माझ्या मराठीची गोडी

वाचकांना वाचनाची एक पर्वणी मिळावी . मराठी भाषेची गोडवी कळावी यासाठी केवळ हा एक प्रयत्न आहे कुणाला काही शंका असल्यास कृपया राग व्यक्त न करता कमेंटमध्ये सांगा व योग्य ते मार्गदर्शनही करा .

Breaking

मंगळवार, २ जून, २०२०

जून ०२, २०२०

मुलीच्या वडिलांचे मनोगत

मुलीच्या वडिलांचे मनोगत... बायकोला उद्देशून...


आज मुलीला  सासरी पाठवले
नकळत तुझे बाबा आठवले
तिला सासरी पाठवताना
आपल्या संसाराचे
चित्र डोळेसमोर सरकले

तु घरी आली तेव्हा वाटले
तुला सगळे यायला हवे
तू सगळे करायला हवे
आज वाटते सासरच्यांनी
आपल्या मुलीला संभाळून घ्यायला हवे
तिला जपायला हवे

तुझे बाबा आले गेले
नाही वाटलं विचाराव
तरी आज  वाटत जावयाने प्रेमाने बोलावं
हक्काने काही सांगाव

तुझे कष्ट तुझी मेहनत
सगळं कसं गृहीत धरलं
आता वाटत लेकीचं कौतुक
सगळ्यानी कराव
तिने मानाने जगावं

बघता बघता वर्ष सरले 
लेकीला ही दिवस गेले
देवा कडे एकच मागणे
तिला एक गोड परी दयावी
म्हातारपणी का होईना
पण नवऱ्याला तिची किंमत कळावी


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 कृपया पोस्ट वाचून झाल्यावर कमेंट नक्की करा तसेच सबस्क्राइब करायला विसरू नका व नक्की फॉरवर्ड करा , म्हणजे अधिकाधिक लोकांना पोस्ट वाचायला मिळेल
धन्यवाद

जून ०२, २०२०

आनंदी आयुष्याचा पासवर्ड

एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते.त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू, संत, फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल.मला कायम आनंदी ठेवेल.
अखेर एका फकिराने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे,पण जेव्हा जीवन-मरण असा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील तेव्हाच डबी उघड, तेव्हाच मंत्र कामाला येईल.बरीच वर्षे शांत गेल्यावर राजाचे दिवस फिरले.राज्यात बंडाळी झाली व त्याच्याच कपटी प्रधानाने त्याला तुरुंगात टाकले.पहाटेला फाशी द्यायचे ठरले.विश्वासू सेवकाने राजाला रात्री सोडवून, एक घोडा बरोबर दिला.मजल दरमजल करीत राजा सीमेपासून दूर पळाला.कळाल्यावर दुष्ट  प्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मागावर पाठवली.राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला.पुढे दरी होती.घोड्याला चरायला सोडून, मोठ्या खडकाआड लपला. त्याला वाटले आता थोडया वेळात सैनिक गाठणार व आपण मरणार.  त्या क्षणी त्याला फकिराच्या अंगठीची आठवण आली.ती त्याने उघडली.त्यात एकच वाक्य लिहिले होते,

"This too shall pass "
 म्हणजे 
"हाही क्षण निघून जाईल" 

केवळ ते वाक्य वाचून राजाचे मन शांत झाले.आश्चर्य घडले.सैनिक तेथपर्यंत पोहचले.त्यांना वाटले फक्त घोडा दिसतोय म्हणजे राजा दरीत पडून मेला. ते परतले.राजाने शेजारच्या राज्याची मदत घेऊन काही दिवसांत आपले राज्य परत मिळवले. विश्वासघातकी प्रधानाचा शिरच्छेद केला.  विजयाचा जंगी समारंभ चालू असताना, नवीन प्रधानाने पाहिले की महाराज कुठेही अति-उत्साहित न होता प्रशांत मुद्रेने सिंहासनावर विराजमान आहेत.त्याने अदबीने विचारले, 
" महाराज, आपल्या आयुष्यात एवढ्या भयानक घडामोडी घडल्या व त्यातून आपण सहीसलामत बाहेर पडला, तेव्हा आपण आज आनंदाने ओसंडून जायला हवे." राजा म्हणाला, " नाही, आता मला माझ्या मंत्राचा अर्थ व सामर्थ्य कळले आहे. जगात कुठलीही गोष्ट कायमची टिकून राहत नाही.परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे.या जगात सुख ही राहात नाही, दुःखही राहात नाही.हे मला आता समजलेले आहे.म्हणून दुःखात खचू नये, सुखात नाचू नये."

This too shall pass !
हे क्षणही निघून जातील.

ओशोंनी सांगितलेली ही बोधकथा आपल्याला जगायला शिकवेल.नुसतेच जगायला नव्हे तर प्रत्येक प्रसंगात मनाची शांती अबाधित ठेवण्याची, मन स्थिर ठेवण्याची गुरुकिल्लीच इथे दिलेली आहे.

*ही कथा पासवर्ड आहे आनंदी आयुष्याचा.*


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 
जून ०२, २०२०

पुरुष कोण आहे

स्त्रियांनी काही असेहीे वाचावे   -

          *"पुरुष कोण आहे ?"*

पुरुष हा निसर्गाने  बनवलेली अशी एक सुंदर गोष्ट आहे, जो आपल्या अगदी कमी वयापासून *तडजोडी* करायला चालू करतो!
१) तो आपल्या *हिश्श्यातील* मलाई कुल्फी सुद्धा आपल्या बहिणीला देतो!

२) तो आपल्या आई-वडिलांच्या सुखासाठी आपल्या स्वप्नांचे *बलिदान* देतो!

३) तो आपली *सर्व जमा पुंजी* अशा मुलीसाठी खर्च करतो जिच्या चेहऱ्यावरील *हसू* पाहायला त्याला आवडते!

४) आपले पूर्ण तारुण्य आपल्या बायको आणि मुलांच्या सुखासाठी रात्री-बेरात्री काम करून कुठल्याही *तक्रारीविना* खर्च करतो!

५) तो त्यांच्या *भविष्यासाठी* कर्ज घेतो आणि *जन्मभर* ते फेडत बसतो!
६) तो खूप *संघर्ष* करतो आणि तरीही त्याच्या *आईचे,* *बायकोचे* आणि  *अधिकाऱ्यांचे* ओरडे खातो!


५) शेवटी *त्याचे आयुष्य* दुसऱ्यांसाठी झटण्यातच संपते!


७) आईचे ऐकले तर त्याला आईच्या पदराखालचे *पोर* बोलतात आणि

८) बायकोचे ऐकले तर त्याला बायकोचा *गुलाम* बोलतात!

प्रत्येक पुरुषाचा आयुष्यात आदर करा!

कारण तुम्हाला माहित नसेल त्याने आयुष्यात तुमच्यासाठी कुठले *बलिदान* दिले असेल!
हा  प्रत्येक पुरुषाला पाठवा, त्याच्या चेहऱ्यावर हसू पाहण्यासाठी 

आणि 

प्रत्येक स्त्रीला पाठवा
तिला ही त्याचे
मोठेपण समजायला हवे.
                                       👇




























तो बाप असतो... 
तो बाप असतो... 
चांगल्या शाळेमध्ये
पोरांना टाकायची धडपड करतो.. 
donation साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो
..........तो बाप असतो

























कॉलेज मध्ये सोबत जातो, होस्टेल शोधतो,
स्वतः फाट्क बनियन घालून
तुम्हाला jeans ची pant घेऊन देतो
........तो बाप असतो. 






























स्वतः टपरा mobile वापरून,तुमहाला stylish mobile
घेऊन देतो, 
तुमच्या prepaid चे पैसे स्वतःच भरतो, 
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो, 
.......तो बाप असतो..
























love marriage करायला कोणी निघाल तर
खूप चिडतो, 
"सगळ नीट पाहिलं का?" म्हणून खूप ओरडतो, 
"बाबा तुम्हाला काही समजत का? "अस ऐकल्यावर खूप
रडतो, 
........तो बाप असतो.. 






















जाताना पोरगी सासरी, धायमोकळून रडतो, 
माझ्या चिऊला नीट ठेवा
असे हात जोडून सांगतो, 
.......तो बाप असतो.. 




























वडिलावर खूप कमी कविता असतात म्हणून
कविता FORWARD
करा......... 











