माझ्या मराठीची गोडी

वाचकांना वाचनाची एक पर्वणी मिळावी . मराठी भाषेची गोडवी कळावी यासाठी केवळ हा एक प्रयत्न आहे कुणाला काही शंका असल्यास कृपया राग व्यक्त न करता कमेंटमध्ये सांगा व योग्य ते मार्गदर्शनही करा .

Breaking

रविवार, २८ जून, २०२०

जून २८, २०२०

आणि म्हातारी अमर झाली.*


कथा क्रमांक एक

आणि म्हातारी अमर झाली.*

लेखक- मनवंतराव साळुंखे.

       रात्री बराच वेळ झाला होता. भुसावळ जाणारी शेवटची बस वेळ होऊनही सुटत नव्हती. बस स्थानक तसे संपुर्ण रिकामे झाले होते. दोन चार प्रवाशी इकडे तिकडे रेंगाळत होते. या बसचे दहा बारा प्रवाशी मात्र तळमळ करीत होते की बस अजुन का सुटत नाही.
       तेवढयात एकाने निरोप आणला की बसचे एक चाक पंक्चर आहे. तो काढला की गाडी सुटेल. बरोबर दहा वाजता बस निघाली. जवळ जवळ सर्वच प्रवाशी भुसावळ जाणारे होते. एका हातात बोचके धरुन बसलेल्या म्हातारी जवळ मात्र जेव्हा वाहक तिकिट फाडण्यास आला तेव्हा रस्त्यावर फाटा असलेल्या व तेथुन तीन चार किलोमिटर दूर असलेल्या गावाचे तिकिट मागु लागली.
     बस वाहक विचारात पडला. या म्हातारीचे वय झालेले, एकटीच उतरणारी, पावसाळ्याची गर्द अंधारी रात्र ही म्हातारी घरी कशी पोहचेल? 
     तो थोडासा म्हातारीवर रागावलाच की, 'तु एकटी, तुला नीट दिसत नाही, चालता येत नाही, एवढा उशीर का केला? लवकर उजेडात निघुन जायायचे ना?'
     म्हातारीला नीट ऐकु पण येत नव्हते. काही तरी उत्तर तीने दिले. वाहकाने तीला त्या गावाचे तिकिट दिले व आपल्या स्थानावर येवुन बसला.
     इतर प्रवाशी पेंगुळले होते. चालकाने दिवे बंद केले. वाहक मात्र म्हातारीचा विचार करीत होता. त्या फाट्यावर तर आपण तीला उतरुन देवु पण धड चालता न येणारी, व्यवस्थीत रस्ता न दिसणारी ही म्हातारी तीन चार किलोमीटर या पाणी पाऊसाच्या दिवसात घरी कशी पोहचेल? रस्ता खाचखळग्यांनी व खड्डांनी भरलेला, मध्ये एखादा नाला वाहत असेल तर? कुत्रे किंवा एखादया प्राण्याने या म्हातारीवर एकटे पाहुन हल्ला केला तर?
      तेवढयात म्हातारी उतरणार होती त्या गावचा फाटा आला. वाहकाने घंटी वाजविली. चालकाने बस थांबविली. वाहक उठला आजीबाईचे बोचके एका हातात व दुसऱ्या हातात तीचे बखोटे धरून तीला गाडीखाली उतरण्यास मदत केली. थोडा त्रागाही केला.
      बाहेर डोळयांना काहीही दिसत नव्हते. त्याने ते बोचके डोक्यावर घेतले व म्हातारीचे परत बखोटे धरून चालायला लागला तो एकाच विचाराने की म्हातारीला एकटे न सोडता घरापर्यंत सुरक्षित घरी पोहचविणे.
     म्हातारीलाही नवल वाटले. शक्य तेवढे ती ही त्याच्या पाऊलांबरोबर पाऊल टाकु लागली.
     इकडे बस चालक व प्रवाशींची 'दहा पंधरा मिनिटे झाली हा वाहक गेला कुठे?' अशी काव काव सुरु झाली. चालकाने बसखाली उतरुन बसला फेरी मारली की चक्कर वगैरे येवुन पडला की काय? नंतर त्याच्या लक्षात आले की तो त्या म्हातारीला सोडायला गेला असेल.
     संताप झाला त्याचा. प्रवाशीही संताप करु लागले. अशा निर्जनस्थळी बस सोडुन हा निघुन गेला. काही म्हणाले 'चला हो, त्याला राहु द्या' वगैरे वगैरे.
       इकडे म्हातारीने त्या वाहकाला विचारले, 'बा तुझे नांव काय रे?'
     'तुला काय करायचे आजी माझ्या नांवाशी... मी महादू शिंदे.'
      'कोणत्या डेपोमध्ये आहे?'
     वाहक- 'चोपडा.'
     आजी - 'मुलेबाळे?'
     वाहक- 'आहेत दोन.'
     तेवढयात आजीचे पडक्या अवस्थेतील जीर्ण घर आले. दोन चार कुत्रे भुंकत पळाले. वाहकाला म्हातारीने कुलुपाची किल्ली दिली. त्याने कुलुप उघडुन दिले व तसाच धावत पळत बसच्या दिशेने माघारी पळाला.
      ती म्हातारी त्या घरात व गांवात एकटी राहत होती. तीला जवळचे म्हणुन कोणीच नातेवाईक नव्हते. तीच्यावर प्रेम करणारे चौकशी करणारे काळजी करणारे असे कोणीही तीच्या आजुबाजुला फिरकत नसे.
      तीही फारशी मग कोणाच्या जवळ जात नसे. कोणी जवळ येण्याचा प्रयत्न केला की तीला वाटायचे, हा स्वार्थी आहे. याचा माझ्या इस्टेटवर डोळा आहे. ते वयोमानानुसार तीला वाटणे स्वाभाविक व सहजही होते.
      गांवा लगतच ज्याला ग्रामीण भाषेत पांढरी म्हणतात तसे चार बिघा शेताचे तुकडे तीच्या मालकीचे होते. ते दरवर्षी कोणास तरी पेरण्यास देऊन त्या मोबदल्यात पैसे घेवुन आपला उदरनिर्वाह करायची.
      असेच एक दिवस म्हातारी थोडी जास्तच आजारी पडली. तीने गांवचे सरपंच व ग्रामसेवक यांना बोलाविणे पाठविले. त्यांनाही म्हातारीने असे अचानक का बोलाविले म्हणुन नवल वाटले.
      ते घरी आले. म्हातारी उठुन बसली व त्यांना म्हणाली, 'दादा कागद काढा. हे दोन अडीच तोळे सोने, माझी पांढरी व हे घर महादू शिंदे, कंडक्टर, चोपडा याच्या नावावर लिहुन द्या व हे वीस हजार रुपये जमविले आहेत त्यातुन मी मेल्यावर क्रियाकर्म करा. मी जास्त दिवस काही जगणार नाही.
      सरपंच व ग्रामसेवक अबोल झाले. काय भानगड आहे, कोण हा महादू शिंदे कंडक्टर? त्याला सर्व म्हातारी का देतेय? असेल काही नाते असा विचार करून त्यांनी म्हातारीचा निरोप घेतला.
      दोन तीन दिवसात म्हातारी वारली. सरपंच व ग्रामसेवकाने तीच्या सांगितल्या प्रमाणे सर्व क्रियाकर्म पार पाडले. सर्व आटोपल्यावर मग त्यांनी महादू शिंदे कंडक्टरचा चोपडा बसस्थानकावर शोध घेतला. त्याला भेटुन सर्व वृत्तांत सांगितला. साधारण वर्षभरापूर्वीचाच बस मध्ये घडलेला प्रकार असल्यामुळे त्यालाही ते सारे आठविले. म्हातारीने त्याच्यासाठी केलेले ऐकुन तर त्याला रडुच कोसळले.
     त्याने ती सर्व घटना सरपंच व ग्रामसेवकाला सांगितली. त्यांना नवलही व आनंदही वाटला. त्यांनी वाहकाला ठरल्या तारखेला त्या गांवी येण्याचे आमंत्रण दिले.
      वाहक महादू शिंदे गावात आले तर शेकडो ग्रामस्थ जमलेले. सरपंचाने त्यांच्या गळ्यात फुलाचा हार घातला. वाजतगाजत त्याला गांवाच्या ग्रामपंचायत कार्यालयात नेले. तेथे सर्वजन विराजमान झाल्यावर तो शेताचा व घराचा नावावर करण्याचा कागद व म्हातारीने दिलेले अडीच तोळे सोने त्याच्या समोर ठेवले.
      महादू शिंदेंच्या डोळ्यातुन अश्रुच्या धारा लागल्या. मी केलेल्या एका छोटयाश्या मदतीची म्हातारी एवढी किंमत देवुन गेली. त्याला काहीच सुचत नव्हते.
     बाजुलाच मुलांचा गलका त्याला ऐकु येत होता. त्याने विचारले, 'येथे शेजारी हायस्कुल भरते का?'
       सरपंचाने, 'हो, शाळेला स्वतःची जागा व इमारत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या या तोडक्या मोडक्या खोल्यांमध्ये वर्ग भरतात.' असे सांगितले.
      वाहक म्हणाला, 'का? गावठाणची जागा किंवा जवळपासच्या एखाद्या शेताचा तुकडा नाही का कोनी देत शाळेसाठी?'
      सरपंच म्हणाले, 'गांवठाणची जागा नाहीच व शेत देण्यास कोणीच तयार होत नाही.'
      वाहक महादू शिंदे ताडकन खुर्चीवरुन उठले व टेबलावरील शेताचा कागद सरपंचाला देत म्हणाले, 'हे घ्या शाळा बांधण्यासाठी शेत. हे घर पण विक्री करा. त्यातुन येणारे पैसे बांधकामाला वापरा आणि हे सोने हे विकुन शाळेला छान दरवाजा बांधा व त्यावर म्हातारीचे सुंदर नांव टाका.'
     टाळ्यांचा कडकडाट झाला. सरपंच व ग्रामस्थ भारावुन गेले. 'दरवाज्यालाच काय हायस्कुलला म्हातारीचे नांव देवु.'
      वाहक महादू शिंदे यांनी त्यांचे आभार मानुन निरोप घेतला. त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे सारा गाव बघतच राहिला. झोळी फाटकी असुन सुद्धा गांवाचे सारे काही तो गांवालाच देवुन गेला होता व एक प्रकारे त्या म्हातारीच्या नावाला अमर करून गेला.
      बंधुनो, एखाद्याला केलेली छोटीमोठी मदत कधीही वाया जात नाही. त्याच्या काळजात ती घर करुन जाते. समोरचा कृतघ्न झाला तरी चालेल पण आपण मदत करण्याचा स्वभाव कधीच सोडु नका.
मनवंतराव साळुंखे,*
 धाबे, पारोळा.
(आवडल्यास शेअर करतांना कृपया लेखात कुठलाही बदल न करता मुळ लेखकाच्या नावासहच शेअर करा ही विनंती- मेघःशाम सोनवणे.)
श्री. मधुकर पोतदार, नाशिक, यांच्या संग्रहातून.
**
👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌👌👌👌👌

