शी Share करणार आहे.

क्लृप्ती क्रमांक . 01

(1)² = 1
(11)² = 121
(111)² = 12321
(1111)² = 1234321
(11111)² = 123454321

अशा पद्धतीने अगदी सेकंदात आपण 1, 11, 111, 1111, 11111 चा वर्ग लिहू शकतात.

=======================

क्लृप्ती क्रमांक . 02 

2, 6, 5, 8 अंक एकदाच वापरून चार अंकी किती संख्या तयार होतात ?

संख्या किती होता साठी सोपी क्लृप्ती 
चार संख्या दिल्या आहेत .

= 4 × 3 × 2 × 1 असा गुणाकार करा.
*= 24 संख्या तयार होतील*

अशा पद्धतीने 5 अंकी 120 संख्या , 6 अंकी 720 संख्या तयार होतात अगदी सेकंदात सांगता येते.

======================

क्लृप्ती क्रमांक . 03

5, 7, 8 अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्या ची बेरीज किती ?

याची क्लृप्ती आहे.

बेरीज = 222 × ( अंकाची बेरीज)
         = 222 × ( 5+7+8)
   
         = 222 × 20
   
         = 4440 बेरीज येते. 

अशा पद्धतीने ...
चार अंकी संख्या साठी...
= 6666 × ( अंकाची बेरीज )

अगदी सेकंदात प्रश्न सोडवता येतो.

=======================

क्लृप्ती क्रमांक - 04 

62 × 62 × 62 × 62 ×  ...
अशा पद्धतीने 47 वेळा 62 घेऊन गुणाकार केल्यास एकक स्थानी कोणता अंक येईल  ?

यासाठी क्लृप्ती ...

47 ला 4 ने भाग द्यावे 
47 ÷ 4 = 11 आणि बाकी 3 येईल .

जेवढी बाकी आली तितक्या वेळा दिलेल्या संख्यातील एकक चा गुणाकार करावा 

= 2 × 2 × 2

= *8* अंक एकक स्थानी येईल .

आणि सेकंदात सोडवता येईल .

=======================
क्लृप्ती क्रमांक - 05

वर्तुळावर 12 बिंदू घेऊन ते सर्वच बिंदू एकमेकांना जोडले तर किती रेषाखंड काढता येतील ?

याची सोपी क्लृप्ती अशी आहे. 

      12 × 11 
= ----------------
           2

= *66* रेषाखंड काढता येतील.

आणि सेकंदात प्रश्न सुटेल.

=======================

क्लृप्ती क्रमांक - 06

  वर्तुळावर 12 बिंदू परस्परांना जोडून जास्तीत जास्त किती त्रिकोण काढता येतील ?

या साठी क्लृप्ती 

    12 × 11 × 10
= ----------------------
             6

= 220 त्रिकोण काढता येतील 

आणि सेकंदात प्रश्न सुटेल.

=======================
क्लृप्ती क्रमांक - 07 

20% द.सा.द.शे. दराने सरळव्याजाने किती वर्षात कोणतीही रक्कम तिप्पट होईल ?

या साठी क्लृप्ती ...

     ( पट - 1 ) × 100
= ---------------------------
                दर 


     ( 3 - 1 ) × 100
= ---------------------------
               20

= 10 वर्षात तिप्पट होईल.

सेकंदात प्रश्न सोडवा

=======================
क्लृप्ती क्रमांक - 08 

1) पाव वर्तुळाची परिमिती / परीघ

      25
= ---------- × त्रिज्या 
        7

2) अर्ध वर्तुळाची परिमिती / परीघ

      36
= ---------- × त्रिज्या 
        7

3) पाऊन वर्तुळाची परिमिती / परीघ

      47
= ---------- × त्रिज्या 
        7

4) संपूर्ण  वर्तुळाची परिमिती / परीघ

      44
= ---------- × त्रिज्या 
        7

अशा पद्धतीने सेकंदात परीघ / परिमिती शोधता येईल .

=======================

अशा हजारो गणित क्लृप्ती विद्यार्थ्यांना समजल्या तर प्रत्येक गणित सेकंदात सुटेल. आणि गणित बद्दल ची भीती नक्की कमी होऊन विद्यार्थ्यांना आयुष्यभर गणिताची गोडी लागेल . प्रत्येक जण समजेल गणित जगातील सर्वात सोपा वियष आहे. 

