माझ्या मराठीची गोडी

वाचकांना वाचनाची एक पर्वणी मिळावी . मराठी भाषेची गोडवी कळावी यासाठी केवळ हा एक प्रयत्न आहे कुणाला काही शंका असल्यास कृपया राग व्यक्त न करता कमेंटमध्ये सांगा व योग्य ते मार्गदर्शनही करा .

Breaking

रविवार, ३१ मे, २०२०

मे ३१, २०२०

स्टॉक

दारूचा स्टाॅक संपत नाही
 तंबाखू-शिगरेट चा स्टॉक संपत नाही
 ऐवढच काय तर गुटका बंदी असुनही गुटक्याचा स्टॉक
 कधी संपत नाही.
तर मग ऐण पेरणीच्या दिवसात खता-बियांण्याचा
 स्टॉक कसा काय संपतो......?
आणी वाढीव पैसे देताच लगेच कसा काय उपलब्ध
 होतो.....
दलाल व्यापार्यांनो पुरे करा हा हरामखोरपणा.....
 .
बस करा आता शेतकर्यांना लुबाडुन खाणं. ....
कारण,
ज्या दिवशी आम्हा शेतकर्यांचा अन्नधान्याचा
 स्टाँक संपेल ना
 तेव्हा तुम्हाला भिक पण मिळणार नाही.
सर्वानसाठी पोस्ट केला पन
 जगाचा पोशिंदा शेतकऱ्यासाठी एक पोस्ट
 मनापासून पटल तर शेयर करा.
कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा,
रात्रभर झोप नाही येणार.
विचार करा शेतकऱ्याच कस होत असेल !!👥👥
 ✍               
मी एक शेतकरी ....
मे ३१, २०२०

माणसे ओळखण्यातील धोका

*कधी कधी माणसाची ओळख करण्यात किती मोठा धोका होतो.*

अवश्य वाचा

 अमेरिकेतील जगप्रसिद्ध हॉर्वर्ड विद्यापिठाच्या प्रेसिडेंटना भेटण्यासाठी म्हणून एक वृद्ध जोडपे अपॉईंटमेंट न घेता भेटायला आले. 
त्या जोडप्याचा वेश नुसताच साधा नव्हता तर गबाळा पण होता. म्हातारीबाईंनी घातलेला फ्रॉक अगदी साधा, चुरगळलेला आणि थोडासा मळलेला हेता. तर म्हाताऱ्याबुवांनी घातलेला सूट पण घरी शिवलेला, ढगाळ, गबाळा आणि इस्त्री न केलेला होता. प्रेसिडेंटच्या केबिनबाहेर पॉश काऊंटरवर बसलेल्या सेक्रेटरीकडे ते जोडपे आले. 

‘आम्हाला प्रेसिडेन्ट साहेबांची फक्त दहा मिनिटेच भेट हवी आहे! मिळेल का?’ त्या आजीबाईंनी नम्रपणे विचारले. 

त्या जोडप्याचा तो गबाळा अवतार बघून ती सेक्रेटरी थोडीशी नाराज झाली. तिला वाटले हे एक गरीब जोडपे आहे. एकतर भीक मागायला, म्हणजे डोनेशन मागायला आले असेल किंवा मुलाच्या फी मध्ये सवलत मागायला आले असेल. अशा लोकांना कसे टोलवायचे हे तिला चांगलेच ठाऊक होते. 

‘प्रेसिडेन्ट साहेब सध्या कामात आहेत! ते लगेच भेटू शकणार नाहीत!’ तिने उर्मटपणे सांगीतले. तिला वाटले तिच्या या उत्तराने ही दोघे म्हातारे एकदाची टळेल. 

‘ठीक आहे! आम्ही वाट बघू! पण त्यांना भेटूनच परत जाऊ!’ त्या आजी नम्रपणे म्हणाल्या आणि ते जोडपे तेथे ठेवलेल्या सोफ्यावर जाऊन बसले. 

प्रेसिडेन्ट साहेब खरच बिझी असावेत. दोन चार वेळा ते केबिनच्या बाहेर आले. त्यांनी ऊंची सूट घातला होता, पायात चकचकीत बूट होते, चेहऱ्यावर अधिकाराचा रुबाब होता. त्यांनी त्या म्हाताऱ्या जोडप्याकडे पाहिले न पाहिल्यासारखे केले पण त्यांची काही दखल घेतली नाही. बघता बघता दिवस संपायला आला. संध्याकाळ व्हायची वेळ आली. तरी सुद्धा ते वृद्ध जोडपे बसूनच होते. शेवटी त्या सेक्रेटरीलाच दया आली असावी. 

‘ते वृद्ध जोडपे सकाळपासून तुम्हाला भेटायची वाट बघत आहेत. तुम्ही त्यांना पाच मिनीटे तरी भेटावेत’ सेक्रेटरीने प्रेसिडेन्टला सांगीतले. प्रेसिडेन्टला घरी जयची घाई होती तरी पण केवळ पाच मिनिटेच भेटायला ते एकदाचे तयार झाले!

‘काय काम आहे?’ प्रेसिडेन्ट साहेब केबिनच्या बाहेर आले आणि त्या वृद्ध जोडप्याला विचारू लागले. चेहऱ्यावर बऱ्याचपैकी नाराजी होतीच.

‘हे पहा! आमचा एकुलता एक मुलगा काही वर्षांपूर्वी या विद्यापिठाचा स्टुडंट होता. आता दुर्दैवाने तो नाही. विद्यापिठाच्या आवारात त्याचे एखादे स्मारक असावे असे आम्हाला वाटते. म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलो!’ ती वृद्ध महिला नम्रपणे म्हणाली

‘स्मारक? कसले स्मारक? म्हणजे तुम्हाला ईथे त्याचा पुतळा वगैरे उभारायचा आहे काय? ते शक्य नाही.  आम्ही जर मृत पावलेल्या प्रत्येक माजी विद्यार्थ्याचा पुतळा येथे उभारू लागलो तर आमच्या युनिव्हर्सिटिचे स्मशान व्हायला वेळ लागणार नाही!’ प्रेसिडेन्ट साहेब काहिश्या वैतागानेच म्हणाले. 

‘नाही नाही! तसे नाही!’ त्या आजीबाई परत बोलू लागल्या, ‘आम्हाला येथे त्याचा पुतळा वगैरे उभारायचा नाही. त्याचे स्मारक म्हणून तुमच्या विद्यापीठाला एखादी चांगली ईमारत वगैरे बांधुन देण्याचा विचार आहे!’ 

त्या आजीबाईंच्या चुरगळलेल्या, मळक्या कपड्यांकडे बघून प्रेसिडेन्ट साहेबांना हसूच आले.’ ईमारत? ईमारत बांधायला किती पैसे लागतात ठाऊक आहे का? तुम्हाला म्हणून सांगतो. या विद्यापिठाच्या कॅम्पसमधील ईमारती बांधायला आम्हाला 75 लाख डॉलर्स लागले!’ प्रेसिडेन्ट साहेब सांगत असतातना या जोडप्याच्या खिशात 75 डॉलर्स तरी असतील की नाही याची त्यांना खात्री वाटत नसावी असा त्यांचा चेहरा होता. 

‘युनिव्हर्सिटी काढायला एवढेच पैसे लागतात?’ त्या आजीबाई हळूच त्या म्हाताऱ्याबुवांच्या कानात कुजबुजल्या. प्रेसिडेन्ट साहेबांचे आभार मानून मिस्टर आणि मिसेस लेलॅन्ड स्टॅनफोर्ड नावाचे हे वृद्ध जोडपे तेथून बाहेर पाडले. 
पुढे ते कॅलिफोर्निया राज्यातील पालो आल्टो या गावी आले आणि स्वतःच्या मुलाच्या नावाने युनिव्हर्सिटी चालू केली. हीच आहे जगप्रसिद्ध स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी!

आज स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ही जगातील नंबर एकची युनिव्हर्सिटी म्हणून ओळखली जाते. 8180 एकर जमीनीवर या युनिव्हर्सिटीचा परिसर पसरला आहे.
 या युविव्हर्सिटिचे वार्षिक बजेट भारत सरकारच्या वार्षिक बजेटच्या तिपटीहून जास्त असते. जगात सगळ्यात जास्त ‘नोबेल लॉरिएट्स’ (नोबेल पारितोषिक विजेते) या युनिव्हर्सिटीसाठी काम करतात. आज या युनिव्हर्सिटीत 32 नोबेल लॉरियटस प्रोफेसर म्हणून काम करत आहेत. 

अनेक जणांना माणसाची पारख ही त्याच्या कपड्यांवरून किंवा बाह्य रुपावरून करायची सवय असते. पण अनेकदा ही सवय घातक ठरते. पॉश किंवा फॅशनेबल कपडे घालणारा माणूस हा खऱ्या अर्थाने    श्रीमंत किंवा चांगल्या कॅरेक्टरचा असतोच असे नाही. तसेच सामान्य कपडे घालणारा, सामान्यपणे राहणारा माणुस हा गरीब, दरिद्री किंवा ‘लो कॅरेक्टर’चा असतो असेही नाही. अनेक वेळा आपण माणसाच्या कपड्यांवरून किंवा बाह्य रुपावरून चुकीची पारख करतो आणि एखादा चांगला मित्र, हितचिंतक किंवा गि-हाईक कायमचे हातचे घालवून बसतो. 

माणसाच्या

कपड्यांवरून किंवा बाह्य रुपावरून त्याची पारख करायची घातक सवय, असल्यास, ती सोडून द्या! 

अर्थात असे करायचे की नाही हे तुमचे तुम्ही ठरवा!
मे ३१, २०२०

मनातली माणसं

*माणसं मनातली......*
.
मोगऱ्याचं फूल ओंजळीत घेतलं की त्याचा गंध मनाला, शरीराला प्रसन्न करून जातो.
सहवासातील माणसाचं देखील असंच असतं.
काही माणसं काही क्षणातच मनाला खूप आवडतात, आपली होऊन जातात.
तर, काही कितीही सहवासात राहिली, तरी त्यांची आतून ओढ नसतेच...

चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शोधूनही तिथं माणूसपण सापडत नसेल, तर त्याचं सुंदर दिसणंही मग किळसवाणं वाटतं...

शरीराची सुंदरता वया बरोबर संपते, तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहाते.
शरीराला वय असतं, मनाला ते कधीच नसतं...

शेवटी काय, आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो, शरीर तर निमित्त मात्र असतं.
माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा, आणि विनयशीलता असेल, तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते...

म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही, देवघरातील समईच्या तेजापुढं आपण नतमस्तक होतो...

आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं!!

आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं, ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई...
ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही.
आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे?
नशिबानं कधी भेटलीच तर हळुवार जतन करून ठेवावीत...
 
 *कदाचित, पुन्हा भेटतील ,न भेटतील?*
🙏🙏👍👍🌹🌹
मे ३१, २०२०

निसर्गाचे मनुष्याला पत्र

निसर्गाचे मनुष्यास पत्र

प्रिय मनुष्य,
                खूप खूप आशीर्वाद.
     सध्या तुला माझ्या आशीर्वादाची फार गरज आहे. कारण नेहमी आपल्या बुद्धीच्या जीवावर शक्ती प्रदर्शन करणारा तू..आज एका अतिसूक्ष्म व अदृश्य व्हायरसशी मुकाबला करताना थकलेला दिसत आहेस. 
     सुरुवातीला बुद्धी चांगल्या कामासाठी वापरत होतास, पण हळूहळू बुद्धी भ्रष्ट होत गेली तुझी. एकमेकांना ओरबाडून झालं, अन्य पशुपक्षांना व पिकाझाडांना ओरबाडून झालं. आणि गेल्या काही वर्षांत तुझा माज एवढा वाढला की तू चक्क तुझ्या पालनकर्त्या निसर्गालाच.. मलाच ओरबाडू लागलास. स्वतःच्या करमणूकी साठी पशुपक्षांना पिंजर्‍यात कोंडणे, स्वतःची घर उभारण्या साठी झाडांची कत्तल करणे जणू तुझा छंदच झाला. प्रगतीच्या नावाखाली वातावरण प्रदूषण, जलप्रदूषण केलसं. जमीनीची वारेमाप खोदाई केलीस. पण सगळ्यात हुशार लेकरू म्हणून आधी मी कानाडोळा करत राहिलो तुझ्याकडे. आता मात्र तुझ्यावर डोळे वटारल्या शिवाय पर्याय उरलेला नाही माझ्याकडे.
     माझी निसर्गाची उदात्त देणगी तुला लाभली ती म्हणजे बुद्धीमत्ता. अश्मयुगापासून आजवर तू बौद्धिक दृष्ट्या संपन्न होत आलास. तू मी निर्माण केलेल्या वनस्पतींचे वाण तयार केलेस, पण वनस्पती मीच निर्माण केल्या होत्या. तू चित्त्याला जोरात पळताना पाहिलसं व मोटारगाडी तयार केलीस. तू शार्कला सहज पोहताना पाहिलसं व जहाज तयार केलस. तू गरुडाला आकाशात भरारी घेताना पाहिलसं व विमान तयार केलस. अगदी सगळी आधुनिक निर्मिती तू केली असलीस तरी मूळ कल्पना माझीच होती रे बाळा. तरी पण तुझं कौतुकच केल मी. तू जलविद्युत व पवनऊर्जेचा शोध लावलास तेव्हा मला अभिमान वाटला तुझा. लाडके लेकरू म्हणून मी मिरवत होतो.
     पण नंतर नंतर विनाशकाले विपरीत बुद्धी झाली तुझी. आधी तू मला दैवत मानत होतास, आता उपभोगाचे साधनच मानू लागलास व सध्या तर लुबाडणूक करत आहेस. हस्तीदंतासाठी हत्तीना मारायचे, वाघनखांसाठी वाघांना. गायीगुरांना कत्तलखान्यात द्यायचे असले उद्योग तू करू लागलास. कन्स्ट्रक्शनच्या नावाखाली नदीनाले बुझवायचे, झाडे तोडायची तुला सवय लागली. कारखानदारी हवामान व जलस्रोत विस्कळीत करू लागली. लवकर पीक येण्यासाठी खतांचा भडीमार होऊ लागला पण जमीनीचा पोत बिघडला हे तुझ्या लक्षात येऊन पण तू बेफिकीर होऊ लागलास. एका लेकराचे हुशार म्हणून लाड करताना माझ्या बाकीच्या लेकरांचे हाल होऊ लागले.
     प्रगती व उत्कर्षाला माझा कधी विरोध नव्हताच रे. पण जेव्हा याच्या नावाखाली सद् सत् विवेक बुद्धी हरपू लागली व माणूसकीच्या तोंडावर काळीमा फासू लागलास तेव्हा मात्र मी माझे रौद्ररूप धारण करू लागलो. कधी भूकंपाच्या, कधी दुष्काळाच्या, कधी महापूराच्या रूपांत लहान मोठे धक्के देऊन तुला सावध करू लागलो. पण संकट टळले की ये रे माझ्या मागल्या. मग महामारीची भीती तुला दाखवत आहे. बघ जरा.. पूर्ण जगात तुला एकट्याला घरी बसवल्यावर माझ्या इतर लेकरांचे जगणे किती सुसह्य झाले आहे ते. वन्यजीव बिनधास्त वावरु लागले, झाडे आनंदाने डोलू लागली. पाणी व हवा शुद्ध झाली.आनंद ते अनुभवत आहेत. तो त्यांच्या हक्काचा होता पण तू हिरावून घेतलास. मी त्यांना परत मिळवून देतोय इतकेच.
     माझे अंतःकरण क्षमाशील आहे, हे संकट देखील काही दिवसांत टळेल. पण यानंतर मात्र तुझ्याकडून एक रास्त अपेक्षा आहे ती म्हणजे तू तुझ्या स्वार्थासाठी माझ्या वरदानाचा गैरवापर करणार नाहीस. 
                             तुझा पण फक्त तुझा नव्हे
                                         निसर्ग
मे ३१, २०२०

