*सोडून द्यायला शिका..* 🚀
माणसांची खरी समस्या काय? तर जुन्या पुराण्या गोष्टी उगाळत बसायचं. त्यातून खरंतर काहीही निष्पन्न होत नाही. पण ते समजेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. जगात अनेक गोष्टी अशा असतात, ज्या सहजपणे सोडून देता येतात. पण त्या धरून ठेवण्याचा अट्टाहास आपल्या त्रासाला, वैतागाला कारणीभूत ठरत असतो. अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या सोडून देता येतील.
☄ *सोडून द्या* :
दुसर्यांना सतत टोमणे मारणे.
☄ *सोडून द्या* :
दुसर्यांच्या सतत चुका काढणे.
☄ *सोडून द्या* :
दुसर्यांच्या यशाबद्दल मत्सर वाटणे.
☄ *सोडून द्या* :
दुसर्याच्या संपत्तीची अभिलाषा ठेवणे.
☄ *सोडून द्या* :
दुसर्याची कागाळी करणे.
☄ *सोडून द्या* :
दुसर्यांच्या दुःखात आपले सुख मानणे.
☄ *सोडून द्या* :
दुसर्यांच्या खाजगी आयुष्यात डोकावणे.
☄ *सोडून द्या* :
दुसर्यांशी स्वतःची तुलना करत राहणे.
☄ *सोडून द्या* :
दुसर्यांशी सतत स्पर्धा करत राहणे.
☄ *सोडून द्या* :
दुसऱ्याची फालतू चौकशी करणे.
☄ *सोडून द्या* :
दुसऱ्याला कमी लेखून स्वतःला श्रेष्ठ समजणे.
☄ *सोडून द्या* :
तुमचा खोटा अहंकार
☄ *सोडून द्या* :
स्वतः दुःखात असल्यामुळे दुसऱ्याला दुःखी करणे.
☄ *सोडून द्या* :
एखाद्या व्यक्तीला तोंडावर न बोलता त्या व्यक्तीबद्दल मागे दुसऱ्या व्यक्तीजवळ टीका-टिप्पणी करणे, माप काढणे, मी किती श्रेष्ठ आहे हे दाखवणे, माझ्यासारखा दुसरा कोणी नाही हे दाखवणे.
☄ *सोडून द्या*:
सगळ्या मित्र परिवारामध्ये मीच हुशार आहे, मी लोकांना वेड्यात काढू शकतो, लोकांना कमी लेखणे.
👉 *लक्षात ठेवा.*
आपण आपल्या लबाडी, स्वाथीॅ स्वभावाने लोकांना एक-दोन वेळा वेड्यात काढू शकतो, पण एकदा लोकांना समजले की लोक आपल्यापासून दूर होऊ लागतात.
*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..