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
whatsaap - 8856046142 

लेखन व संकलन 
श्री. प्रविण बनकर 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळाली 
ता.जि.उस्मानाबाद

🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸

शनिवार, १३ जून, २०२०

जून १३, २०२०

सामान्य ज्ञान


  • *● थोर व्यक्तींची संबोधने :--*

  • (१)जोतिबा फुले  -- महात्मा 
  • (२)जवाहरलाल नेहरू -- पंडित,  चाचा 
  • (३)वल्लभभाई पटेल -- सरदार, लोहपुरूष 
  • (४)सुभाषचंद्र बोस -- नेताजी 
  • (५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर -- भारतीय    
  •             राज्यघटनेचे  शिल्पकार 
  • (६)मोहनदास करमचंद गांधी -- राष्ट्रपिता 
  • =========================
*●लेखक - कवी व त्यांची टोपणनावे :-*

(७) राम गणेश गडकरी -- गोविंदाग्रज 
(८) प्रल्हाद केशव अत्रे -- केशवकुमार 
(९)विष्णू वामन शिरवाडकर -- कुसुमाग्रज 
(१०)नारायण सूर्याजी ठोसर - संत रामदास 
(११) मुरलीधर नाराय नारायण ण गुप्ते --  बी 
(१२) कृष्णाजी केशव दामले -- केशवसुत 
  • =========================
  • *● सुप्रसिद्ध व्यक्ती  :--*

  • (१) डाॅ. अब्दुल कलाम -- शास्त्रज्ञ 
  • (२) लता मंगेशकर -- गायिका 
  • (३) डाॅ. जयंत नारळीकर -- शास्त्रज्ञ 
  • (४) अण्णा हजारे -- ज्येष्ठ समाजसेवक 
  • (५) झाकिर हुसेन -- तबलावादक 
  • (६) मिल्खा सिंग -- धावपटू 
  • (७) रतन टाटा  -- उद्योजक 
  • (८) मुकेश अंबानी -- उद्योजक 
  • (९) सचिन तेंडुलकर -- क्रिकेटपटू 
  • (१०) अंजली भागवत -- नेमबाज 
  • (११) मेरी कोम -- मुष्टियुद्ध 
  • (१२) पी. टी. उषा -- धावपटू 
  • (१३) अभिनव बिंद्रा -- नेमबाज 
  • (१४)सायना नेहवाल -- बॅडमिंटन 
  • (१५)अमिताभ बच्चन -- अष्टपैलू अभिनेता 
  • (१६) कविता राऊत -- धावपटू 
  • (१७) डाॅ. बाबा आमटे -- कुष्ठरोग निर्मूलन 
  • (१८) पी. टी. उषा -- भारताची सुवर्णकन्या 
  • (१९) कविता राऊत -- सावरपाडा एक्सप्रेस    
 ====================
*=========================*
जून १३, २०२०

टी.एन्.शेषन्

*टी.एन्.शेषन् भारताचे मुख्यनिवडणूक आयुक्त होते.त्ंच्या जीवनात घडलेला प्रसंग !*
एकदा ते आपली पत्नी जयलक्ष्मी शेषन् यांच्याबरोबर फिरायला बाहेर पडले होते.उत्तरप्रदेशातल्या एका सुंदर रस्त्यावरून गाडी जात होती.रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी होती.वर्दळीचा रस्ता नसल्यामुळे की काय ,पक्ष्यांची अनेक ,सुंदर घरटी झाडांची शोभा वाढवत होती.
जयलक्ष्मी यांना हे दृष्य खूप आवडलं .त्यांना वाटायला लागलं आपल्या घराच्या बागेसाठी यातली दोन घरटी नेली ,तर बाग किती शोभून दिसेल.त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली.
गाड्या थांबल्या.त्यांच्यासाठी जे संरक्षक पोलीस दल होते ,ते इकडे तिकडे शोधायला लागले.तिथे एक मुलगा गुरं चरायला आला होता.त्याला बोलावलं.तो सरकारी इतमाम पाहून कोणीतरी मोठी अधिकारी व्यक्ति आलीय ,हे त्यानी ओळखलंच.त्यांनी मुलाला दोन घरटी काढून आणायला सांगितली ,आणि प्रत्येक घरट्याचे १० रु.देऊ असंही सांगितलं.त्या मुलानं खाली मान घालून नकारार्थी मान हलवली. "दहा रुपये कमी वाटतायंत का ,५०रुपये देऊ प्रत्येक घरट्याचे."
यावर तो मुलगा म्हणाला ,"सरजी,पैशाचा सवालच नाहीए .कितीही पैसे दिलेत तरी ती घरटी मी झाडावरून उतरवणार नाही."
"का रे बाबा?"
*"त्यात पक्ष्याची पिल्लं शांतपणे आणि विश्वासानी झोपली आहेत.सायंकाळी त्यांची आई चोचीत दाणे घेऊन पिल्लांच्या ओढीनं येईल ,पिल्लं सापडली नाहीत तर ती सैरभैर होईल ,आक्रोश करेल,ते माझ्याच्यानं पाहवणार नाही.कोणाचं घर मोडायचं पाप आहे ना सर जी."*
हे ऐकून शेषन् व त्यांची पत्नी थक्क झाले.
शेषन् म्हणाले ,"कोणीतरी डोळ्यात अंजन घातल्यासारखं वाटलं. *माझं पद ,माझी पदवी ,उच्च शिक्षण सार्‍या सार्‍याचा अभिमान क्षणार्धात गळून पडला ,वितळून गेला.जे शिक्षण , संस्कृती आणि संस्कार या मुलानं निसर्गाकडून शिकलेत. ते शिक्षण कोणत्याच विद्यापीठात मिळणार नाही."*

