माझ्या मराठीची गोडी

वाचकांना वाचनाची एक पर्वणी मिळावी . मराठी भाषेची गोडवी कळावी यासाठी केवळ हा एक प्रयत्न आहे कुणाला काही शंका असल्यास कृपया राग व्यक्त न करता कमेंटमध्ये सांगा व योग्य ते मार्गदर्शनही करा .

Breaking

रविवार, ३१ मे, २०२०

बरं झाल देवा

*बरं झाल देवा तू माणसाला अद्दल घडवलीस*
*पैशामागे धावणारी सगळी एका खोलीत दडवलीस*

*!!तेव्हा माणूस माणसात होता*
*जेव्हा  डोक्यावर जरीचा पटका होता* 
*इज्जतीन नेटका होता*
*तोंडात पानाचा विडा होता*
*रहायला मोठा वाडा होता*!!

*!!तेव्हा माणूस माणसात होता*
*जेव्हा काचा कवड्याचा खेळ होता*
*नणंद भावजयीचा मेळ होता*
*डोक्यावरुन पदर पडत नव्हता*
*वाऱ्यांन ओढणीसारखा उडत नव्हता*!!

*!!तेव्हा माणूस माणसात होता*
*जेव्हा थोरामोठ्यांना किंमत होती*
*आयुष्य म्हणजे गंमत नव्हती*
*माणसं एकमेकांशी गोड होती*
*लांबच्यानां रक्ताची ओढ होती*!!

*!!तेव्हा माणूस माणसात होता*
*जेव्हा पोरगी प्रेमामध्ये गंडत नव्हती*
*सासू सासरे नको म्हणून भांडत नव्हती*
*तोंड बांधून हिंडत नव्हती*
*मुलगी बापाची शान होती*
*बापाच्या कष्टाची जाण होती*!!

*!!तेव्हा माणूस माणसात होता*
*जेव्हा शेतकरी माझा राजा होता*
*लग्नाला त्याच्या बँड बाजा होता*
*वरातीला सर्ज्या-राजा होता*!!

*!!तेव्हा माणूस माणसात होता*
*जेव्हा शेतकरी नवरा नको म्हणून मुलीं रडत नव्हत्या*
*बापाचा शब्द मोडत नव्हत्या*
*प्रेमात आंधळ होऊन नवऱ्याला सोडत नव्हत्या*!!

*!!तेव्हा माणूस माणसात होता*
*जेव्हा घासां घांसात कस होता*
*माणसाच्या वागण्यात रस होता*
*जेव्हा माणूस माणसात होता!!*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..