*दुर्दैवाने कधी आयुष्यात सेटबॅक आलाच*
अचानक कंपनी बंद पडणं ,
जॉब जाणं,
व्यवसाय अडचणीत येणं,
उत्पन्न एकदम कमी होण,
एखादं मोठं आजारपण ,
अपघात होणं,
हे कोणाच्याही
आणि केंव्हाही वाट्याला येऊ शकतं
त्रास होणं , झोप उडन , काळजी वाटणं स्वाभाविक आहे
पण हिंमत हारू नका !
मात्र काही निर्णय ताबडतोब घ्यावे लागतील
चार रूम मध्ये राहात असाल दोन रूम मध्ये रहा
दोन मध्ये रहात असाल एक मध्ये जा
फोर व्हीलर वापरत असाल
टू व्हीलर घ्या
चारिठाव स्वयंपाक होत असेल
फक्त पोळी-भाजी वर या
काही loan घेतलेले असेल तर ते Clear करण्याचा प्रयत्न करा !
नातेवाईकाला शिव्या देऊ नका
फालतू डायलॉगबाजी अगोदर बंद करा
वेळच येऊ नये , कुणीच कुणाचं नसतं
त्याच त्या घिस्यापिट्या कॅसेट्स वाजउ नका !
शंभर पैकी दोन चार जण नक्की मदत करत असतात
त्यांचं नाव घ्या
९६ जणांना नावं ठेवण्या पेक्षा ४ जणांना चांगलं म्हणा !
थोडक्यात काय ,
आपला आर्थिक स्रोत कमी झाला आहे
हे समजून घ्या
आणि गरजा कमी करा !
अजून एक महत्वाची गोष्ट
अशा प्रसंगी .......
बायकोने नवऱ्याला साथ देणे
खूप गरजेचे आहे
त्याला टोमणे मारू नका ,
त्याच्या दुर्गुणांवर बोट ठेवण्याची ही वेळ नाही
हे जरा समजून घ्या
शाब्दिक बाणांनी सुद्धा माणूस घायाळ होऊन कोलमडून पडू शकतो
हे नीट समजून घ्या
राम वनवासाला निघाल्यावर ,
सिता आपण होऊन रामा सोबत वनवासाला निघाली
याचा अर्थ .......
राजवैभव असो किंवा वनवास असो
आहे त्या परिस्थितीत मी तुमची साथ देईल
तुम्हाला सोडून जाणार नाही
अवास्तव मागण्या करणार नाही
असा त्याचा अर्थ असावा !
वाढलेले खर्च कमी कसे करता येतील
ती पावलं अगोदर उचला
पोरं जर खूप जास्त फी असणाऱ्या मोठाल्या शाळेत,महाविद्यालयात असतील
तर त्या बदला
फी भरतांना ओढाताण होणार नाही
त्या शाळेत टाका
लोकांच्या हसण्याचा नाही स्वतःच्या खिशाचा विचार करा !
*दिवस राहत नसतात मार्ग निघत असतात*
कोणतंही काम करण्याची
लाज बाळगू नका
अगदी भाजी पोळी करण्या पासून ते
ड्रेस मटेरियल विकण्या पर्यंत काहीही करा
घरातल्या मोबाईलची संख्या कमी करा
इतरांशी स्पर्धा करू नका , तुलना करू नका
कोणाच्याही लग्नाकार्यात उपस्थित राहण्या पेक्षा चार पैसे कमवण्यासाठी वेळ खर्च करा
कमी पगारावर join व्हायची वेळ आली तरी पटकन हो म्हणा
हेच मार्ग आहेत संकटातून बाहेर पडण्याचे !
नातेवाईकांना , लोकांना शिव्या देऊन काहीही होत नसतं
कोणी न कोणी मदत करतच असतं
आणि एक गोष्ट लक्षात ठेवा
उद्या दिवस सुधारल्या नंतर ज्यांनी मदत केली होती
त्यांच्या वरच तगंड वर करू नका !
कारण मदत करणाऱ्याचे अनुभव फार चांगले नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे !
हे मत बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा
सगळं चांगलं होईल
काळजी करायची नाही आणि
हिंमत हारायची नाही !!!
काहि महत्वाच्या टिप्स :-
1. तुम्ही हलाखीत आहात याचा पाढा सर्वांसमोर सतत वाचू नका. लोक तुमच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतील.
2. आपले जवळचे मित्र कोण त्यांच्याकडे मनमोकळेपणाने बोला. खरे मित्र या परिस्थितीत तुमच्या बाजूने उभे राहतात. हीच ती वेळ आहे जेव्हा खरे मित्र अोळखता येतात.
3.नातेवाईक अश्या प्रसंगी दूर जाण्याचा प्रयत्न करतात हे लक्षात ठेवा.
4. कागद व पेन घ्या. तुमच्या कुटूंबासोबत बसून महिन्याचे एकूण खर्च लिहून काढा. कोणते खर्च कमी करता येतील ते ठरवा. यामुळे संपूर्ण कूटूंब तुमच्या मदतीला येते.
5. स्वत:वर विश्चास ठेवा. या जगात फक्त तुम्ही आणि तुम्हीच स्वत:ला सर्वात जवळून अोळखता.
6. जग काय म्हणेल हे विसरा. जगाला तुमची काही पडलेली नाही.
7. छोटा व्यवसाय देखील उद्या तुम्हाला मोठ करु शकतो हे लक्षात घ्या.
8. व्यवसाय करताना लाज मनात बाळगू नका.
*लक्षात घ्या तुम्ही कमवून खात आहात चोरी करुन नाही.*
9. योग्य आर्थिक नियोजन करा. कूटू्ंबाचा मेडीक्लेम व लाईफ ईन्शूरन्स हा एखाद्या तज्ञ आर्थिक सल्लागाराकडूनच करुन घ्या. लक्षात ठेवा योग्य तज्ञ आर्थिक सल्लागार तुम्हाला योग्य मार्ग दाखवू शकतो.
टिप :- शक्य असेल तर हि पोस्ट तुमच्या मित्रमंडळींना व इतर ग्रुपवर शेअर करा. कदाचित कोणीतरी या पोस्टपासून प्रेरणा घेउन आयुष्यात उभा राहू शकेल.
🙏
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
कृपया पोस्ट वाचून झाल्यानंतर नक्की शेअर करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..