कथा क्रमांक दोन

      *📚 शेवटी मी आई आहे!📚*━━━━━━━━━━━━━━━━  

💢एलीस हि महाराणी व्हिक्टोरिया यांची मुलगी होती. लग्नानंतर तिला मुलगा झाला. मुलाची देखभाल करण्यासाठी राजवाड्यात नोकर-चाकरांची काही कमी नव्हती. तरीही एलीस लहान बाळाची खूप काळजी घेत असे. सतत त्याच्या सोबत राहून ती त्याची देखभाल करीत असे. तो क्षणभर जरी दृष्टीआड झाला तरी तिला चैन पडत नसे. तिचा मुलगा मग १० वर्षाचा झाला. एके दिवशी त्याला संसर्गजन्य रोगाची लागण झाली. तज्ञानी त्याच्यावर उपचार सुरु केले. डॉक्टरांनी तपासणी करून सल्ला दिला कि काही दिवस सर्वांनी याच्यापासून दूर राहावे कारण हा अतिशय जीवघेणा संसर्ग असून तो श्वासोच्छवासाद्वारे फैलावू शकतो. त्यामुळे त्याच्या संपर्कात कुणीही येवू नये. या डॉक्टरांच्या सांगण्यामुळे सर्व नोकरांमध्ये भीती पसरली. कोणीही नोकरचाकर किंवा कुणीच त्याच्या खोलीत जायला तयार नसे. परंतु एलीसने त्या परिस्थितीतही मुलाला एकटे सोडले नाही.ती त्याची सेवा करतच राहिली.एके दिवशी मुलगा म्हणाला,"आई ! बरेच दिवस झाले तू माझी पापी घेतली नाही, मला कुशीत घेतले नाही." शेवटी आईचेच हृदय ते !! एलीसने मुलाला जवळ घेतले व मायेने त्याला कुरवाळले, त्याची पापी घेतली. बरेच वेळ ती त्याच्या सानिध्यात राहिली. नको तेच झाले, तिच्या मुलाच्या संपर्कात राहण्याने तीपण त्या रोगाच्या तावडीत सापडली. नंतर अनेकांनी तिला विचारले,"हा रोग जीवघेणा असतानासुद्धा व तुला ते माहित असताना ही तू मुलाला का जवळ केले? असे करणे म्हणजे वेडेपणा आहे असे तुला वाटले नाही का?" एलीसने उत्तर दिले,"मी आई आहे. मी माझ्या मुलाला तडफडत कसे एकटे सोडू? तो तळमळत होता आणि मी आनंदात कसे राहू? मला माझे बाळ महत्वाचे आहे." 