वडिलांचे प्रेम जगाला कळूद्या
सहमत असाल तर नक्की FORWARD करा...
असे म्हनत नाही , तुमची मर्जी...
पन तुम्ही नक्की Forward करनार..
  ❤I love AAI BABA❤

आणि खरच जर तुम्ही आई वडील यांना मानतात तर *मला पंण पठावा*
😔😔😢😢
🙏🙏🙏🙏👍👍👍👍
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 कृपया पोस्ट वाचून झाल्यावर कमेंट नक्की करा तसेच सबस्क्राइब करायला विसरू नका व नक्की फॉरवर्ड करा , म्हणजे अधिकाधिक लोकांना पोस्ट वाचायला मिळेल
धन्यवाद


जून ०२, २०२०

महान शिक्षकांचे श्रेष्ठ गुण*

*महान शिक्षकांचे श्रेष्ठ गुण*

 एक उत्तम शिक्षक ते असतात जे विद्यार्थी  कायमस्वरूपी लक्षात ठेवतात आणि त्यांच्या स्मृतींना जतन करून ठेवतात . शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर दिर्घकालीन परिणाम करतात आणि महान शिक्षक विद्यार्थ्यांना महानतेच्या दिशेने जाण्यासाठी प्रेरणा देतात.
यशस्वी होण्यासाठी, उत्तम शिक्षक असणे आवश्यक आहे:

1. *आकर्षक व्यक्तिमत्व आणि अध्यापन शैली*
 महान शिक्षक  आकर्षक असतात आणि सर्व चर्चेत विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून ठेवतात .

2. *अध्यापनासाठी उद्दिष्टे स्पष्ट* 
एक उत्तम शिक्षक प्रत्येक धड्यासाठी स्पष्ट उद्दिष्टे तयार करतो आणि प्रत्येक वर्गामध्ये त्या विशिष्ट उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी काम करतो.

3. *प्रभावी शिस्त कौशल्य*
एक उत्तम शिक्षक प्रभावी शिस्त कौशल्याची भूमिका बजावतात आणि वर्गामध्ये विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वर्तणुकीसाठी बदल घडवून आणू शकतात.

4. *चांगले वर्ग व्यवस्थापन कौशल्य*
एक उत्तम शिक्षकात चांगली वर्ग व्यवस्थापन कौशल्ये असतात आणि चांगले विद्यार्थी वर्तन, प्रभावी अभ्यास आणि कामाची सवय आणि वर्गात एकतेची भावना याची खात्री करु शकतात.

5. *पालकांशी चांगले संवाद*
एक उत्तम शिक्षक पालकांशी मुक्त संवाद कायम ठेवतो आणि त्यांना अभ्यासक्रम, शिस्त आणि इतर समस्यांबाबत काय चालले आहे याची माहिती देतो. ते स्वतः फोन कॉल, बैठका आणि ईमेल उपलब्ध करतात

6. *उच्च अपेक्षा*
एक महान शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांकडून उच्च अपेक्षा बाळगतात आणि प्रत्येकाला त्यांच्या उत्कृष्ट पातळीवर काम करण्यासाठी प्रोत्साहन देतात.

7. *पाठ्यक्रमाचे  ज्ञान*
एक उत्तम शिक्षकाला शालेय अभ्यासक्रमाचे आणि इतर मानकांबद्दल सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यांचे अध्यापन ती मानके पूर्ण करत असल्याचे सुनिश्चित करतात.

8. *विषय ज्ञान*
 कधीकधी दुर्लक्ष केले जाते पण एक उत्तम शिक्षक ज्या विषयावर ते शिकवत आहेत त्यामध्ये अविश्वसनीय ज्ञान आणि उत्साह असतो . ते प्रश्नांना उत्तरे देण्यास आणि विद्यार्थ्यांसाठी सामग्री मनोरंजक ठेवण्यासाठी तयार असतात .

9. *मुलांसाठी शिक्षण* एक महान शिक्षक शिकविण्यावर आणि मुलांबरोबर काम करण्यावर भर देतात . ते विद्यार्थ्यांच्या जीवनावर प्रभाव टाकण्याबद्दल आणि त्यांच्या प्रभावाविषयी समजून घेण्यास उत्सुक असतात .

10. *विद्यार्थ्यांशी स्नेहपूर्ण संबंध* 
एक महान शिक्षक विद्यार्थ्यांबरोबर एक मजबूत स्नेहपूर्ण संबंध विकसित करतात आणि विश्वासक संबंध प्रस्थापित करतात.
✒🖊🖋✒✒

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 कृपया पोस्ट वाचून झाल्यावर कमेंट नक्की करा तसेच सबस्क्राइब करायला विसरू नका व नक्की फॉरवर्ड करा , म्हणजे अधिकाधिक लोकांना पोस्ट वाचायला मिळेल
धन्यवाद