व. पु. काळे एक अवलिया

_*नॉट सो स्ट्रेंज यार...!!*

       बायकोनं घरात मांजर पाळलेलं. तिचं ते खूप लाडकं. ती जेवायला बसली की तिलाही घेवून बसायची. एका वाटीत दूध भाकर कुस्करुन द्यायची.
       पण नवऱ्याला ते मांजर अजिबात आवडायचं नाही. उघडं दिसेल त्या भांड्यात तोंड घालायची त्याला सवय. त्याचा त्याला प्रचंड राग यायचा... 
      एकदा नवरा जेवायला बसलेला, आणि नेमकं मांजराने त्याच्या ताटात तोंड घातलं. नवरा चिडला आणि रागारागाने शेजारी असलेला पाटा त्याच्या डोक्यात घातला.  
     घाव वर्मी बसल्याने मांजर बराच वेळ निपचित पडून राहीलं. 'मेलं की काय' अशी शंका येत असतांनाच ते अंग झटकून उठून बसलं. 
     त्याने हळूच नवऱ्याकडे हसून बघीतलं, आणि चक्क 'शॉरी यार, मी मघाशी तुझ्या ताटात तोंड घातलं. क्या करे आदत से मजबूर हूँ, पुन्हा नाही असं करणार..' असं माणसासारखं बोललं. नवरा वेडा व्हायचाच बाकी..!
      त्यानंतर मांजर नम्र आणि आज्ञाधारक झालं. ताटात तोंड घालणे तर सोडाच, दारातला पेपर आणून दे, टी पॉय वरचा चष्मा आणून दे...  अशी बारीकसारीक कामं ते करू लागलं.
      मग काय, नवऱ्याची आणि त्याची छान गट्टी जमली. ऑफिसमधून येताच मांजर दिसलं नाही की तो अस्वस्थ व्हायचा. 'अग मन्या दिसत नाही गं कुठं ?' बायकोला सतत विचारत राहायचा.
       असेच काही दिवस गेल्यावर एकेदिवशी सोसायटीच्या दारात बेवारस कुत्री आणि मांजरं पकडून नेणारी महानगरपालिकेची व्हॅन येवून थांबली. 
     मन्याने खिडकीतून ती व्हॅन बघितली. त्याच्या मनात काय आलं कोण जाणे, पण धावत जावून तो व्हॅन मधे बसला. 
      नवऱ्याने हे बघितले.  हातातला पेपर पटकन बाजूला टाकून तो मन्यामागे धावला. मन्या व्हॅनमध्ये निवांत बसलेला.
     नवरा म्हणाला, "मन्या, अरे इथं गाडीत का बसलायस? ही गाडी बेवारस मांजरासाठी आहे. तुझ्यासाठी नाही."
      "मला माहितेय..! पण मला जायचंय आता." मन्या शांतपणे बोलला.
      "मन्या, अरे असं काय करतोस? तू किती लाडका आहेस आम्हा दोघांचाही.  माझं तर पानही हालत नाही तुझ्याशिवाय. तू क्षणभर नजरेआड गेलास तरी मला करमत नाही. मी इतकं प्रेम करतो तुझ्यावर आणि तू खुशाल मला सोडून निघालास ? ए प्लिज, प्लिज उतर रे आता." काकुळतीला येवून नवरा बोलला.
      मन्या गोड हसला, आणि बोलला, "तू माझ्यावर प्रेम करतोस? माझ्यावर?"
      "म्हणजे काय शंकाय का तुला?"
     "मित्रा, अरे मी जेंव्हा माझ्या मनासारखं वागत होतो, हवं तिथं हवं तेंव्हा तोंड घालत होतो, तेंव्हा मी तुझा नावडता होतो. सतत रागवायचास माझ्यावर. अगदी माझ्या जीवावर उठला होतास तू एकदा. 
     पण जेंव्हा मी तुझ्या मनासारखं वागू लागलो,  तुला हवं तसं करू लागलो.... तेंव्हा तुला आवडू लागलो. तू माझ्यावर प्रेम करू लागलास, यात नवल ते काय?" 
      नॉट सो स्ट्रेंज यार...!!

     वपुंची ही कथा खूप काही सांगून जाते. जेंव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो, तेंव्हा ते खरंच त्याला बरं वाटावं म्हणून, की स्वतःला बरं वाटावं म्हणून करतो ?
      समोरचा जो पर्यंत आपल्या मनासारखं वागत असतो, तोपर्यंत त्याच्यावर आपलं प्रचंड प्रेम असतं. कारण त्याचं वागणं आपल्याला सुखावणारं असतं. 
     *पण जेंव्हा तो आपलं ऐकत नाही, आपल्याला हवं तसं वागत नाही, तेंव्हा त्याचं आपल्या सोबत असणंही आता नकोसं वाटतं. त्याला टाळत राहतो.*
      भेटलाच कधी तर त्याच्यावर चिडतो, रागावतो. त्यानं नाहीच ऐकलं की मग वर्मी घाव घालून नातंच संपवून टाकतो. ज्याच्यावर जीवापाड प्रेम असतं, त्याला क्षणात परकं करून टाकतो.

     आश्चर्य आहे ? का वागतो असं आपण ? त्याच्यावर खरंच आपलं प्रेम असतं की निव्वळ time pass म्हणून केलेली खोटी भावनिक गुंतवणूक?

      आपल्या मनासारखं वागणाऱ्या माणसावर कुणीही प्रेम करतं, *अवघड असतं त्याच्यावर प्रेम करणं, त्याला समजून घेणं, जेंव्हा तो आपल्या मनासारखं वागत नसतो..!!*
लेखक :- व. पु. काळे.
मे ३१, २०२०

या गोष्टी कोणाला सांगू नका

-------------------------------------------------
*नेहमी गुप्त ठेवाव्यात ह्या सात गोष्टी :-*
-------------------------------------------------

*१) अपमान*
जर आपल्याला कोणत्याही कारणाने अपमानाला तोंड द्यावे लागले असेल तर ही गोष्ट आपण गुप्त ठेवणेच आपल्या फायद्याचे असते. कारण जर इतरांना हे माहिती पडले की आपल्याला अपमानाला तोंड द्यावे लागले होते तर ते आपली खिल्ली उडवू शकतात, चेष्टा करू शकतात.
*२) धन हानि / आर्थिक नुकसान*
आजच्या काळात पैसा, धन यांनाच कोणत्याही व्यक्तीच्या शक्तीचे परिमाण मानले जाते. बहुतांश परिस्थितीत पैशाच्या पार्श्वभूमीवरच नाती निभावली जातात आणि मैत्री देखील केली जाते. तेव्हा आपल्याला कधीही आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले तर आपण ही गोष्ट गुप्त ठेवली पाहिजे. कारण आर्थिक नुकसानाची गोष्ट जर आपण इतरांना सांगितली तर अनेक लोक आपल्यापासून दूर जाऊ लागतील. आर्थिक नुकासानातून सावरण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असते. परंतु ही गोष्ट जाहीर झाली तर कोणीही आपल्याला आर्थिक मदत करणार नाही. त्याचबरोबर, जर आपल्याकडे खूप सारा पैसा असेल तर ही गोष्ट देखील गुप्त ठेवली पाहिजे.
*३) घरगुती भांडण –तंटे*
बहुतेक सर्व परिवारांमध्ये वाद – विवाद होतच असतात. ही अगदी सामान्य गोष्ट आहे. परंतु आपसातल्या या भांडणाविषयी बाहेर कोणालाही सांगता कामा नये. असे केल्यामुळे समाजात आपल्या परिवाराची प्रतिष्ठा कमी होते. परिवाराचे वाईट चिंतणारे लोक आपल्या आपसातील भांडणाचा गैरफायदा घेऊ शकतात.
*४) गुरुमंत्र*
आपल्या गुरूने आपल्याला दिलेला मंत्र गुप्त ठेवला पाहिजे. गुरु मंत्र तेव्हाच सिद्ध होतात जेव्हा ते गुप्त ठेवले जातात. मंत्र गुप्त ठेवल्याने लवकरच शुभ फळ प्राप्त होते.
*५) केलेले दान*
गुप्त दानाचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे. असे मानले जाते की जे लोक गुप्त स्वरुपात दान करतात, त्यांना पुण्य प्राप्त होत दुसऱ्यांना सांगून दान केल्याने पुण्य प्राप्त होत नाही.
*६) पद – प्रतिष्ठा*
जर आपण एखाद्या मोठ्या पदावर असलो आणि समाजात आपल्याला खूप मान – सन्मान मिळत असेल तर ही गोष्ट देखील गुप्त ठेवली पाहिजे. कोणा दुसऱ्या व्यक्तीसमोर या गोष्टीचा उल्लेख केला तर त्यातून अहंकाराचा भाव निर्माण होतो. अहंकार हा अधःपतनाचे कारण बनतो आणि त्यामुळे आपली प्रतिष्ठा कमी होऊ शकते.
*७) एकांतवास*
स्त्री – पुरुषांनी रातीक्रीयेच्या वेळी एकांताला विशेष महत्व दिले पाहिजे. या कृत्याशी निगडीत असलेल्या गोष्टी देखील गुप्त ठेवल्या पाहिजेत. जर या गोष्टी इतरांना माहिती झाल्या तर ते आपले चरित्र आणि सामाजिक जीवनासाठी चांगले नसते.
*टिप –*
 आपल्या जिवनात अनेक प्रकारचे उतारचढाव येत असतात , अश्यावेळी आपण त्यातून बाहेर पडण्यासाठी आपले दुःख ईतरांना सांगत असतो परंतू त्यात अशाकाही गोष्टी ह्या समाजात जानार नाही व त्याचा दुष्परीनाम आपल्या पुढिल आयुष्यात आपल्याला भोगावे लागू नये यासाठी आपण नेहमीच सतर्क रहायला हवे.
----------------------------------------

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
मे ३१, २०२०

मयूर पंख

🦚।। *मयूर_पंख* ।।🦚

वनवासाच्या काळात माता सीतेला तहान लागली तेव्हा  श्री रामाने सर्वत्र बघितले पण पाणी कोठेच मिळेना सर्वत्र जंगलच दिसत होते.तेव्हा श्रीरामाने पृथ्वी मातेला प्रार्थना केली की जेथे कोठे पाणी असेल तेथे जाण्याचा मार्ग अाम्हांला दाखव तेव्हा तेथे एक मयुर तेथे आला व श्रीरामास म्हणाला येथून थोड्याशा अंतरावर एक जलाशय आहे.चला मी आपणास दाखवतो.पण मार्गात मी  उडत उडत जाईल आणि आपण चालत येणार त्यामुळे चुकामूक होऊ शकते म्हणून मी मार्गात एक एक पंख टाकत जाईल.त्यामुळे आपणास मार्ग सापडेल व आपण जलाशयात जवळ पोहचाल.
आपणास माहिती आहे की मयूर पंख,हॆ एक विशेष काळी व एक विशेष ऋतु मध्ये पंख तुटून पडतात पण मोराच्या इच्छे विरूद्ध पंख निघत असतील ही त्याचा मृत्यु होतो. आणि तेच झाले त्याचे पंख निघत होते त्यामुळे त्याचा मृत्यूचा काळ जवळ आला होता. तेव्हा मोर म्हणाला की मी किती भाग्यशाली आहे की जो जगाची तहान भागवतो त्या प्रभुची तहान भागवण्यावे मला सौभाग्य प्राप्त झाले. माझे जीवन धन्य झाले.आता मरताना माझी काही इच्छा शेष राहीली नाही.तेव्हा मर्यादा पुरुषोत्तम
 श्रीरामाने मयुरास म्हटले की माझ्या साठी जे मयूर पंख इच्छे विरूद्ध  काढून मार्गात टाकलेस त्यामुळे तुझे माझ्यावर ऋण झाले आहे व जो ऋणानुबंध झाला आहे हे ऋण मी पुढच्या अवतारात नक्की फेडेल माझ्या  कृष्ण अवतारात तुला माझ्या माथ्यावर धारण करीन. त्यानुसार पुढच्या अवतारात श्रीकृष्ण अवतारात त्यांनी आपल्या माथ्यावर मयूर पंख धारण करुन वचना नुसार मयुराचे ऋण उतरवले.
        तात्पर्य हे आहे की जर प्रत्यक्ष भगवंतास मागील जन्मातले ऋण पुढील जन्मात फेडावे लागले मग आपण तर मनुष्य आहोत न जाणे आपणास कितीतरी ऋण फेडायचे आहे.
आपण तर अनेक ऋणानुबंधानात अडकलेलो आहोत.ते ऋण फेडण्यसाठी कित्येक जन्म कमी पडतील. 
         अर्थात अापणास जे काही भले  करायचे आहे ते या जन्मात करायचे आहे.कारण पुढचा जन्म कुठला असेल आपणास माहिती नाही.आणि मनुष्य जन्मातच ऋण फेडता येते.....
      *एक महत्त्वाची गोष्ट सांगतो श्री साईबाबा म्हणतात पूर्वीच्या ऋणानुबंध असल्याशिवाय माशी सुध्दा अंगावर बसत नाही. त्यामुळे मागच्या जन्मातील देणेकरी,वैरी, ज्यांना त्रास दिला गेला हे आपल्या या जन्मी भाऊ,बहीण, नातेवाईक, शेजारी या रुपात आपापले ऋण वसूल करतात व ज्यांना आपण मदत केली, तेही या जन्मी कोणत्या ना कोणत्या रुपात येवून परतफेड करतात.*
            *त्यामुळे मी सरळमार्गी आहे मी कोणालाही त्रास दिला नाही मग माझ्या बाबतीत असे का होते याची कधीच खंत करु नका समर्थ रामदास स्वामी म्हणतात.*
 *मना त्वाची रे पूर्वसंचित केले* 
*तयासारिखे भोगणे प्राप्त झाले*
        *देह प्रारब्धावर सोडून मन सद्गुरु चरणी व वाणी नामस्मरणात गुंतवावी मग जीवनातील गंमत व आनंद अनुभवता येतो*
|| *ॐ सद्गुरु परब्रह्माय नमो नमः* ||
मे ३१, २०२०

प्रेरणा

गरुडाचे जीवनमान 70 वर्षांचे असते, परंतु तो जेव्हा 40 वर्षाचा होतो तेव्हा त्याला एक महत्वाचा निर्णय घ्यावा लागतो.....

त्या अवस्थेत त्याच्या शरीराचे 3 महत्वाचे अवयव निष्प्रभ होऊ लागलेले असतात,... पंजे लांब आणि लवचिक होतात ज्यामुळे शिकार पकडतायेत नाही ,....चोच पुढील बाजूला वळते ज्यामुळे भोजन करता येत नाही,... पंख जड होतात व छातीस चिकटल्यामूळे पूर्णपणे उघडत नाहीत,....  गरुड भरारी सीमित करतात..... अन्न शोधणे, सावज पकडणे,अन्न खाणे या तिन्ही क्रिया त्याच्यासाठी अवघड बनून जातात.... अशावेळी त्याच्याकडे तीन पर्याय असतात एक तर प्राण त्याग करणे .... आणि दुसरा आपली प्रवृत्ती सोडून गिधाडा प्रमाणे मृत अन्नावर गुजराण करणे .... आणि तिसरा पर्याय असतो आकाशाचा अनभिषिक्त सम्राट म्हणून स्वतः ला पुनर्स्थापित करणे .... 

जिथे पहिले दोन पर्याय सोपे व सुलभ आहेत .... तिथे तिसरा अत्यंत कठीण आणि दुर्धर.... गरुड तिसरा पर्याय निवडतो, .... एखाद्या उंच पहाडावर जातो एकांतात आपले घर बनवतो .... आणि स्वतः च्या पुनर्स्थापनेस प्रारंभ करतो ..... सर्वप्रथम तो आपली चोच दगडावर मारून मारून तोडून टाकतो..... एका पक्षासाठी चोच तोडण्याहून अधिक त्रासदायक दुसरे काय असेल?..... आणि प्रतीक्षा करतो चोच पुन्हा उगवून येण्याची.... तसेच तो आपले पंजे तोडून टाकतो ... आणि प्रतीक्षा करतो पंजे पुन्हा उगवण्याची..... नवीन चोच आणि पंजे आल्यानंतर तो आपल्या जड झालेल्या पंखांना एक एक करन उपसून टाकतो आणि वाट पाहतो नवे पंख फुटण्याची .... 

150 दिवसाचा त्रास आणि प्रतिक्षे नंतर त्याला मिळते त्याची गरुड भरारी, .... या पुनरस्थापणे नंतर तो 30 वर्षे जगतो ... ताकद आणि अभिमानाने .... 

याच प्रकारे मानवाच्या आत्मविश्वास,... सक्रियता...  आणि कल्पनाशक्ती .... या तिन्ही शक्ती दुर्बल होऊ लागतात..... आपणही भूतकाळात अडकलेल्या बंधक अस्तित्वाचा त्याग करून ..... कल्पनेची मुक्त उड्डाणे घेतली पाहिजेत .... 
150 दिवस नाही..... 60 दिवस द्या स्वतः ला पुनर्स्थापित करण्यासाठी .... जे शरीराला मनाला चिकटलेले आहे....  ते तोडताना आणि उचकटून काढताना यातना तर होणारच ... पण त्यानंतर जी उड्डाणे असतील ती उंच, .... अनुभवी .... आणि .... अनंताकडे झेपावणारी असतील.... 
Be happy , Be positive 👍🙏🌹
मे ३१, २०२०

हृदय स्पर्शी (अबोल नाते)

मिसेस पाटील आपल्या वर्गात शिरल्या. इंग्रजी माध्यमाची शाळा होती. पाटील बाईंना वर्गात बोलणे सुरू करताना,

“love you All” 

असं म्हणायची सवय होती. तसं त्या म्हणाल्याही. 