कृपया पोस्ट वाचून झाल्यानंतर अधिकाधिक शेअर करा व इतरांनाही वाचनाचा आनंद घेऊ द्या. धन्यवाद
जून १३, २०२०

अर्थ

*प्रत्येक वाक्यात किती अर्थ आहे*

"अश्रु" _सांगून जाते,_ "दुःख"  किती आहे ?

"विश्वास" _सांगून जातो,_ "जोडीदार"  कसा आहे?

"गर्व" _सांगून जातो,_ "पैशाचा माज"  किती आहे?

"संस्कार" _सांगून जातात,_ "परिवार"  कसा आहे?

"वाचा" _सांगून जाते,_ "माणूस"  कसा आहे?  

"संवाद" _सांगून जातात,_ "ज्ञान"  किती आहे?

"ठेच" _सांगून जाते,_ "लक्ष"   कुठे आहे?

"डोळे" _सांगून जातात,_ "व्यक्ती"  कशी आहे ?

"स्पर्श" _सांगून जातो,_ "मनात"  काय आहे ?

आणि "वेळ" _दाखवते,_ "नातेवाईक"  कसे आहेत.


भावकीतली चार माणसं *" एका दिशेने "* तेव्हाच चालत असतात जेव्हा पाचवा खांद्यावर असतो. 

संपूर्ण आयुष्य आपण याच विचारात जगत असतो की *" लोक काय म्हणतील " ?* आणि म्हणून धम्म सांगतो *" मृत्यु हा शाश्वत आहे तर मग जिवंत आसताना माणसाशी  माणसासारखे वागा"*..........

           माणसाची कदर करायची असेल तर जिवंतपणीच करा. 

कारण तिरडी उचलण्याच्या वेळी तिरस्कार करणारे सुद्धा रडतात. 

मेल्यावर माणूस चांगला होता असं म्हणण्याची प्रथा आहे आणि जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही हीच खरी व्यथा आहे. 
म्हणून माणसांना जिवंतपणीच समजून घ्या. 

मेल्यावर समाधीवर फुलं वाहण्यात काहीच अर्थ नसतो .......
   
        चांगल्या माणसावर एवढा विश्वास ठेवा जेवढा आपण आजारपणात औषधांवर ठेवतो. 
कारण औषध जरी कडू असलं तरी ते आपल्या फायद्याचे असते. 

चांगल्या माणसांच सुद्धा अगदी तसचं असतं .........
प्रवीण🙏

🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐💐💐💐💐💐
कृपया पोस्ट वाचून झाल्यानंतर नक्की शेअर करा म्हणजे इतरांनाही वाचनाचा आनंद घेता येईल.
जून १३, २०२०