सोमवार, १ जून, २०२०

जून ०१, २०२०

रेबन गॉगल

*“रेबन गॉगल”*
“काय गरज होती एवढा महागडा फोन घ्यायची,पहिला होता ना” पप्पा चिडले.
“अहो,आता तो कमावता आहे, असेल हौस,तुम्ही नका लक्ष देऊ”आईने समजावले. 
“पगार झाला की लगेच उधळपट्टी सुरु,गरज काय फालतू खर्च करण्याची.”पपांची बडबड सुरुचं.
आई त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करीत होती.प्रकाश सगळे बोलणे ऐकत होता.त्यामुळे आईला टेन्शन आले.तिने खुणेने प्रकाशला गप्प राहण्यास सांगितले.
हे घरातलं रोजचच वातावरण. बाप-लेका मध्ये नेहमीच खडाजंगी चालयची आणि आईची त्यात मध्यस्ती.
खरंतर पप्पाचा प्रकाश अतिशय लाडका.एकुलता  असल्यामुळे लाड जरा जास्तच. 
प्रकाश मोठा होऊ लागला तसे दोघांच्यामध्ये अंतर पडायला लागले कारण दोघांचे परस्परविरोधी स्वभाव.
दहावीनंतर पुढे काय करायचे यावरून दोघांचे वेगवेगळे विचार होते.त्यामुळे मोठा वाद झाला पण प्रकाशसुद्धा वडिलांप्रमाणे हट्टी म्हणून त्याने स्वतःला पाहिजे तेच केले.चांगले मार्क्स असूनही तो आर्ट्सला गेला.त्याला कला क्षेत्रात करियर करायचे होते अर्थातच पपांना हे मान्य नव्हते. हळूहळू दोघांमधला संवाद कमी झाला. एकाच घरात राहत असल्यामुळे दोघात जे बोलणे व्हायचे ते फक्त कामापुरते.
वाद घालताना मात्र दोघेही मागे हटत नसत.दोघांमध्ये फार मोठे असे काही भांडण नव्हते पण विचार आणि वागण्याची पद्धत वेगवेगळी होती. जनरेशन गॅपचा परिणाम.
पप्पा व प्रकाश यांच्यामध्ये नेहमीच आईचे सँडवीच व्हायचे.
दोघेही घरात असले म्हणजे ती बिचारी कायम धास्तावलेली.
शिक्षण पूर्ण करून प्रकाश नोकरीला सुद्धा लागला पण घरातल्या परिस्थितीत फारसा पडला नाही.केवळ आईमुळे घर टिकले. 
प्रकाश चांगली चित्र काढायचा त्यामुळे त्यातच त्याने करियर केले.एका अँडव्हटाझिंग कंपनीत त्याला जॉब मिळाला.
पहिला पगार झाला आणि त्याने नवीन मोबाईल घेतला,आईसाठी फूड प्रोसेसर आणला.तो पाहून आईच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वहायला लागले. काहीच बोलली नाही 
आधी फोन मग फूड प्रोसेसरची खरेदी,पपांना भडकायला निमित्त पुरले.
त्यांची बँटींग पुन्हा सुरु झाली पण आश्चर्य म्हणजे यावेळी प्रकाश शांत होता.
काही बोलत नव्हता पण आई पपांवर चिडली.
“लेकराने,घरासाठी वस्तू आणली त्याचे कौतुक करायचे सोडून, कुरकुर कसली करत आहात.”
आईच्या बोलण्याने पपा संतापले आणि दोघांमध्ये भांडण सुरु झाले.
“विनाकारण खर्च करण्याची तुझीच सवय त्याला लागली आहे,सेविंग करायला पाहिजे, आपण करोडपती नाही.पैसे वाचवायचे की असे फालतू खर्च करायचे,आपल्यासारखेच दोन खोल्यांमध्ये हासुद्धा आयुष्य काढणार”
“अहो,काहीही काय बोलताय, आपण केली अडजेस्टमेंट,मन मारून पै पै साठवली पण आता चांगले दिवस आले आहेत. माझा पोरगा हुशार आहे.तो नक्की चार रूमचा फ्लॅट घेईल.”
आईच्या डोळ्यात प्रकाशविषयी अपार कौतुक होते.
“तसं झालं तर चांगलंच आहे”
“चला जेवायला उगीचच वाद घालत बसता”
“मी वाद घालतो” 
“आज आईस्क्रीम खाऊ,मी आणतो”असे बोलून प्रकाशने हळूच पपांकडे पाहिले.पपा काहीच बोलले नाही.
जेवण झाल्याबरोबर आई वरच्या मजल्यावरील काकूंकडे गेली पप्पा व्हरांड्यात पेपर वाचत बसले होते,प्रकाश मोबाईल मध्ये हरवला तेवढ्यात कुरियर आले. पपांना वाटले प्रकाशचे पार्सल आले.त्यांनी हाक मारली पण प्रकाश मुद्दामच पुढे आला नाही 
आपल्या नावाचे पार्सल पाहून पपांना फार आश्चर्य वाटले.
पार्सल आपलेच आहे का याची त्यांनी पुन्हा पुन्हा खात्री करून घेतली.
कुरियरवाला निघून गेला.बराच वेळ पप्पा पार्सलकडे पाहत होते.
पुन्हा एकदा त्यांनी पार्सलवरचे नाव आणि पत्ता तपासला.
टिपिकल मध्यमवर्गीय वृत्तीचे पप्पा पार्सल उघडू की नको विचारात पडले होते.
शेवटी प्रकाशच बाहेर आला.
“पप्पा,कसलं पार्सल आहे,उघडा की”
“नको रे,कसलं पार्सल,कोणी पाठवलं आहे ते माहित नाही”
“नाव,पत्ता तुमचाच आहे मग कशाला विचार करताय”
“मग फोडू म्हणतोस”
पपांनी पार्सल फोडले आणि त्यात नवाकोरा “रेबन गॉगल” होता.
आश्चर्याने पपा गॉंगलकडे एकटक पाहत होते.
“पप्पा,आवडला का गॉगल, माझ्याकडून तुम्हांला गिफ्ट” प्रकाशने विचारले 
“रेबनचा गॉगल तोही माझ्यासाठी” पप्पा जोरात ओरडले.त्यांना प्रचंड आनंद झाला.
“ओरीजनल रेबन आहे”
“महाग असेल”
“फार नाही,आवडला का तुम्हांला”
“न आवडायला काय झाले, कसला भारी आहे” पपांनी अलगदपणे गॉगल हातात घेतला.
“पपा,मला माहिती आहे तुम्हांला गॉगलची खूप आवड आहे. आयुष्यात एकदा तरी ओरीजनल रेबन घ्यायचा हेच तुमचं स्वप्न होते.त्याविषयी अनेकदा तुम्ही बोलायचा.तेव्हाच मी ठरवले होते की कमवायला लागेल तेव्हा तुम्हांला ओरीजनल रेबन गिफ्ट म्हणून द्यायचा”
“एवढा खर्च कशाला केलास,परत करून टाक, वडिलांची आवड लक्षात राहिली,काही घ्यावेसे वाटले यातच मला सगळे काही मिळाले,”.
“हा गॉंगल तुमच्यासाठीच घेतला आहे,तुम्ही तो रोज वापरायचा आणि पप्पा,थँक्यू सो मच”
“कशासाठी” गॉगलकडे पाहत असलेल्या पपांनी विचारले. 
“सगळ्याच साठी,खूप काही केलंत माझ्यासाठी,” पपांनी चमकून प्रकाशकडे पाहिले.
“त्यात काय विशेष.सगळेच आईबाप आपल्या मुलांसाठी करतच असतात” 
“बाकीच्यांचे माहिती नाही पण आई,तुम्ही माझ्यासाठी स्पेशल आहात.आतापर्यत तुम्ही मला गिफ्ट देत आलात. अनेकवेळा स्वतःचे मन मारून माझ्यासाठी तडजोड करीत आलात.सगळे ताण-तणाव,त्रास सांभाळून नोकरी करीत राहिलात.स्वतःपेक्षा मला महत्व दिले.तेही आपल्या दोघांचे फारसे पटत नसताना.वाद नेहमीच व्हायचे पण तुमची तळमळ मला समजत होती.” 
प्रकाशच्या बोलण्याने पपा इमोशनल झाले.
“जे झाले ते झाले फार मनावर घेऊ नकोस,तुझ्या भल्यासाठीच सगळा आटापिटा होता,तुझी फार काळजी वाटायची,”
“पप्पा,प्रत्येक घरात वडिल आणि मुले यांच्यात एक अदृश्य भिंत असते,मुलं आईशी जेवढं मनमोकळ बोलतात,वागतात तसं वडिलांशी नाही वागता येत.ती अदृश्य  भिंत मधे येत असते. माझंही तसचं झालं तुमच्याशी कधीच मनमोकळ बोलता आलं नाही,कारण माहित नाही पण तुमच्याशी वागताना आपसूक बंधने यायची” अचानक प्रकाशने पपांना मिठी मारली.
पपांच्या डोळ्यात पाणी आले,ते लपविण्यासाठी त्यांनी पटकन रेबन गॉंगल घातला.
“कसा दिसतोय,”
“एकदम कडक” दारातूनच आई म्हणाली.
“आलोच आरशात बघून” लगबगीने पपा घरात गेले.मधले दार बंद केले आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
पपांच्या आनंदाश्रुमध्ये नवाकोरा रेबनसुद्धा न्हाऊन निघाला.
---
जून ०१, २०२०

मोबाईल- एक भयंकर सत्य*





*वेऴ काढुन वाचा *
*मोबाईल- एक भयंकर सत्य*

दोन दिवसांपूर्वी आमच्या आईच्या पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे MRI करण्यासाठी एका सेंटरवर घेऊन गेलो होतो. पाय कंबरेपासून खूप दुखत असल्याने लवकरात लवकर MRI करण्यासाठी मी विनंती केली आणि लगेच सर्व कार्यालयीन बाबी पूर्ण करून MRI करायला घेणार एवढ्यात एक अँबुलन्स त्या सेंटरवर आली.

अँबुलन्सचा आवाज, डॉक्टरांची धावपळ आणि नातेवाईकांच्या गाड्यांची लगबग बघून अंगावर शहारे आले. कदाचित अक्सिडेंट झालं असावं. नक्की काय झालं होतं ह्याची कल्पना नव्हती. तेवढ्यात पाच ते सहा वर्षाच्या एका मुलाला अँबुलन्समधून बाहेर काढलं. त्याच्या पूर्ण चेहऱ्याला ब्राउनपट्टीने कव्हर केले होते. तोंडातून एक नळी बाहेर काढून त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास देत होते. त्या मुलाच्या शरीराची हालचाल अजिबात दिसत नव्हती. बहुतेक तो कुठून तरी पडला असावा आणि चेहऱ्याला खूप मार बसला असावा असं मला वाटलं.  मला पुन्हा ऑफिसमध्ये बोलावून डॉक्टरांनी विनंती केली की, आमचा पेशंट एकदम सिरिअस आहे, मेंदूचा MRI करायचा आहे तरी कृपया तुमच्या पेशंटच्या आधी आम्हाला नंबर द्यावा. एकंदर ती सगळी धावपळ आणि रडारड बघून मी लगेच होकार दिला. माझ्यासमोरूनच त्या मुलाला स्ट्रेचरवरून MRI मशीन रूममध्ये नेण्यात आले. त्या मुलाचे वडील माझ्याच वयाचे असल्याने त्यांच्या डोक्यात चाललेल्या विचारांचा काहूर मला कळत होता. डोळे पाण्याने भरले होते. त्या मुलाला आतमध्ये नेलं, त्याच्यासोबत डॉक्टर आत गेले आणि त्याचे सगळे नातेवाईक बाहेर बसले. रूमच्या बाहेर मी आमच्या आईच्या बाजूला बसलो होतो, तेव्हा त्याचे वडील माझ्या बाजूला, भिंतीला डोकं टेकून, छताकडे बघत शांत बसले होते. शेवटी मी न राहवून त्या मुलाबद्दल त्यांना विचारले. त्यानंतर त्यांनी जो खुलासा केला तेव्हा माझ्या पायाखालची जमीन एका क्षणासाठी सरकल्यासारखं मला वाटलं.

सार्थक आमचा एकुलता एक मुलगा. लग्नानंतर पाच वर्षांनी झाला. घरामध्ये त्याचे सगळेजण खूप लाड करतात. काही दिवसांपासून त्याचा स्वभाव खूप चिडचिडा झाला होता. त्याला पाहिजे ती वस्तू आम्ही लगेच उपलब्ध करून द्यायचो. मोबाईलवर गेम खेळणे, YOU TUBE वर व्हिडीओ क्लिप बघणे हा त्याचा आवडता छंद. मोबाईल हातात दिल्याशिवाय तो जेवतच नाही. काल संध्याकाळी तो शाळेतून आला तेव्हा त्याला खूप मोठी उलटी झाली आणि नंतर त्याला चक्कर आली. आम्ही लगेच त्याला जवळच्या डॉक्टरकडे नेलं. परंतु तो शुद्धीवर येत नसल्याने त्याला आम्हाला इकडे (हॉस्पिटलच नाव मी इथे लिहीत नाही) आणायला सांगितले.  कालपासून ह्याच्यावर उपचार चालू केले आहेत. अजून शुद्धीवर आला नाही. मेंदूचा MRI केल्यावर आजाराच्या अजून जवळ जाता येईल म्हणून आम्ही डॉक्टरांसोबत इथे आलो आहोत. डॉक्टर आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याची काळजी घेत आहेत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे *"मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे मेंदूवर परिणाम होऊन तो कोमात गेला आहे."*  हे सगळं ऐकून मला माझ्या डोळ्यासमोर मोबाईलवर खेळणाऱ्या अनेक मुलांचे चेहरे डोळ्यासमोर आले.

