आज मुलीला सासरी पाठवले
नकळत तुझे बाबा आठवले
तिला सासरी पाठवताना
आपल्या संसाराचे
चित्र डोळेसमोर सरकले
तु घरी आली तेव्हा वाटले
तुला सगळे यायला हवे
तू सगळे करायला हवे
आज वाटते सासरच्यांनी
आपल्या मुलीला संभाळून घ्यायला हवे
तिला जपायला हवे
तुझे बाबा आले गेले
नाही वाटलं विचाराव
तरी आज वाटत जावयाने प्रेमाने बोलावं
हक्काने काही सांगाव
तुझे कष्ट तुझी मेहनत
सगळं कसं गृहीत धरलं
आता वाटत लेकीचं कौतुक
सगळ्यानी कराव
तिने मानाने जगावं
बघता बघता वर्ष सरले
लेकीला ही दिवस गेले
देवा कडे एकच मागणे
तिला एक गोड परी दयावी
म्हातारपणी का होईना
पण नवऱ्याला तिची किंमत कळावी
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 कृपया पोस्ट वाचून झाल्यावर कमेंट नक्की करा तसेच सबस्क्राइब करायला विसरू नका व नक्की फॉरवर्ड करा , म्हणजे अधिकाधिक लोकांना पोस्ट वाचायला मिळेल
धन्यवाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..