*आईला बघण्यामध्ये वया नुसार मुलात होणारा बदल तो कसा पहा🙏*
आईला पाहिलं का . . . .
आईला बघायचं आहे . . . . . . . .
आई कुठं गेली . . .
*वय - दोन वर्ष*
आई . . .कुठे आहेस ? ?
मी शाळेत जाऊ . . . . .
अच्छा टाटा
मला तुझी आठवण येते शाळेत
*वय - चार वर्ष*
मम्मा . . . .
लव यू
आज टिफिन मध्ये काय आहे ?
आई आज शाळेत खूप गृहपाठ दिले आहे....
*वय - आठ वर्ष*
बाबा आई कुठे आहे ? ? ?
शाळेतून आल्यावर आई दिसली नाही तर कसं तरी होतं
*वय - बारा वर्षे*
आई बसना जवळ खूप काही बोलायचं आहे तुझ्याशी
*वय - चौदा वर्ष*
काय ग आई
समझ ना . . . .
बाबांशी बोलना मला पार्टीत जाउ दे म्हणून
*वय - आठरा वर्ष*
काय आई . . . . बदलते आहे
तुला काही कळत नाही तू समजत नाही
*वय - बावीस वर्षे*
आई . . . आई. .
जेंव्हा बघावे तेंव्हा काय शिकवत असतेस मी काय लहान बाळ आहे का
*वय - पंचवीस वर्षे*
आई . . . . ती माझी पत्नी आहे
तू समजून घेना . . .
तू तुझी मानसिकता बदल
*वय - अठावीस वर्षे*
आई . . . . ती पण एक आई आहे
तिला तिच्या मुलांना सांभाळता येते तू प्रत्येक बाबतीत हस्तक्षेप करू नकोस
*वय - तीस वर्ष*
आणि त्या नंतर . . . .
आईला कधी विचारलं नाही . .
आई कधी म्हातारी झाली त्याला कळलंच नाही
आई तर आजपण तीच आहे . . .
फक्त वयानुसार मुलांचं वागणं बदलत गेलं . .
नंतर एक दिवस. . . . .
आई . . . आई . . . . . गप्प का आहेस? ? ? ?
बोल ना . . .
पण आई नाही बोलत. . . .
कारण ती कायमची गप्प झाली होती
*वय - पन्नास वर्षे*
ती भाबडी आई. . .दोन वर्षांपासून पन्नास वर्षा पर्यंत हा बदलावं समजू शकली नाही . .
करण आईसाठी पन्नास वर्षाचा प्रौढ पण लहानच आहे . . . .ती बिचारी तर शेवट पर्यंत प्रौढ मुलाच्या लहान सहान आजारांवर पण तशीच तळमळते जशी तळमळ त्याच्या लहानपणी असायची....
आणि मुलगा...आई गेल्यावरच समजतो की त्याने कोणता अमूल्य खजिना गमावलं आहे...... 😔😢😔😢
आई बाबांची सेवा करा
त्यांच्यासारखे दैवत नाही
*आपण ना जन्मदाता ब्रह्मा पाहीला,*
*ना आपण पोषण करता विष्णु पाहीला.*
*ना आपण दु:खाचा अंत करणारा शंकर पाहीला*
*पण हे तिन्ही गुण ज्यांच्यात आहेत ते नक्कीच आज जवळ आहेत त्यांची सेवा करा*
आणि एक विनंती प्रत्येकाने ही पोस्ट नक्की शेअर करा ह्यामुळे कोणाला तरी ह्या मोठेपणात विसरलेल्या आईची पुन्हा एकदा जाणीव होऊन जाईल...ते ही तुमच्यामुळे.
*आई म्हणजे आईचं असते ...!!!*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..