*Happy Mathematics Day*
*जगातील सर्वात सोपा विषय गणित*
आश्चर्यचकीत झालात काय ? गणित जगातील सर्वात सोपा विषय आहे. होय पण खरच जगातील सर्वात सोपा विषय गणित होता आहे आणि कायमच राहाणार. आज जागतिक गणित दिन या निम्मित्ताने लिहायला पेन उचलला .गणिततज्ञ रामानुजन यांच्या जन्मदिनानिमित्त आपण गणित दिन साजरा करतो.
*गणित म्हणजे काय हेच आपण समजून घेत नाही* आज लहानापासून अगदी वयस्कर प्रत्येकाला वाटते गणित म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार ,भागाकार आणि भली मोठी अकडेमोड यांच्या पलिकडे कोणी विचारच केला नाही . मित्रांनो गणित म्हणजे काय हे आपण या लेखाच्या माध्यमातून समजून घेऊयात.
गणित म्हणजे काय ?
1) गणित म्हणजे अंदाज बांधणे.
2) गणित म्हणजे फरक करणे.
3) गणित म्हणजे संबध शोधणे.
4) गणित म्हणजे तर्क करणे.
5) गणित म्हणजे शोध घेणे.
6) गणित म्हणजे पट करणे.
7) गणित म्हणजे समस्या सोडवणे.
8) गणित म्हणजे दुवा जोडणे.
9) गणित म्हणजे साम्य शोधणे.
10) गणित म्हणजे जुळवणी करणे.
11) गणित म्हणजे बांधणी करणे.
12) गणित म्हणजे कृती करणे.
13) गणित म्हणजे रचना करणे.
14) गणित म्हणजे जीवन जगणे.
15) गणित हेचे जीवन आणि जीवन हेच गणित.
*गणित विषयात गोडी निर्माण करण्यासाठी*...
गणित विषयात गोडी निर्माण करण्यासाठी एक छान मार्ग म्हणजे गणिती कोडी , गणिती गमतीजमती समजून घ्या इतरांना सांगा .आज प्रत्येकाने एक तरी कोड व एक तरी गणित सौंदर्य आपल्या मित्रांशी , विद्यार्थ्यांना नक्की सांगा. आज गणित दिनानिमित्ताने काही गणिती क्लृप्ती आपल्या शी Share करणार आहे.
क्लृप्ती क्रमांक . 01
(1)² = 1
(11)² = 121
(111)² = 12321
(1111)² = 1234321
(11111)² = 123454321
अशा पद्धतीने अगदी सेकंदात आपण 1, 11, 111, 1111, 11111 चा वर्ग लिहू शकतात.
=======================
क्लृप्ती क्रमांक . 02
2, 6, 5, 8 अंक एकदाच वापरून चार अंकी किती संख्या तयार होतात ?
संख्या किती होता साठी सोपी क्लृप्ती
चार संख्या दिल्या आहेत .
= 4 × 3 × 2 × 1 असा गुणाकार करा.
*= 24 संख्या तयार होतील*
अशा पद्धतीने 5 अंकी 120 संख्या , 6 अंकी 720 संख्या तयार होतात अगदी सेकंदात सांगता येते.
======================
क्लृप्ती क्रमांक . 03
5, 7, 8 अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व तीन अंकी संख्या ची बेरीज किती ?
याची क्लृप्ती आहे.
बेरीज = 222 × ( अंकाची बेरीज)
= 222 × ( 5+7+8)
= 222 × 20
= 4440 बेरीज येते.
अशा पद्धतीने ...
चार अंकी संख्या साठी...
= 6666 × ( अंकाची बेरीज )
अगदी सेकंदात प्रश्न सोडवता येतो.
=======================
क्लृप्ती क्रमांक - 04
62 × 62 × 62 × 62 × ...
अशा पद्धतीने 47 वेळा 62 घेऊन गुणाकार केल्यास एकक स्थानी कोणता अंक येईल ?
यासाठी क्लृप्ती ...
47 ला 4 ने भाग द्यावे
47 ÷ 4 = 11 आणि बाकी 3 येईल .
जेवढी बाकी आली तितक्या वेळा दिलेल्या संख्यातील एकक चा गुणाकार करावा
= 2 × 2 × 2
= *8* अंक एकक स्थानी येईल .
आणि सेकंदात सोडवता येईल .
=======================
क्लृप्ती क्रमांक - 05
वर्तुळावर 12 बिंदू घेऊन ते सर्वच बिंदू एकमेकांना जोडले तर किती रेषाखंड काढता येतील ?
याची सोपी क्लृप्ती अशी आहे.
12 × 11
= ----------------
2
= *66* रेषाखंड काढता येतील.
आणि सेकंदात प्रश्न सुटेल.
=======================
क्लृप्ती क्रमांक - 06
वर्तुळावर 12 बिंदू परस्परांना जोडून जास्तीत जास्त किती त्रिकोण काढता येतील ?
या साठी क्लृप्ती
12 × 11 × 10
= ----------------------
6
= 220 त्रिकोण काढता येतील
आणि सेकंदात प्रश्न सुटेल.
=======================
क्लृप्ती क्रमांक - 07
20% द.सा.द.शे. दराने सरळव्याजाने किती वर्षात कोणतीही रक्कम तिप्पट होईल ?
या साठी क्लृप्ती ...
( पट - 1 ) × 100
= ---------------------------
दर
( 3 - 1 ) × 100
= ---------------------------
20
= 10 वर्षात तिप्पट होईल.
सेकंदात प्रश्न सोडवा
=======================
क्लृप्ती क्रमांक - 08
1) पाव वर्तुळाची परिमिती / परीघ
25
= ---------- × त्रिज्या
7
2) अर्ध वर्तुळाची परिमिती / परीघ
36
= ---------- × त्रिज्या
7
3) पाऊन वर्तुळाची परिमिती / परीघ
47
= ---------- × त्रिज्या
7
4) संपूर्ण वर्तुळाची परिमिती / परीघ
44
= ---------- × त्रिज्या
7
अशा पद्धतीने सेकंदात परीघ / परिमिती शोधता येईल .
=======================
अशा हजारो गणित क्लृप्ती विद्यार्थ्यांना समजल्या तर प्रत्येक गणित सेकंदात सुटेल. आणि गणित बद्दल ची भीती नक्की कमी होऊन विद्यार्थ्यांना आयुष्यभर गणिताची गोडी लागेल . प्रत्येक जण समजेल गणित जगातील सर्वात सोपा वियष आहे.
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
whatsaap - 8856046142
लेखन व संकलन
श्री. प्रविण बनकर
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवळाली
ता.जि.उस्मानाबाद
🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸🚸
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..