पण त्यांना जाणवलं की, खरंतर आपण हे मनापासून म्हणत नाही आहोत.

त्याला कारण शेवटच्या बाकावर बसणारा एक मुलगा होता.

तो मुलगा अगदी अव्यवस्थित, गबाळा असा होता आणि पाटील बाईंना त्याच्याबद्दल प्रेम
 किंवा आत्मीयता वाटेल असं, त्यांची दखल घ्यावी असं, काहीही नव्हतं ! 

त्या मुलाशी जरा अलिप्तपणेच त्या वागायच्या.

कोणत्याही नकारात्मक गोष्टींसाठी बऱ्याचदा त्याचंच उदाहरण द्यायच्या आणी कोणत्याही सकारात्मक गोष्टींच्या बाबतीत त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायच्या.

पहिली तिमाही झाली.

प्रगती पुस्तक लिहायचे दिवस आले. त्याही मुलाची ‘प्रगती’ त्यांनी लिहिली. 

शाळेची अशी पद्धत असते की, प्रगतिपुस्तकावर शेवटी मुख्याध्यापिकेची सही होते.

त्याप्रमाणे प्रगतीपुस्तके सहीसाठी गेली.

मुख्याध्यापिकेने पाटील बाईंना बोलावून घेतले.

त्या म्हणाल्या, “अहो प्रगतिपुस्तकात ‘प्रगती’ लिहायची असते.

पालकांना कळायला हवे, की त्यांच्या मुला-मुलींना काही भवितव्य आहे. 

या शैलेशबद्दल तुम्ही काहीच लिहिले नाहीये. असं कसं चालेल? त्याच्या पालकांना काय वाटेल ? अहो त्याला ते मारतीलसुद्धा एखादेवेळी !” 

पाटील बाई म्हणाल्या, “मी त्या मुलाचं करू तरी काय ? अहो, सकारात्मक काहीच नसेल, काही प्रगती नसेलच तर मी तरी काय लिहू ?”

“ठीक आहे, तुम्ही वर्गावर जा,” मुख्याध्यापिका म्हणाल्या.

मुख्याध्यापिकेने लगेच शाळेची कागदपत्रे सांभाळणाऱ्या व्यक्तीला बोलावून घेतले,

आणि शैलेशची जुनी प्रगतिपुस्तके काढून आणायला सांगितले. आणि शैलेशची जुनी प्रगतिपुस्तके पाटील बाईंकडे पाठवून दिली.

पाटील बाईंनी प्रगतिपुस्तके चाळायला सुरुवात केली.

तिसरीच्या प्रगतीपुस्तकावर शेरा होता,

“शैलेश हा वर्गातील सगळ्यांत हुशार विद्यार्थी आहे!”

त्याना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांनी चवथीचे प्रगतीपुस्तक पाहिले, 

त्यात असलेले दर तिमाहीचे शेरे असे सुचवत होते की,

त्याच्या प्रगतीचा आलेख हळूहळू खाली येतो आहे.

त्याच्या आईला दुर्धर कॅन्सरने ग्रासले होते आणि रोग आता शेवटच्या स्थितीत पोचला होता. त्यांची आई त्याच्याकडे आता पूर्वीसारखे लक्ष देऊ शकत नव्हती.

आणि ते हळूहळू त्या शेऱ्यांमधून ध्वनीत होत होते.

सहावीत शेरा होता,

“ शैलेशने त्याची आई गमाविली आहे आणि तो स्वत:ही हरवल्यागत झाला आहे. 

आता त्याच्याकडे अधिक लक्ष देण्याची नितांत गरज आहे. नाहीतर आपण त्याला गमावू !

आतापर्यंत पाटील बाईंच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते. 

त्या तशाच मुख्याध्यापिका कक्षात गेल्या. म्हणाल्या,

“मला कळले काय करायला पाहिजे ते !”

पुन्हा सोमवारी, त्या वर्गावर गेल्या आणि वर्गावर नजर फिरवून नेहमीप्रमाणे म्हणाल्या, “love you All”! 

पुन्हा त्यांना जाणवलं की आपण खरं बोलत नाही आहोत.

कारण त्याना वर्गातल्या सर्व मुलांबद्दल वाटणाऱ्या प्रेमापेक्षा कैक पटींनी जास्त माया आता शैलेशविषयी वाटत होती !

त्यांनी आता मनाशी काही ठरवलं होतं.

आता शैलेशला हाक मारताना त्यांचा स्वर बदलला होता.

त्या शैलेशशी सकारात्मक वागत होत्या. 

दिवस जात होते.

शाळेचा शेवटचा दिवस उगवला. सगळ्या मुलांनी teacher साठी छान-छान गिफ्ट्स आणल्या होत्या.

एकच ‘गिफ्ट’ एका जुन्या वर्तमानपत्रात गुंडाळलेली होती.

शिक्षिकेच्या अंत:प्रेरणेने त्यांनी ओळखले, ही कोणाची गिफ्ट आहे ते. 

एक अर्धी वापरलेली परफ्युमची बाटली आणि दोन खड्यांच्या बांगड्या.

एका बांगडीतले दोन खडे आधीच निखळलेले होते. 

सगळी मुले हसली. त्यांनी ती गिफ्ट शैलेशची आहे हे ओळखलं.

काही न बोलता पाटील बाईंनी तो परफ्युम आपल्या साडीवर उडवला. त्या दोन बांगड्या आपल्या हातात घातल्या.

आता शैलेशचा चेहेरा खुलला. हलकेच हसून तो म्हणाला,

“आता माझ्या आईसारखाच सुगंध तुमच्या साडीला येतोय!”

“ती मला सोडून गेली त्या आधी, तिने वापरलेला हा शेवटचा परफ्युम होता.

आणि शेवटी तिच्या हातात ह्याच बांगड्या होत्या !”

एक वर्षानंतर,

म्हणजे शाळा संपली तेव्हा, पाटील बाईंच्या टेबलावर एक पत्र होते. “मला जेव्हढे शिक्षक-शिक्षिका लाभल्या, त्यातल्या तुम्ही सर्वांत छान आहात.”- शैलेश.

त्यानंतर बरीच वर्षे, शैलेशकडून याच आशयाचे पत्र त्यांना दर वर्षी मिळत असे.

वर्षे निघून गेली.

त्यांचा संपर्क राहिला नाही. दरम्यान, त्या निवृत्तही झाल्या. अचानक त्याना एक कुरिअर शोधत आला. त्याने एक पत्र त्यांना दिले.

त्यावर प्रेषक म्हणून नाव होतं, डॉ. शैलेश, Ph.D.

या दरम्यान, शैलेश मोठा झाला होता. शैलेशने खूप प्रगती केली होती. डॉक्टरेट मिळविली होती.

पत्रात तीच ओळ पुन्हा होती. थोड्या फरकाने. 

“मला जगात खूप माणसे भेटली. पण तुम्ही सर्वांत छान आहात !”

“मी लग्न करतोय. आणि तुमच्या उपस्थितीशिवाय लग्न करण्याचा विचार मी स्वप्नातही  करू शकत नाही.”

सोबत विमानाची दोन तिकिटे होती. जायचे आणि यायचे.

पाटील बाईंकडे आता तो परफ्युम नव्हता. 

पण त्या बांगड्या मात्र अजूनही त्यांच्या हातात होत्या.

पाटील बाईंना राहावले नाही. त्या लग्नाला गेल्या. तिथे अपरिचितच जास्त होते.
त्यामुळे त्या मागच्या एका रांगेत बसून चाललेला सोहळा पाहात होत्या. मात्र कुणीतरी त्यांना शोधत होते. त्यांनी त्यांना ओळखले आणि पहिल्या रांगेकडे नेले.

तिथे एका खुर्चीवर चिठ्ठी लावलेली होती,

“आई”.

त्यांना पाहताच, सोहळा थांबवून शैलेश त्यांच्यापाशी आला. त्याने त्यांना सन्मानाने

खुर्चीवर बसविले. पाया पडला आणि म्हणाला, तुम्ही माझ्या आईपेक्षा कमी नाही. आज मी जो काही आहे, तो केवळ तुमच्यामुळेच.

लग्न पार पडले. जोड्याने पुन्हा पाया पडायला आला, तेव्हा नवपरिणीत पत्नीला म्हणाला, 

“हया नसत्या, तर आज जसा मी आहे तसा कधीच घडलो नसतो !”

त्यावर पाटिल बाई उत्तरल्या,

'शैलेश जर माझ्या वर्गात नसता, तर मला कधीही कळलं नसतं,

की शिक्षकाने आधी प्रत्येक मुलाची आई असणं जास्त जरुरीचं आहे, मग शिक्षक' ! 😊

असल्या चांगल्या गोष्टी जमेल तेवढ्या लोकांना पाठवा,
तंत्रज्ञानामुळे माणसे तर खुप जोडली पण माणुसपण कुठेतरी हरवत चाललयं

अजून एक छान

मे ३१, २०२०

दानपेटी

*दानपेटी* 

तो त्या दानपेटीत दररोज पांच रुपये टाकायचा .

त्याचे ते नियमित देवळात येणे , देवाला नमस्कार करणे आणि दानपेटीत पांच रुपये टाकणे तिथल्या विश्वास्थांच्या ध्यानात आले होते . त्याच्या साध्या कपड्यावरून व सायकलच्या वापरावरून तो निम्नवर्गीय गरीब भक्त आहे हे सहज लक्षात येत होते . कधी कधी तो आपल्या बायकोला व एका मुलीला बरोबर  घेऊन यायचा .  तेंव्हासुद्धा कापूर , बुक्का , उदबत्ती न घेता पाच रुपये पेटीत टाकायचा . एखाद्या दिवशी नाही आला तर दुसऱ्या दिवशी दहा रुपये पेटीत न चुकता पडायचे . त्याच्या या नित्यक्रमात कधी खंड पडल्याचे तिथल्या पुजाऱ्याने आणि विश्वस्थानी पाहिले नव्हते . त्यामुळे तो आदराचा विषय झालेला होता . 

अशी वीस वर्षे संपली . महागाई किंवा उत्पन्नातील वाढ याचा त्याने आपल्या दानपेटीतील पाच रुपयात कधी बदल केला नाही किंवा वाढ केली नाही . आता तर रस्त्यावर लहानमोठे सर्व   स्कुटर , मोटार सायकल घेऊन दिमाखात येत व ऐटीत निघून जात . मात्र त्याच्या सायकलीवरून येण्याजाण्यात कधी फरक पडला नाही . सध्या त्याचे आयुष्य थोडे ओढग्रस्त असावे असे जाणवत होते . तरीही दानपेटीतील पाच रुपयांचा नित्यक्रम त्या गरीबाने चुकविला नाही . त्याची मुलगी मोठी झाली होती व कदाचित तिची काळजी त्याला सलत असावी . कधी कोणाजवळ बोलला मात्र नाही . त्याला देवळाच्या ओट्यावर शून्यात नजर लावून बसलेला अनेक वेळा त्या विश्वस्थानी पाहिले देखील . मात्र हा आपणहून कोणाशी बोलत नसे किंवा आपले दुखडे सांगीत नसे . सध्या तो जास्तच चिंताक्रांत दिसत होता .

एके दिवशी देवळाच्या विश्वस्थानी हिय्या केला व आपुलकीने  त्याला विचारले की सध्या असे चिंताक्रांत का असता ? तुमचे काम सुटले आहे काय ? कसली चिंता भेडसावत आहे ? तो कसनुसे हसला . बोलला ," कांही नाही हो , मुलीचे लग्न ठरलेय व पैशाची जोडणी कांही झालेली नाही . स्थळ चांगले आहे . हातचे जाऊ नये असे वाटतेय . पण आता हात तरी कोणाकडे पसरायचे ? मी हा असा पैशाने दुबळा . कामाचा मालकही फारसे कांही उचलून द्यायला तयार नाही . म्हणून काळजीत आहे , इतकेच . बघू देव यातून कसा काय मार्ग काढतोय ते ?"
" अरे पण खर्च तरी किती आहे ?" विश्वस्थ .
"पंचवीस-तीस तरी नक्की लागणार हो ." तो 

त्या दिवशी काय झाले कुणास ठाऊक . त्या विश्वस्थाच्या डोक्यातून तो विषय कांही जाईना . रात्री झोपतानाही त्याचाच विचार . रात्री वरचेवर जाग आल्यामुळे झोपदेखील नाही झाली . पहाटे त्याला एक स्वप्न पडले . स्वप्नात पाच रुपयांची नाणी तो मोजत होता . जागा झाला व स्वप्न जसेच्या तसे त्याला आठवू लागले , खाऊ लागले . त्याने देवाकडे पाहिले . तो चोरासारखा बेरकी हसत असलेला त्याला दिसला . तो पटकन उठला . वही घेतली व हिशोब करू लागला . एकूण वर्षे वीस . एकूण दिवस ७३०० . दररोज रुपये पाच ने झाले ३६५००/- . त्याने ३६५००/- ची एक थैली तयार केली व शांतपणे झोपी गेला . झोपेत पुन्हा तेच स्वप्न ! तो जागा झाला व आठवू लागला . पाच रुपयांची नाणी आपण मोजत होतो हे स्वच्छपणे त्यास आठवले . दानपेटीतील जमा पैसे आपण एफडी'त ठेवतो हेही त्यास आठवले . त्यांनी हिशोब केला . सरासरी जमा रुपये १८२५०/-. वर्षाचे अंदाजे व्याज २०००/- . वीस वर्षांचे झाले ४००००/- म्हणजे सरळ व्याजाने त्या गरीबाच्या दररोजच्या पाच रुपयांचे मुद्दलासह होतात रुपये ७६५००/- आणि हा चिंताक्रांत आहे पंचवीस हजारासाठी ! 

तो विश्वस्थ आता निश्चिन्त झाला होता . त्याने देवाच्या तिजोरीतून शहाहत्तर हजार पाचशेची थैली तयार करून ठेवली . आता त्यास शांत झोप लागली . नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो गरीब देवळात आला . त्याने देवाला नमस्कार केला . तिथल्या दानपेटीत रुपये पाच टाकले व ओट्यावर जाऊन बसला . तो विश्वस्थ देवळातील आणखी कांही सज्जनांना घेऊन तिथे आला व त्याने ती थैली त्या गरिबाला दिली . सांगितले ," बाबा रे , तू दररोज देवाला पाच रुपये प्रमाणे या वीस वर्षांत ३६५००/- रुपये  वाहिलेस .  वीस वर्षांत त्याचे ७६५००/- रुपये झालेत , जे देवाकडे सुरक्षित आहेत . आज तुझी नड आहे व देवाची इच्छा आहे की ते तुला उपयोगी पडू देत . म्हणून तुझे पैसे तू मोजून घे !" 

गरीब चकित झाला . त्याला दिवसा उजेडी जसे कांही मोठे स्वप्न पडले होते . तो ती थैली घेऊन देवाजवळ गेला व रडू लागला . सर्वजण खूप भावूक झाले . देव प्रसन्न हसत होता . गरीबाचा पाय देवळाबाहेर निघत नव्हता . तो मात्र थैली घेऊन तिथेच बसून राहिला . त्याची पत्नी व मुलगी त्याला शोधत देवळात आली . त्याने घडलेले वर्तमान त्या दोघींना सांगितले . त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले . बघणारे सर्वजण देवाचा जयजयकार करू लागले . आता पत्नी व मुलगी त्याला घरी चला असे विनवू लागली . पण त्याचा पाय तिथून निघत नव्हता . 'माझे दान देवाने परत तर नाही केले ?' असे त्याचे मन त्यास खाऊ लागले . काय करावे त्याला सुचेना . त्याने विश्वस्थाना बोलावले व मी जे देवाला पाच रुपये वाहिले त्याचे वीस वर्षात किती होतात असे विचारले . त्यांनी सांगितले की ३६५००/- होतात . गरीबाने थैलीतील ३६५००/- रुपये काढले व पुन्हा त्या दानपेटीत टाकले . आता त्याच्या चेहऱ्यावरील ताण नाहीसा झाला . सर्व उपस्थित चकित झाले . त्यांनी त्याला विचारले की हे तू काय केलेस ? तो बोलला ," मी देवाला जेवढे वाहिले तेवढे परत करतोय . तो माझ्यासाठी देवाला मी दिलेला नैवद्य होता . उद्याचा माझा पाच रुपयांचा नैवद्य आता मी निश्चिन्त मनाने देवास वाहीन . अन्यथा माझ्या येणाऱ्या रात्री मी  तळमळत काढल्या असत्या . आता मला शांत झोप लागेल . देवाने दिलेल्या या उरलेल्या पैशात माझ्या मुलीचे लग्न थाटामाटात होईल . आता मी घरी जातो आहे ." 