शेवटी मुलासोबतच एलीसचेही निधन झाले. एलीसच्या समाधीवर इतकेच लिहिले होते,

===============================
""""""""""""" शेवटी मी आई आहे !!""""""""""""""""""
===============================

तात्पर्य-आई हे पृथ्वीतलावरचे ईश्वराचे रूप आहे. जे मुलांच्या सुखासाठी तळमळते, प्रसंगी जीवही देते, सर्वस्वाचा त्याग करते. त्या मातेला मग ती आपली असो किंवा दुसऱ्याची माता तिला दुखावले जाणार नाही याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे.




ही पोस्ट तुमच्या कमीत कमी दहा मित्रांना शेअर करा ही नम्र विनंती व ब्लॉग ला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करून तुमचे मतही कळवा.

शुक्रवार, २६ जून, २०२०

जून २६, २०२०

जीवनसमुद्र


प्रत्येकाचे आयुष्य वेगळे आहे ;व त्याला येणारे अनुभवही वेगळे असतात ;परंतु त्या अनुभवातून माणूस अधिक समृद्ध होत जातो. तो कसा हेच आपण ह्या लेखामध्ये बघूया.
@@@@@@@@@@@@@
  
    समुद्राच्या किना-यावर जेव्हा एक लाट आली तेव्हा जाताना एका लहान मुलाची एक चप्पल आपल्या सोबत घेऊन गेली..... *तो मुलगा वाळुवर बोटाने लिहीतो कि*

*"समुद्र चोर आहे".*

*त्याच समुद्राच्या दुस-या तटावर मासे पकडणारा खुप मासे पकडतो तो वाळुवर लिहीतो कि*

*"समुद्र पालनकर्ता आहे".*

*एक युवक समुद्रात बुडून मरतो तेव्हा त्याची आई वाळुवर लिहीते*

*"समुद्र खुनी आहे".*

*एका दूस-या किना-यावर एक गरीब वृध्द वाकड्या कंबरेने फिरत असतो त्याला एका मोठ्या सीपमध्ये एक अनमोल मोती सापडतो तर तो वाळुवर कसा लिहीतो*

*"समुद्र दाता है".*

*अचानक एक विशाल लाट येते आणि सर्व लिहीलेले पुसले जाते*
*लोकं काही म्हणू द्या*... *परंतु अथांग, विशाल समुद्र आपल्या लाटांमध्ये मस्त राहतो*... *आपली भरती आणि ओहोटी तो आपल्या पध्दतीने सिध्द करीत असतो*

      *जर अथांग समुद्र बनायचे असेल तर कोणाच्या निर्णयावर लक्ष न देता जे करायचे ते आपल्या पद्धतीने करायचे...*
*भूतकाळातील विचार करत बसू नये*. *यश अपयश, मिळणे न मिळणे, सुख-दुख, या सगळ्यात मन विचलित होऊ देऊ नये*.
*जर जीवन सुख शांति ने भरलेले असते तर मनुष्य जन्माला येताना रडला नसता*

जन्माला येताना रडणे आणि मेल्यानंतर रडवणे यामधील संघर्षमय वेळेलाच कदाचित जीवन म्हणतात...
👌👌👌👌👌👌👌👌
☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️☺️&&&&&&&&&&&&&&&
        थोडं भान ठेवा

सहजच...
दुसऱ्या साठी करताना सुद्धा आपल्याला झेपेल इतकंच करावं..अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो..झटतो.पण प्रत्येक वेळी आपलीच जबाबदारी म्हणून कर्तव्य म्हणून आपण पुढे पुढे करतो..कोणताही स्वार्थ नसतांना.. मतप्रवाह तर दोन्ही बाजूंनी असतात. आपण ज्याच्या साठी करतो त्याला वाटतं " आमच्यासाठी केलं तर काय फरक पडतो ? ..यांचं कर्तव्ये च आहे ते..
  करणाऱ्या चा हेतू स्वच्छ असतो.. आपल्या प्रयत्नाने कुणाचं तरी भलं व्हावं हा निर्मळ प्रयत्न असतो..गैरसमज हा फार मोठा शत्रू असतो तो या निर्मळ भावनेलाच धोका निर्माण करतो...
   ज्याला समजून घ्यायचंय तो समजूतदार पणे गोष्टी हाताळतो...ज्याला समजून उमजुन घ्यायचंच नाही तो शब्दाचा किस पडतो...शब्दांनी घायाळ करतो...नात्यांची खरी मेख तर इथेच आहे...माझं माझं करता करता आपण आपल्यांना दुखावतो..घालून पाडून बोलतो..परिणाम फक्त वाईटच होतात...संबंध दुरावले जातात..आपुलकीतला रस संपत जातो...उरते ती फक्त निराशा...हल्ली तर नातं आर्थिकदृष्टीतच बांधलेली दिसतात..जणू पैसा म्हणजे सर्वस्व...अमक्याने अमक्या कार्यक्रमात आहेर दिला नाही म्हणून राग...रस्त्याने जाताना ओळखीचे बोलले नाही हा राग...एखाद्या प्रसंगांत मागे उभे राहिले नाही म्हणुन राग...निर्व्याज प्रेम ..जिव्हाळा..काळजी.. कुटुंबातील प्रेम हे सगळंच विरळ होत चाललंय ...
एकमेकांना टाळ्या देत हास्याची कारंजी उडण लुप्त होतंय...मामा न मामाचा गावी जाण ..भाऊ बहिणीचं लुटुपुटू भांडण..लग्न कार्यातली एकत्रित मजा अनुभवणं...भावंडांच्या मागे उभं राहणं...नातेवाईकांमध्ये मनमुरादपणे फिरणं हेही कालांतराने कमी होत जाईल असा वाटतं..अर्थात काही अपवाद आहेतही.
       खरं बघितलं तर किती दिवस आपण जगणार याची काहीच शाश्वती नाही..सोबतीला काय घेऊन जाणार हेही माहीत नाही..जिव्हाळ्याची अगदी कमी माणसं असतात जी आपली काळजी करतात.. जीव ओतून आपल्याला घडवतात.. 
इमेज शेअर करू शकता
वेळप्रसंगी आपल्याला भल्यासाठी साठी रागावतात पण परत माया करतात..त्यांचा विसर कधीच पडु देऊ नये..कोणाला व्यक्त होता येतं तर कोणाला नाही..हा समजूतदार पणा अंगी यायला हवा..जगण्यासाठी दिवस फार कमी आहेत..तक्रारी मात्र त्यानंतर ही सुरूच असणार..दुसऱ्या ला दुःखी करून आपण सुखी व्हावं ही भावना किती बोचरी आहे...आयुष्य फक्त धावण्याची स्पर्धा नाही...मिळेल ते अनुभव ..मिळेल ती उपेक्षा ..मिळेल ते प्रेम...आदर..मिळेल ती अनुभूती घ्यावी... प्रवाहात मुक्त जगावं..जीवनात सगळेच रंग हवेत...निराशेतही आशा आहेच की...त्या ऊर्जेची वाट बघायची..कोणा वाचून कोणाचं अडत नसतंच खरं तर..पण आनंद मात्र घेता येत नाही तो आपल्या माणसांशीवाय...कौतुक करणार..पाठीवर हात ठेवणार कुणीतरी हवंच ना....आपल्या दुःखा च्या प्रसंगी कोणच्या डोळ्यात अश्रू येणारी... आपलं यश डोळे भरून बघणारी माणसं ही हवीतच अवतीभवती... नाहीतर यश ..पैसा खूप मिळवला पण माणसंच नसतील प्रेम करणारी तरी त्या सारखा दरिद्री तोच...खरं ना..??







