*कार्यकर्ता आणि त्याचे संघटन...!!* ■■■■■■■■■■■■■■
*कोणत्याही संघटनेचा कार्यकर्ता कसा असावा व कसा नसावा ?*
*स्वतःला कार्यकर्ता समजत असाल तर जरूर वाचा…*
1) संघटनेची तत्वप्रणाली-
त्याला मान्य असावी. संघटनेचे अंतीम ध्येय, उद्धीष्ट्य त्याला माहित असावे.
2)समाजाबद्दल आपुलकी असावी.
संघटनेच्या कार्कर्त्यांबध्दल त्याच्या मनात सद्भावना, प्रेम, आदरभाव असावा.
3)स्वत:च्या समाजाचा पूर्वेतिहास त्याला माहित असावा. कारण जो इतिहास विसरतो तो इतिहास घडऊ शकत नाही असे म्हटले जाते.
4)कार्यकर्ता हलक्या कानाचा नसावा. संघटनेचा नेता आणि उध्दीष्ठ यावर त्याचा ठाम विश्वास असायला हवा.
5) कार्यकर्त्याच्या ठायी अहंभाव नसावा. दुसरया कार्यकर्त्याचा व त्याच्या कामाचा सन्मान/आदर करणारा असावा.
6) पदलोभी नसावा-
पदाची लालसा असलेले कार्यकर्ते शत्रुंपेक्षाही घातक असतात. ते स्वतःही संघटन वाढवीत नाहीत आणि इतरांनाही वाढवू देत नाहीत. संघटन फक्त लेटरपॅडवर शिल्लक राहते.
7) आकलनशक्ती-
नेत्याच्या ‘सूचक’ शब्दांचा अर्थ समजला पाहिजे. Read between the lines दर्जाची आकलन क्षमता असावी.
8) सूक्ष्म निरीक्षण-
कार्यकर्त्याकडे सूक्ष्म निरीक्षण शक्ति असावी. सर्वच समाजात घडणा-या लहानमोठ्या घटनांची त्याने नोंद घ्यायला हवी.
9) भाषण व संभाषण चातुर्य- आपल्या मधुर वाणीने मुद्दा पटवून देण्याचे चातुर्य कार्यकर्त्याने अवगत करावे.
10) आत्मविश्वास-
निराश मनोवृत्ती नको.अपयशाचे यशात रूपांतर करतो, तोच खरा लढवय्या, नाहीतर ‘रडवय्या’.
कार्यकर्त्याच्या डिक्शनरीत ‘निराशा’ हा शब्दच नसतो. दुर्बल परिस्थितीशी जुळवून घेतात. पराक्रमी परिस्थिती हवी तशी बनवण्यासाठी लढा देतात.
11) परिश्रम, चिकाटी आणि सातत्य-
ध्येय गाठण्यासाठी इतरांपेक्षा जास्त परिश्रम करण्याची तयारी हवी. प्रयत्नांत सातत्य हवे.धरसोड नको.
12) कार्यकर्ते जोडणारा-
कार्यकर्ते जोडणारा असावा. तोडणारा नको. प्रभावी संघटन हिच संघटनेची शक्ति असते.
13) कार्यकर्ते हेरणारा व व्यक्तीपरीक्षक-
कर्तृत्वशाली, सदाचारी आणि प्रभावी व्यक्तींना हेरून त्यांना संघटनेत सामील करण्याचे कौशल्य कार्यकर्त्याकडे हवे.
चांगले काम करणारा कार्यकर्ता पुढे जात असेल तर त्यावर खोटे आरोप करुन त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न कदापी करु नका…
14) शिस्त व वेळ पाळणारा पाहिजे.
15) त्याला उपलब्ध साधनांचा काटकसरीने व कौशल्याने वापर करता यावा.
16) श्रेय लाटण्याची मनोवृत्तीचा नसावा. धोकेबाज नसावा.
17) कार्यक्रमाचे आयोजन करता यावे. संघटनेचे विविध उपक्रम राबविण्याची जबाबदारी स्वीकारावी. पुढाकार घ्यावा. किमान संघटनेच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये त्याचा सक्रीय सहभाग असावा.
18) समताप्रेमी व समर्पित मनोवृत्तीचा असावा. श्रमाची लाज वाटू नये.
19) अभ्यासू, चिकित्सक व संशोधक वृत्तीचा असावा.
20) गुप्तता-
संघटनेतील काही गुप्त गोष्टी गुप्तच ठेवणारा असावा.
21) कार्यकर्त्याला संघटनेचा व स्वतःचा विचार दुस-यांस पटवून देता यायला हवा.
22)प्रसिद्धी व प्रतिष्ठा यांस हपापलेला नसावा.
23) अंधश्रद्धाळू नसावा.
24)संघटनेसाठी वेळ, बुद्धी, श्रम, कौशल्य हे ‘पंचदान’ देणारा असावा.
25)संघटना समाजातील सर्वांच्या भल्यासाठी आहे.स्वत:च्या भल्यासाठी नाही…
त्यामुळे संघटनेसाठी सातत्याने पंचगुणांचे योगदान करणारा असावा
*ज्या संघटनेकडे वरील गुणधर्म असलेले कार्यकर्ते असतात; त्या संघटनेला जगात तोड नसते.*
*आपल्यालाही आपलं संघटन मजबूत बनवायचं असेल तर वरील गुणधर्म कार्यकर्ता म्हणून अंगी बाणवणं अत्यावश्यक आहे.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..