तिकडून बाहेर पडल्यावर ही सगळी घटना मी माझ्या पत्नीला फोनवर सांगितली आणि आपल्या मुलाबद्दल कशी काळजी घ्यावी हे ठरलं. तीनेसुद्धा आमच्या मुलाला त्या दिवसात अजिबात मोबाईल दिला नाही. हे सगळं बघून शेवटी रात्री माझा मुलगा म्हणाला की, "जर तू मला मोबाईल देत नसशील तर तू माझ्यासोबत खेळ." हे वाक्य साधं आहे पण आईवडिलांना खूप काही शिकवण्यासारखं आहे. आपण आपल्या मुलांना योग्य तो वेळ देत नसल्याने ती मुलं दुसरा आसरा शोधतात आणि तो म्हणजे एकमेव मोबाईल.  हे असं का होतं ह्याच उत्तर मला त्याच रात्री माझ्या 3 वर्षाच्या मुलाकडून मिळालं.

ह्या अश्या जीवघेण्या आजारातून आपल्या मुलांना कसं वाचवायचं हे आता सर्व पालकांच्या हातात आहे, कारण तुम्ही मोबाईल वापरणारे सुज्ञ पालक आहात.

१. आपल्या मुलांना वेळ द्या, त्यांच्या सोबत खेळा.

२. मुलांसमोर पालकांनी मोबाईल जास्त वापरू नये.

३. मुलं जेवत नाहीत म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देणे हे काटेकोरपणे टाळावे.

४. आपल्या लहानपणीचे खेळ त्यांच्यासोबत खेळावे. आपलासुद्धा विरंगुळा होतो. मुलांचा वेळ सत्कारणी लागतो आणि जुने खेळ जतन करता येतात.

५. मुलांना कधीतरी मातीत, उन्हात खेळुद्या. पावसात भिजू द्या. आपण सुद्धा मातीत खेळुन, पावसात भिजूनच मोठे झालोय हे कधी विसरू नये.

६. त्यांना मातीचे किल्ले बनवायला शिकवा.

७. त्यांना पोहायला शिकवा. कॅरम, बुद्दीबळ, सापशिडी, ल्युडो ह्यासारखे खेळ खेळा.

८. आजूबाजूच्या ४-५ मुलांना एकत्र करून आपल्या काळातले जुने खेळ शिकवावे. त्यांना सुदधा आवड निर्माण होते. आपण पण हेच करत करत मोठे झालो हे कधी विसरू नये.

 कदाचित हे सर्व करताना आपल्याला कंटाळा येईल पण आपल्या मुलाला कोमात जाण्यापासून वाचवायचे असेल आणि हसतमुख कुटुंब बघायचं असेल तर हे करायलाच पाहिजे. ह्यामधून पालक आणि मुलं ह्यांच नातं अजून घट्ट होते.

शेवटी कमावलेला पैसा तसाच राहतो, आणि आपल्या मुलांना योग्य संस्कार करण्यात आपण कमी पडलो, त्यांना वेळ दिला नाही ह्याचंच आयुष्यभर दुःख मनात घेऊन जगावं लागत. 

  -----------------समाप्त---------------
जून ०१, २०२०

अध्यापनाची खरी पद्धत...*

*अध्यापनाची खरी पद्धत...*

एकदा *शिक्षकांचे* असेच एक *प्रशिक्षण होते*. त्यात *एक निवृत्त शिक्षक* पण आले होते.

सर्वजन दिवसभर 

*व्याकरण कोणत्या पद्धतीने शिकवायचे?* 

*स्पेलिंग पाठ करावेत की नाही?* 

*कविता कशी शिकवायची?* 

*अध्यापन करताना शैक्षणिक साहित्य कोणते वापरायचे?* 

याचा *काथ्याकूट करीत होतो*. 

*संध्याकाळी ५ वाजले.* सर्वांना *जाण्याची घाई* होती. 
सर्वजन *उठू लागताच* ते *निवृत्त शिक्षक बोलायला उठले* आणि म्हणाले, *_"मी फक्त ३ मिनीटे बोलणार आहे."_* 

*वैतागाने* सारे खाली बसलो. ते शिक्षक म्हणाले, 

_*"दिवसभर तुमची सर्व चर्चा मी ऐकली*.
 *मी एक छोटे उदाहरण* सांगतो. ते जर *तुम्ही नीट समजून घेतले तर तुम्ही चांगले शिक्षक व्हाल."*_ 

*'आता आणखी काय उपदेश ऐकायचा' अशा भावनेने सर्व ऐकू लागले...*

ते म्हणाले की,

_*"एका डोंगराच्या पोटाला एक झोपडी आहे* तिथे एक , नवरा बायको राहतात. त्यांना *एक ६ महिन्याचं मूल आहे*. *आजूबाजूला एक ही घर नाही*. एकदा संध्याकाळी नवर्‍याला *अचानक गावाला जावे लागले*. पत्नी आणि मूल एकटेच आहेत. रात्री दोघे झोपले आणि *अचानक मध्यरात्री ते मूल किंचाळून रडायला लागले*._ 

_*ती आई काय करेल?*_

_सांगा ना काय करेल?_"
 
ते आम्हाला विचारू लागले.

आम्ही सारे शांत झालो.                 

कुणीच काही बोलेना. 

ते शिक्षक पुन्हा आम्हाला विचारू लागले,  

_*"ती आई बालमानसशास्त्राची पुस्तके उघडून पाहील का?*
 
*की मुलांना कसे हाताळावे याच्या वेबसाईट उघडून पाहील?"*_

_"सांगा ना... काय करेल यातलं?"_

आम्हाला मुद्दा कळला होता. 

ते *किंचित हसले* आणि पुढे म्हणाले, 

_*"ती यातले काहीच करणार नाही*
. *ती तिला जे सुचेल ते करील*. ती त्याला *कडेवर घेईल. छातीशी कवटाळेल...  त्याच्यापुढे ताटली आणि चमचा वाजवेल, त्याच्यापुढे नाचून दाखवील, गाणी म्हणेल, त्याला दूध पाजील, त्याला झोपडीबाहेर आणून चंद्र दाखविल. हे सारं सारं ती तिथपर्यंत करील की जोपर्यंत ते मूल शांत होत नाही."*_

ते पुढे म्हणाले की, 

_*"हे सारे ती का करील?"*_ 

_"हे तिला सारे का सुचेल?"_ 

*_"कारण ते तिचे मूल आहे म्हणून...!!!"_*

त्या शिक्षकांनी क्षणभर सगळीकडे बघितले बोलताना क्षणभर थांबले आणि म्हणाले, 

_"त्या बाईसारखे *तुमच्यासमोर बसलेले मूल तुम्हाला तुमचे वाटते आहे का?* *तितके प्रेम तुम्हाला जर त्याच्याबद्दल वाटणार असेल* तर माझ्या मित्रांनो, *तुम्ही जे काही वर्गात कराल*, तेच *उपक्रम* असतील, *तीच अध्यापनाची पद्धती असेल*. तुम्ही *हातात जे काही घ्याल तेच शैक्षणिक साहित्य असेल* आणि *तुम्ही जो विचार कराल तेच शैक्षणिक तत्वज्ञान असेल."*_ 

_*"यापलीकडे शिक्षण नावाचे काहीही नसते...!"*_
जून ०१, २०२०

अध्यात्म

*अध्यात्म म्हणजे काय?*



*अध्यात्म म्हणजे काय* ?