पोस्ट वाचून झाल्यावर नक्की शेअर करा व इतरांनाही वाचनाचा आनंद घेऊ द्या तसेच ब्लॉग ला सबस्क्राइब करायला विसरू नका म्हणजे नवीन पोस्ट टाकल्यानंतर लगेच तुम्हाला माहिती मिळेल धन्यवाद.   😊....


गुरुवार, २५ जून, २०२०

जून २५, २०२०

पुत्र सुख ( बालगणेश)- तडजोड


पुत्र सुख कशात आहे ? हा एक न सुटलेला प्रश्न आहे कारण की बऱ्याच जणांना अनेक मुलं असूनही त्यांना पुत्र सुख प्राप्त झालेलं नाही व काही निपुत्रिक असूनही आपल्या वागण्याने व आत्मसंयमाने त्यांनी पुत्रसुख मिळवले आहे ते आपण या लेखामध्ये बघूया .

लेख आवडल्यास नक्की शेअर करा व सबस्क्राईब करा


🌹 *पुत्रसुख* ...! 🌹

कंडक्टरनं एस.टी.चं दार उघडलं..आणि सामंतकाका दारापाशी आले.हातात एक गोंडस बाल गणेशाची मुर्ती...कंडक्टरनं ते पाहिलं आणि काकांना आधार देत आंत घेतलं.मागून दोन पॅसेंजर चढले..! एस.टी.सुरु झाली.कंडक्टरनं ड्राईव्हरला ओरडून सांगितलं, " थांबा जरा ..गणपती मुर्ती आहे....!" त्यानं गाडी थांबवली.लोकांनी मागे वळून मुर्तीकडं पाहिलं.. ती मूर्ती इतकी सुंदर होती की  तिचे ते गोंडस रुप पाहून काही जणांचे हांत नकळत जोडले गेले.कंडक्टरनं शेवटी सामंतकाकांना आपल्या शेजारी बसायला सांगितलं ..डबलबेल दिली.एस.टी.सुरु झाली..!
कंडक्टर इतरांची तिकीटं काढून येऊन काकांपाशी बसला...! 
काकांच्या पँटच्या खिशात पैसे होते.पण मांडीवर मुर्ती असतांना त्यांना पैसे काढता येईनात तिकीटासाठी.त्याची ती धडपड पाहून 
कंडक्टर म्हणाला, "राहू दे काका.उतरतांना द्या.एस.टी.थांबवून माझ्या या सीटवर मुर्ती ठेऊ.तेव्हा द्या."
थोडं अंतर जाताच कंडक्टरनं विचारलं, "काका एक विचारु? तुमच्या गावात गणेशमुर्ती मिळत असेलच ना ? मग दुस-या गावांतून ही मूर्ती घेऊन येणं ;तेही एस.टी.च्या प्रवासाची दगदग करुन? "
सामंतकाकांनी स्मित केलं..मग म्हणाले, " आमच्या गांवात मिळतात मुर्त्या..पण अशी नाही ..ही मुर्ती पाहिलीत नं? कशी गोंडस आहे? अगदी जिवंत वाटते..अगदी लहान बाळच..!"
कंडक्टरनं होकारार्थी मान हलवली व अगदी अंत:करणापासून पुन्हा हांत जोडले..हलकेच स्पर्शही केला.
" आम्हा नवरा-बायकोला मूलबाळ नाही.सगळे उपाय करुन थकलो..मग प्रारब्ध म्हणून सोडून दिलं..माझी पत्नी या गावी पंधरा वर्षापूर्वी आली होती कामानिमित्त. तिनं अशी मुर्ती इथं पाहिली अन् तिचं वात्सल्य जागं झालं जणूकाही ..तिचे डोळे भरुन वाहू लागले.तोंडातून नकळत शब्द फुटले "माझं बाळ "..हे असं घडल्यापासून..ह्या गांवातून मुर्ती नेणं हा प्रघात सुरु झाला.हिला सांधेदुखीनं आता प्रवास झेपत नाही. म्हणून मी आणतो " 
कंडक्टर हे ऐकून स्तिमीत झाला..थोड्यावेळानं त्यानं विचारलं " पण काका तुमच्या तिथं दाखवून घ्यायची, मोल्ड बनवून गावांत .."
" ते ही केलं पण ..जास्त मुर्त्या केल्या तरच त्यांना इंटरेस्ट..आणि असे भाव येतीलच शाश्वती नाही " 
हे संभाषण एव्हाना आजूबाजूचे ऐकत होते..एका स्त्रीनं विचारलं "काका मग विसर्जित करायचीच नाही मुर्ती ..!" 
सामंतकाका फिकटसे हसले व म्हणाले," विरहामुळं प्रेम उदंड पाझरतं तिचं..!आत्ताही दारात वाट पहात बसली असेल.रांगोळी काय ..आंब्याची तोरणं काय..!भाकरतुकडा काय..,दृष्ट काढण्यासाठी ..!! त्याच्या कपड्यांची छोटी बॅग आहे.छोटा तांब्या भांडं काय.....विचारु नका..मला तिचं ते सुख हिरावून घ्यायचं नाहीए. "
यांवर कुणाचे डोळे पाणावले.कुणी स्मित केले..नंतर मौन राहिलं.काकांचं गांव आलं.एका व्यक्तीनं पुढं होऊन मुर्ती हातात घेतली..म्हणाला "काका तुम्ही तिकीट काढा.तोपर्यंत धरतो मी.." काहीजण त्या मुर्तीकडं जवळून पहात राहिले..आता लोकांची नजरच बदललेली....
सामंतकाकांनी कंडक्टरला पैसे दिले " दिड तिकिट द्या.एक हाफ आणि एक फुल "
कंडक्टरनं आश्चर्यानं विचारलं " दिड ? तुम्ही तर एकटेच आला आहात नं? "
काकांनी स्मित केलं, " दोघं नाही का आलो? मी आणि हा बालगणेश आमचा? " 
हे ऐकून सगळे एकमेकांकडं पाहू लागले..!
काका म्हणाले, " असे कोड्यात का पडलांत बरें? त्याला नमस्कार केलात.त्याला आपला देव मानता..व प्राणप्रतिष्ठेपूर्वी तो केवळ माती आहे का हो? तो आपल्यापेक्षा जास्त जिवंत नाहीए का? तुमचा भाव जागृत झाला नं? आपणच त्याला मातीची मुर्ती याच भावाने भजतो;पूजतो..अगदी पूजा केल्यावरही ...
पण त्याला एकाचीच गरज प्रेमाची..आपल्या अलिंगनाची ..द्या दिड तिकिट..!'' हे बोलतांना काकांचा गळा दाटून आला होता.कंडक्टरनं दिड तिकीट दिलं..!
सामंतकाका जेव्हा एस.टी.तून उतरले तेव्हा एस.टी.तील प्रवाशांचे डोळे पाणावलेले व हांत जोडले गेले ...
अगदी अनाहूतपणे ...!!


