माझ्या मराठीची गोडी

वाचकांना वाचनाची एक पर्वणी मिळावी . मराठी भाषेची गोडवी कळावी यासाठी केवळ हा एक प्रयत्न आहे कुणाला काही शंका असल्यास कृपया राग व्यक्त न करता कमेंटमध्ये सांगा व योग्य ते मार्गदर्शनही करा .

Breaking

रविवार, ३१ मे, २०२०

मोदीयुग

#मोदीयुग

भारत चीन सीमेवरील तणावामुळे नरेंद्र मोदींचा मूड खराब आहे असे विधान अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यानी करून जगात खळबळ उडवून दिलीय.पाच सात वर्षांपूर्वी भारताचा किंवा कुठल्या भारतीय पंतप्रधानांचा मूड खराब आहे अशी बातमी असती तर जग सोडा,भारतातील नागरिकांनी ही ती वाचली नसती.पाच च वर्षात भारताला जगाच्या सत्ता केंद्रात पार मध्यभागी नेऊन ठेवायचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे आणि ही पुण्याई पुढील किमान तीस वर्षे भारताच्या कामाला येईल,अगदी सरकार कुणाचे ही असले तरीही.

नरेंद्र मोदींच्या पहिल्या टर्म मधील परदेश दौऱ्यांच्यावर आपल्या इथल्याच काही महाभागांनी यथेच्छ टीका केली.दौऱ्यांच्यावर तर आधीचे पंतप्रधान ही जायचे पण इंदिरा गांधींच्या नंतर जगात भारताचा दबदबा वाढवण्याचे काम आपल्या परदेश दौऱ्यांच्या माध्यमातून जर कुणी केले असेल तर ते नरेंद्र मोदींनी केले आहे.संयुक्त राष्ट्रांच्या मध्ये भारताचा दबदबा वाढवणारे मोदी ,बराक ओबामांच्या पुढ्यात चीन अमेरिका जे काही वाटाघाटी असतील किंवा करार त्याचे कसलेही दडपण भारत नावाच्या देशावर तुम्ही लोक आणू शकत नाही हे भर पत्रकार परिषदेत सांगणारे मोदी ,जनतेला विश्वासात घेऊन आपले निर्णय राबवणारे मोदी हे अभ्यासाचा विषय आहेत.नरेंद्र भाई भारताचे पहिले पंतप्रधान आहेत जे स्वतःला आपल्या देशाचा प्रतिनिधी म्हणवुन घेऊन छाती ठोक पने जगासमोर जातात.जेवढे आमदार प्रादेशिक पक्षांच्या आजन्म भावी पंतप्रधानांच्या पक्षाला निवडून आणता येत नाहीत त्याहून जास्त देशांच्या राष्ट्राध्यक्षणी तर मोदींचे हिंदी शिकून घेऊन हिंदीत स्वागत केले आहे.

काय आहे मोदींची ताकद? जे अमेरिकेपासून चीन पर्यंत सगळे आज नरेंद्र भाई व भारताची ठळक दखल घेत आहेत.ह्याचे उत्तर फार सोपे आहे मित्रानो.अमेरिका असेल की इजराईल ,हे देश त्यांच्याकडील अणुशक्ती किंवा सैन्य दलामुळे महासत्ता बनले नाहीयेत.तिथं लोकशाही आहे आणि देशाबाहेर जेव्हा जगासमोर आपला देश किंवा आपल्या प्रमुखांच्या शब्द न शब्दाला तेथील राष्ट्रप्रेमी जनता एका अक्षराचे खंडन न करता समर्थन देते ही त्यांची ताकद आहे.हीच ताकद मोदींना लाभली आहे ,फरक एवढाच आहे की इथं एकशे तीस कोटी म्हणजे युरोप खंडाहून जास्त लोकसंख्येचे प्रतिनिधित्व मोदी करतात .जगातील कोणत्याही मोठ्या देशात पन्नास हजार लोकांची उत्स्फूर्त जनसभा घ्यायचा करिश्मा मोदींच्या कडे आहे.ह्या बाबतीत त्यानी ओबामा ना ही मागे टाकलेले आहे.तुम्ही म्हनाल चीन ची लोकसंख्या ही एवढीच आहे.पण फरक आहे मित्रानो ,चीन मध्ये त्यांचे प्रमुख ,सैन्य आणि प्रतिनिधी सोडले तर बाकी जनता त्यांच्या राष्ट्र प्रमुखला मनापासून नाही तर बळजबरीने नाईलाजाने पाठिंबा देते आणि ती देते का नाही हे ही कुणाला ठाऊक नाही! ह्या नव्या भारताच्या नव्या शक्तिशाली आणि व्हिजनरी पंतप्रधानाने जगात भारताला विश्वसार्ह राजसत्ता म्हणून पुढं आणले आहे.इस्लामीक राष्ट्रे असोत की आफ्रिकन राष्ट्रे,आज भारताला आपला विश्वासू लीडर मानतात.

राहिला प्रश्न मोदींच्या मूड चा..मोदींचा मूड खराब झाला तर मोदी काय करू शकतात ह्याचा रिपोर्ट इथल्या पुरोगामी शहरी पिल्लावळी ने अमेरिकेला आणि वामपंथी डाव्या वराहानी चीन ला दिलेला असणारच आहे.ओळखीतले कुणी पाच हुन जास्त वर्षे सैन्यात सीमेवर सेवेत असेल तर आपल्या जवानांच्या मध्ये आलेल्या आत्मविश्वासाकडे बघितल्यावर तुम्हाला कळेल की मोदींनी काय काम करून ठेवले आहे.आज नरेंद्र मोदी फक्त भारतीय जनता पक्ष, भारतीय लोक किंवा भारताची गरज नाहीत तर देशातील अनेक प्रगत देशांच्या प्रमुखांच्या विदेश नितीतील महत्वाचे पात्र आहेत त्यामुळं विरोधकांनो,आता 2024 नाही तर 2029 ची तयारी करा आणि निवडणूक खर्च वाचवायचा असेल तर नरेंद्र भाई ना 2024 ला बाय देऊन टाका व तो पैसा आपले पक्ष व संघटन मजबूत करण्या साठी वापरा!

गेले ते दिवस जेव्हा अमेरिका,रशिया किंवा चीन सोयीने भारताला आपले प्यादे म्हणून वापरून घ्यायचे.हा नवा भारत आहे आणि नव्या भारताच्या पंतप्रधानाने जगातील सत्ता केंद्रांना आपल्या खेळातील मोहरे बनवून ठेवले आहे आज.

टीप : छाती ठोकून अभिमानाने सांगतो मी नरेंद्र मोदी ह्यांचा अनुयायी आहे 🚩

जय हिंद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..