*अध्यात्म म्हणजे मुळात कोणतीही धार्मिक गोष्ट नाही.*

*अध्यात्म म्हणजे वरिष्ठांच्या प्रती आदरभाव असणे.*

*अध्यात्म म्हणजे कनिष्ठांच्या प्रती करुणाभाव बाळगणे.* 

*अध्यात्म म्हणजे आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असं वागण.*

*अध्यात्म म्हणजे वेद वाचण्यापेक्षा वेदना वाचता येणे.* 

*अध्यात्म म्हणजे आपलं काम प्रामाणिकपणे करणं.*

*अध्यात्म म्हणजे आपलं कौटुंबीक आणि सामाजिक कर्तव्य पार पाडणं.*

*अध्यात्म म्हणजे मुक्या प्राण्यांवर, पशु-पक्ष्यांवर प्रेम करणे.*

*अध्यात्म म्हणजे निरपेक्ष सत्कर्म करत रहाणे.*

*अध्यात्म म्हणजे नि:स्वार्थी सेवाभाव जोपासणे.*

*अध्यात्म म्हणजे सदैव कृतार्थ भाव अंगी बाळगणे.*

*अध्यात्म म्हणजे विना अपेक्षा कौतुक करणे.*

*अध्यात्म म्हणजे आपण प्रत्येकाशी सद्भाव आणि सद्भावाने रहाणे.*

*अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत सदैव असणे.* 

*अध्यात्म म्हणजे आपण या समाजाचं काही देणं लागतो, आणि ते आपण दिलेच पाहिजे अशी मानसिकता मनाशी सतत बाळगणे.*

*अध्यात्म म्हणजे गरजुवंतांना यथा शक्ती आर्थिक किंवा शाब्दिक मदत करणे.* 

*अध्यात्म म्हणजे आपल्या बरोबर इतरांची देखील प्रगती होवो हा भाव अंगी असणे.*   

*अध्यात्म म्हणजे* 
*साधं*.........
*सोपं*........
*सरळ*.........
*आणि*
*निर्मळ* ..........
*असणं - दिसणं आणि वागणं.*      

*अध्यात्म म्हणजे फक्त पूजा - पाठ, प्रार्थना आणि भक्ती नव्हे तर*......
*अध्यात्म म्हणजे केलेली पूजा - पाठ, प्रार्थना आणि भक्ती या प्रमाणेच आपली प्रत्येक कृती असणे.*

*अध्यात्म म्हणजे राष्ट्रपुरुष आणि  राष्ट्रीय संताचं सदैव स्मरण असणे.*   

   *थोडक्यात अध्यात्म म्हणजे सकाळ पासून रात्री झोपे पर्यंत नित्य  कर्म, कर्तव्य पारदर्शक पद्धतीने पार पाडणे.*
शुभम भवतु।।🙏🏻🚩💐

 🙏🏻जय श्री राम 🙏🏻
जून ०१, २०२०

बाप-अहिराणी कविता

*बाप*
बाप मना कष्टाळू 
त्याले नको दुःखाडू, 
तो आजारी पडस तवय 
समदं लागस कडू...

आधार तो घरना 
तो मनका से पाठना, 
तो खाट वर पडणा 
आमना हुंदुक दाटना...

तुम्ही चांगला व्हतात 
मनी गरज नही पडस, 
तूमना मोठा पोर्या पप्पा 
आते एकलामा रडस...

जसा घरना पाया 
त्यावर घर उभ रास, 
तसे पप्पा तुम्ही 
आमना सेतस श्वास...

लवकर बरा व्हा तुम्ही 
लवकर घर चला 
मी थकी गऊ आते 
माले मोकय करा 
माले मोकय करा...🙏 

-राहूल राजेंद्र नेरकर
जून ०१, २०२०

शिळी चपाती

*🍪  शिळी चपाती टाकून देताय ?*

रात्रीची चपाती सकाळी कडक होते, शिळे अन्न आरोग्यासाठी चांगले नाही या कारणास्तव शिळ्या चपात्या टाकून दिल्या जातात. खरं तर बारा ते चौदा तास आधी बनवण्यात आलेली चपाती ही हानीकारक नाही. त्याचे काय फायदे असू शकतात त्याचीच माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत
.
*📌 फायदे :*
*१)* ताज्या चपातीपेक्षा शिळी चपाती हेल्दी आहे. शिळ्या चपातीमध्ये अनेक पोषणमुल्ये आणि उर्जा ताबडतोब मिळते.

*२)* शिळ्या चपातीत कोलेस्ट्रॉल अजिबात नसते. त्यामुळे हार्ट प्रॉब्लेम दूर होतात.

*३)* ब्लड प्रेशरच्या समस्येनं त्रस्त असाल तर शिळ्या चपातीला थंड दुधात १५ मिनिटं भिजवून खावं. 

*४)* मधुमेही व्यक्तींनी सकाळच्या नाश्त्यामध्ये शिळी पोळी कुस्करून त्यात थंड दुध घालून खावं. पण साखर टाळावी.

*५)* अशक्तपणा जाणवत असेल तर शिळ्या चपातीचे सेवन करावे. यामुळे शरीरात शक्ती येईल.

*६)* याशिवाय उन्हाळ्यात शिळी दुधात भिजवून खाल्ल्यानं उष्माघाताचं त्रास कमी होतो.

*७)* रोज व्यायाम किंवा शारीरिक मेहनतीचे काम करणाऱ्यांनी शिळ्या चपातीचं सेवन करावं. यामुळे त्वरित ऊर्जा मिळते.

*८)* अॅसिडीटी, गॅस आणि पचनाच्या समस्या असणाऱ्यांनी शिळी चपाती खावी. गव्हाच्या पोळीमध्ये असणारे फायबर अन्न पचनासाठी देखील उपयुक्त आहे.
----------------------------------------🕉🕉🕉🕉🕉
.
.
जून ०१, २०२०

सर मला लिहिता येतयं!!

सर,मला लिहिता येतयंं...!

 आमची शाळा सुरु होवून एक महिना झाला होता. सकाळी दहाची वेळ असेल,मी शाळेत गेल्यावर आज ''Good morning sir.'' याऐवजी ''सर,राणीचं बोट दरवाजात चेंबलयं .'' असे माझे स्वागत झाले. राणी म्हणजे इयत्ता पहिलीतील आमची विद्यार्थीनी आराध्या कोळी , राणी हे तिचं टोपणनाव.(राणी,माऊली,गऱ्या,चिनपाल ही आमच्या कोळीवस्तीवरील मुलींची टोपणनावे आहेत.)
   सकाळी राणी दरवाजात असताना दुसऱ्या मुलीने दरवाजा बंद केला अन् राणीचे एक बोट दरवाजाच्या फटीत सापडले . जखम झाली नसली तरी ते चांगलेच लाल झाले होते.मी तिला जवळ बोलावले,'' आराध्या,इकडे ये.'
   आराध्या जवळ आल्यानंतर मी तिला म्हंटलं, ''चल,आपण गावात डॉक्टरांच्याकडे जावू.'' ''नको सर...!'' ती म्हणाली.आता काय करायचं ? मला प्रश्न पडला.नंतर मी सर्व मुलांना माझ्याजवळ बोलावले . आराध्याला जवळ घेतले अन् तिच्या दुखावलेल्या बोटावर एक हळूवार फुंकर घातली आणि सर्व विद्यार्थ्यांना सांगितले , ''आता,तुम्ही सर्वांनी प्रत्येकाने आराध्याच्या बोटावर एकेक फुंकर घालावयाची.'' लगेच सर्व मुलामुलांनी आनंदाने तिच्या बोटावर फुंकर घातली. आता  आराध्याचा चेहरा खुलला,ती हळूहळू हसू लागली.
   परिपाठानंतर आम्ही वर्गात आलो, हजेरी घेतल्यानंतर मी लगेच सांगितले,''राणी ,आज तू पाटीवर किंवा वहीत काहीही लिहायचे नाही,फक्त वाचन करायचं.'' जड अंत:करणाने आराध्या दिवसभर फक्त वाचत राहिली,कधी फळ्यावरील शब्द वाचायची तर कधी स्वत:च्या वहीतील... काहीवेळ फक्त पुस्तकातील चित्रे पाहत बसली.
   दुपारनंतर साडेचार वाजता पहिलीतील मुले घरचा अभ्यास घेण्यासाठी जवळ आली. मी सर्वांचा कालचा स्वाध्याय तपासून नवीन स्वाध्याय देत होतो. मी आराध्याचा कालचा स्वाध्याय तपासला आणि तिला सांगितले ,''तुझ्या बोटाला आज लागले आहे,तुला लिहिता येणार नाही म्हणून मी तुला आज स्वाध्याय देणार नाही.''
 आराध्या निराश होवून मान खाली घालून जागेवर जाऊन बसली. मी दोन - तीन विद्यार्थ्यांना स्वाध्याय दिला असेल,तितक्यात आराध्या आनंदाने उड्या मारीत माझ्याजवळ आली आणि म्हणाली,''सर,मला लिहिता येतयं..तुम्ही मला अभ्यास द्या.'' तिने मला तिची वही दाखवली,त्यामध्ये तिने फळ्यावरील शब्द लिहिले होते.मी तिला पुन्हा माझ्यासमोर शब्द लिहायला सांगितले ,तिने ते पटकन लिहून दाखविले. आता माझा नाईलाज झाला ,मी तिला वहीत स्वाध्यायाचा नमुना दिला.ती नाचत जावून आपल्या बेंचवर बसली. थोड्या वेळाने शाळा सुटली आणि आराध्या आनंदाने मुलांच्यासोबत आपल्या घरी निघून गेली.
   पण बोटाला लागलेलं असतानाही आपण इतरांच्या मागे राहू नये यासाठी जिद्दीने प्रयत्न करणारी आराध्या आज मलाच खूप काही शिकवून गेली .ज्ञानाच्या भुकेने झपाटलेली अशी पाखरं भेटली की शिक्षक झाल्याचं खूप समाधान वाटते.