चैनलला नक्की सबस्क्राईब करा. पोस्ट शेअर करायला अजिबात विसरू नका

👨🏻‍🦳👨‍👩‍👧‍👦🙆🏻‍♂ 
पोस्ट आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा व त्यांनाही वाचनाचा आनंद घेऊ द्या . सबस्क्राइब करायला विसरू नका आपल्या व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम इत्यादी सोशल मीडियावर नक्की शेअर करा धन्यवाद

                                 - 
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

बुधवार, २४ जून, २०२०

जून २४, २०२०

मी कसा आहे

www.readfist.blogspot.com    कृपया लेख पूर्ण वाचा आपले सर्व व्यर्थ अहंकार गर्विष्ठपणा नक्की गळून पडेल याची 100% खात्री देतो                                                                                      *मी कसा आहे?*


         आपल्याच देशातल्या एका सुप्रसिद्ध उद्योगपतींची ही कहाणी आहे. एक दिवस हे उद्योगपती सकाळी तयार होऊन कामाला जाण्यासाठी निघाले होते. तेवढ्यात त्याच्या समोर घरमालक येऊन उभा राहिला. "आज कसं येणं झालं ?" उद्योगपतींनी त्या माणसाला विचारले. कामाच्या नादात ते विसरून गेले होते की,समोर त्यांचा घरमालक उभा आहे.घरमालक विनम्रपणे म्हणाला, "मी भाडं वसूल करायला आलो आहे. दर महिन्याला तुम्ही पाठवता. यावेळेला कामाच्या गडबडीत राहन गेलेलं दिसतं." उद्योगपती वरमले आणि म्हणाले, "हे घ्या तुमचं घरभाडं. उशीर झाल्याबद्दल क्षमा करा." एवढे बोलून उद्योगपतींनी खिशात हात घालून पैसे काढले व घरमालकाला दिले.घरमालक   उद्योगपतींलना म्हणाला," तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून भाड्याच्या घरात राहता,याचे मला आश्चर्य वाटते." यावर उद्योगपती हसले व
म्हणाले, "मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे याला महत्त्व आहे. माझ्या
काही तत्त्वांमुळे मी भाड्याच्या घरात राहतो." घरमालक काही समजला नाही.तो भाडे घेऊन निघून गेला.

     हा प्रसंग त्या उद्योगपतींचा ड्रायव्हर पाहत होता. उद्योगपती गाडीत बसले व आपल्या परदेश प्रवासासाठी तिकीट काढायला एका एअरलाईनच्या  ऑफिसात गेले. तिथे बरीच गर्दी होती. उद्योगपती एका सामान्य माणसासारखे रांगेमध्ये उभे राहिले, तेवढयात एअरलाईनच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहिले, ते घाईने पुढे आले आणि म्हणाले,"सर, तुम्ही रांगेत का उभे आहात? आम्ही तुमचे तिकीट काढून तुम्हाला आणून देतो. तुम्ही समोरच्या सोफ्यावर आरामात बसा.तुम्ही रांगेत उभे राहून आम्हाला लाजवू नका.उद्योगपती म्हणाले, "आत्ता मी उद्योगपती म्हणून इथे उभा नाही, तुम्ही एवढी धावपळ करण्याची आवश्यकता नाही. उद्योगपती हे माझ्या नावासमोर लावलेले विशेषण आहे. मी कोण आाहे यापेक्षा मी कसा आहे? हे अधिक महत्त्वाचे आहे." एअरलाईनचा स्टाफ हे उत्तर ऐकून चकित झाला. 

       तिकीट काढून उद्योगपती आपल्या ऑफिसकडे निघाले. रस्त्यात त्यांना अनेक माणसे धावतपळतआपापल्या कार्यालयाकडे जाताना दिसली. त्यांना लाज वाटली की, आपण एवढ्या अलिशान गाडीमधून एकटे प्रवास करीत आहोत. सामान्य माणसे मात्र किती कष्टाने ऑफिसला पोहोचतात. त्या दिवसापासून त्यांनी आपल्या गाडीत लोकांना लिफ्ट द्यायला सुरुवात केली. लिफ्ट मिळालेल्या लोकांचा आनंद पाहून उद्योगपतींना समाधान वाटायचे.

       एके दिवशी हे उद्योगपती परदेश प्रवासासाठी निघाले होते.त्या दिवशी एक प्रसंग घडला. हवाई सुंदरीच्या हातून त्यांच्या अंगावर चुकून पेय पडले.त्यामुळे ती घाबरली.तिने पाणी व कपडा आणून त्यांचा ड्रेस स्वच्छ केला.ती त्यांना ओळखत असल्याने तिने शतदा त्यांची क्षमा मागितली. तिला भीती वाटत होती की, या चुकीबद्दल तिला शिक्षा घडणार उद्योगपतींनी तिच्याकडे पाहिले व तिला विचारले, "तू माझ्या अंगावर काय सांडलेस ?'" हवाई सुंदरी भीत भीत म्हणाली, "माझ्या हातून तुमच्या कपड्यांवर फळांचा रस सांडला, मला क्षमा करा.उद्योगपती हसले व म्हणाले, "पुढच्या वेळेला माझ्या अंगावर सोडा,व्हिस्की सांड.", उद्योगपतींचे बोलणे ऐकून हवाई सुंदरी खुदुकन हसली. तिच्या मनावरचा सगळा ताण एका क्षणात उतरला.