रतन टाटा यांचे विचार

*************************
*उद्योग रत्न मा.रतनजी टाटांनी लंडन मध्ये दिलेल्या व्याख्यानातील सुंदर ओळी!*

✍🏻1. श्रीमंत होण्यासाठी तुमच्या मुलांना शिकवू नका तर त्यांना आनंदी राहण्यासाठी शिकवा ज्यामुळे मोठ झाल्यावर त्यांना वस्तूंचं महत्त्व आणि मूल्य कळेल किंमत नाही.
2. 🌷तुमचं जेवण तुम्ही तुमचं औषध समजून घ्या नाहीतर औषधच तुम्हाला जेवण म्हणून घ्यावं लागेल.
3. 🌷जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते ती तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही कारण तुम्हाला सोडून जाण्याची शंभर जरी कारणं असली तरीही त्या व्यक्तीला एकच कारण असं सापडेल की ज्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला सोडून जाणार नाही.
4. 🌷मानव असणं आणि मानवता असणं या मध्ये खूप फरक आहे.
5. 🌷ज्या वेळी तुमचा जन्म होतो त्यावेळी तुमच्या वर प्रेम केलं जातं आणि ज्यावेळी तुम्ही मृत व्हाल त्या वेळी ही तुमच्या वर प्रेम केलं जाईल. मधील काळात तुम्हाला असच चालवून घ्यावं लागेल.
6. 🌷तुम्हाला वेगात चालायच असेल तर एकटं चाला पण दूरवर चालत जावे लागणार असेल तर एकत्र चाला.
7. 🌷जगातील सर्वात चांगले सहा डॉक्टर १) सूर्यप्रकाश २) विश्रांती ३) व्यायाम ४) योग्य आहार ५) आत्मविश्वास ६) मित्र.......
     आयुष्याच्या सगळ्या टप्प्यांवर यांना सांभाळा आणि आरोग्यदायी जीवन जगा.
8. 🌷जेव्हा तुम्ही चंद्र पाहता त्यावेळी तुम्ही देवाचं सौंदर्य पाहता, जेव्हा तुम्ही सूर्य पाहता त्या वेळी तुम्ही देवाचं सामर्थ्य पाहता,ज्यावेळी तुम्ही आरसा पाहता त्यावेळी तुम्ही परमेश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती पाहता.... म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा!
     आपण सगळे जण प्रवासी आहोत आणि परमेश्वर हा या प्रवासाचा प्रतिनिधी(एजंट) आहे त्यानं आपला सर्व मार्ग आणि आपला अंतिम मुक्काम आधिच ठरवलेला आहे म्हणूनच त्याच्यावर विश्वास ठेवा आणि हे जीवन ही एक सहल समजून आनंद घ्या!

        🍁 🙏🙏🍁😊


कृपया वाचून झाल्यानंतर शेअर करा. इतरांनाही वाचनाचा आनंद घेऊ द्या व कमेंट करायला विसरू नका धन्यवाद
जून १३, २०२०

मिसळ

*मिसळ - एक रसग्रहण*
     *एक* *अमृतानुभव*
 ( *आणि काही उपयोगी टीप्स* )

*मिसळ* खाणे हा एक आनंद सोहळा असतो.

मिसळ हा खरं तर *गरीबापासून श्रीमंतांपर्यन्तचा राजमान्य राजश्री बेत.* अश्या या मिसळीचा स्वाद घेण्याचे एक शास्त्र आहे.

म्हणजे बघा, *उत्तमात-उत्तम मिसळ कुठे मिळेल याची आधी माहिती काढावी.* मनात आलं म्हणून कुठेही जावून मिसळ हादडली याला काहीच अर्थ नाही.

मिसळ खायला जाण्याच्या आधी त्या मिसळीचा इतिहास, बनवण्याचं  तंत्र, मिसळीतले घटक पदार्थ, यांचा अभ्यास करावा.

*उगाच चिचूंद्रया वाटीत, पातळ बेचव रस्सा देणाऱ्या मिसळीच्या दुकानात पाऊलही ठेवू नये.*

अश्या निवडलेल्या मिसळीच्या ठिकाणी शक्यतो कमी गर्दीच्या वेळी पोहोचावे.

*चांगली उजेडाची आणि हवेशीर जागा बघुन आपली बैठक मारावी* आणि मिसळ ऑर्डर करावी.

काही ठिकाणी मिसळ ऑर्डर केली की आधी कांदा आणि लिंबू याची प्लेट आणून देतात.

*काही मुर्ख लगेच त्यातील कांदा तोंडात टाकतात, लिंबु चाखुन बघतात. असं कधीही करु नये.* 

*हे म्हणजे वाग्दत पत्नीला भेटण्यासाठी गेलेलं असतांना, तिच्याच धाकट्या बहिणीवर नजर टाकण्याइतकं आचरटपणाचं आहे.*

हे असले पदार्थ मिसळ खाण्याआधी तोंडात टाकून तुम्ही जिभेचा स्वाद ही बिघडवून टाकता.

तर, मिसळ समोर येवु द्यावी. मिसळ शक्यतो आडव्या मोठ्या डिश मध्ये असावी. *उगाच छटाकभर गोलाकार डिश मध्ये अजिबात असू नये.*

समोर उजव्या बाजूला कमीत कमी अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा असावा. त्यात कोथिंबीर असणं क्रमप्राप्त आहे. *नसेल, तर सरळ निषेध नोंदवा.* कांद्या बरोबर लिंबाच्या फोडी असाव्यात.