✒श्री.दीपक माळी ९६६५५१६५७२.
खरशिंग,ता.कवठेमहांकाळ,जि.सांगली.
जून ०१, २०२०

आई आणि बदल

*आईला बघण्यामध्ये वया नुसार मुलात होणारा बदल तो कसा पहा🙏*

आईला पाहिलं का . . . . 
आईला बघायचं आहे . . . . . . . .
आई कुठं गेली . . .
*वय - दोन वर्ष*

आई . . .कुठे आहेस ? ? 
मी शाळेत जाऊ . . . . .
अच्छा   टाटा
मला तुझी आठवण येते शाळेत
*वय - चार वर्ष* 

मम्मा . . . .
लव यू 
आज टिफिन मध्ये काय आहे ? 
आई आज शाळेत खूप गृहपाठ दिले आहे....
*वय - आठ वर्ष*

बाबा आई कुठे आहे ? ? ?
शाळेतून आल्यावर आई दिसली नाही तर कसं तरी होतं
*वय - बारा वर्षे*

आई बसना जवळ खूप काही बोलायचं आहे तुझ्याशी
*वय - चौदा वर्ष*

काय ग आई
समझ ना . . . . 
बाबांशी बोलना मला पार्टीत जाउ दे म्हणून
*वय - आठरा वर्ष*

काय आई . . . . बदलते आहे
तुला काही कळत नाही तू समजत नाही
*वय - बावीस वर्षे*

आई . . . आई. . 
जेंव्हा बघावे तेंव्हा काय शिकवत असतेस मी काय लहान बाळ आहे का
*वय - पंचवीस वर्षे*

आई . . . . ती माझी पत्नी आहे 
तू समजून घेना . . . 
तू तुझी मानसिकता बदल
*वय - अठावीस वर्षे*

आई . . . . ती पण एक आई आहे 
तिला तिच्या मुलांना सांभाळता येते तू प्रत्येक बाबतीत हस्तक्षेप करू नकोस
*वय - तीस वर्ष*

आणि त्या नंतर . . . . 
आईला कधी विचारलं नाही . . 
आई कधी म्हातारी झाली त्याला कळलंच नाही

आई तर आजपण तीच आहे . . . 
फक्त वयानुसार मुलांचं वागणं बदलत गेलं . . 

नंतर एक दिवस. . . . . 
आई . . . आई . . . . . गप्प का आहेस? ? ? ? 
बोल ना . . . 
पण आई नाही बोलत. . . . 
कारण ती कायमची गप्प झाली होती
*वय - पन्नास वर्षे*

ती भाबडी आई. . .दोन वर्षांपासून पन्नास वर्षा पर्यंत हा बदलावं समजू शकली नाही . . 
करण आईसाठी पन्नास वर्षाचा प्रौढ पण लहानच आहे  . . . .ती बिचारी तर शेवट पर्यंत  प्रौढ मुलाच्या लहान सहान आजारांवर पण तशीच तळमळते  जशी तळमळ त्याच्या लहानपणी असायची....

आणि मुलगा...आई गेल्यावरच समजतो की त्याने कोणता अमूल्य खजिना गमावलं आहे...... 😔😢😔😢

आई बाबांची सेवा करा
त्यांच्यासारखे दैवत नाही
*आपण ना जन्मदाता ब्रह्मा पाहीला,*
*ना आपण पोषण करता विष्णु पाहीला.*
*ना आपण दु:खाचा अंत करणारा शंकर पाहीला*

*पण हे तिन्ही गुण ज्यांच्यात आहेत ते नक्कीच आज जवळ आहेत त्यांची सेवा करा*

 आणि एक विनंती प्रत्येकाने ही पोस्ट नक्की शेअर करा ह्यामुळे कोणाला तरी ह्या मोठेपणात  विसरलेल्या आईची पुन्हा एकदा जाणीव होऊन जाईल...ते ही तुमच्यामुळे.
*आई म्हणजे आईचं असते ...!!!*
जून ०१, २०२०

शाळा

शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,
आज उगाचच खुप वर्षांनी आठवली!
शाळा तर कधीचीच संपलीय, पण,
परीक्षेची धडधड मात्रं तशीच राहीलीय!!

"शब्दांचे अर्थ लिहा" म्हटल्यावर,
अचूक अर्थ आठवायचेत!
आता अर्थही बदललेत आणि,
शब्दही अनोळखी झालेत!!

"समानार्थी, विरुद्धार्थी शब्द",
गुण हमखास मिळायचेत!
आता समानार्थी भाव, विरुद्धार्थी बनलेत,
अन अर्थांचे अनर्थ झालेत!!

"गाळलेल्या जागा भरा",
हा प्रश्नं पैकीच्या पैकी गुण देणारा!
प्रश्नपत्रिकेतल्या सगळ्याच,
गाळलेल्या जागा भरल्यात!
आयुष्यातल्या काही जागा मात्रं,
आजही रिकाम्याच राहील्यात!!

पेपरातल्या "जोड्या जुळवा",
क्षणार्धात जुळायच्यात!
पण नात्यांच्या जोड्या,
कधी जुळल्यात,तर कधी,
जुळता जुळता फसल्यात!

"एका वाक्यातल्या उत्तरा"नं पाच मिनिटात,
पाच गुण मिळवून दिलेत!
आयुष्यातले काही सोप्पे प्रश्नं,
आजही तिथेच तटस्थ उभे आहेत,
एकाच जागी...उत्तराची वाट बघत..

"संदर्भासहीत स्पष्टीकरण" लिहिताच,
पाच पैकी साडेतीन गुण मिळायचेच!
आता स्पष्टीकरण देता देता,
बरेचसे संदर्भ मागे पडलेत!!

"कवितेच्या ओळी पुर्ण" करणं,
अगदी आवडता प्रश्नं!
आजही शोध सुरु आहे,
कवितेच्या सुंदर ओळींचा!
एका चालीत, एका सुरात गाताना,
मिळेल कधीतरी, पुर्णत्वं आयुष्याला!!

"निबंध लिहा", किंवा "गोष्टं लिहा",
पाचापैकी तीन गुण देणारच देणार!
आता कितीही कल्पना लढवा,
किंवा, म्हणींवरुन गोष्ट तयार करा,
पण त्याचा विस्तार मात्रं नियतीच ठरवणार!!

तेंव्हा अभ्यासक्रमावरुन परीक्षा द्यायचो!
काही प्रश्नं "option" ला ही टाकायचो!
आता परीक्षा आधीच द्यावी लागते,
अभ्यासक्रम मात्रं नंतर कळतो!!
आयुष्याचा अभ्यासक्रम अनोळखी असतो,
आणि कुठलाच प्रश्नं ऐच्छिक नसतो!!

शाळेत सोडवलेली मराठीची प्रश्नपत्रिका,
आज उगाच खुप वर्षांनी आठवली...
तेंव्हाची परीक्षा आज फारच सोप्पी वाटली!!
जून ०१, २०२०

I Love You पप्पा* !

🏠
*I Love You  पप्पा* !
(प्रत्येक पालकाने अवश्य वाचा)

आजचा दिवस जरा जास्तच खराब गेला. दिवसभर बरीच दगदग झालेली होती त्यामुळे घरी आल्यावर थोडा आराम करावा म्हणून जरा बेडवरती आडवा झालो व लगेच डोळा लागला. थोड्या वेळेतच बायकोच्या ओरडण्याने जाग आली, काय झालं म्हणून विचारले तर कळाले की मुलांनी (एक सात वर्षाचा व एक चार वर्षाचा) मोबाईल पाडला व त्याची स्क्रीन तुटली. स्क्रीन तुटली म्हटल्यावर माझा पारा खूप वर गेला, राग अनावर झाला व मी दोन्हीही मुलांना फटके द्यायला सुरुवात केली, त्यांच्यावर जोर जोराने ओरडू लागलो, बायको मला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली तर मी तिच्यावरही तुटून पडलो. पुढचे काही मिनीटे असेच गेले, मुलांना मारून झाल्यावर, मी स्टडीरूममध्ये जावून बसलो. मुले भेदरलेल्या अवस्थेत हॉलमध्येच बसून राहिली.
थोडावेळ तसाच बसून राहिलो, मुलांचा प्रचंड राग आला होता, मोबाईलचं नुकसान झालं होतं, झालेलं नुकसान अक्सेप्ट करायला मन तयार नव्हते, पण जे झालं होतं ते तर काही बदलणार नव्हतं. मनाला कसं शांत करू कळत नव्हते. आता मोबाईल रिपेअर करण्यासाठी पैसे लागणार होते त्याचेही टेंशन आले होते. कॉम्पुटर चालू करून डेटा एन्ट्रीचे काम करू लागलो. 