आणि प्रसन्न चेहऱ्याने ते कुटुंब घरची वाट चालू लागले . देवाचा प्रसन्न चेहरा मात्र आणखी उजळला होता ! थेंबाथेंबाने साठविलेली कोणतीही गोष्ट ; मग ते पैसे असोत किंवा देवाचे आशीर्वाद असोत , कालांतराने अशी महाकाय होत असते व आयुष्यातील कठीण वेळा सहज दूर करते..
💐💐💐🙏🙏
मे ३१, २०२०

थोडं विज्ञान आणि अंधश्रद्धा

*1) अंत्यसंस्कार किंवा केशकर्तनावरून आल्यावर अंघोळीशीवाय कोणाला शिवायचीही परवानगी का नसायची ?*
*Infections spread टाळण्यासाठी.*

*2) चप्पल घराबाहेर सोडूनच घरात प्रवेश का?*
*Infections spread टाळण्यासाठी.*

*3) घरात मृत्यू झाल्यावर १२ दिवस घरातून बाहेर पडण्याची परवानगी का नसायची?*
*(यालाच होम क्वारंटाईन म्हणावे का?)*
*कारण मृत्यू समयी माणसाला काही ना काही आजार असतोच.*
*त्याची Immunity lowest level ला असते ,त्यामुळे ते deceased शरीर सर्व infective आजारांचे घर असते.*
*या infective आजारांपासून इतरांना दूर ठेवण्यासाठी इतर लोकांनी 12 दिवस अंतर ठेवावे.*

*काही ठिकाणी नवीन जन्म झाल्यावर काही दिवस बाळ आणि बाळाच्या आईला घरातल्याच एका खोलीत क्वारंटाईन करायचे.*
*त्या खोलीच्या दाराला कडुनिंबाच्या पाल्यांचे तोरण बांधायचे.*
*इथे कारण उलटे असते*
*कारण नवजात बालकाची* *immunity खूप कमी असते.* *बाहेरच्या जगातील आजार त्याला होऊ नयेत म्हणून घरातच राहणे,जसे आपण आता करत आहोत.*

*4) मयत झालेल्या घरात १२ दिवस अन्न शिजवायचे नाही अशी पद्धत का असावी? १२व्या नंतर घरात साफसफाई का करतात?*
*आलं का logic लक्षात.*

*5) शौचास बसून करण्याची भारतीय पद्धत का प्रचलित आहे? (आतड्यांना लॉक करणारे मसल्स अनलॉक झाल्याने मलाचा पूर्ण निचरा होतो, टॉयलेट पेपरची गरज नाही त्यामुळे इको-फ्रेंडली आहे,*
*पाश्चात्य कमोडच्या सीटवरच्या लाखो विषाणूंचा डायरेक्ट शरीराला संपर्क होतो तसा भारतीय पद्धतीत होत नाही.*

*6) हळद आणि मसाले युक्त अन्न शरीराच्या प्रतिकार शक्तीला आपसूकच बळ देतात. लग्नाआधी हळदी समारंभ का असतो?*
*आता western लोकही हळददूध प्यायला लागलेत, फरक एवढाच की ते त्याला turmeric latte म्हणतात. तुमच्या शहरातील कोणत्याही cafe shop वर जाऊन turmeric latte मागवून तर बघा.*

*7) घरात उद, कापूर जाळणे धूप फिरवणे यामागे काय कारण असावे?*
*Logic लक्षात घ्या.*

*8. ऋतुमानानुसार सणवार आणि अन्न नियोजन यामागे किती मोठा विचार असेल....?*
*उन्हाळा सुरू व्हायच्या आधीचा काळ हा वायरल इन्फेक्शनचा असतो.*
*या काळातच दारोदारी होळी का पेटवली जाते...?*

*9)*
*आपल्याकडे जनरली मृतदेह दफन करण्याऐवजी दहन करायची पद्धत का रूढ आहे? गुगल करा "cremate or bury". अनेक संशोधने मिळतील. तिकडे चीनने मृतदेहांना पुरण्या ऐवजी जाळण्याचे आदेश दिलेत.*

*10*
*जगातला सगळ्यात जास्त शाकाहारी असलेला देश भारतच आहे.*
*असे का...?*
*इथे भारतात आपण प्राण्यांत पण देव पाहतो. झाडांमध्ये, दगडांमध्ये, नद्यांमध्ये, पर्वतांमध्ये ही...!*
*आम्हाला जगाने इको-फ्रेंडली व्हा हे शिकवणे म्हणजे मोठा विनोद आहे.*
*आम्ही कुत्र्यात पण देव पाहतो, खंडोबा म्हणतो. तिकडे चीनच्या युलीन फेस्टिवल मध्ये कुत्र्यांना भाजून खातात.*

*11*
*एकाही व्हायरसचा जन्म भारतातून झाला आहे असे ऐकिवात का नाही?*
*कारण आम्ही इकडे वटवाघूळ, उंदीर, मांजर कुत्री, ऑक्टोपस, साप,रातकिडे, अळ्या असे बेछूट खात नाही. Nonveg खाण्यातही नियम आहेत ते पाळतो.*

*12*
*उठसुठ हात मिळवणे, मुके घेऊन अभिवादन करणे असे प्रकार आपल्याकडे नसून हात जोडून नमस्कार करायची पद्धत का आहे..?*

*हिंदू भारतीय पद्धतींचा logical विचार करा.*
*त्या बरोबर आहेत .👍*

*_आपली संस्कृती हजारो वर्षांपासून अस्तित्व टिकवून आहे. अनेक महामाऱ्या आणि संकटे झेलून अनुभव संपन्न झाली आहे. आमचीच संस्कृति किती वैज्ञानिक आहे याचा ढोल बडवायचा यात उद्देश अजिबात नाही. हे केवळ अनुभवातून शिकणे आणि कॉमन सेन्सचा भाग आहे. स्वतःच्या संस्कृतीला कमी समजणे आणि वेस्टर्न तेच योग्य ही विचारसरणी कोरोना पेक्षा घातक आहे._*

*यावर नक्कीच विचार व्हावा व पालन व्हाव*े 🙏

मे ३१, २०२०

गुरु

गुरुविण कोण दाखवील वाट ? ?

मनुष्याच्या जीवनात केव्हातरी असा प्रसंग येतो की तो अतिशय हतबल होतो अशा या कठीण प्रसंगी तो देवाचा धावा करतो अनेक व्रते,उपवास करतो पण देव त्याला लवकर मदत करत नाही.परंतु एक घटना मात्र निश्चित घडते आणि ती म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या पाठीशी उभी रहाते आणि संकटात आपली इतकी मदत करते की त्या संकटातून आपण सहज बाहेर पडतो.आपण नंतर म्हणतो सुध्दा की त्यांनी अगदी देवासारखी मदत केली येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे सर्व ईश्र्वराच्या मर्जीनुसार घडते आणि ती मदत सुध्दा ईश्र्वर करत असतो मदत करणाऱ्या व्यक्तीला बुध्दीयोग देण्याचे कार्य सुध्दा ईश्र्वराचे आहे
पुढे जेव्हा आपले भाग्य आपल्याला साथ देते व आपण वैभवाच्या उच्च शिखरावर जातो तेव्हा काळाच्या ओघात ही झालेली मदत आपण विसरतो असे घडू नये म्हणून वर्षातून किमान एकदा तरी आपण स्वतः अगदी एकटे बसावे आणि आपल्या कठीण प्रसंगी मदत केलेल्या व्यक्तींची आठवण करावी आणि मनोमन देवाचे आभार मानावे आणि एक निश्चय करावा की आपणही अशीच कोणाची मदत करू जेणेकरून ईश्र्वराची ही व्यवस्था अव्याहतपणे चालू राहील.

  गुरुंची आज्ञा हीच खरी देवभक्ती ...गुरुसेवा करताना काहींना त्रास सोसावा लागतो, काहींना अपमान सहन करावा लागतो.
ह्याचा प्रत्यय बऱ्याच जणांना आला असेल. नाना प्रकारचे शेरे, ताशेरे ऐकवले गेले असतील. पण गुरूंनी भक्तांना भिक्षा मागायला सांगण्याचे कारण एकच की त्यांचा अहंकार कमी व्हावा, '  मी  ' पणा कमी व्हावा.
          प्रत्येकाने ही भावना ठेवली पाहिजे की आपल्या जीवनात जे काही यश मिळते, आनंद मिळतो, त्याला आपले गुरू कारणीभूत आहेत. अशी भावना दृढ झाल्याने, तुम्हाला कोणताही अहंकार होणार नाही. " महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती " जेव्हा महापुर येतात तेव्हा अहंकाराने ताठ उंच उभी राहिलेली झाडे वाहून जातात :परंतु नम्रतेने खाली वाकलेली लव्हाळी जशीच्या तशी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात.
मे ३१, २०२०

रक्ता विषयी माहिती

‘प्लेटलेट्स म्हणजे काय?'

🥬🥦🍆🍅🥑🥝

हा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्या प्रश्नाचं उत्तर या लेखात मिळेल. 
हिमोग्लोबिन,
प्लाझ्माप्रमाणे
प्लेटलेट्स हादेखील रक्तातील एक महत्त्वाचा घटक आहे.
रक्त पातळ होऊ न देण्याचं तसंच
रक्तवाहिन्यांना इजा झाल्यास रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होऊ न देण्याचं काम या ‘प्लेटलेट्स’ करतात.

या प्लेटलेट्स मुळातच
एखाद्या प्लेटप्रमाणे दिसतात.
त्यामुळे त्यांना ‘प्लेटलेट्स’ हे नाव शास्त्रज्ञांनी दिलं आहे.
या पेशींसाठी वैद्यकीय भाषेत ‘थ्रोम्बोसाइट्स’
ही संज्ञा वापरली आहे.

   रक्तामध्ये प्रामुख्याने तीन पेशी असतात.

लालपेशी (आरबीसी),
पांढऱ्या पेशी (डब्लूबीसी)
आणि
प्लेटलेट्स (तंतुकणिका).
त्यापैकी रक्तामध्ये ‘प्लेटलेट्स’ची संख्या सर्वाधिक असते.
प्लेटलेट्स या मोठया हाडांतील
रक्तमज्जेत (रेड बोनमॅरो) असणाऱ्या
मेगा कॅरोसाइट्स या पेशींपासून तयार होतात.
त्यांचं रक्तातील आयुष्य सर्वसाधारणपणे 5-9 दिवसांचं असतं.
जुन्या झालेल्या प्लेटलेट्स प्लीहा (स्टीन) आणि यकृत (लिव्हर) या मध्ये नाश पावतात.

🅾🅾  प्लेटलेट्सचं कार्य 

रक्तवाहिन्यांतून वाहणारं रक्त हे प्रवाही राहणं महत्त्वाचं असतं.
ऑक्सिजन वहनाचं प्रमुख कार्य रक्तातून होतं.
तसंच रक्त शरीरातील विभिन्न अवयवांचे पेशीस्तरांवर पोषण करते.
एखादी जखम झाल्यास रक्तवाहिन्यांमधून रक्त अधिक प्रमाणात वाहून गेल्यास जीवितहानीदेखील होऊ शकते. 

अशा वेळेस जखम झालेल्या ठिकाणी प्लेटलेट्स आणि फायबर एकत्र येऊन रक्तप्रवाह खंडित करण्याचं काम करतात.
त्यामुळेच प्लेटलेट्सना
‘मानवी शरीराची कवचकुंडलं’ म्हटलं जातं.

⭕⭕ प्लेटलेट्सची संख्या

सर्वसाधारणपणे मानवी शरीरातील प्लेटलेट्सची संख्या दीड ते साडेचार लाख इतकी असते.

संख्या प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास रक्ताची गुठळी होऊन,
रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होऊ शकतो.
त्यामुळे हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात.
हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास,
शरीराचा तो भाग बधीर होऊन निकामी होऊ शकतो.

संख्या प्रमाणापेक्षा कमी झाल्यास रक्तस्त्राव अधिक होतो.
म्हणजे नाकातून, हिरडयांमधून, थुंकीतून रक्त पडतं.
त्वचेवर लालसर ठिपके येतात. मासिक रज:स्रव अधिक प्रमाणात होतो.
जखम झाल्यास रक्तस्रव आटोक्यात येत नाही.
जास्त रक्त गेल्याने थकवा येतो.

🛑⭕ प्लेटलेट्स कमी होण्याची कारणं

•    डेंग्यू, मलेरियाचा ताप
•    अनुवंशिक आजार
•    केमोथेरपी
  
⏺⏺ संख्या कमी झाल्यास..

डेंग्यू, मलेरिया या साथीच्या तापात प्लेटलेट्सची संख्या अचानक कमी होऊ शकते.
त्यामुळे 2-3 दिवसांचा ताप आल्यास,
त्या त्या रोगांची लक्षणे दिसल्यास वैद्यकीय सल्ल्याने त्वरित रक्ततपासणी (सीबीसी टेस्ट) करून घ्यावी. त्यानुसारच उपाययोजना करावी.

🅾⭕⛔⭕🅾🅾

प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यास लक्षात ठेवायच्या गोष्टी : 

•    लसूण खाऊ नये.
•    अधिक श्रमाचे व्यायाम तसंच दगदग करु नये.
•    अ‍ॅस्प्रिन, कोल्डडॅगसारखी औषधे घेऊ नयेत.
•    दात घासताना ब्रश लागणार नाही, याची दक्षता घ्यावी.
•    सु-या, कातरी वापरताना काळजीने वापरावे.
•    बद्धकोष्ठता होणार नाही, याची काळजी घ्यावी.
•    त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

प्लेटलेट्स कमी झाल्यास,
त्या बाहेरून घ्याव्या लागतात. इतर कुठलेही उपाय अजून खात्रीशीररीत्या सिद्ध झालेले नाहीत.
प्लेटलेट्ससाठी गोळया किंवा औषधंही नाहीत.
पौष्टिक आहारातूनच प्लेटलेट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येतं.
                                       

🛑🛑🛑🛑
नैसर्गिकरीत्या ब्लड प्लेटलेट्स वाढवण्यात मदत करतील हे 7 पदार्थ

 
  जर तुम्ही शरीरात कमी होत चाललेल्या प्लेटलेट्समुळे चिंताग्रस्त असाल तर घाबरू नका कारण तुम्ही तुमचा आहारात काही पदार्थांचा समावेश करून ब्लड प्लेटलेट्स नैसर्गिक पद्धतीने वाढवू शकता.

शरीरात प्‍लेटलेट्सची संख्या कमी होण्याच्या स्थितीला थ्रोम्बोसायटोपेनिया नावाने ओळखले जाते. या निरोगी व्यक्तीच्या शरीरात सामान्य प्लेटलेट काउंट 150 हजार ते 450 हजार प्रती मायक्रोलीटर असतो. परंतु जेव्हा हा काउंट 150 हजार प्रती मायक्रोलीटरपेक्षा खाली येतो तेव्हा याला लो प्लेटलेट मानले जाते. 
काही विशिष्ठ प्रकरच्या औषधी, अनुवांशिक रोग, कँसर, केमोथेरपी ट्रीटमेंट, अल्कोहलचे जास्त सेवन आणि काही विशिष्ठ प्रकारचे आजार उदा. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुण्या झाल्यानंतर ब्लड प्लेटलेट्सची संख्या कमी होते.

पुढे जाणून घ्या, नैसर्गिक पद्धतीने प्लेटलेट्स वाढण्व्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा....

१.पपई
🍑🥭🥬🥦🍉🍉🍊🍊🥑🥝

पपईचे फळ आणि झाडाची पानं दोन्हींचा उपयोग कमी असलेल्या प्लेटलेट्स थोड्याच दिवसात वाढवण्यास मदत करते. 2009 मध्ये मलेशिया येथे वैज्ञानिकांनी केलेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले की, डेंग्यू आजारात रक्तातील कमी होणाऱ्या प्लेटलेटची संख्या पपई पानांच्या रसाचे सेवन केल्याने वाढू शकते. पपईचे पानं तुम्ही चहाप्रमाणे पाण्यात उकळून घेऊ शकता. याची चव ग्रीन टी प्रमाणे असते.
 