*डाव्या बाजूला गरमागरम, चमचमित रश्याचं भांडं असावं*.

*त्यातील लाल-पिवळा, काळसर तर्रीबाज रश्याचा वास नाकाच्या रंध्रा रंध्रात सामावून घेत जीभेला आवाहन करावे.* नुसत्या त्या वासाने जिभेत उत्साह सळसळला पाहिजे.

सर्व मांडामांडी झाली की *लगेच भसकन मिसळ खायला सुरुवात करू नये.*

प्रथम मिसळी मध्ये काय काय आहे याचा अंदाज घ्यावा. *ती व्यवस्थित मिसळून घ्यावी.* मस्त मिसळून झाली कि त्यातील रस्सा शेव, पापडी, शेंगदाणे इत्यादी पदार्थात शोषला जातो. मिसळ थोडी घट्टही होते.

*मग रस्सा चमच्याने व्यवस्थित घुसळून त्यातील उसळीचा भाग या मिश्रणावर नीट पसरवावा.* मिसळ भिजली की त्यावर रस्श्यातील तर्री चवी पुरती टाकावी. आता पुन्हा हे सर्व चमच्याने छानपैकी मिसळून घ्यावे.

त्यावर बारीक कांदयाची पेरणी करावी.

सर्वात शेवटी, चवी पुरते लिंबू पिळावे. *उगाच समोर आहे म्हणून भरमसाठ लिंबू पिळून मिसळीचा स्वाद बिघडू नये*.

आता पाव. तो मऊ, लुसलूशित ताजातवाना असावा. *कडक झालेला, सुरकुतलेला, काळे ठिपके असलेला पाव लगेच धुत्कारुन लावावा.*

पावाची डिश डाव्या बाजूला ठेवावी. *आणी परमेश्वराचे आभार मानून मिसळीचा स्वाद घ्यायला सुरुवात करावी.*

पावचा छोटा टुकड़ा तोडून तो मिसळ मध्ये बुडवून तोंडात टाकावा, *आणि लगोलग एक चमचा रस्श्याचा जिभेवर अभिषेक करावा.* पहिला घास तोंडात जाताच रस्सा आणि मिसळ यांचा झटका जिभेवरुन थेट मेंदूच्या शेवटच्या टोकावर पोचतो. *सगळ्या शरीरावर रोमांच उभे राहातात!*

हळूहळू, स्वाद घेत घेत खावे. मधुनच कच्चा कांदा चवी पुरता खावा. 

*खातांना घाई करु नये. तसंच खात असतांना ऑफिसचं काम, साहेबाचा विक्षिप्त स्वभाव, राजकारण असल्या क्षुद्र गोष्टींची चर्चाही करु नये.* 

मिसळ खाणं *हे एक योगसाधन आहे.*

प्रत्येक घासात पाव कमी आणि मिसळ जास्त असे प्रमाण असू द्यावे. *उगाच पोळी भाजी खाल्लासारखं पाव मिसळीला लावून लावून खाऊ नये. तो मिसळीचा विनयभंग असतो.*

पावामुळे डिश मधले रस्स्याचे प्रमाण कमी होते. मग थोडे खाणे थांबवावे. पुन्हा रस्साचे भांडे समोर आणावे. ते गरम नसेल तर दूसरे आणायला सांगावे. मग पुन्हा तो गरमागरम रस्सा आपल्या मिसळीत टाकून, मिसळून घ्यावा.

हा रस्सा भांडयातून *मिसळीवर टाकतांना त्याचे दोन चार थेंब तुमच्या कपड्यावर उडालेच पाहिजेत. नाहीतर तुम्ही मिसळीशी एकरूप झालाच नाही असा अर्थ होतो.*

पुन्हा कांदा, लिंबू याचे सोपस्कर करावे. आणि पुन्हा खायला सुरुवात करावी.

आणि असे कमीत कमी दोन ते तीन वेळा करावे.

*जास्तीत जास्त दोन पावात मिसळ खावी. आपला उद्देश मिसळ खाणे हा आहे, पाव खाणे नाही.* त्यामुळे पाव कमी, मिसळ जास्त असू द्यावी. तरच मिसळीचा मान राखला जातो.

*नुसतंच पोट भरेपर्यंत खाऊ नये. आत्मा संतुष्ट होईपर्यंत खावं*. 

*खातांना डाएटींग, ब्लड शुगर, कोलेसटेरॉल असले चिंताजनक विचार डोक्यात आणू नयेत*.

खाऊन झालं कि रिकाम्या डिश मध्ये एक मोठा चमचाभर रस्सा ओतून घ्यावा. चमच्या चमच्याने तो रस्सा ग्रहण करावा.

