माझ्या मराठीची गोडी

वाचकांना वाचनाची एक पर्वणी मिळावी . मराठी भाषेची गोडवी कळावी यासाठी केवळ हा एक प्रयत्न आहे कुणाला काही शंका असल्यास कृपया राग व्यक्त न करता कमेंटमध्ये सांगा व योग्य ते मार्गदर्शनही करा .

Breaking

शनिवार, ३० मे, २०२०

लॉकडाऊन गुरुजी

लेखक : माहित नाही
*लॉकडाउनच्या दरम्यान सर्वांना खरं शिकायला मिळालेलं सत्य*

 १. अमेरिका आज आघाडीचा देश नाही.

 २. चीन कधीही जागतिक कल्याणाचा विचार करू शकत नाही.

 ३. युरोपियन जितके पाहिजे होते तितके शिक्षित नाहीत.

 ४. आम्ही युरोप किंवा अमेरिकेत न जाताही सुट्टया आनंदात घालवू शकतो.

 ५. जगातील लोकांपेक्षा भारतीयांची प्रतिकारशक्ती खूपच जास्त आहे.

 ६. कोणताही पुजारी, पादरी, ग्रन्थी, मौलवी, ज्योतिषी, धर्मगुरू हे एकाही रुग्णाला वाचवू शकले नाहीत.

 ७. आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी, शिक्षक कर्मचारी, प्रशासन कर्मचारी हेच खरे नायक आहेत, क्रिकेटपटू, चित्रपट तारे आणि फुटबॉल तारे हे नायक नाहीत.

 ८. जगात सोन्याचे आणि जडजवाहिरांचे अथवा इंधनाचे उपभोगाशिवाय कोणतेही महत्त्व नाही.

 9. प्राणी आणि पक्ष्यांना प्रथमच असे वाटले की हे जग देखील त्यांचे आहे.

 10. तारे खरोखरच चमकतात, हे सर्वप्रथम महानगरांच्या मुलांना पहायला मिळाले.

 ११. जगातील बहुतेक लोक आपले कार्य घरूनही करु शकतात.

 १२. आम्ही आणि आमची मुले 'जंक फूड' शिवाय जगू शकू.

 १३. स्वच्छता बाळगून आणि स्वच्छतेच्या सवयी अंगीकारून आयुष्य जगणे कठीण काम नाही.

 १४. फक्त महिलांनाच स्वयंपाक बनवता येतो, असे नसून पुरुषही उत्तम स्वयंपाक करू शकतात.

 १५. मीडिया फक्त खोटेपणा आणि मूर्खपणाचा एक समूह आहे.

 १६. अभिनेते केवळ करमणूक करणारे असतात आणि जीवनात वास्तविक नायक नसतात.

 १७. भारतीय स्त्रीया घरालाच मंदिर बनवू शकतात.

 १८. पैशाला काही किंमत नाही कारण आज दाळ रोटीशिवाय तुम्ही जगू शकत नाही .

 १९. काही लोक सोडले तर भारतीय श्रीमंत माणुसकीने परिपूर्ण आहेत.

 २०. कठीण प्रसंग केवळ भारतीय लोकच योग्य पद्धतीने हाताळू शकतात.

 २१. लहान / विभक्त कुटूंबापेक्षा सामाईक / एकत्र कुटुंब कधीही चांगलेच आहे.

२२. आणि शेवटच एक वाक्य शेतकरी मात्र सगळ्यांचाच बाप कारण तुम्ही मोबाईल,  गाड्या, टिव्ही, पेट्रोल, शीतपेये खाऊन किंवा पिऊन जगू शकत नाहीत हे पण सिद्ध झाले. त्यांच्यासाठी फळे, दुध, भाकरी, भाज्यांची गरज आहे. 

 💪🦾🎋🌾
*शेतकरी जगला तरच सगळे जगतील...*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..