२.गुळवेल

🥭🥬🥦🍉🍉🍊🍊🥑🥝

गुळवेलचे ज्यूस ब्लड प्लेटलेट वाढवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पडते. डेंग्यू झालेल्या रुग्णाने याचे सेवन प्लेटलेट्स वाढवण्यासाठी कर्वे तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दोन चमचे गुळवेल सत्व एक चमचा मधासोबत दिवसातून दोन वेळेस घ्यावे किंवा गुळवेलची काडी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी आणि सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून प्यावे. या उपायाने ब्लड प्लेटलेट वाढण्यास मदत होईल. गुळवेल सत्व आयुर्वेदिक मेडिकल स्टोअरवर सहजपणे उपलब्ध होते.

३.आवळा

🥭🥬🥦🍉🍉🍊🍊🥑🥝

प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवळा लोकप्रिय आयुर्वेदिक उपचार आहे. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेले व्हिटॅमिन 'सी' प्लेटलेट्स वाढवण्याचे आणि तुम्ही प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते. दररोज सकाळी नियमितपणे रिकाम्या पोटी 3-4 आवळे खावेत. दोन चमचे आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध टाकून तुम्ही हे मिश्रण घेऊ शकता.
 
४.भोपळा

🥭🥬🥦🍉🍉🍊🍊🥑🥝

भोपळा कमी प्लेटलेट कांउटमध्ये सुधार करणारा उपयुक्त आहार आ
हे. भोपळा व्हिटॅमिन 'ए' ने समृद्ध असल्यामुळे प्लेटलेटचा योग्य विकास होण्यास मदत करतो. हा कोशिकांमध्ये उत्पन्न होणाऱ्या प्रोटीनला नियंत्रित करतो. यामुळे प्लेटलेट्सचा स्तर वाढवण्यास मदत होते. भोपळ्याच्या अर्धा ग्लास ज्यूसमध्ये दोन चमचे मध टाकून दिवसातून दोन वेळेस घेतल्यास रक्तातील प्लेटलेट्सची संख्या वाढते.

५.पालक

🥭🥬🥦🍉🍉🍊🍊🥑🥝

पालक व्हिटॅमिन 'के'चा चांगला स्रोत असून अनेकवेळा कमी प्लेटलेट विकाराच्या उपचारामध्ये याचा उपयोग केला जातो. व्हिटॅमिन 'के' योग्य पद्धतीने होणाऱ्या ब्लड क्‍लॉटिंगसाठी आवश्यक आहे. अशाप्रकारे पालक जास्त प्रमाणात होणाऱ्या ब्लीडींगचा धोका कमी करण्यात सहाय्यक ठरतो. दोन कप पाण्यामध्ये 4  ते 5 पालकाची ताजी पानं थोडावेळ उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास टोमॅटोचा रस मिसळा. हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळेस घ्या. या व्यतिरिक्त तुम्ही पालकाचे सेवन सलाड, सूप, भाजी स्वरुपात करू शकता.

६.नारळ पाणी
🥭🥬🥦🍉🍉🍊🍊🥑🥝

शरीरात ब्लड प्लेटलेट वाढवण्यात नारळ पाणी खूप सहाय्यक ठरते. नारळ पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त हे पाणी मिनरलचा उत्तम स्रोत आहे. हे शरीरातील ब्लड प्लेटलेट्सची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त आहे.

७ बीट

🥭🥬🥦🍉🍉🍊🍊🥑🥝

बीटचे सेवन प्लेटलेट वाढवणार सर्वात लोकप्रिय आहार आहे. नैसर्गिक अँटीऑक्‍सीडेंट आणि हेमोस्टॅटिक गुणांनी भरपूर असल्यामुळे, बीट प्लेटलेट काउंट थोड्याच दिवसात वाढवण्याचे काम करते. दोन ते तीन चमचे बीट रस एक ग्लास गाजराच्या रसामध्ये मिसळून घेतल्यास ब्लड प्लेटलेट्सची संख्या जलद गतीने वाढते. यामध्ये उपलब्ध असलेल्या अँटीऑक्‍सीडेंट गुणामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

...
मे ३१, २०२०

एक निस्वार्थी समाज घटक

**समाज घडविणारया शिक्षकाची कदर*
       *एक नि:स्वार्थी समाज घटक*

*अलबट फर्नांडिस त्यांच्या एका पुस्तकात लिहिलं आहे* 

*रोममध्ये एकदा पोलिसांनी मला दंड केला. कामात असल्यानं मला वेळेवर दंड भरता आला नाही. त्यामुळे कोर्टात जावं लागलं. न्यायाधीशासमोर उभं केल्यावर त्यांनी कारण विचारल्यावर मी म्हटलं, "प्रोफेसर आहे, कामात एवढा गुंतलो की वेळच मिळाला नाही."*

*माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आंत न्यायाधीश म्हणालेत,*

*अ टीचर इज इन द कोर्ट ...!*

*आणि सगळे लोक उठून उभे राहिलेत आणि त्यांनी माझी माफी मागितली व माझा दंड रद्द केला गेला.*

*त्या देशाच्या यशाचं रहस्य तेव्हा मला कळलं.*

*ज्यांना अतिविशिष्ट किंवा व्हीआयपी म्हणतात ते कोण असतात ?*

*अमेरिकेत केवळ दोन प्रकारच्या लोकांना अतिविश्ष्ट मानलं गेलं आहे. *वैज्ञानिक आणि शिक्षक*.

*फ्रान्सच्या न्यायालयां मधे केवळ शिक्षकांनाच खुर्चीवर बसायचा अधिकार आहे.*

*जपानमध्ये सरकारकडून परवानगी मिळाल्यावरच पोलीस एखाद्या शिक्षकाला अटक करू शकतात.*

*कोरियात प्रत्येक शिक्षकाला ते सगळे अधिकार आहेत जे हिंदराष्ट्राच्या मंत्र्याला मिळतात, केवळ आपलं ओळखपत्र दाखवून.*

*अमेरिकन आणि युरोपीय देशांमध्ये प्राथमिक शिक्षकाला सर्वाधिक वेतन मिळतं,कारण तेच कच्च्या भांड्यांना आकार देतात.*

*ज्या समाजात शिक्षकांचा अपमान होतो,तिथं फक्त चोर,आणि भ्रष्टाचारी लोकच तयार होतात.*

*म्हणजे आपलाच देश का?*
मे ३१, २०२०

भारत माता

काल रात्री भारतमाता माझ्या स्वप्नात आली
१५ ऑगस्टला संपावर जाते असं म्हणाली

म्हणते जो तो करतोय संप आपल्या मागण्यांसाठी
आहेत मागण्या माझ्याही मी का रहावे पाठी

नागरिक म्हणून तुम्हाला नाही कुठलीच शिस्त
स्वातंत्र्य या देशामधले वाटू लागले स्वस्त

माझ्यासाठी का द्यावे बलिदान सैनिकांनी
तुम्हास त्याची चाड नाही का मरावे त्यांनी

संप मोर्चे बंद यांनी बिघडवले स्वास्थ माझे
जाती पाती मधली तेढ पोखरते शरीर माझे

पाण्याचा अन सीमेचा करता वाद तुम्ही
दोन्ही आहे या देशातच हे विसरता तुम्ही

केवळ आपला विचार करता माझा विचार नाही
ठेवा लक्षात स्वातंत्र्य हे फुकट मिळाले नाही

मागणी माझी एकच आहे जबाबदारीने वागा
देश माझा मी देशाचा या कर्तव्याला जागा

नाहीतर त्यादिवशी मी माझे अस्तित्व नाकारेन
सारे तुम्ही अप्पलपोटी हे सत्य मी स्विकारेन

नसेल कुठला देश तुम्हाला नसेल कुठली भूमी
अन्न आणि पाण्याविना मग तडपाल तुम्ही

बोलून इतके सारे भारतमाता गायब झाली
जागा झालो झोप माझी कायमची उडाली

संपले स्वप्न तरीही बाकी उरले इतके सत्य
व्यथेत भारतमातेच्या नक्कीच आहे तथ्य
मे ३१, २०२०

पाणी समस्येवर उपाय

*नदी नांगरून जलस्तर आला 500 फुटावरून 90 फुटावर....शहादा तालुख्यातील घटना*
*अवश्य वाचा व आपल्या गावातही अंमलात आणा.*

शेत नांगरावे लागते ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे , पण नदी नांगरणे हे ऐकायला कसेसेच वाटते ना ? सतरा वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे ,पण तिचे समकालीन मूल्य मात्र आजही तितकेच आहे.
*शहादा तालुक्यातील गोमाई या नदीच्या काठावरचे डांबरखेडा हे गाव . गोमाई मध्यप्रदेशातून वाहत सातपुड्याच्या डोंगररांगातून महाराष्ट्रातल्या प्रकाशा या गावी तापीला येऊन मिळते. संगमावर असल्याने प्रकाशा दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे.*
*२००० ची गोष्ट आहे. डांबरखेडा परिसरात अचानक असे लक्षात आले की , परिसरातील बऱ्याच विहिरी , बोअरवेलना पाणी येत नव्हते. चारसहा महिने जिवंत असणाऱ्या गोमाई नदीच्या काठावर असून देखील डांबरखेड्याच्या विहीरी , बोअर मृत . पाचशे ते सातशेफुटापर्यंत जलस्तर खोल गेला . लोक बोअरची खोली तेवढी वाढवत होते. पण पाणी वरती येत नव्हते .असे का ? शेतकरी हैराण. कुणाकडे नीट उत्तर नव्हते.
मोतीलाल पाटील ( पटेल ) तात्या. नांदरखेडा त्यांचे गाव. शहाद्याला त्यांना डांबरखेड्यावरून जावे लागते . त्यामुळे डांबरखेड्याची पाणी समस्या मोतीलाल तात्यांच्याही चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झाली होती. तात्या पुणे विद्यापीठाचे १९७० चे एम एस्सी ऍग्री . डांबरखेड्याची ही समस्या सार्वजनिक होती. गावात नदी असून विहरी , बोअर कोरड्या होत्या. सर्वचजण विचारात पडले होते , पण उत्तर सर्वांकडे नव्हते.
तात्यांनी एकेदिवशी डांबरखेड गावाच्या सरपंचांना मनातल्या चार गोष्टी सांगितल्या . खूप दिवसानंतरच्या आपल्या चिंतनाचा परिपाक लोकांपुढे ठेवला. समस्येचा मुळापर्यंत जाऊनच उत्तर सापडतात. आणि ती चिरस्थायी असतात. *जलस्तर खोल गेला या समस्येवर तात्यांनी सांगितलेला उपाय अगदीच वेगळा होता. काहीसा वेडेपणाचा , पण त्यामागे अभ्यास , संशोधन आणि चिंतन होते. लोकांनी तात्यांचे ऐकले आणि पाचशे ते सातशे फुटावर गेलेला जलस्तर चक्क नव्वद फुटावर आला.*
*डांबरखेडच्या लोकांसाठी तात्यांनी स्वतः डिझल पुरवले , ट्रॅक्टर , लाकडी नांगर , लोखंडी नांगर अशा साधनांनी गोमाई नदी उन्हाळ्यात नांगरायला सुरुवात केली. लोखंडी फाळ वाकले. चार किमी. नदी आडवी नांगरायचा हा अजब प्रयोग काहीसा चेष्ठेचा विषय झाला*. *गावकऱ्यांनी फक्त फक्त एक किलोमीटर इतकीच नदी नांगरली. जून कोरडा गेला , जुलैत पहिला पाऊसपूर आला . मात्र गोमाईचा हा पूर तापीला भेटायला गेला नाही. नांगरलेल्या नदीने रात्रीच सर्व पूरपाणी पिऊन टाकले . अवघ्या चोवीस तासात पाचशे फुटावरचे पाणी नव्वद फुटावर आले.लोक आनंदले*.सकाळी परिसरातील मोटारींनी फोर्सने पाणी फेकले.
तत्कालीन जिल्हाधिकारी असीमकुमार गुप्ता यांनी नदी नांगरण्याच्या या अभिनव प्रयोगाचे शिल्पकार म्हणून मोतीलाल तात्यांना " वॉटर मॅन ऑफ शहादा " असे संबोधून तात्यांचे तोंडभरून कौतुक केले होते .महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्य सचिव अजित निंबाळकर यांनी मोतीलाल तात्यांच्या या जगावेगळ्या प्रयोगाची पाहणी करून कौतुक केले.
नदी नांगरण्याची ही अभिनव कल्पना कशी सुचली ? या विषयी सांगताना तात्या बोलले , " दरवर्षी येणाऱ्या गढूळ पूरपाण्यातले 'फाईन पार्टीकल' वाळूत साचून साचून दोन-तीन फुटावर हे पार्टीकल सेटल होतात , थरावर थर साचून त्याचे खडकीकरण होत जाते. अर्थातच पाणी खाली न झिरपता वाहून जाते. माझ्या अनेक वर्षांच्या अभ्यास आणि चिंतनातून मला समस्येचे हे कारण लक्षात आले. "
खेतीया या मध्यप्रदेशातील शहारापर्यंतच्या अनेक गावातील लोकांनी नंतर सातत्याने गोमाई नदी नांगरली आहे , आणि वाहून जाणारे पाणी आपल्याच गावात जिरवले आहे. हे तात्यांच्या कल्पक प्रयोगाचे फलित आहे. निराश न होता , आत्महत्येचा पर्याय न अवलंबता शेतकऱ्यांनी आपल्या समृद्धीचा जलस्तर जिवंत करण्यासाठी काय करता येईल याचा शोध घेतल्यास उत्तर नक्की सापडेल. मोतीलाल तात्या पटेल या वेड्या माणसासारखा परिपक्व विचार शेतकऱ्याने करावा बस.

माझी सर्वाना विनंती आहे की हा प्रयोग प्रत्येक गावाने केला तर आपले गाव पण पाण्याच्या समस्येतून मुक्त होईल.

आपल्या मित्रांना  बाकीचे मेसेज पाठविण्यापेक्षा हा मेसेज forword करून पाणी चळवळ जागृत करा.
मे ३१, २०२०

नवरा बायको

छान 💏 नक्की वाचा
-------------------
नवरा- बायकोच्या जोरदार भांडणानंतर खूप चिडलेला नवरा रागाने घराबाहेर जायला निघतो.
 .💏💏💏💏💏💏

बायको ओरडते - "कुठे चाललात मैदान सोडून ?"
 
नवरा - जीव द्यायला.

बायको - जीव द्यायचा प्लॅन कॅन्सल झाला तर , येतांना कांदे आणि तुरीची डाळ घेऊन या.
"डाळकांदा कर" असं दोन दिवस झाले ओरडताय .

वरील भांडणातील विनोदाचा भाग सोडला तर भारतीय नवराबायकोच्या
अतूट नात्याचं आणि खंबीर विवाह संस्थेचे दर्शन होते. कारण
बायकोला शंभर टक्के खात्रीअसते की, आपला प्रेमळ नवरा आपणाला आणि आपल्या लेकरांना सोडून कुठेही जाणार नाही.

पण त्याचवेळी, आपल्या पतीने खरेच जीव दिला तर ? अशी शंकाही तिला घाबरून सोडते आणि त्यासाठी त्याच्या चिडलेल्या मनावर फुंकर घालण्यासाठी -
"तुमच्या आवडीचा डाळकांदा करणार आहे लवकर परत या" असे लटक्या रागात सुचवते.

ही ताकत आहे आपल्या भारतीय संस्काराची, संस्कृतीची आणि मजबूत विवाह संस्थेची .
 
कितीही रागवला
 तरी मायेन तोच जवळ घेतो…
कधी रागाने बाहेर गेला तरी त्याचे पाय आपोआप घराकडे वळतात ..
मनातले भाव त्याला डोळ्यातूनच कळतात ..
किती दुःखी असला तरी सारं गिळून घेतो. कोण आहे तिला आपल्या शिवाय म्हणून एक गजरा घेऊन येतो …
नवरा तो नवराच असतो….
 .
काळजी का करतेस ? मी आहे न तुला.
म्हणून किती धीर देतो.
 सा-या अडचणी आपल्या मनात ठेऊन बायकोकडे
 हास-या नजरेन पाहतो…
.
जसं घरावर छत असतं, तसंच आपल्या डोक्यावर नव-याचं झाकण असतं.
 किती सुरक्षित असतो आपण त्यांच्या
 सावलीत …
ऊन्हाचे चटके तो खातो,
 पण सावली आपल्या डोक्यावर देतो..
नवरा तो नवराच असतो….
 .
आपण चार अलंकार घालून म्हणतो
 "मान माझी मंगळसुत्र तुझं,
 कपाळ माझं बिंदी तुझ्या नावाची .."