*तुमच्या नाकातून, डोळ्यातून पाणी आलं आणि कपाळावर घामाचे दवबिंदु जमले कि मिसळ सुखरूप पोहोचली हे ओळखावं!*

आता तुम्ही हात धुवायला मोकळे!

*ज्या कोणा अन्नपुर्णेने ही मिसळ बनवली तिचे आभार मानावे, तिला दीर्घायुष्य चिंतावं.*

*समोरचा चहा घेण्याआधी जरा हाताचा वास घ्यावा.* 

मिसळ अजूनही आपल्या बोटांवर रेंगाळत असते, पुन्हा येण्याचं वचन मागत असते!

😋😛😋😛😋😛😋😋😋😋🤒😂😜😝😋😋

 कृपया वाचून झाल्यानंतर इतरांनाही शेअर करा

शुक्रवार, १२ जून, २०२०

जून १२, २०२०

मायकल जॅक्सन

'#मृत्यू - एक अटळ सत्य 


मायकल जॅक्सनला १५० वर्षे जगायचं होतं. 

कोणाशी हात मिळवायचा तर तो आधी हातात मोजे घालत असे. जेव्हा त्याला लोकांमध्ये जावं लागत असे तेव्हा तोंडावर तो आधी मुखवटा (mask) घालत असे. 

त्याची काळजी घेण्यासाठी त्याने त्याच्या घरी १२ डॉक्टर नियुक्त केले होते. हे डॉक्टर त्याच्या केसांपासून ते अगदी पायाच्या नखांपर्यंत सगळ्या अवयवांची रोज तपासणी करीत असत. 

त्याचे जेवणखाण प्रयोगशाळेत तपासल्यानंतरच त्याला खायला घातले जायचे. 

त्याच्याकडून व्यायाम करून घेण्यासाठी १५ लोक तैनात असायचे. 

मायकल जॅक्सन गोरा नव्हता. त्याने १९८७ मध्ये प्लॅस्टिक सर्जरी करवून घेत आपली त्वचा गोरी केली होती. गोरा झाल्यावर त्याने आपले काळे आईवडील, काळे मित्र यांना सोडलं आणि गोर्‍या आईवडिलांना भाड्याने घेतलं. मित्र जवळ केले ते ही त्यांचा गोरा रंग बघूनच. लग्न केलं ते ही गोर्‍या मुलींबरोबर. 

दीडशे वर्षे जगण्याचं उद्दिष्ट ठेवलेला मायकल नेहमी प्राणवायूच्या बिछान्यावर झोपत असे. त्याने स्वतःसाठी शरीराचे अवयव दान करणारे दाता तयार ठेवले होते. त्यांचा खर्च तो स्वतः करत असे म्हणजे त्याला गरज पडल्यावर मूत्रपिंड, फुप्फुस, डोळे किंवा इतर कुठलेही अवयव हे दाता येऊन त्याला देऊ शकतील. 

त्याला वाटायचं की तो पैसा आणि आपला प्रभाव यामुळे मृत्यूलाही चकवा देईल पण हे शक्य झालं नाही आणि २५ जून २००९ या दिवशी त्याची हृदयगती बंद पडू लागली. त्यावेळी त्याच्या घरी १२ डॉक्टर होते पण कोणीही परिस्थिती सावरू शकलं नाही. हे बघता शहरातील सगळे डॉक्टर त्याच्या घरी जमा झाले. या सगळ्यांनी प्रयत्न केले पण कोणीही त्याला वाचवू शकलं नाही. 

त्याने २५ वर्षे डॉक्टरांना विचारल्याशिवाय कधीही काहीही खाल्लं नाही. त्याचा शेवटचा काळ जसजसा जवळ येत गेला तसतशी त्याची शारीरिक स्थिती बिघडू लागली. ज्याला १५० वर्षे जगायचं होतं पण त्याची पन्नाशीतच शारीरिक अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली. आयुर्मान वाढावं म्हणून त्याने जी काही सोय केली होती, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. 

जेव्हा त्याच्या शवाचं विच्छेदन करण्यात आलं तेव्हा डॉक्टर म्हणाले की त्याचं शरीर म्हणजे फक्त हाडांचा सापळा झाला होता. तो टकला होता. त्याच्या बरगड्या, खांदा यांची हाडं तुटलेली होती. त्याच्या शरीरावर असंख्य सुई टोचल्याचे निशाण होते. प्लॅस्टिक सर्जरी केल्याने जो त्याला त्रास व्हायचा, त्यावर उपाय म्हणून त्याला रोजच्या रोज antibiotics ची अनेक injections घ्यावी लागत असे. 

