माझ्या मराठीची गोडी

वाचकांना वाचनाची एक पर्वणी मिळावी . मराठी भाषेची गोडवी कळावी यासाठी केवळ हा एक प्रयत्न आहे कुणाला काही शंका असल्यास कृपया राग व्यक्त न करता कमेंटमध्ये सांगा व योग्य ते मार्गदर्शनही करा .

Breaking

शनिवार, ३० मे, २०२०

गायीची डिलेव्हरी ( बाळांतपण

लेखक :गजानन साळवे ताहाराबाद

*गायीची डिलेव्हरी ( बाळांतपण)*

 🐄🐄  मि एक छोटा शेतकरी .शेतीला जोडधंदा म्हणुन अनेक वर्षांपासून गायी पाळल्या आहे .घरच्चा दुधा बरोबर ईतरांना  दुध देत असु व दोन पैसे घरखर्चास मिळत असे .१०,१२ वर्षांनपुर्वी ताहाराबाद गावातील काठेवाडी माणसापासुन एक काठेवाडी गाय विकत घेतली .हळुहळु तिचे संगोपण करत गेलो ,शिकत गेलो यात माझा मित्र भुषण ( छोटू ) नहीरे ,गुजराथी याने फार मदत केली .काही दिवसांनी सामोडे येथुन सासुने मला धोंड्याचा वान म्हणुन त्यांची गाय दिली आणि वर सांगितलेही हि गाय विकायची नाही . धोंड्यात अंगठी ,कपड्यांच्या ऐवजी गाय घेऊन आलो .हळुहळु दुधकाढणे ( धारा काढणे ) शिकलो बायकोला शिकवले ,लहाण भावासही शिकवले ,सालदार गडीस शिकवले ( मला बाहेर गावांना ,राज्यात कार्यक्रमास जान्याची सोयीसाठी ) . हळुहळु गाईंचा पसारा वाढतच गेला .माझ्या बाहेर गावच्या सामाजिक फिरण्यावर काही प्रमाणात बंदी आली .१,२ गाई करता करता १०,१२ गाईंचा गोतावळा झाला . घरच्या दुधासाठी गाय घेतली होती आता गावात अनेक दुधाच्चा बंद्य्या सुरू झाल्या .यावर ऊपाय म्हणुन मि एक एक गाय कमी करण्याचे ठरवले .अंतापुर येथील मावशीला  दोन वासर्या मोफत देऊन टाकल्या .पुढे नेर येथील मावशीस  एक वासरी देऊन टाकली.पुढे देशशिरवाडे येथील मावशीस एक वासरी दिली . ताहाराबाद येथील मित्र बबलु देशमुख व आबा पाटील यांना एक एक गाय देऊन टाकली .काही गोरे विकुन टाकले तरी आज ५ गाई व ३ वासरे आहेतच . त्यांच्या चारा पाण्यासाठी सकाळ संध्याकाळ मला शेतात जाव लागत .कधी सामाजिक कार्यक्रमास बाहेरगावी गेलोतर लहाण भावाच्चा रावण्या कराव्या लागतात .कधी सालदार गड्यास दुध काढण्यासाठी विंनती करून संध्याकाळ साठी २० रू ईकस्ट्रा द्यावे लागत असे .हे असे कायमचे सुरू झाले .गेल्या ८ दिवसानपासुन एक जर्सी गाय डिलेव्हरीच्चा मार्गावर होती .हे ८ दिवस फार धावपळीचे गेले .येवढी धावपळ बायकोच्या डिलेव्हरीस केली नाही तेवढी गाईच्या डिलेव्हरीसाठी करावी लागली यासाठी माझा राजस्थान ,हैदराबाद सामाजिक दौर्यावर पाणी सोडावे लागले .काही दिवसांनवर घरातील विवाहसोहळ्यात देवत घेण्याचा मान मला मिळाला त्या दिवसानपासुन आमच्चा बायकोची सर्वच तयारी जोरात सुरू होती .नवीसाडी मुलांना ड्रेस ,मला नवीन ड्रेस पण मि गाईच्या डिलेव्हरी झाल्या शिवाय कुठेच बाहेर गावी जाणार नाही असे सांगितल्या पासुन माझ्या बायकोला संकटच पडले .तिला ही संकट पडले आपल्या दैवत घेण्यावरपाणी पडणारतर नाही .