 तो कधी म्हणतो का ?
"कष्ट माझे पगार तुझा…
शरीर माझं आयुष्य तुझं …..
जन्म आईच्या उदरात,
पडलो तुझ्या पदरात ..
तू जीवन संगिनी म्हणून गोड मानत असतो ….
नवरा शेवटी नवराच असतो…
.
संसाराचा रथ दोन चाकांवर चालतो. त्यासाठी दोघांनाही समतोल सांभाळावा लागतो….
एक चाक डगमगलं तर एका चाकावर रथ हाकणं फार अवघड होतं.
.
बायकोशिवाय घराला घरपण नाही, तसंच नव-याशिवाय बायको पूर्ण नाही.
तो कळस आहे घराचा,
छत आहे परिवाराचा…
चटके तो खातो आपण मात्र सावलीत राहतो
 नवरा तो नवराच असतो ..
 .
आयुष्यातल्या सगळ्या पोकळ्या भरता येतील पण नव-याची पोकळी कधीच भरून निघू शकणार नाही…..

म्हणून एकमेकांना मायेची हाक द्या,
 प्रेमाची साथ द्या. जीवन क्षणभंगूर आहे जगण्याचा आनंद घ्या….
 . ❣

आवडल्यास आपल्या बायकोला किंवा नवऱ्याला टॅग करा....

आणि लग्नच नसेल झालं तर वाचून आनंद घ्या कारण तुम्हाला हे दिवस पण भविष्यात अनुभवायचे आहेत ना..... 😂😂😂😂😂😂
मे ३१, २०२०

दृष्टिदोष

​नक्की वाचा खुप सुंदर आहे​
                                    
एकदा एका कुटुंबाच्या समोरच्या घरात नविन भाडेकरु राहायला येतात.
          खिड़कीतून त्यांचे दोरीवर वाळत घातलेले कपडे पाहुन बायको नवर्याकडे तक्रार करते की,
     "लोक खुप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत". 
  नवरा म्हणतो साबण संपला असेल. 
   दुसर्‍या दिवशी वाळत घातलेले कपडे पाहुन बायको परत तेच वाक्य म्हणते की, 
"लोक खुप चांगले आहेत पण ते कपडे स्वच्छ धुवत नाहीत"
    कदाचित तिला कपडे चांगले धुता येत नसतील.
    नवरा फक्त ऐकून घेतो. असे रोजच चालते.
    एक दिवस पहाते तर काय चमत्कार एकदम स्वच्छ धुतलेले कपडे पाहुन बायको नवर्‍याला म्हणते 
"अहो ऐकलंत का? 
    समोरच्या वहिनी सुधारल्या.
 त्यांना कुणीतरी कपडे धुवायला शिकवलेले दिसते.
 आज कपडे अगदी चकाचक धुवून वाळत घातलेत"
तेवढयात नवरा बोलतो
   "राणी, मी आज सकाळी लवकर उठलो आणि आपल्या खिडक्या साफ केल्या. 
काचा आतून आणि बाहेरून ओल्या फडक्याने पुसून घेतल्या त्यामुळे तुला ते कपडे स्वच्छ दिसतात. 
     समोरचे रोजच कपडे स्वच्छ धुवत होते. 
परंतु आपल्या खिडकीच्या काचा खराब असल्यामुळे त्यांची कपडे तुला खराब दिसत होती.
  समोरचे नाही आपणच सुधारलोय.

आपला दृष्टीकोन स्वच्छ ठेवून आपण दुसर्‍या कडे पाहिले पाहिजे.
        नेहमी नजर चांगली ठेवा,
जग खुप सुंदर आहे.
"मातीने"  एकी केली तर विट बनते..,
"विटेनी" एकी केली तर भिंत बनते..,
आणि
जर एकी "भिंतीनी" केली तर "घर" बनते.
या निर्जीव वस्तु जर एक होऊ शकतात, आपण तर माणसं आहोत...नाही का...❔🍂   .
.

   "विचार"  असे मांडा की ,
तुमच्या विचारांवर कुणीतरी 
.
            "विचार"
      ​केलाच पाहिजे.... 
        
                       आपलाच माणूस
                 
                         ... दादा...
मे ३१, २०२०

ताक

*"ताक"*
शास्त्रात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते आणि शरीरातील चरबी निघून जाते, इतकेच नव्हे तर चेहऱ्यावरील काळे डाग जावुन चेहरा तरतरीत व तेजस्वी होतो.
ताकात विटामिन ” B 12 ” , कैल्शियम , पोटेशियम आणि फास्फोरस सारखे तत्व असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. ज्याचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांनी ताक पिल्याने असे आजार नाहीसे होतात. ताक प्यायल्यानंतर शरीराची झीज ९० % भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. साधारण माणसाने सुध्दा दररोज ताक पायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकत प्रचंड प्रमाणात वाढते.

ताक पिण्याचे हे १० प्रकारचे फायदे जाणून घेऊया आणि कोल्ड्रिंक पिणे थांबूया . . .

१) ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो. 
२) वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो. 
३) दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते. 
४) ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात. 
५) ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.
६) थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते. 
७) रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते. 
८) ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो. 
9) लहान मुलांना दात येतेवेळी त्यांना दररोज ४ चमचे असे दिवसभरातून २-३ वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो.
१०)महत्वाचे म्हणजे *तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास* आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते. 
ज्यांनी ह्या पूर्वी पैसे देवुन पंचकर्म केलेलं आहे त्यांनी हा प्रयोग करून पहा, तेव्हा लक्षात येईलच. 
तुमची तब्बेत ठीक तर होईलच पण पैसाही वाचेल. असे सहा महिन्यात एक वेळ करा, आपणास होणारे भावी मोठे आजार पण टळतील. त्यामुळे होणारा त्रास व औषधी खर्चही वाचेल.

चला तर मग 🥛 ताक पिण्यास सुरुवात करूयात. आज पासून Cold Drinks बंद करूया..
हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवावी  यासाठी शेअर करायला विसरू नका.
मे ३१, २०२०

आताशा मला जमायला लागलय......

 आताशा मला जमायला लागलय.........* .........*

आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर जे जे मला दुखवत गेले त्या त्या सगळ्यांना न दुखावता सोडून देणं आताशा मला जमायला लागलयं.......

    संघर्षाच्या किंवा वादविवादाच्या क्षणी वाद न घालता तेथून दूर निघून जाण्यातंच खरी परिपक्वता असते हे ही समजायला लागलय..

माझ्या बरोबर घडणाऱ्या अनेक वाईट गोष्टींचा उहापोह करून त्यात शक्ती खर्ची घालून आजूबाजूला जे जे उत्तम आहे त्या कडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातोय हे ही जाणवायला लागलयं....

   आलेल्या अनुभवांतून बाहेर पडत स्वतःला सावरून, इतरांना आनंदी करणे मला आताशा जमायला लागलय....

   कोणत्याही न पटणार्‍या  गोष्टींवर काहीही न बोलणे म्हणजे त्यांना संमती असणे गरजेचे नाही, 
कधी-कधी काहीही न बोलणं किंवा कोणतही प्रत्युत्तर न देणं...खूप काही बोलून जातं आणि सांगूनही जातं  हे ही  कळायला लागलंय .....

   आपण लोकांवर किंवा त्यांच्या विचारांवर बंधन आणू शकत नाही पण आपण स्वतःच्या मनावर मात्र बांध घालू शकतो. आपण अशा लोकांचे  वागणे   किती मनावर घ्यायचे, त्यांना किती महत्त्व द्यायचं , त्यांनी बोललेल्या  गोष्टी किती डोक्यात साठवून ठेवायच्या आणि स्वतःचे आयुष्य खराब करून घ्यायचं का  हे ठरवणं गरजेचं असतं.  
 हे ही कळायला लागलंय........  

   कधीकधी परिस्थितीला आहे तसंच सोडून देणं आणि शांत राहणं सोईचं ठरतं. लोकांना कुठल्याही गोष्टींचं स्पष्टीकरण देत बसणं आणि त्यांनी तुम्हाला समजून घेण्याची अपेक्षा करणं बावळट पणाचं आहे हे कळल्यावर मी आताशा मला त्या दृष्टीनं घडवायला लागलीय .... 

   मी इतके दिवस ज्याचा प्रकर्षांने शोध घेत होते ती मनःशांती, समाधान मला मिळालं तेंव्हा ठरवलं की मी अशा लोकांपासून लांब राहावे , ज्यांच्या दृष्टीने मी  चांगली नाही  अन् मला स्वतःला त्यांच्या साच्यात बसवणे शक्य नाही. 
सतत वादविवाद वा भावना नसलेले संबंध मनाला त्रास देतात .  
तोंडावर गोड बोलून  मागे वाईट वागणार्‍या, वरवर संबंध ठेवणार्‍या, लोकांना आता मी कटाक्षाने दूर ठेवायला हवं हे पटायला लागलंय....

     माझ्या स्वतः च्या आनंदाचा ठेवा मला सापडलायं आणि उशीरा का होईना पण मी आताशा त्या वाटेवर समाधानानं पावलं टाकायला लागलीय....... 

*अाताशा मला समजायला लागलयं ....*
मे ३१, २०२०

शेतकऱ्यांसाठी थोडं ज्ञान

*ऊसाचे पाचट(पाला) काढण्याचे फायदे काय आहेत या बाबत थोडक्यात माहिती पाहू.* 

1. उसाचे पाचट काढल्याने संख्या नियंत्रण होते तसेच जाड कोंब ठेवुन लहान मरके कोंब काढले जातात. 
2. बुडातिल पाचट निघाल्याने हवा खेळती राहते त्यामुळे जाडी वाढण्यास मदत होते 
4. नविन वॉटर शूट फुटून येतात. त्यापासून बनणारा ऊस हा जोमदार व वजनदार बनतो
5. पाचट काढल्यामुळे कांडी कीड,मिलिबग तसेच पायरीला या किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.
6. योग्य वयातच आपण बुडातील कोवळा वाळलेला पाला  काढतो त्यामुळं तो लगेच कुजून जातो त्यामुळे जमिनीत सेंद्रिय घटक ऍड केले जातात. तसेच उन्हाळ्यात जमिनीवर आच्छादन झाल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते व पाण्याची बचत होते.
7. पाचट आच्छादन केल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
8. पाचट काढून जमिनीवर आच्छादन केल्यामुळे जमिनीचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते..

पाचट काढताना शेतकऱ्यांकडून सामान्यता खालील चुका होतात 

1. ज्यावेळी आपल्या उसाचे बुडातील 4 ते 5 टोपणे सुकून जातात त्याच वेळी उसाचे पाचट काढावे.
2. उसाचे पाचट काढताना फक्त सुकलेली पाने काढावीत. हिरवी पाने अजिबात सोलू नयेत किंवा वैरणीसाठी देखील ऊसाची हिरवी टोपणे अजिबात काढू नयेत.
3. एका निरोगी वाढणाऱ्या ऊसाला नऊ ते बारा पर्यंत पाने असतात.  हिरवी पाने  काढून घेतल्यास प्रकाश संश्लेषण क्रियेवर त्याचा परिणाम होऊन उसामध्ये अन्न कमी तयार केले जाते व पर्यायाने उसाची वाढ कमी होते.
4. एकदा उसाचे पाचट काढल्यानंतर शक्यतो वैरणीसाठी हिरवी टोपणे अजिबात काढू नयेत.
*_"बदलत्या काळानुसार शेतीमधील नवीन माहिती व तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न"_*
मे ३१, २०२०

जरा हसा

अगर बोलीवुड की फिल्में *"कोरोना"* पे बनती तो *कैसे डायलोग्स होते ?* 

एक कल्पना..

*शोले* - ये मास्क 😷 मुझे दे दे, ठाकुर!

*दीवार* - मेरे पास मास्क है, सेनिटाईजर है, ईन्श्योरन्स है, बेंक बेलेन्स है, तुम्हारे पास क्या है ?           
*- मेरे पास कोरोना वेक्सिन हैं!* 💉

*दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे* - बड़े बडे शहरों मेंं छोटी मोटी बिमारियाँ होती रहती हैं!

*3 इडियट्स* - दवाई नही इम्यूनिटी बढ़ाओ, बिमारी झख मार के तुमसे दूर भागेगी!

*दबंग* - लोकडाउन से डर नही लगता साहब, कोविड 🦠 से लगता है!

*कुछ कुछ होता है* - फेफड़ों में कुछ कुछ होता है अंजलि, तुम नही समझोगी! 

*दीवार* - मैं आज भी लोगों से हाथ नहीं मिलाता! 🤝🏼

*दामिनी* - तारीख पे तारीख, तारीख पे तारीख.. हमेशा अगले लोकडाउन की तारीख ही मिलती रही है मिलोर्ड, पर लोकडाउन की आखिरी तारीख नही मिली! 

*अजीत* - मोना डार्लिंग, सोशियल डिस्टेन्सींग तुम्हें मरने नही देगा और लॉक डाउन तुम्हें जीने नही देगा! 

*पाकीजा* - आपके पाँव देखे,  बहोत हसीन हैं। इन्हें घर पर ही रखिएगा वर्ना *कोरोना* हो जाएगा! 

*बाजीराव मस्तानी* - अगर आपने हमसे हमारा सेनिटाईजर मांगा होता तो हम खुशी खुशी दे देते, मगर आपने तो मास्क ना पहनकर हमारा गुरूर ही तोड़ दिया! 

*डोन* - कोरोना की वेक्सिन तो ग्यारह मुल्कों की पुलिस ढूंढ रही है, पर वेक्सिन को ढूँढना मुश्किल ही नही, नामुमकिन है! (भगवान ना करे 🙏🏻)

*देवदास* - कौन कमबख्त है जो  बर्दाश्त करने के लिये पीता है ? हम तो इसलिए पीते 🥃 हैं कि देशकी ईकोनोमी 💰 ऊपर उठा सके, लोकडाउन को बर्दाश्त कर सके! 

*जिंदगी ना मिलेगी दोबारा* - अगर साबुन से हाथ धो रहे हो, तो जिंदा हो तुम। अगर चेहरे पे मास्क लगाकर घूम रहे हो तो जिंदा हो तुम। अगर सोश्यल डिस्टन्सिंग फोलो कर रहे हो तो जिंदा हो तुम। अगर बारबार चेहरे पे हाथ नही लगा रहे तो जिंदा हो तुम। अगर घरमें झाडू, पोछा, बरतन कर रहे हो तो जिंदा हो तुम! 

*ओम शांति ओम* - अगर कोरोना के नए केस आने बंद नही हुए तो समझ लो कि लोकडाउन अभी बाकी है मेरे दोस्त।

*मुगल-ए-आजम* - सोश्यल डिस्टन्सिंग तुम्हें मरने नहीं देगा और लोकडाउन तुम्हें जीने नही देगा।

*मैंने प्यार किया -* क्वोरन्टाईन का एक उसूल है मैडम - *नो मिटींग, नो गोईंग आऊट।*

*दीवार* - जाओ,पहले उस आदमी का साईन लेकर आओ जिसने बिना मास्क के पब्लिक में छींक दिया था! 🤧

और आखिर..

