.......
एकमेकांची डोकी फोडलेले दोन मित्र न्यायाधीशांसमोर आले.
काय झालं? मित्र आहात ना? एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत पाळी कशी गेली? न्यायाधीशाने विचारलं.
एकजण संतापून म्हणाला, म्हणजे काय? उसाचं उभं पीक असलेल्या माझ्या शेतात कोणी म्हशी घुसवल्या, तर मी काय करणार?
दुसरा म्हणाला, मी काय दिवसभर म्हशींची राखण करणार? त्यांना बांधून घालणार? शेत आहे म्हटल्यावर त्यात जनावर शिरणारच. ज्याचं शेत आहे, त्याने काळजी नको घ्यायला?
न्यायाधीश म्हणाले, ठीक आहे. कुठे आहे शेत ते सांगा.
पहिला मित्र म्हणाला, शेत कुठेच नाहीये.
न्यायाधीश म्हणाले, मग म्हशी कुठे शिरल्या?
दुसरा मित्र म्हणाला, म्हशी असतील, तर शिरतील ना?
न्यायाधीश बावचळले.
मित्रांच्या लक्षात अालं. ते सांगायला लागले. आम्ही दोघेे नदीकिनारी वाळूत गप्पा मारत बसलो होतो. मी म्हटलं, आताच्या सुगीत जरा बरे पैसे येणार आहेत हातात. चार म्हशी घेऊन टाकतो. तर हा म्हणाला, अरे, म्हशी नको घेऊस. मी यंदा उसाचं शेत घेणार आहे. तुझ्या म्हशी माझ्या शेतात शिरतील.
मी म्हणालो, मग मी काय करू? असं कसं चालेल?
बोलता बोलता वाद वाढला. मित्राने हातातल्या काठीने वाळूत एक चौकोन आखला आणि म्हणाला, हे घे. मी घेतलं शेत. बघतो तू कशा म्हशी घुसवतोस ते.
माझंही डोकं फिरलं. मी माझ्या हातातल्या काठीने त्याच्या चौकोनात म्हशी घुसवल्या.
त्याने मला मुस्काटात मारली. मी त्याच्या पेकाटात लाथ घातली.
शेवटी आम्ही एकमेकांच्या डोक्यात दगड घातले.
मैत्री असली म्हणून काय झालं, शेवटी स्वाभिमान नावाची काही चीज असते की नाही?
Social media असा असतो. प्रत्यक्षात काहीच नसतं आणि आपण मात्र एकमेकांना भांडत बसतो
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..