झाले तसेच गेले ८-१० दिवस गायीची सकाळ ,दुपार ,संध्याकाळ ,रात्री ,पहाट पहाणी करण्यासाठी मला शेतात जाव लागायचं . गाईची सुखरूप डिलेव्हरी होण महत्वाचे होते .काल दि .१७/५/१९ ला संध्याकाळी गाय वाड्यात गरागरा  चकरा मारायला लागली , चारा खाण्यासाठी मागे पुढे करू लागली .कधी बसायची तर कधी लगेच ऊठाऊची .तिला कळा सुरू झाल्या होत्या मग काय आज रात्री डिलेव्हरी होणारच असे वाटू लागले .मग लागल्याच गुरांचे जायखे येथील डॉक्टर चौधरी यांना फोन केला .डॉ. साहेबांना गाईचा ईतिहास सांगितला . डिलेव्हरी रात्री अपरात्री केव्हाही होऊ शकते डॉ. आपण जायखेड्यावरून येण्यासाठी तयार रहा .गाय ही जर्शी असल्याने रिस्क नको .त्या दिवशी माझा मुक्काम अंथरूण पाघरूणासह शेतात झाला .रात्रीच्या १०:३० वा .गाय सुन्न होऊन आडवी पडली होती मि जरा वेळ घाबरलो होतो कि काय झाले तेवढ्यात लांबुन हळुच निरीक्षण केलेतर गाय एक लहाण पिलांस जन्म देत होती .अगोदर एक पाय बाहेर आला नंतर तोंड ल दुसरा पाय बाहेर येतांना दिसला .मि एकदम चिंतेत होतो .गाईने ५,१० मिनिटात वासुरे बाहेर पाडले .वासुरीची हलचाल होत नव्हती मी फार घाबरलो होतो की म्रुत वासरू तर नसेल पण दोन मिनिटाने त्यांने हातपाय हलवायला लागले  .मि लागलेच चिकट वासरू मागिल बाजुकडुन ऊचलुन पुढे तिच्या तोंडापाशी ठेवले तेव्हा गाईने पुर्ण वासरू चाटुन चाटुन स्वच्छ केले . गाय ऊठुन ऊभी रहात नव्हती मि लगेच भावाला फोन केला नंतर डॉक्टर चौधरीनां फोन केला डॉ. बोलले मि ताहाराबाद येथेच आहे माझा जिवात जिव आला .२ मिनिटात डॉ. आपल्या फोरव्हिलर गाडीने शेतात आले .मि विचारले गावात कोणाकडे आले होते तर डाँ .बोलले फँमिलसह साईगार्डन येथे जेवनासाठी आलो होतो .गाईची पहाणी करून दोन, चार ईंजेक्शन दिले व ९०% काळजी मिटली आहे पण रात्रभर लक्ष राहु द्या व काही वाटल्यास मला फोन करा मि जायखेड्यावरून येईल .रात्री २:०० गाईचा जार पडला .गाईचे पिल्लुला पहीले दुध पाजणे एक कसरतच आहे , ईकडुन तिकडे ,तिकडुन ईकडे कधी गाय ऊड्या मारायची तर कधी वासरू .कसेतरी वासुरूर दुध पाजले . रात्रीतुन घरून डाळ ,ढेप ,गुळाचे पाणी असा खुराक दिला .गाईला बरे वाटले .गाईच्या सुखरूप डिलेव्हरी पाहुन मि फारमोठ्या कार्यातुन मोकळा झालो .ऐवढी ढावपळ बायकोच्चा डिलिव्हरी च्चा वेळेस मला झाला नाही .बायकोच्चा डिलेव्हरी पेक्षा गाईच्याच डिलेव्हरीला जास्तच धावपळ झाली .हा वारंवार टोमणा बायको कडुन ऐकण्यात येत होता .अशी ही माझ्या गाईच्या डिलेव्हरीरी  गोष्ट आपण वाचली धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐🐄🐄 गजानन साळवे ताहाराबाद , जय सगर वार्ता ✍🏼
 *अभिमान आहे शेतकरी असल्याचा*

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 कृपया पोस्ट वाचून झाल्यावर कमेंट नक्की करा तसेच सबस्क्राइब करायला विसरू नका व नक्की फॉरवर्ड करा , म्हणजे अधिकाधिक लोकांना पोस्ट वाचायला मिळेल
धन्यवाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..