थोड्या वेळानंतर बायको जेवणासाठी बोलवायला आली पण माझा राग अजून शांत झालेला नव्हता त्यामुळे तिच्यावर परत खेकसलो,

“मला जेवायचे नाही.”

“थोडं जेवून घ्या, जेवणावर का राग काढता?”

“तुला तर मुलांना सांभाळता येत नाही, त्यांना चांगलं काही शिकविता येत नाही, सारखी दंगामस्ती करत असतात, सारखी तोडफोड चालू असते, तुम्ही नुकसानी करत राहायचे आणि मी राब राब राबायचे, तुम्हाला तर घरबसल्या सर्व काही आयते मिळते ना? तुम्हाला काय त्याचे? मी आपला राब राब राबतो आहे, तुम्ही ओता त्यावर पाणी” माझा राग परत उफाळून आला.

“एवढं रागवू नका हो, चुकून पडला मोबाईल त्यांच्याकडून.”

“अगं पण तू त्यांना मोबाईलला हातच का लावू दिलास, तुला दिसत नव्हते का? वेंधळ्यासारखी करत असतेस, मुलांकडे लक्ष नाही, जर मुलांनी परत मोबाईलला हात लावला तर बघ!” माझा पारा आणखीनच चढला होता, स्क्रीन तुटल्याचे दुख होत होते, जेवणाची इच्छाच होत नव्हती.

मी जेवणाला नाही म्हटल्यामुळे मुलांना वाईट वाटलं, दोघंही माझ्याजवळ येवून म्हणाली,

“सॉरी पप्पा, आम्ही परत नाही असे करणार.”

“परत नाही करणार? तुम्हाला करू देतो का तेच बघा, आजपासून तुमचं सर्वच बंद, खेळायला जाणं बंद, टीव्ही बघणं बंद, मोबाईलला हात लावायचा नाही, फक्त अभ्यास करायचा, कळलं का?” मी मुलांवरती खेकसलो.

मनात विचार चालू होता निदान आठ दहा हजार रुपये तरी लागतील, कसे एवढे पैसे जमवायचे? ह्या मुलांना तर अजिबातच अक्कल नाही, पैसे कमवायला किती कष्ट करावे लागतात कधी कळेल ह्या मुलांना? मी आपले राब राब राबायचे व ह्या सर्वांनी माझ्या जीवावर मजा मारायची. मनात विचारांचे चक्र चालू होते व मी मनातल्या मनातच मुलांवर राग काढत होतो. डोकं सुन्न झाले होते म्हणून मी कीबोर्ड बाजूला करून टेबलावर डोकं टेकवून बसलो व थोड्या वेळेतच माझा डोळा लागला.

“स............टा.....क...” कुणीतरी खूप जोराने माझ्या थोबाडीत मारली होती. मी खडबडून उठून बसलो व समोर बघतो तर काय साक्षात परमेश्वर माझ्या समोर उभा होता व त्यानेच माझ्या श्रीमुखात लगावली होती.

“हे परमेश्वरा तू मला का मारलेस?” मी गाल चोळत विचारले.

“तू मुलांना का मारलेस?”

“त्यांनी मोबाईल पाडला, त्याची स्क्रीन तोडली म्हणून मी त्यांना मारले” मी बडबडलो.

“तो मोबाईल तुझ्या हातून पडला असता तर?”

परमेश्वराने विचारलेल्या प्रश्नाने मी चपापलो, माझ्याकडे त्याचे काहिही उत्तर नव्हते. पण चूक कशी कबूल करायची? मानवी स्वभाव आड आला व मी बोललो,

“देवा हे त्यांचे पहिलेच काम नाही, कायमच ते काहीतरी करत असतात. सारखा गोंधळ घालत असतात, खोड्या करत असतात, एक मिनिटभर देखील शांत बसत नाही, सारखा उपद्व्याप करत असतात.”

“तुला काय म्हणायचं आहे, ते फक्त उपद्व्यापीच आहेत का?”

“तसं नाही देवा, पण त्यांनी समजून घायला पाहिजे ना, मी राब राब राबतोय, कष्ट करतोय व त्याची त्यांना काहीच किमंत नाही”

“असं ते म्हणाले का?"

“नाही तसं काही ते म्हणाले नाही पण त्यांच्या वागण्यावरून दिसतच ना!” मी कसंबसं बोललो.

“काय दिसतं त्यांच्या वागण्यावरून?” देवाने मला परत प्रश्न केला.

“हेच कि, मी त्यांच्यासाठी राब राब राबतोय, त्यांना चांगल्या शाळेत घातले आहे वर्षाची लाख रुपये फी भरतोय, त्यांना चांगल्या क्लास्सेस मध्ये घातलेय ज्याची पंचवीस हजार रुपये फी भरतोय, पण ती अभ्यासच करत नाहीत” मी माझं रडगाणे चालू केले.

“तुला हे सर्व करायला त्यांनी सांगितले का?”

“नाही त्यांनी नाही सांगितले पण त्यांचे चांगले भविष्य घडावे, ते यशस्वी व्हावेत, त्यांनी खूप नाव व पैसा कमवावा, आमचं नाव रोषण करावं म्हणून हे सर्व करतोय. ते इतके लहान आहेत त्यांना काय कळतं, हा सर्व विचार मीच केला पाहिजे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, माझं कर्तव्यच आहे ते.”

“तुझं हे कर्तव्य पार पाडत असतांना तू कधी त्यांचा विचार केला का?

“म्हणजे? मला समजले नाही, मी त्यांचाच तर विचार करतो, त्यांच्या भल्यासाठीच करतोय की मी हे सर्व!” मला देवाचा प्रश्नच समजला नाही.

“तुझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवस कोणते? तू सर्वात आनंदी केंव्हा होतास?” देवाने परत एक प्रश्न विचारला.

“बालपणीचे दिवस” खूप विचार करून मी उत्तर दिले.

“मग त्यांचे बालपण का हिरावून घेतोयेस? सकाळी शाळा! दुपारी ट्युशन! सायंकाळी हॉबी क्लास्सेस! त्यांनी खेळ पण कोणते खेळायचे तर जे तुला आवडतात तेच, कारण त्याच खेळात करिअर आहे म्हणून? त्यांनी हे नाही करायचे, त्यांनी ते नाही करायचे, त्यांनी असे नाही बोलायचे, त्यांनी तसे नाही बोलायचे! अरे तू तर त्यांना स्वच्छंदीपणे जगू पण देत नाहीयेस, तरीही ते तुझी काहीच तक्रार करत नाही आणि तू त्यांच्या तक्रारींचा पाढाच वाचतोय.”

देवाने माझ्या काळजावरच घाव केला होता, काय बोलावे काहीच कळत नव्हते.

“मला एक सांग मी तुला दिलेली आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट काय?” देवाने विचारले.

"अर्थातच हे जीवन, माझा परिवार व माझी मुलं.”

“जर तुला हे कळतंय की तुझी मुलं मी तुला दिलेली आहेत, मग तरी देखील तू त्यांच्याबरोबर असं वागतोस, ती मुलं तुझ्या पदरात टाकून मी चूक तर  ना केली?”

परमेश्वराच्या ह्या वाक्याने माझ्या दोन्हीही डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या, मला माझी चूक समजली होती तरीही मी परत देवाला प्रश्न केला.

“परंतु देवा ती असं का वागतात? काहीच ऐकत नाही, काहीच करत नाही, फक्त दंगामस्ती करतात, फक्त त्रासच देतात, कधी कधी तर जगणं मुश्कील करून टाकतात.”

“जर खरचं तुला त्यांचा इतका त्रास होत असेल तर मी घेवून जातो त्यांना, मग राहा त्यांच्याशिवाय एकटाच सुखाने, मग तुला त्यांच्यासाठी काहीही करावे लागणार नाही, तुला हवं तसं जग, तुला ते काहीही त्रास देणार नाही.”

देवाच्या ह्या वाक्याने क्षणात माझे डोके ठिकाणावर आले व मी देवाच्या पायावर लोटांगण घातले,

“नाही असे करू नकोस, माझी मुले माझं सर्वस्व आहेत, त्यांच्याशिवाय मी जगू शकत नाही, हवं तर तू माझा प्राण घे परंतु त्यांना माझ्यापासून हिरावू नकोस” बोलतांना माझा श्वास अडकत होता, जोराची धाप लागली होती, दोन्हीही डोळ्यांत अश्रू मावत नव्हते, नुसत्या मुलांना नेण्याच्या विचारानेच मी अर्धमेला झालो होतो.

“उठ! मी असं काहीही करणार नाही मी फक्त तुला त्याची जाणीव करून देत होतो.”

