*अध्यात्म म्हणजे काय?*
*अध्यात्म म्हणजे काय* ?
*अध्यात्म म्हणजे मुळात कोणतीही धार्मिक गोष्ट नाही.*
*अध्यात्म म्हणजे वरिष्ठांच्या प्रती आदरभाव असणे.*
*अध्यात्म म्हणजे कनिष्ठांच्या प्रती करुणाभाव बाळगणे.*
*अध्यात्म म्हणजे आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असं वागण.*
*अध्यात्म म्हणजे वेद वाचण्यापेक्षा वेदना वाचता येणे.*
*अध्यात्म म्हणजे आपलं काम प्रामाणिकपणे करणं.*
*अध्यात्म म्हणजे आपलं कौटुंबीक आणि सामाजिक कर्तव्य पार पाडणं.*
*अध्यात्म म्हणजे मुक्या प्राण्यांवर, पशु-पक्ष्यांवर प्रेम करणे.*
*अध्यात्म म्हणजे निरपेक्ष सत्कर्म करत रहाणे.*
*अध्यात्म म्हणजे नि:स्वार्थी सेवाभाव जोपासणे.*
*अध्यात्म म्हणजे सदैव कृतार्थ भाव अंगी बाळगणे.*
*अध्यात्म म्हणजे विना अपेक्षा कौतुक करणे.*
*अध्यात्म म्हणजे आपण प्रत्येकाशी सद्भाव आणि सद्भावाने रहाणे.*
*अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत सदैव असणे.*
*अध्यात्म म्हणजे आपण या समाजाचं काही देणं लागतो, आणि ते आपण दिलेच पाहिजे अशी मानसिकता मनाशी सतत बाळगणे.*
*अध्यात्म म्हणजे गरजुवंतांना यथा शक्ती आर्थिक किंवा शाब्दिक मदत करणे.*
*अध्यात्म म्हणजे आपल्या बरोबर इतरांची देखील प्रगती होवो हा भाव अंगी असणे.*
*अध्यात्म म्हणजे*
*साधं*.........
*सोपं*........
*सरळ*.........
*आणि*
*निर्मळ* ..........
*असणं - दिसणं आणि वागणं.*
*अध्यात्म म्हणजे फक्त पूजा - पाठ, प्रार्थना आणि भक्ती नव्हे तर*......
*अध्यात्म म्हणजे केलेली पूजा - पाठ, प्रार्थना आणि भक्ती या प्रमाणेच आपली प्रत्येक कृती असणे.*
*अध्यात्म म्हणजे राष्ट्रपुरुष आणि राष्ट्रीय संताचं सदैव स्मरण असणे.*
*थोडक्यात अध्यात्म म्हणजे सकाळ पासून रात्री झोपे पर्यंत नित्य कर्म, कर्तव्य पारदर्शक पद्धतीने पार पाडणे.*
शुभम भवतु।।🙏🏻🚩💐
🙏🏻जय श्री राम 🙏🏻
सोमवार, १ जून, २०२०
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..