*शहेनशाह* - रिश्ते में तो हम सारे वायरस के बाप लगते हैं, नाम है *"कोरोना!"* 😎

😂😂😂😎😂😂😂
मे ३१, २०२०

डोळे उघडा विचार करा

*संपूर्ण वैज्ञानिक सत्य*
*( सर्वांनी वाचलाच पाहीजे असा लेख )*
आपले वेद आणि प्राचीन ज्ञान संपूर्ण थोतांड आहे कां ??? आणि आधुनिक विज्ञान परिपूर्ण आहे कां ???( एक अभ्यासपूर्ण विवेचन ) 
सदरील लेखात आपण विज्ञान आणि वैज्ञानिक आणि त्यांचे शास्त्रीय दृष्टीकोन याचा उहापोह केला आहे. ठीक आहे. विज्ञानात वैज्ञानिक निसर्ग नियमाना जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारतो, उत्तरे शोधतो. तर्कावर आधारित सिद्धांत मांडतो. ते गणितीय पद्धत वापरून सिद्ध करतो हि सगळी तार्किक दृष्टी आहे. आपला हा सुद्धा दावा आहे कि मानवाने ३०० वर्षात अफाट प्रगती केलेली आहे. 
सूर्य-चंद्र ग्रहणे, कोणत्या दिवशी, नेमक्या कोणत्या वेळी, जगात कुठे, कशी दिसतील याची अचूक गणिते या सिद्धांताच्या आधारे आपण गेली तीनशे वर्षे करीत आहोत. असा आपला दावा आहे. 
ज्या माणसाला वेद म्हणजे काय आहे हे माहित नाही. ज्या माणसाला उपनिषदे म्हणजे काय हे माहित नाही. ज्या माणसाला प्राचीन भारतीय गणिती पद्धत म्हणजे काय हे माहित नाही. ज्या माणसाला प्राचीन भारतीय खगोलशास्त्र, अंतराळशास्त्र काय हे माहित नाही त्या माणसाला हा लेख वाचून विज्ञानाबद्दल प्रेमाचे भरते येणे स्वाभाविक आहे. परंतु हे सगळे अर्ध सत्य आहे. मध्यंतरी एका विद्वानाने अशीच टिप्पणी केली होती सगळे काही वेदात असेल तर तुम्ही पुढचे १० -१५ शोध आजच लावा कि, विज्ञान हे शोध लावण्याची वाट का पहात बसला आहात. 
तर विज्ञान विरुद्ध प्राचीन भारतीय ज्ञान / अध्यात्म या विषयावर आपण मुद्देसूद, पुराव्यांच्या सह चर्चा करूया. विज्ञानाचे जे प्रेमी असतील त्यांनी आवर्जून हा लेख वाचावा माझ्या मुद्द्यांच्या बद्दल काही आक्षेप असतील ते नोंदवावे. आणि जर माझे मुद्दे योग्य असतील तर मान्य करण्याचा मोठेपणा सुद्धा दाखवावा. 
१) कुतुब मिनार च्या समोर एक लोहस्तंभ आहे. २२ फुट उंच सुमारे ६.५ टन वजन असणारा wrought iron अर्थात ओतीव लोखंडाचा बनलेला स्तंभ. ज्याचे वय कमीत कमी १६०० वर्षे आहे. ज्याच्यावर एक अत्यंत पातळ असे आवरण चढवले आहे ज्यामुळे गेली १६०० वर्षे या खांबाला गंज लागलेला नाही. आय आय टी कानपूर च्या धातू तज्ञांनी अभ्यास करून एका विशिष्ट रासायनिक प्रक्रियेचा उल्लेख केला आहे ज्याचे आवरण फक्त १० micron आहे त्यामुळे हा स्तंभ अजूनही गंज पकडत नाही. 
आपल्या महान वैज्ञानिक प्रगती चे मापदंड असणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या कारला सुद्धा मुंबईच्या खाऱ्या वातावरणात ३ ते ५ वर्षात बुडाला भरपूर गंज लागतो आणि मुंबईतील जुनी कार नेहमीच निम्म्या किमतीला विकली जाते. १६०० वर्षांच्या पूर्वी जिवंत असणारी अंधश्रद्धाळू विज्ञान परान्मुख माणसे जे करून गेली आहेत त्याची नक्कल तरी करण्याची आजच्या वैज्ञानिकाची आणि त्यांच्या समर्थकांची तयारी आहे कां ??? 
२)लेपाक्षी मंदिर आंध्र प्रदेश. या मंदिरात एक दगडाचा स्तंभ ( column ) आहे तो अधांतरी आहे. त्या खांबाच्या खालून आपण एक इंच जाडीची कोणतीही वस्तू फिरवून त्याची खात्री करून घेऊ शकतो. याच पद्धतीचा दीपस्तंभ मी विजयनगर साम्राज्यात सुद्धा पहिला होता. एक मेकानिकल इंजिनियर म्हणून मी तो कसा बनवला असेल हे नक्की सांगू शकतो. सुमारे १० टन वजन असणारा एक २ फुट व्यास असणारा दगड घ्या. त्याच्यावर तुम्हाला हवे तसे नक्षीकाम करा ( सुमारे ५ ते १० वर्षे लागणार हे करायला पारंपारिक हत्यारे वापरून. ) नंतर त्या खांबाच्या एका बाजूला एक मोठे गोल भोक करा त्यात लोहकांत दगड ( चुंबकीय गुणधर्म असणारा दगड ) घट्ट ठोकून बसवा. नंतर जिथे हा स्तंभ उभा करायचा असेल तिथे जमिनीत या दगडाचे वारा, पाउस, उन, वादळ या सगळ्या प्रकारात सुद्धा रक्षण करू शकेल इतका मजबूत पायाचा दगड बसवा त्यात तितकाच मजबूत पायाचा लोहकांत दगड ठोकून बसवा. आता या दोन्ही लोह्कांत दगडांचा असा संयोग हवा कि त्यांनी परस्परांना दूर तर लोटले पाहिजे पण ते स्थिर सुद्धा राहिले पाहिजेत ( १० टन वजनाचा दगड घेऊन आजच्या कोणत्याही वैज्ञानिकाने हे करून दाखवावे ) मग खालील दगडावर हा वरील दगड ढकलत ढकलत आणा दोन्ही दगड एकमेकांच्या चुंबकीय क्षेत्रात आले कि ते स्थिर होतील. आणि नंतर १००० वर्ष तसेच राहतील.. ( अजून किती काळ राहतील ते माहित नाही ) असा अफलातून तंत्रज्ञानाचा वापर करणारी मंडळी निर्बुद्ध होती ? त्यांना विज्ञान तुमच्या न्यूटन पेक्षा कमी समजत होते असे तुमचे मत आहे का ? बर हे करणारी मंडळी कलाकार होती, शिल्पी होती, तुमच्या पुरोगामी भाषेत बहुजन.. ब्राह्मण सुद्धा नव्हती तरी त्यांचे गणित, विज्ञान आणि निसर्गाचा अभ्यास इतका पक्का होता कि ती मंडळी या गोष्टी लीलया करत होती.
३) महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर किरणोत्सव : आदिमाया महालक्ष्मीचे हे मंदिर कमीत कमी १००० वर्ष जुने आहे. या मंदिरात भूगोलाचा अभ्यास करून मुख्य द्वार असे बनवले आहे कि दर वर्षी विशिष्ट नक्षत्र असताना सूर्याचे पहिले किरण हे देवीच्या पायावर पडते आणि जसा सूर्य वर वर जातो ती किरणे तिच्या मुखापर्यंत पोचतात. हा सोहळा किरणोत्सव म्हणून ओळखला जातो. ज्या लोकांनी हे मंदिर बांधले त्यांचा भूगोल अत्यंत पक्का असल्या शिवाय आणि त्यांचे गणितीय ज्ञान अत्यंत चपखल असल्याशिवाय हे शक्य होऊ शकेल ? आज असेच एक मंदिर उभे करायचे ठरले तुमचे शास्त्रज्ञ सध्या ज्ञात असणारी साधने आणि तंत्रज्ञान घेऊन सुद्धा १००० वर्ष टिकेल अशी वस्तू निर्माण करू शकतील ? आणि याच पद्धतीचा किरणोत्सव तुमच्या न्यूटन च्या मूर्तीवर पाडून दाखवू शकतील ??? 
४) कैलाश मंदिर वेरूळ : वेरूळ येथील लेणीनच्या मध्ये असणारे कैलास मंदिर हे जगातील पहिले आधी कळस मग पाया या पद्धतीने बांधलेले मंदिर आहे. ७व्या शतकात बांधलेले हे मंदिर एकाच शीलाखंडाला पूर्णपणे कोरून बनवले आहे. कमीत कमी तीन पिढ्या या मंदिराच्या निर्मितीसाठी राबल्या आहेत. त्या काळातील लोकांना एकच इतका मोठा दगड कसा ओळखू आला असेल. त्याचे माप कसे कळले असेल कि त्यांनी बरोबर तीन मजली मंदिर उभे केले. आधी कळस मग पाया पद्धती वापरून बनवलेले हे एकमेव मंदिर म्हणजे शिल्पकलेचा आणि तत्कालीन लोकांच्या भूमीच्या गर्भाच्या अभ्यासाचा एक जिवंत नमुना आहे. 
५) बाण स्तंभ. सोरटी सोमनाथाचे सुप्रसिद्ध मंदिर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणारे हे मंदिर गझनीच्या मोहमदने १७ वेळा लुटले होते. या मंदिरात एक बाणस्तंभ आहे. त्या स्तंभावर संस्कृत मध्ये असे कोरले आहे कि या स्तंभापासून अंतर्क्तिका पर्यंत सरळ रेषा मारली तर भूमी लागत नाही. या लेखासोबत त्याच्या लिंक सुद्धा दिल्या आहेत. गुगल map चा फोटो सुद्धा दिला आहे. त्या काळातील लोकांच्याकडे आज असणारी कोणतीही सामुग्री नसताना सुद्धा ते या पद्धतीची घोषणा कशी काय करू शकले असतील ??? आज च्या विज्ञानाकडे याचे उत्तर आहे ??? त्यांनी नक्की कोणती यंत्रे, कोणती तंत्रे वापरली असतील ज्यामुळे त्यांना हे ज्ञान प्राप्त झाले ???
६) मीनाक्षी टेम्पल मदुराई : सुमारे २५०० वर्ष जुने मंदिर. बांधकाम करताना ३० ते ३५ टन वजनाच्या शिळा हत्तींच्या सहाय्याने ढकलत आणून निर्मिती केलेली आहे. या मंदिरात सहस्त्रखंबी मंडप आहे. त्यात ९८५ खांब आहेत आणि त्यातील काही खांबांवर आपण नाणे वाजवले तर सा ते नि असे सप्तसूर ऐकू येतात. मी मध्यंतरी डिस्कव्हरी वर एक कार्यक्रम पाहिला होता ज्यात या मंदिराचे वर्णन आहे. त्यात त्यांना सुद्धा हाच प्रश्न पडला कि २५०० वर्षांच्या पूर्वी ३० टन वजनाचा दगड कसा हलवला असेल. त्या साठी त्यांनी एक दगड आणला सुमारे २५ टन वजनाचा कारण आजच्या वैज्ञानिक दृष्ट्या प्रगत भारतात दगड वाहण्यासाठी असणारा सगळ्यात मोठा ट्रेलर सुद्धा २५ टन वजनच वाहून नेऊ शकतो. आणि जुन्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे त्यांनी लाकडी ओंडके तासून गोल केले त्यावर तो दगड टाकून त्यांनी हत्तींचा वापर करून ढकलून पहिले आणि त्यांना तसे करता आले . ( ज्याला आपण तरफ चे तत्व किंवा लिव्हर आर्म प्रिन्सिपल म्हणतो त्याच तत्वाचा वापर करून हि अत्यंत अवजड वस्तू हत्तींनी लीलया ढकलून दाखवली )
७ कोणार्क चे सूर्य मंदिर : संपूर्णपणे लोह्कांत दगड वापरून बनवलेले मंदिर म्हणजे कोणार्क चे सूर्य मंदिर. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे लोह्कांत दगड एकमेकांचे magnetic forces balance करून घट्ट बसवले होते. त्या नंतर त्यावर शिल्पे घडवली. मंदिराचा कळस हा सुद्धा लोह्कांत दर्जाचा होता आणि तो कळस संपूर्ण मंदिराचे magnetic forces control करत असे. या मंदिराच्या आत जे राशी चक्र काढले होते ते या पद्धतीचे होते कि रोज सूर्य उगवताना ज्या राशीत असेल त्या राशीवर बरोबर सूर्याचे पहिले किरण पडणार. अर्थात रोज राशी बदलला अनुसरून किरणांची जागा बदलणार. कल्पना करा याला भूगोल आणि स्थापत्याचा काय दर्जाचा अभ्यास लागला असेल. 
या मंदिराची मला माहित असणारी कथा सांगतो. हे मंदिर समुद्र किनाऱ्याच्या जवळ आहे. आणि त्या भागात समुद्र किनारा अत्यंत खडकाळ आहे. या किनाऱ्याजवळ येणारी जहाजे त्यातील लोखंड या magnetic forces ने ओढली जाऊन खडकावर आपटून फुटून जात असत. ज्यावेळी वास्को द गामा भारतात आला त्याच्या दोन पैकी एका जहाजाचा याच पद्धतीने खडकावर आदळून अंत झाला. त्याला यात मंदिराचा काही तरी परिणाम आहे हे लक्षात आले त्याने जहाजावरून तोफा डागल्या. त्यामुळे मंदिराचा कळस निखळला. कळस निघाल्याने सगळे magnetic forces unbalance झाले आणि मंदिर जवळ जवळ उध्वस्त झाले. नंतर ब्रिटीश कालखंडात ब्रीटीशांना कल्पना होती कि आपण हे मंदिर पूर्ववत करू शकत नाही. त्यांनी मंदिराच्या गर्भगृहात चक्क कॉन्क्रीट ठासून भरले. 
आजच्या महान विज्ञान आणि वैज्ञानिकांना आवाहन आहे. ते कॉन्क्रीट काढा आणि पुन्हा ते मंदिर पूर्ववत करून दाखवा.
८हि माझी पोपटपंची नाही. विकिपीडियाच वराह मिहीर चे गणितातील योगदान सांगतो आहे. सदरील ऋषींच्या बद्दल अजून एक ज्ञात बाब म्हणजे ते सूक्ष्म देह धारण करून ( यावर विज्ञानाचा बिलकुल विश्वास नाही ) अंतराळात भ्रमण करत असे. आणि त्यांनी काही श्लोक लिहिले आहेत ज्यात त्यांनी तुम्ही अंतराळात प्रवास करत असला आणि तुम्हाला जिथे आहात तेथून सूर्य अथवा पृथ्वी दोन्ही सुद्धा दिसत नसेल तरीपण आपले लोकेशन ( स्थान ) कसे ओळखावे आणि प्रवास करावा यावर मार्गदर्शन केलेले आहे.
मध्यंतरी डिस्कव्हरीवर मंगलयान सफल झाल्यावर एक कार्यक्रम दाखवला गेला. त्यात नासा पहिली प्रयत्नात का अपयशी झाली याची चर्चा होती. आणि भारत का सफल झाला याचे सुद्धा विवरण होते. मंगलयान मंगल ग्रहाच्या कक्षेत स्थिर करताना एक समस्या वर सांगितल्या प्रमाणेच उद्भवली कि मंगल यान मंगल ग्रहाच्या उलट बाजूला होते. एका बाजूला सूर्य अन दुसऱ्या बाजूला पृथ्वी होती यानाला या पैकी काहीही दिसत नव्हते. या ठिकाणी वराह मिहीर ने सांगितलेली पद्धत वापरून प्रोग्राम बनवला होता आणि तो परफेक्ट होता त्या प्रमाणे मंगल यान सफलपणे मंगळावर उतरले. 
आचार्य कणाद ज्यांनी अणु त्याच्या गर्भातील छोटे पार्टिकल यांच्यावर शास्त्रीय भाष्य केलेले आहे. आणि हा लेख वाचा. मी सांगत नाही तज्ञ अश्या पाश्चात्य विद्वानांनी सुद्धा यावर शिक्का मोर्तब केलेलं आहे. 
१०) वैदिक गणित, आपले पंचांग आणि त्यावर आधारित पर्जन्य मानाचे अंदाज: 
गणित हा भारतीयांनी जगाला दिलेला शोध आहे. शून्यावर आधारित गणमान पद्धती हि भारताची देण आहे. भारतातून हे ज्ञान मध्य पूर्वेला गेले अरब लोकांनी ते युरोपात नेले. त्यामुळे गणिताला युरोपियन लोक अरेबिक म्हणत आणि अरबी लोक हिंदसा म्हणत अर्थात हिंद मधून आलेली गणन पद्धत. यावर आधारित आपले पंचांग हे आज सुद्धा सगळ्यात परफेक्ट आहे. आपल्याकडे पर्जन्यमान दर्शवणारे जितके ग्रंथ आहेत ते नक्षत्रांची स्थिती आणि त्यानुसार पर्जन्य आणि येणारे पिक हा अंदाज वर्तवतात तो अंदाज आपल्या हवामान खात्याच्या अंदाजापेक्षा अधिक चांगला असतो. 
११) ज्या विज्ञानाच्या यशाच्या आपण गप्पा मारत असतो त्याचा पाया उत्तम गणिती ज्ञान हा आहे आणि त्यात भारतीय खूप आधी पासून तज्ञ आहेत. आज तुम्ही गणिताचे ऑलिम्पियाड जिंकलेल्या कोणत्याही मुलाला विचारा तू काय करणार तो सांगतो मी पाय चे मूल्य अधिकाधिक चांगले मांडणार. पाय हा वर्तुळाचा व्यास मोजण्यासाठी वापरला जाणारा स्थिरांक आहे.
पाय चे मूल्य ३२ अंशापर्यंत या श्लोकातून समजते. पाय चे मूल्य शुल्बसूत्रातून काढले गेले आहे. आधुनिक विज्ञानाने पाय चे मूल्य २२ अंशापर्यंत काढले आहे.
१२) आपण गणन करण्यासाठी जी पद्धत वापरतो त्यात इंग्रजी अक्षरात 
trillion च्या पुढे गणना नाही. आपल्या पद्धतीत. पद्म, महापद्म, अर्व, खर्व पर्यंत गणन करण्यासाठी शब्द आहेत.
१३) प्राचीन भारतातील हि सात शिव मंदिरे एकाच अक्षांशाला संदर्भ घेऊन बांधली आहेत. सर्व मंदिरे एकमेकांच्या पासून कमीत कमी काही हजार किलोमीटर दूर आहेत. असे असताना त्यांना ती एका रांगेत बांधता आली याचा अर्थ त्यांचे भूगोलाचे आणि अक्षांश आणि रेखांशाचे ज्ञान किती परिपूर्ण होते याचे द्योतक आहे. 
मी इथे दिलेली माहिती म्हणजे सागरातील काही थेंब आहेत. शक्यतो प्रत्येक मुद्याचे स्पष्टीकरण सुद्धा देण्याचा प्रयत्न केला आहे. आधुनिक विज्ञान म्हणजे कचरा आहे असे माझे बिलकुल मत नाही. आधुनिक विज्ञानाची दृष्टी वेगळी आहे. प्राचीन ऋषींची दृष्टी वेगळी होती. त्यांच्या दृष्टीत लोककल्याणाची तळमळ अधिक होती. त्यांची दृष्टी अधिक निसर्गपूरक होती. दुर्दैवाने सध्याचे विज्ञान हे निसर्गाला आव्हान देण्यासाठी विकसित होते आहे. भारतीय ऋषींनी विकसित केलेले विज्ञान हे निसर्ग आणि मानव यांनी शांततापूर्वक सहजीवन व्यतीत करावे असे होते. 
याठिकाणी मला चीनमधील एक महान विचारवंत कान्फूशियस याचे एक वाक्य उधृत करायचे आहे. तुम्ही निसर्गाच्या नियमांना बांधील राहून काही निर्माण केले तर निसर्ग ते टिकण्यास मदत करतो. तुम्ही निसर्गाला आव्हान देऊन काही निर्माण केले तर निसर्ग ते उध्वस्त करण्याच्या उद्योगाला लागतो. आपले आजचे विज्ञान असे संहारक होऊ लागले आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपण पर्यावरणाच्या बदलांशी झुंजतो आहोत. 
मी अध्यात्माच्या मार्गावर चालणारा एक छोटा पांथस्थ आहे. मला स्वतःला प्राचीन विज्ञान आणि अर्वाचीन विज्ञान असा लढा उभा करण्यात काहीही रस नाही.
पण इथे मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते आपल्या देशात चार प्रकारचे लोक आहेत. पहिल्या प्रकारात त्यांना भारतीय आणि त्यातल्यात्यात हिंदू म्हणून जन्माला आलो याची लाज वाटते. त्यांना आपले सगळे जुने ज्ञान म्हणजे कचरा वाटतो आणि ते पाश्चिमात्य ज्ञानाच्या प्रेमात पडलेले असतात. दुसऱ्या प्रकारातील लोक स्वार्थी असतात. त्यांना वेद आणि प्राचीन ज्ञान यातील शून्य माहिती असते परंतु काहीही असले तर ते वेदात आहे म्हणून हि मंडळी ठोकून मोकळी होतात. त्यांचे वेद आणि प्राचीन ज्ञानाच्या बद्दलचे प्रेम बेगडी आणि स्वतःची तुंबडी भरणारे आहे. तिसऱ्या प्रकारातील लोक श्रद्धाळू असतात. लोक म्हणतात म्हणजे वेदात काही तरी भारी असेल असा विचार करून ते गप्प बसतात हि पाप भीरु मंडळी असतात. आणि स्वार्थी लोक यांनाच फसवतात. चौथ्या प्रकारात माझ्या सारखे लोक असतात. जे आपली मती वापरून या प्राचीन ज्ञान सागरातील एक दोन थेंब जरी मिळवता आले तरी त्याची चव कृतज्ञपणे चाखतात...
मे ३१, २०२०

