माझ्या मराठीची गोडी

वाचकांना वाचनाची एक पर्वणी मिळावी . मराठी भाषेची गोडवी कळावी यासाठी केवळ हा एक प्रयत्न आहे कुणाला काही शंका असल्यास कृपया राग व्यक्त न करता कमेंटमध्ये सांगा व योग्य ते मार्गदर्शनही करा .

Breaking

रविवार, ३१ मे, २०२०

गुरु

गुरुविण कोण दाखवील वाट ? ?

मनुष्याच्या जीवनात केव्हातरी असा प्रसंग येतो की तो अतिशय हतबल होतो अशा या कठीण प्रसंगी तो देवाचा धावा करतो अनेक व्रते,उपवास करतो पण देव त्याला लवकर मदत करत नाही.परंतु एक घटना मात्र निश्चित घडते आणि ती म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या पाठीशी उभी रहाते आणि संकटात आपली इतकी मदत करते की त्या संकटातून आपण सहज बाहेर पडतो.आपण नंतर म्हणतो सुध्दा की त्यांनी अगदी देवासारखी मदत केली येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे सर्व ईश्र्वराच्या मर्जीनुसार घडते आणि ती मदत सुध्दा ईश्र्वर करत असतो मदत करणाऱ्या व्यक्तीला बुध्दीयोग देण्याचे कार्य सुध्दा ईश्र्वराचे आहे
पुढे जेव्हा आपले भाग्य आपल्याला साथ देते व आपण वैभवाच्या उच्च शिखरावर जातो तेव्हा काळाच्या ओघात ही झालेली मदत आपण विसरतो असे घडू नये म्हणून वर्षातून किमान एकदा तरी आपण स्वतः अगदी एकटे बसावे आणि आपल्या कठीण प्रसंगी मदत केलेल्या व्यक्तींची आठवण करावी आणि मनोमन देवाचे आभार मानावे आणि एक निश्चय करावा की आपणही अशीच कोणाची मदत करू जेणेकरून ईश्र्वराची ही व्यवस्था अव्याहतपणे चालू राहील.

  गुरुंची आज्ञा हीच खरी देवभक्ती ...गुरुसेवा करताना काहींना त्रास सोसावा लागतो, काहींना अपमान सहन करावा लागतो.
ह्याचा प्रत्यय बऱ्याच जणांना आला असेल. नाना प्रकारचे शेरे, ताशेरे ऐकवले गेले असतील. पण गुरूंनी भक्तांना भिक्षा मागायला सांगण्याचे कारण एकच की त्यांचा अहंकार कमी व्हावा, '  मी  ' पणा कमी व्हावा.
          प्रत्येकाने ही भावना ठेवली पाहिजे की आपल्या जीवनात जे काही यश मिळते, आनंद मिळतो, त्याला आपले गुरू कारणीभूत आहेत. अशी भावना दृढ झाल्याने, तुम्हाला कोणताही अहंकार होणार नाही. " महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती " जेव्हा महापुर येतात तेव्हा अहंकाराने ताठ उंच उभी राहिलेली झाडे वाहून जातात :परंतु नम्रतेने खाली वाकलेली लव्हाळी जशीच्या तशी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..