असे अनेक प्रसंग उद्योगपतींच्या ड्रायव्हरने पाहिले होते.त्याची उत्सुकता चाळविली गेली. तो उद्योगपतींना म्हणाला, "साहेब, तुम्हाला इतके साधे राहणे व वागणे कसे काय जमते ?आम्ही तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतो. तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून तुम्ही किती साधे जगता??."
उद्योगपती म्हणाले, "अरे, मी लहान असताना फार उद्दाम होतो. मला सांभाळायला एक दाई होती. एकदा माझ्या मनाविरुद्ध काही घटना घडली तेव्हा मी तिला चक्क लाथ मारली होती. ते पाहून माझे वडील एवढे संतापले होते की, त्यांनी मला बदडून काढले. ते मला म्हणाले होते, *"तू कोण आहेस हे बिलकूल महत्त्वाचे नाही; पण तू कसा आहेस हे फार महत्त्वाचे आहे.आयुष्यभर माझे हे वाक्य स्मरत राहा."*

"तेव्हापासून मी वडिलांचे शब्द स्मरत आलो आहे. मला हे पटले आहे की,
खरोखरच आपण कोण आहोत हे महत्त्वाचे नसतेच. आपण कसे आहोत यावर आपली किंमत ठरते. जगात जेवढे थोर पुरुष होऊन गेले, सगळे साधेच होते."

'या उत्तुंग उद्योगपतीचे नाव 

*रतन टाटा.* 

खरंच,जगात जेवढी उत्तुंग
माणसे होऊन गेली ती सगळी बोलायला, वागायला अत्यंत साधी कुठलीही गुंतागुंत नसलेली अशी असतात. खरेतर साधे राहणे, हेच कठीण असते. व्यक्तींच्या जीवनाचे आपण अनुकरण करायला हवे.    


   
कृपया पोस्ट वाचून झाल्यानंतर नक्की शेअर करा आपल्या फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप ग्रुप वर नक्की शेअर करा हो कमेंट करायला विसरू नका
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


मंगळवार, २३ जून, २०२०

जून २३, २०२०

तत्वनिष्ठ बाप...शरदराव

*कृपया कितीही Busy असाल तरी,*
*ही पोस्ट एकदा नक्की वाचा अगदी निवांत तुमच्या जिवनात 1000% फरक पडनार* 🙏
              पोस्ट चे लेखक माहीत नाहीत .
      
            *तत्त्वनिष्ठ*
 
"अहो ऐकलंत का? राहूलचा डबा नेऊन देता का जरा कंपनीत?"

"का राहूलने नेला नाही डबा?" शरदरावांनी विचारलं.

" आज राहूलच्या कंपनीचे चेअरमन येत आहेत म्हणून राहूल सकाळी सातलाच गेलाय कंपनीत."त्यामुळे सकाळी लवकर  डबा तयार नाही झाला.

"ठीक आहे. देतो मी नेऊन."
शरदरावांनी हातातला पेपर बाजूला ठेवला आणि ते कपडे घालण्यासाठी आतमध्ये गेले.
पुष्पाबाईंनी सुटकेचा निःश्वास सोडला.

शरदराव तयार झाले म्हणजे त्यांचा आणि राहूलचा झालेला वाद त्यांनी ऐकला नव्हता. वाद कसला, राहूलचं नेहमीप्रमाणे आपल्या वडिलांवर आगपाखड करणं आणि पुष्पाबाईंचं नवऱ्याची बाजू घेणं. विषयही तोच 'वडिलांनी आमच्यासाठी काही केलं नाही.' काय केल माझ्यासाठी बापाने हा चुकीचा समज त्याच्या मनात रुजला होता,

"आई माझ्या मित्राचे वडीलही शिक्षक होते, पण किती मोठा बंगला बांधलाय् बघ. नाहीतर नाना! अजूनही आम्हांला भाड्याच्या घरात ठेवत आहेत."
राहूल तावातावाने बोलत होता.

"राहूल तुला माहीत आहे की नाना घरात मोठे. त्यामुळे दोन बहिणी आणि दोन भावांची लग्नं त्यांनाच करावी लागली. शिवाय तुझ्या बहिणींची लग्नंही त्यांनीच केली. आपल्या शेताच्या कोर्टकचेऱ्या सुरू होत्या. अशा सगळ्या जबाबदाऱ्या होत्या. कुणी पार पाडल्या त्या?"

 "काय उपयोग झाला त्याचा?त्यांचे भाऊबहीण बंगल्यात राहात आहेत. कधीतरी वाटतं का त्यांना की आपला भाऊ आपल्यासाठी खस्ता खाताना साधं घर बांधू शकला नाही तर आपण त्याला घर बांधून द्यावं?"

क्षणभर पुष्पाताईच्या डोळ्यातून पाणी आले, काय बोलावं जन्म दिलेला मुलगा बापाने काय केले माझ्यासाठी विचारतोय . मग म्हणाल्या,
"तुझ्या वडिलांनी त्यांचं कर्तव्य केलं. भावाबहिणींकडून कधीही अपेक्षा बाळगली नाही."

"राहूल मुर्खा सारखे म्हणत होता बरं ते ठीक आहे. हजारो मुलांच्या नानांनी ट्युशन्स घेतल्या. त्यांच्याकडून जर फी घेतली असती तर आज नाना पैशात लोळले असते. आजकालचे क्लासवाले पाहा. इंपोर्टेड गाड्यांत फिरतात."

"हे तू बरोबर म्हणतो आहेस. पण नानांचं तत्त्व होतं, ज्ञानदानाचे पैसे घ्यायचे नाहीत म्हणून. या त्यांच्या तत्त्वामुळेच तर ते किती प्रसिद्ध होते. किती पुरस्कार मिळाले आहेत त्यांना कल्पना आहे तुला?"

ते ऐकताच राहूल एकदम संतापला. "काय चाटायचे आहेत ते पुरस्कार आई? त्या पुरस्कारांनी घर थोडीच बांधता येतं? पडले आहेत धूळ खात!कोणी विचारत नाही त्यांना!"

तेवढ्यात दार वाजलं. राहूलने दार उघडलं तर शरदराव उभे होते. वडिलांनी आपलं बोलणं ऐकलं तर नाही ना या भीतीने राहूलचा चेहरा उतरला. पण शरदराव न बोलता आत निघून गेले आणि तो वाद तिथंच संपला.
हे होते पुष्पाताई व राहूलचे कालचे  भांडण , पण आज 
शरदरावांनी सायकलला डबा अडकवला आणि भर उन्हात ते औद्योगिक वसाहतीतल्या राहूलच्या कंपनीकडे निघाले. सात किलोमिटरवरच्या कंपनीत पोहचता पोहचता त्यांना चांगलीच धाप लागली होती. कंपनीच्या गेटवर पोहचल्यावर सिक्युरिटी गार्डने त्यांना अडवलं.

"राहूल पाटील साहेबांना डबा द्यायचा होता. जाऊ का आत?"

"आता नाही देता येणार.." गार्ड म्हणाला, "चेअरमनसाहेब आलेत. त्यांच्यासोबत मिटींग सुरू आहे. कोणत्याही क्षणी ते मिटींग संपवून बाहेर येतील. तुम्ही बाजूला थांबा. चेअरमनसाहेबांना तुम्ही दिसायला नको."