“हे परमेश्वरा! मग मी त्यांच्या भविष्याचा विचारच करायचा नाही का? त्यांच्यासाठी बघितलेली माझी स्वप्ने चुकीची आहेत का? त्यांना मी परिपूर्ण नाही बनविलं तर म्हातारपणात ते आम्हाला आधार कसा देतील? माझं हे सर्व करणं व्यर्थ आहे का?” मी माझी शंका विचारली.

“मी कधी म्हटलं हे सर्व करणं व्यर्थ आहे, तू जे करतोय ते तू करायलाच पाहिजे पण फक्त योग्य विचार करूनच, प्रत्येक वेळी त्यांचा विचार कर, त्यांना हवं तसं जगू दे, त्यांना हायब्रीड बनवू नकोस, त्यांना त्यांच्या पद्धतीने घडू दे आणि महत्वाचे म्हणजे म्हातारपणात ते तुझा आधार तेंव्हाच बनतील जर आज तू त्यांचा आधार झालास तर, आज तू त्यांच्याशी हिटलर सारखा वागला तर तेही तुझ्याशी म्हातारपणात तसेच वागतील, जे पेरशील तेच उगवेल.”

“हे परमेश्वरा! मला तुझं म्हणणे पटलंय पण, त्यांना त्यांच्या पद्धतीने घडू दिले तर ते काहीच करणार नाहीत, आजच्या जमान्यात नाव, पैसा खूप महत्वाचा आहे तो नाही कमविला तर त्यांचे भविष्य बिघडेल, मग ते मलाच टोमणे देतील, मग मी गप्प बसून तसं होतांना बघायचं का?”

“एकदा डोळे उघडे करून त्यांच्याकडे बघ, त्यांच्यात अफाट क्षमता दडलेल्या आहेत, त्या क्षमतांचा त्यांना वापर करायला शिकव, त्यांच्या क्षमतांना योग्य दिशा दाखव, मग तुला पाहिजे ते सर्व काही मिळेल आणि नाव, पैसा ह्यापेक्षा ते जीवनात आनंदी कसे राहतील यावर भर दे.”

एवढे बोलून परमेश्वर गायब झाले. परमेश्वर गायब होताच मला खडबडून जाग आली व मी बेडरूमकडे धाव घेतली दोन्ही मुले झोपलेली होती, त्यांना तसेच कडेवर उचलून घेतले व पटापट त्यांचे मुके घेवू लागलो, दोन्हीही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या, ती दोघे झोपेच्या धुंदीतच माझे अश्रू पुसत होती, अश्रू पुसता पुसताच मला घट्ट बिलगले व म्हणाले,

“सॉरी पप्पा, आमच्यामुळे तुमचा मोबाईल तुटला, आम्ही परत कधीच असे करणार नाही. I love you पप्पा.”

मुलांच्या ह्या वाक्याने तर मी हादरूनच गेलो व मुलांना मिठीत घेवून मुसमुसून रडू लागलो. मी जेवढं प्रेम मुलांवर करतो त्याच्यापेक्षाही कैक पटींनी ते माझ्यावर करतात हे मला उमगलं होतं, माझ्यासाठी ते त्यांचा आनंद सोडायला तयार होते पण मी किती बुरसटलेल्या विचारांचा, पैस्यापुढे मला त्यांची, त्यांच्या आनंदाची किमंतच नव्हती. मला आज स्वतःचीच लाज वाटत होती.

ता.क. - हा खुप गहन प्रश्न आहे पण खरचं आपण आपल्या मुलांना त्यांच्या क्षमता, त्यांच्या क़्वालिटी, त्यांचे टॅलेंट, पोटेन्शियल, त्यांच्या मर्यादा ओळखून त्यांना हवं तसं करिअर करू देतो? खरचं आपण मुलांच्या क्षमता, क़्वालिटी, टॅलेंट, मर्यादा ओळखू शकतो? आजचे जीवनमान हे एकदम बेभरवशाचे व ताणतणावचे झालेले आहे, आपल्या मुलांना ह्यातून वाचवायचे असेल तर त्यांच्या क्षमता ओळखून, त्यांच्या मर्यादा ओळखूनच करिअर करणे हि काळाची गरज झाली आहे. मुलांचे शिक्षण, करिअर निवडतांना पैसा व नाव याबरोबरच आपला फोकस त्यांच्या आनंदी व सक्षम जीवनावर असला पाहिजे. ती जीवनात सदैव आनंदी असली पाहिजे. जर तुम्हांला मुलांच्या क्षमता ओळखता येत नसतील तर त्यासाठी एक्स्पर्टची मदत घ्या.

लेख आवडल्यास अभिप्राय जरूर द्या, हा लेख जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहचवा. पुढची पिढी आनंदी व सक्षम बनविण्यासाठी आपल्या सर्वांचेच योगदान आवश्यक आहे. धन्यवाद.
जून ०१, २०२०

स्थिरता आणि महानता

*एक घडलेली  गोष्ट...*    

 १९७९ सालची सत्यघटना .

सकाळची वेळ होती.. त्रिवेंद्रमचा समुद्र किनारा शांत वाटत होता. फारशी गर्दी नव्हती. काही लोकांचीच ये-जा होती. 

एक बऱ्यापैकी वृद्ध गृहस्थ किनाऱ्यावर आसन टाकून एकाग्रतेने श्रीमद् भगवत गीता वाचत होते. 
तेवढ्यात एक  उच्च शिक्षित पण देव धर्म न मानणारा तरुण तिथे येऊन त्यांच्याजवळ मुद्दाम टिंगल करण्याच्या उद्देशाने बसला, आणि त्या तरुणाने टोमणे मारायला सुरुवात केली. गीता वाचणारी व्यक्ती मात्र शांत होती. 

तो तरुण म्हणाला, एवढा वेळ जर अभ्यास करून देशासाठी काही केले असते तर आज देश कुठल्या कुठे प्रगती पथावर उंच गेला असता.  

त्या व्यक्तीने ते एक पान वाचून पूर्ण केले व त्या तरुणास अगदी शांतपणे माहिती विचारली की कुठून आलास, शिक्षण किती , व पुढे काय करणार आहेस ? इ.

त्या तरुणाने थोडेसे गुर्मीतच उत्तर दिले की तो कलकत्याहून आला आहे. सायन्सचा उच्च शिक्षित आहे आणि भाभा अॕटोमिक रिसर्च संस्थेत पुढील संशोधन करण्यासाठी आला आहे.. 
पुढे मोठ्या तुसडेपणाने  - तुम्ही बसा इथे पोथ्या पुराणे वाचत, तुम्हाला देशाची काळजी नाही, वगैरे वगैरे त्याने बरीच मुक्ताफळे उधळली. तरीही ती व्यक्ती शांतच होती,,,  

थोड्या वेळाने - त्या गीता वाचणाऱ्या व्यक्तीने उठून आसन गुंडाळले तसे एकदम ४ दणकट कमांडो बॉडीगार्ड धावत त्या व्यक्तीजवळ आले व एक मोठी मजबूत शासकीय लाल दिवा असलेली कार एक ड्रायव्हर घेऊन आला व आदबीने सलाम करून दार उघडून उभा राहिला. 

हे सगळं पाहिल्यावर मात्र तो तरुण पुरता गोंधळून गेला व त्या व्यक्तीची क्षमा याचना करू लागला. 

त्याने घाबरत घाबरत ओळख विचारली, तेव्हा ती व्यक्ती शांतपणे स्मितहास्य करून म्हणाली की, "ज्या संस्थेत तू  संशोधन करण्यास आला आहेस ना त्या भाभा अॕटोमिक रिसर्च संस्थेचा मी चेअरमन आहे... डॉ. विक्रम साराभाई ."

मग मात्र तो नास्तिक , देवा धर्माची टिंगल करणारा तरुण ओशाळला व चक्क रडू लागला, माफी मागू लागला... 
तरीही डॉ, साराभाई शांतच.. 

ते म्हणाले, जर या जगात एखादी गोष्ट आहे , तर नक्कीच त्याचा कोणीतरी निर्माता आहे, मग ती आजची असो की महाभारत कालीन असो .  
आणि हे त्रिकालाबाधित सत्य ही गीता सांगते. तेंव्हा - *टिंगल करण्यापूर्वी वाचून पहा, सर्व सायन्स देखील यातच आहे .*

ही गोष्ट घडली तेव्हा भारतीय पातळीवरच्या विविध १३ संशोधन संस्था या डॉ. साराभाईंच्या नांवावर होत्या. 
तर तत्कालीन पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी अणू संशोधन मंडळाचेही अध्यक्ष म्हणून डॉ. साराभाई यांची नियुक्ती केली होती. 

. विक्रम साराभाई ... 
 एक आठवण ...

 त्या थोर राष्ट्रभक्त शास्त्रज्ञास विनम्र अभिवादन !   
  *जय हिंद*