मायकल जॅक्सनची अंत्ययात्रा २५० कोटी लोकांनी थेट प्रक्षेपणात पाहिली. ही आत्तापर्यंतची थेट प्रक्षेपणात सर्वात जास्त पाहिली गेलेली घटना आहे. 

मायकल जॅक्सन याच्या मृत्यूच्या दिवशी म्हणजेच २५ जून २००९ या दिवशी दुपारी ३.१५ वाजता विकिपीडिया, ट्विटर आणि AOL चं instant messenger हे सगळं क्रॅश झालं होतं. याच्या मृत्यूची बातमी येताच ८ लाख लोकांनी गुगलमध्ये मायकल जॅक्सन म्हणून शोधाशोध केली आणि ही शोध मोहीम फारच सुरू झाल्याने गुगलवर सगळ्यात मोठा ट्रॅफिक जॅम झाला आणि मग गुगलही क्रॅश झालं. त्यावेळी अडीच तास गुगल बंद राहिलं. 

मृत्यूला चकवा देण्याचा ज्यांचा विचार असतो, त्यांना मृत्यूच चकवतो, हेच खरं. 

चार दिवसांचा थाट, ऐश, पैसा, श्रीमंती आणि यामुळे येणारा माज.. कशाला तो ! स्मशानात जाणार तेव्हा हाताची साधी मूठही रिकामीच असणार आहे. हे कधी समजणार लोकांना ! कदाचित कधीच नाही.
_______________________*********************

गुरुवार, ११ जून, २०२०

जून ११, २०२०

चिडका कट्टा

"चिडका कट्टा..."