शरदराव थोड्या दूर अंतरावर उन्हातच उभे राहिले. आजूबाजूला कुठेही सावली नव्हती. थोडा वेळ म्हणता म्हणता एक तास उलटून गेला. पाय दुखायला लागले म्हणून शरदराव तिथेच एका तापलेल्या दगडावर बसणार तोच गेटचा आवाज आला. बहुदा मिटींग संपली असावी.

चेअरमनसाहेबांच्या पाठोपाठ अधिकारी आणि त्यांच्यासोबत राहूलही बाहेर आला. उभ्या असलेल्या वडिलांकडे पाहून तो मनात चरफडला.

चेअरमनसाहेबांनी गाडीचं दार उघडलं आणि बसता बसता त्यांचं लक्ष शरदरावांकडे गेलं. गाडीत न बसता ते तसेच बाहेर थांबले.

"ते समोर कोण उभे आहेत?" त्यांनी सिक्युरिटीला विचारलं.

"आपल्या राहूल साहेबांचे वडील आहेत. जेवणाचा डबा द्यायला आलेत." सिक्युरिटीने घाबरल्या आवाजात सांगितलं.

"बोलवा त्यांना."

नको ते घडलं होतं. राहूलच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. संताप आणि भीतीने डोकं फुटेल असं त्याला वाटू लागलं.

सिक्युरिटीने आवाज दिल्यावर शरदराव जवळ आले. चेअरमनसाहेब पुढे होऊन त्यांच्याजवळ गेले.

"तुम्ही पाटील सर ना? डी.एन. हायस्कूलमध्ये तुम्ही शिक्षक होता?"

"हो. तुम्ही कसं ओळखता मला?"

काही कळायच्या आत चेअरमनसाहेबांनी शरदरावांचे पाय धरले. सगळे अधिकारी आणि राहूलही ते दृश्य पाहून अवाक् झाले.

"सर, मी अतिश अग्रवाल. तुमचा विद्यार्थी होतो. बघा तुम्ही मला घरी शिकवायला यायचात."

"हो. हो. आठवलं. बाप रे बरेच मोठे झालात की तुम्ही..."

चेअरमन हसले. मग म्हणाले, "सर तुम्ही इथे उन्हात काय करताय? चला आतमध्ये बसू. खूप गप्पा मारायच्यात तुमच्याशी. सिक्युरिटी तुम्ही यांना आत का नाही बसवलंत?" सिक्युरिटीने शरमेने मान खाली घातली.

ते पाहून शरदरावच म्हणाले, "त्यांची काही चूक नाही. तुमची मिटींग चालू होती. तुम्हांला त्रास नको म्हणून मीच बाहेर थांबलो."

"ओके... ओके...!"
चेअरमनसाहेबांनी शरदरावांचा हात धरला आणि ते त्यांना आपल्या आलिशान चेंबरमध्ये घेऊन गेले. "बसा सर." आपल्या खुर्चीकडे बोट दाखवत चेअरमन म्हणाले.

"नाही. नाही. ती खुर्ची तुमची आहे." शरदराव गडबडून म्हणाले.

"सर, तुमच्यामुळे ती खुर्ची मला मिळालीय्. तेव्हा पहिला हक्क तुमचा."

चेअरमनसाहेबांनी बळजबरीनेच त्यांना आपल्या खुर्चीत बसवलं.

"तुम्हांला माहीत नसेल पवार सर.." जनरल मॅनेजरकडे पाहत चेअरमन म्हणाले, "पाटील  सर नसते तर आज ही कंपनी नसती आणि मी माझ्या वडिलांचं धान्याचं दुकान सांभाळत बसलो असतो."

राहूल आणि जी.एम. दोघंही आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिले.

"शाळेत असताना मी अतिशय 'ढ' विद्यार्थी होतो. कसाबसा ढकलत शाळेने मला नववीपर्यंत आणलं. शहरातल्या सर्वोत्तम क्लासेसमध्ये मला टाकलं गेलं. पण मला शिकण्यातच गोडी नव्हती. त्यातून श्रीमंत बापाचा लाडका लेक. दिवसभर शाळेत माऱ्यामाऱ्या करायच्या. आणि संध्याकाळी क्लासेस चुकवून मुव्ही पाहायच्या हे माझे उद्योग. आईला ते सहन होईना. त्या वेळी पाटील सर कडक शिस्तीचे आणि उत्कृष्ट शिकवणारे म्हणून प्रसिद्ध होते. आईने त्यांच्याकडे जाऊन मला शिकवण्याची विनंती केली. पण सरांच्या छोट्याशा घरात बसायला जागा नव्हती, म्हणून सरांनी नकार दिला. आईने सरांच्या विनवण्या केल्या आणि आमच्या घरी येऊन शिकवायची विनंती केली. मागाल ती फी देण्याची तयारी दाखवली. सरांनी फी घ्यायला नकार दिला पण आढेवेढे घेत घरी येऊन शिकवायला तयार झाले. पहिल्या दिवशी सर आले. मी नेहमीप्रमाणे खोड्या करायला सुरुवात केली. सरांनी मला चांगलं बदडून काढलं. मी मुकाट्याने बसायला सुरुवात केली. तुला सांगतो राहूल पहिल्याच आठवड्यात मला अभ्यासात गोडी वाटायला लागली. नंतर तर अभ्यास केल्याशिवाय मला करमायचं नाही. सर इतके छान शिकवायचे इंग्लिश, गणित, सायन्स हे विषय जे मला कठीण वाटायचे ते खूप सोपे वाटायला लागले. सर कधी आले नाहीत तर मला अस्वस्थ वाटायचं. नववीत मी वर्गात दुसरा आलो. आईवडिलांना खूप आनंद झाला. मी तर हवेत तरंगत होतो. दहावीत मी सगळे क्लासेस सोडले आणि फक्त पाटील सरांकडे शिकू लागलो. आणि दहावीत मेरीटमध्ये येऊन मी सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच दिला."

"माय गुडनेस...! पण सर मग तुम्ही सरांना तरीसुद्धा फी दिली नाहीत?" जनरल मॅनेजरनी विचारलं.

"मी आईवडिलांसोबत सरांकडे पेढे घेऊन गेलो. वडिलांनी सरांना एक लाखाचा चेक दिला. सरांनी तो घेतला नाही. सर त्या वेळी काय म्हटले ते अजूनही माझ्या लक्षात आहे. ‌सर म्हणाले, 'मी काहीही केलेलं नाही. तुमचा मुलगाच हुशार होता. मी फक्त त्याला मार्ग दाखवला. आणि मी ज्ञान विकत नाही, मी ते दान करतो'. नंतर मी सरांच्या मार्गदर्शनाखालीच बारावीत परत मेरीटमध्ये आलो. पुढे बी. ई. झाल्यावर मी अमेरिकेत जाऊन एम.एस. केलं. आणि आपल्याच शहरात ही कंपनी सुरू केली. एका दगडाला सरांनी हीरा बनवलं. आणि मीच नाही तर सरांनी असे असंख्य हिरे घडवले आहेत. सर तुम्हांला कोटी कोटी प्रणाम...!!"