भगवंताचे अस्तित्व

*बोधकथा...*

      *भगवंताचे अस्तित्व*
             
  थॉमस अल्व्हा एडिसन एकदा रेल्वेने प्रवास करीत होते, त्यांच्या समोर एक मोठे प्रोफेसर बसले होते. एडिसन बायबल वाचत होते , ते प्रोफेसर नास्तिक होते त्यामुळे ते एडिसन यांना म्हणाले "अहो तुम्ही चांगल्या घरातील दिसता , वय पण 45 एक आहे मग देव देव करण्यापेक्षा काहीतरी चांगलं कार्य करा आणि समाजात नाव कमवा , हे बायबल वाचून काय होणार? फेकून द्या बघू ते रेल्वे च्या बाहेर." हे ऐकून एडिसननी गपचूप बायबल आपल्या पिशवीत घातले. त्या प्रोफेसरनी आपलं कार्ड एडिसन ना दिले व सांगितले की काही काम हवं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. एडिसन चे स्टेशन आल्यावर ते उतरू लागले असता एडिसननी सुद्धा आपले कार्ड त्यांना दिले व ते उतरले. त्यानंतर ते प्रोफेसर सुद्धा आपल्या घरी पोचले.                               
      आठवड्याचे कपडे धुवायला काढताना त्या प्रोफेसरना ते कार्ड सापडले , त्या दिवशी त्यांनी ते गडबडीत आपल्या खिश्यात टाकले होते , आज ते कार्ड बघून ते अचंबित झाले. आपण एका महान शास्त्रज्ञा समोर होतो आणि आपल्याला कळलंच नाही आणि आपण काय बोललो या बद्दल त्यांना अपराधी वाटू लागले. या जगविख्यात शास्त्रज्ञाने विजेच़ा बल्ब, फिल्म, फोनोग्राफ, ग्रॅहॅमचा फोनमधील सुधारणा वगैरे अनेक शोध लावून जगावर उपकाराचे डोंगर उभारले.
           त्यांनी लगेचच त्यांना भेटण्यासाठी अपॉइंटमेंट घेतली. त्यांच्या प्रयोगशाळेतच ते दोघे भेटले. ती प्रयोगशाळा पाहून प्रोफेसर थक्क झाले. ते म्हणाले "वा , काय प्रयोगशाळा आहे तुमची , खरच तुम्ही फार मोठे आहात , किती दिवस लागले हो हे सगळं करायाला?" त्यावर एडिसन म्हणाले "छे हो , हे मी काहीच केलेलं नाही ,सगळे आधीच तयार होते मी फक्त इथे येऊन प्रयोग केले."
         त्यावर प्रोफेसर म्हणाले "माझी चेष्टा करताय काय, अस आपोआप काही तयार होत होय?" त्यावर एडिसन हसले व म्हणाले "अहो ही एवढीशी माझी प्रयोगशाळा आपोआप आली अस म्हटलेलं तुम्हाला पटलं नाही ना , मग हे ब्रह्मांड आपोआपच निर्माण झालं हे मला कस पटेल."
         पुढे त्यांनी एक सिद्धांत मांडला आहे , ते म्हणतात

 "Where there is a creation there should be a creator. Without a creator there is no creation, so GOD exists."
मे ३१, २०२०

संस्था, संघटना, मंडळ

🙏 *नमस्कार मित्रांनो*🙏

*संस्था, संघटना, मंडळ चालवताना आपल्याला आपल्या पदाच्या कामाबद्दल माहिती आहे का?*

बरेच जण समाजसेवा करण्यासाठी मंडळ चालू करतात पदावर राहतात पण आपण त्याला योग्य न्याय देतो का ?

*तर मग आपण जाणून घेऊ काम कसे करावे*

🔰 *अध्यक्ष,उपाध्यक्ष*

1) प्रतिष्ठित असावा.
2) पारदर्शक असावा. 
3) सर्वांना सोबत घेऊन चालणारा असावा.
4) संचालक मंडळ व समाजाला आपल्या संस्थेचे काम वेळोवेळी सांगणारा असावा. 

🔰 *सचिव*

1) सचिव संघटनेचा कणा आहे. 
2) सर्व मिटींग चे नियोजन करण्याची जबाबदारी सचिवावर असते.
3) संघटनेचे कार्यक्रमाचे नियोजन करण्याची जबाबदारी.
4) संस्थेचे कार्यालयीन जबाबदारी.
5) सर्व सभासदांना  घेऊन काम करणारा असावा. 

🔰 *खजिनदार*

1) निधी संघटनेसाठी कसा मिळेल याची सतत चिंता करणारा असावा.
2) दर आठ दिवसांत हिशोब पूर्ण करणारा असावा.
3) आर्थिकदृष्ट्या संस्थेचे नाव खराब होते ते याचं काम योग्य न झाल्यामूळे. 
4) शासकीय योजनेचा अभ्यास करावा. 
5) व्यवसायिक, सामाजिक  याचा डेटा असावा किंवा नवीन माणसे जोडावी. 

🔰 *सदस्य संचालक*

1) उपक्रम समाजापर्यंत पोचवण्यासाठी  सर्व सदस्य सक्षम असावेत. (whatsapp, facebook, आपला dp , status ) याचा वापर आपण मंडळासाठी जरूर करावा 

2) उपक्रमास आपल्या नातेवाईक, मित्र याचा स्वतः फोन करून किमान आपल्या जवळच्या सभासदांना जरूर कळवा.

3) आपल्या whatsapp group मध्ये ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे

4) स्वतः सामाजिक भाव मनापासून आहे का असेल तर दर महिन्याला आपण करत असलेल्या सेवे साठी आपण किती निधी देतो समाजाकडून आपण मागतो पण आपण स्वतः देतो का? किंवा आपण आता पर्यंत किती दिली आहे याचा जरा आपण विचार करा.

5) आपण करत असलेल्या कामाची आपल्याला चिंता असते का.

आपण सर्व पद व त्याची कामे पाहिलात पण तसे आपल्या कडून होत नाही असे असेल तर आपण संघटनेचे काम मनापासून करत नाही. 
आपल्यामध्ये सेवा भाव म्हणून आपण जोडलेले नाही.
आपण फक्त कोणीतरी सांगितले म्हणून तुम्ही करता पण आपली समाजबांधवा ना काहीतरी देण्याची भावना आपल्यामध्ये आहे का मग समजा आपल्याला कोणीतरी जबरदस्तीने पद दिलेही असेल तरी आपण आता पद मिळाले आहे तर ते कार्य समजवून घ्या. न्याय दया नाहीतर त्यांना सागा की मी हे करणार नाही कारण तुमच्या मध्ये *सेवा भावच* नसेल तर कशाला उगीच आपण एखाद्या *संस्थेची, संघटनेची, मंडळची* वाट लावायची.

*पण तसे नाही आपण आपल्या  दिवसातून एकदा 10 मिनिटे तरी मंडळासाठी द्या.*


🙏
मे ३१, २०२०

घरातील वातावरण का बिघडते आहे?

*🙋🏻‍♂ या 10 वर्षांमध्ये अधिकाधिक घरांमध्ये आर्थिक स्थिती बिघडण्याची प्रमुख कारणे..!🙏🏼* *(मंदी जाणवण्याची कारणे)*

1. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्ट फोन व प्रत्येक वर्षी नवीन घेणे.
2. वाढदिवस, ॲनिवर्सरीमध्ये अनावश्यक खर्च व दिखावा.                                     
3. जीवनशैली बदलामुळे खर्चाचे प्रमाण वाढले.
4. मुलांचं शिक्षण, शाळा, क्लास फी यामध्ये वाढ. (1ली पासून क्लास लावणे ही फॅशन जीवघेणी आहे)
5. घरातील जेवणापेक्षा बाहेरील हॉटेलचा खर्च. यात खोटी प्रतिष्ठा.
6. व्यक्तिगत खर्च, ब्यूटी पार्लर, सलून, ब्रँडेड कपडे, पार्टी, गेट टूगेदर इत्यादी.
7. लग्न तर आहेच, पण प्रतिष्ठेसाठी साखरपुड्यावरही भरमसाठ खर्च.   
8. कर्जांचे व्याज फेडणे.
9. खाण्यापिण्यात बदलामुळे मेडिकल खर्चात वाढ. यामुळे अनावश्यक खर्चात वाढ होऊन, पगार कमी खर्च जास्त होत आहे. परिणामी, तणाव तणाव तणाव.
10.लोक, नातेवाईक काय म्हणतील या भीतीपायी कर्तव्य भावनेपाई पैशाचा चुराडा.
11. पार्टी कल्चरमुळे अक्षरशः लाखो तरुण, कुटुंबे जिवंतपणी नरक भोगताहेत. (उदा. घड्याळ घेतलं-द्या पार्टी, गाडी घेतली-द्या पार्टी, सायकल घेतली-द्या पार्टी, कपडे, दागिने, वस्तू घेतली-द्या पार्टी, 2-5शे रुपये पगार वाढला-द्या पार्टी,)
12. आपण दुसऱ्यावर पैसे खर्च नाही केले किंवा वेळ दिला नाही तर मला खांदा द्यायची वेळ येईल तेव्हा कोण येईल मदतीला? या एका भीतीपायी सामान्य माणूस आयुष्यभर, पिढ्यानपिढ्या कुजतोय.

*🙏🏼अनावश्यक खर्च कमी करा! गरज अन्न, वस्त्र, निवारा आहे आणि इच्छा स्वप्नं अनंत... आहेत त्यांचा अंत..... नाही... !*✍

 *लिमिटेड होतं तेच बरं होतं* ...

पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते बघा..... 

टी.व्ही.वर 1-2 channels होती व तीपण लिमिटेड वेळेसाठी. रात्री ठराविक वेळेनंतर बंद व्हायची व घरातील लोकं एकतर झोपायला जायची, नाहीतर *छान गप्पा मारायची*.... 😊😃😁

दोन चाकी वाहनांचे उत्पादन लिमिटेड होते, बुकिंग केल्यावर वर्षादीड वर्षाने वाहन मिळायचे. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या लिमिटेड होती.. *प्रवासाचा आनंद मिळायचा* .... 😄

गोडाधोडाचे पदार्थ फक्त सणासुदीला असायचे, तेपण लिमिटेड. त्यामुळे *स्थूलतेचे प्रमाण कमी होते*.....😉

शाळांमध्ये लिमिटेड अभ्यास असायचा. त्यामुळे मुलांना खेळायला वेळ मिळायचा व मुलांची मानसिक व शारीरिक *जडण घडण नीट व्ह्यायची*... 💪👍

बहुतांश ठिकाणी वर्किंग अवर्स लिमिटेड होते, संध्याकाळी ५-६ च्या दरम्यान ऑफिसेस बंद व्हायची व माणसे वेळीच घरी पोहोचून *कुटुंबासाठी वेळ द्यायची*...... 👏💞

अशा अजून अनेक गोष्टी आहेत ज्या लिमिटेड होत्या. त्यामुळे आपले *आयुष्य खूप सुखी होते*......

........... पण आता सगळंच *अनलिमिटेड* झालंय.... 😢आणि त्यामुळे जीवनातील सुख मात्र खूपच *लिमिटेड* झालंय !!😧😩
बाबा तुमच्या लहानपणी आणि आता आमच्या लहानपणी काय काय बदल झालेले वाटतात"?

बेटा काळ खूप बदलला बघ...

तेव्हा पोरांच्या छातीच्या बरगड्या दिसायच्या आणि पोट अगदी पाठीला टेकलेले दिसायचे. आता चौथीपाचवीच्या पोरांचीपण सुटलेली पोटे दिसतात.

तेव्हा पोरं दिवसभर खेळून खेळून रात्री बिछान्यावर अंग टाकले की गाढ झोपत. आता पोर दिवसभर बसून 'कॉम्प्युटर गेम्स' खेळून रात्री late night movies एन्जॉय करत जागत बसतात.

तेव्हा आमच्या घरात फक्त आजी आजोबांना डोळ्याला चष्मा असायचा. आता दुसरीची मुलं नाकावरील चष्मे सावरत शाळेत बसतात.

तेव्हा वडिलांचा आम्हाला फार धाक असायचा. आता पोरं नाराज होऊ नयेत म्हणून त्यांचे डॅड त्यांना ते म्हणतील तेव्हा हॉटेलात नेऊन ते म्हणतील ते खाऊ घालतात.

तेव्हा आम्हाला कधीतरी सणावाराला केलेली पुरणपोळी *गोड* लागायची. आता मुलांना दररोज झोपेतून उठल्यावर आई मागे लागून खाऊ घालते ते अंजीर, पिस्ते, मनुका पण बेचव लागतात.

तेव्हा आमच्या वाढदिवसाला आई एखादा बेसनाचा लाडू हातावर ठेवायची. आता मुलांच्या वाढदिवसाला तोंडाला फासण्यासाठी एक आणि खाण्यासाठी एक असे दोन मोठे केक्स लागतात.

मुळात काय की,

*तेव्हा आम्हाला फार काही मिळत नसतानाही आनंदात जगता यायचं*

            आता

बरंच काही मिळत असूनही *आनंदी जीवन कसे जगावे* यांवरील *सेमिनर्स' अटेंड* करावे लागतात.

(कुणी लिहिलंय माहित नाही, पण तथ्य आहे🎫 💐🌹🙏🏼🌹💐