तो फक्त पंचावन्न किलोचा देह होता.
मनानं कधीच मेलेला.
आख्खं घर टोचून टोचून बोलायचं.
सतत अॅक्युपंचर...
त्याला काहीच वाटायचं नाही.
चांगला शिकलेला.
डबलग्रज्युएट.
पण घुम्या.
तोंडातून एक शब्द बाहेर पडायचा नाही.
पहिल्या  पहिल्यांदा  इंटरव्ह्यूला काॅल तरी यायचे.
याचं म्यूट चॅनल कोण पसंत करणार ?
दरवेळी..
" आम्ही  कळवतो तुम्हाला नंतर..."
एवढं मात्र  त्याला लगेच कळायचं..
रेकाॅर्डच होता त्याचा तसा...
एकाही ईन्टरव्ह्युत तो कधी पास झाला नाही..
दीड वर्ष  झालेलं.
तो बेक्कार...
खरंच बेक्कार माणूस होता तो.
घरातला प्रत्येक जण...
आपला राग त्याच्यावर काढायचा..
'खायला काळ, भुईला भार...
तू तों साला धरती पें बोज है !'
खूप चिडायचा तो.
अगदी मनापासून. 
पण ..
मनातल्या मनातच.
चेहरा निर्विकार.
अगदी सुनिल शेट्टीसारखा.
हे बघून समोरचा आणखीन पेटायचा.
नुसता धूर...
फुरसत से बनायी हुवी चीज था वो.
हल्ली हल्ली तर राग येतच नाही त्याला.
त्यानं ठरवून टाकलंय.
आपला जन्म यासाठीच झालाय..
फक्त बोलणी खाण्यासाठी.
कानाचा त्याच्या शरीराला काहीही ऊपयोग नाही.
जगानं मारलेले टोमणे,  त्याच्या मेंदूपर्यंत  पोचतच नाहीत.
गेंड्याची कातडी झालीय त्याची.
निगरगट्ट.
एक दिवस त्याचा बाप..
खूप बोलला त्याला.
दात विचकटून.
त्याला कुठलं ऐकू येतंय ?
शेवटी त्याचा बाप धाय मोकलून रडला..
कान नसले तरी हार्ट होतं त्याच्याकडे.
बापाला रडताना बघून तो गलबलला.
काहीतरी करायलाच हवं.
कुठंतरी हातपाय मारायलाच हवेत.
कुठं ?
त्याची लायकी काय ?
तो घराबाहेर पडला.
गावाबाहेरची टेकडी.
शून्य मिनटात  चढून गेला.
छे छे! 
जीव वगैरे  नाही देणार तो..
टेकडीच्या हाय्येस्ट पाॅईंटवर..
बसला.
एका दगडावर , दुसरा दगड.
समोरच्या आभाळात, त्यानं त्याचं मन काढून ठेवलं.
स्वतःलाच शोधू लागला.
तीन चार तास...
जोरदार स्टडी.
स्वतःचाच.
काय पाहिलंस  माझ्यात  ? 
काही सापडलं ?
नाही ना ?
ठरलं...
निश्चयी चेहरा घेवून तो टेकडी ऊतरला.
एका मित्राला गाठला.
बाजारपेठेतला त्याचा रिकामा गाळा भाड्यानं घेतला..
एक महिन्यासाठी.
मित्राला बजावलेलं..
धंदा चालला तर भाडं देईन..
नाहीतर दिवाळं.
दुसर्या दिवशी दुकानावर पाटी लागली.
"चिडका कट्टा..."
या आणि मोकळे व्हा..
पहिले दोन दिवस तो माशा मारत बसला.
पेशन्स. 
त्याच्याकडे खूप होता.
तिसर्या दिवशी एक तिरसट म्हातारा आत शिरला.
त्याच्या दुकानाच्या नावावरनं घालून पाडून बोलला.
अगदी शिरा ताणून ताणून.
'रिकामटेकडी .
तरूण पिढी...'
वगैरे  वगैरे. .
दहा मिनिटांनी  थकला.
विझला..
यानं शांतपणे सगळं ऐकून घेतलेलं.
म्हातार्यानं शेवटी एकच प्रश्न  विचारला.
" कशासाठी ?"
तो हसून म्हणाला..
" याचसाठी..
चीडचीड , राग , गुस्सा काहीसी म्हणा..
निचरा नाही झाला तर माणसाला संपवतो.
इथं या आणि  मोकळं व्हा..
आता कसं वाटतंय ?"
म्हातारा पहिल्यांदा  स्माईलला.
" शांत .
बरं वाटतंय "
तो पुन्हा  मुद्द्याचं बोलला.
" शंभर रूपये.
तुमच्यापासूनच बोहनी झाली."
म्हातार्यानं खुशी खुशी शंभर रूपये दिले.
आनंदानं तो बागडू निघून गेला.
त्याची पहिली कमाई..
घर खुश.
आज कुणीही त्याला टोचून बोललं नाही.
नंतर त्यानं मागं वळून बघितलंच नाही.
'चिडका कट्टा' फेमस.
सुसाट..
त्याची गाडी सुसाट पळू लागली.
बाॅसवरचा राग.
सासूवरची चीडचीड..
धंद्यात अपयश .
प्रेमात असफलता..
रिझल्ट एकच.
चीडचीड आणि  वैताग.
रोज ट्रक भरून, त्याच्या दुकानात गिर्हाईक  यायचं.
चीड चीड चीडायचं.
राग ओकायचा.
शांत चित्तानं घरी जायचं.
तो सगळं ऐकून घ्यायचा.
घेणारच.
त्याचेच तर पैसे घेत होता तो.
धंदा वाढत चालला.
लोड सहन होईना.
स्टाफ भरला.
बहिरी माणसं...
त्याच्यासारखीच.
तीन मजली आॅफीस.
बंगला.
गाडी.
त्याचं लग्न झालं.
बायको  खुष.
घर खुष.
कारण...?
तो कधीच चिडायचा नाही.
त्याच्या घरात नेहमी प्रसन्न वाटायचं.
कॅलेंडरी  फडफड झाली.
वर्षामागून वर्ष गेली .
प्रसन्न..
त्याचा मुलगा.
लाडाकोडात वाढलेला.
कसाबसा ग्रॅज्युएट  झाला.
पुढं ?
पुढं काहीच नाही...
गावभर गाड्या पळवत ऊंडारायचा.
ऊद्योग ना धंदा.
रिकामटेकडा...
बापाचं काळीज त्याचं.
एक दिवस लेकाला बोलावलं त्यानं. 
चांगला सोलला.
चिडला. 
आयुष्यात पहिल्यांदाच. 
वाट्टेल ते शब्द ओकले.
त्याच्या पोरानं खाली घातलेली मान वर केली नाही.
ढिम्म.
शेवटी तो रडकुंडीला. 
त्याचा बाप शांतपणे शेजारी येवून ऊभा राहिला. 
त्याच्या खांद्यावर  हात ठेवून म्हणाला.
" तू रिटायर्ड  हो आता.
नाही झेपत तुला धंद्याचा व्याप आताशा..
प्रसन्ना सांभाळेल सगळं.."
पुढे काय ?
'चिडका कट्टा' व्यवस्थित  चालूय.
धाकटे मालक बसतात दुकानी..
तुम्हाला  गरज वाटली तर सांगा. .
पत्ता देतो..
'चिडका कट्टा..'
जुग जुग जीयो.

...