चेअरमनसाहेबांनी डोळ्यांत आलेलं पाणी रुमालाने पुसलं.
‌"पण कमालच म्हटली पाहिजे. बाहेर शिक्षणाचा आणि ज्ञानदानाचा बाजार भरलेला असताना एक रुपया न घेता हजारो विद्यार्थ्यांना शिकवणं, नुसतं शिकवणं नाही तर त्यांच्यात अभ्यासाची गोडी निर्माण करणं. व्वा सर, मानलं तुम्हांला..." शरदरावांकडे पाहत जी. एम. म्हणाले.

‌"अहो सर, ही माणसं तत्त्वनिष्ठ होती. पैशाची, मानसन्मानाची भुकेली नव्हती. विद्यार्थ्यांचं भलं व्हावं हा एकमेव उद्देश असायचा." चेअरमनसाहेब म्हणाले.

"माझे वडिलही त्यातलेच. 'एक वेळ उपाशी राहू, पण धान्यात भेसळ करून विकणार नाही' हे त्यांचं तत्त्व होतं. आयुष्यभर त्यांनी ते पाळलं. सचोटीचा व्यापार केला. त्याचा फायदा आज माझ्या भावांना होतोय."

‌बराच वेळ कुणी बोललं नाही. मग चेअरमननी शरदरावांना विचारलं, ‌"सर, तुम्ही घर बदललंय की त्याच घरात राहता?"

‌"त्याच जुन्या घरात राहतोय् सर!"
‌शरदरावांऐवजी राहूलनेच त्यांचं उत्तर दिलं. त्या उत्तरातील वडिलांविषयीची चीड चेअरमनसाहेबांच्या लगेच लक्षात आली.

‌"ठरलं तर मग. सर आज मी तुम्हांला गुरुदक्षिणा देणार आहे. याच शहरात मी काही फ्लॅटस् घेऊन ठेवलेत. त्यांतला एक थ्री बीएचकेचा फ्लॅट तुमच्या नावावर करतोय सर...!"

‌"काय्य?" शरदराव आणि राहूल एकाच वेळी ओरडले. ‌"नको नको. एवढी मोठी गुरुदक्षिणा मला नकोय." शरदराव निग्रहाने म्हणाले.

‌चेअरमनसाहेबांनी शरदरावांचे हात हातात घेतले. ‌"सर, प्लीज.. नाही म्हणू नका आणि मला माफ करा. कामाच्या व्यापात तुमची गुरुदक्षिणा देण्यात मी खूप उशीर केला."

‌मग राहूलकडे पाहत त्यांनी विचारलं, ‌"राहूल तुझं लग्न झालंय?"

‌"नाही सर, ठरलंय. पण जोपर्यंत मोठं घर होत नाही तोपर्यंत लग्न होणार नाही अशी सासरच्यांची अट होती. त्यामुळे अजून तारीख नक्की केली नव्हती आणि हाॅलही बुक केला नव्हता."

‌चेअरमननी फोन उचलला. कोणाशी तरी बोलले. मग समाधानाने फोन खाली ठेवून म्हणाले. ‌"तुमच्या मंगल कार्यालयाचं काम झालं. सागर लाॅन्सं माहित आहे ना?"

‌"सर, ते तर खूप महाग..."

‌"अरे, तुला कुठे पैसे द्यायचे आहेत? ‌अरे, सरांचे विद्यार्थी सरांसाठी काहीही करू शकतात. सरांनी फक्त शब्द टाकायला हवा. पण सर तत्त्वनिष्ठ आहेत ते तसं करणार नाहीत. या लाॅन्सचा मालक सरांचाच विद्यार्थी आहे. त्याला मी शब्द टाकला. नुसता हाॅलच नाही, तर जेवणासकट संपूर्ण लग्नच लावून द्यायची जबाबदारी त्याने घेतलीय... तीही मोठ्या आनंदाने. तुम्ही फक्त तारीख सांगा आणि सामान घेऊन जा."

‌"खूप खूप धन्यवाद सर!" राहूल अत्यानंदाने हात जोडत म्हणाला.

‌"धन्यवाद मला नाही तुझ्या वडिलांना दे राहूल! ही त्यांचीच पुण्याई आहे. आणि मला एक वचन दे राहूल, सरांच्या अंतिम श्वासापर्यंत तू त्यांना अंतर देणार नाहीस आणि त्यांना दुखावणार नाहीस. मला फक्त कळू दे तू त्यांना त्रास देतो आहेस. या कंपनीतून तुला डच्चू तर मिळेलच पण अख्ख्या महाराष्ट्रात तुला कुठे नोकरी मिळणार नाही याची मी व्यवस्था करीन." चेअरमन कठोर आवाजात म्हणाले.

‌"नाही सर. मी वचन देतो तसं होणार नाही." ‌राहूल हात जोडत म्हणाला.
‌संध्याकाळी राहूल घरी आला तेव्हा शरदराव पुस्तक वाचत होते. पुष्पाबाई जवळच भाजी निवडत होत्या. राहूलने बॅग ठेवली आणि शरदरावांचे पाय धरले.

‌"नाना, मी चुकलो. मी तुम्हांला वाटेल ते बोलत होतो. मला माहीत नव्हतं नाना तुम्ही इतके मोठे असाल."

‌शरदरावांनी त्याला उठवून छातीशी धरलं.

‌आपला मुलगा का रडतोय हे पुष्पाबाईंना कळेना. पण काहीतरी नक्कीच चांगलं घडलयं म्हणून तर बापलेकात प्रेम उमळून आलंय हे पाहून त्यांचेही डोळे अश्रूंनी भरून आले.
.....................................
*एक विनंती*
  ☝ *वरील कथा वाचल्यावर तुमच्या डोळ्यातुन अश्रुचा १ थेंब जरी ओघळला असेल तरच हि पोष्ट आपल्या स्नेही जनांना पाठवा ! ✍✍✍✍✍✍ आणि कृपा करुन आपल्या बापाला कधी कोणी विचारु नका काय केलेस काय कमवून ठेवले माझ्यासाठी , जे कमवायचे आहे ते स्व;ता कमवा, त्यांनी जे शिक्षण व संस्कार दिले आहेत ते तेच तुम्हाला कमवायला शिकवतील*
😊😊😊😊😊😊😊😊😊😊

 


कमेंट करायला विसरू नका व सबस्क्राइब करा
😊😊😊😊😊😊😊😊😊😊

रविवार, २१ जून, २०२०

जून २१, २०२०

दुर्लक्ष झालेला बाप

       आपल्या वडिलांचं घरात असणे किती महत्त्वाच आहे . हे वडील नसल्यावरच कळतं . पोस्ट पूर्ण वाचा म्हणजे वडिलांची किंमत कळेल.



            *वडील*

त्यांच्या खांद्यावर बसून
जग दिसतं आपल्याला नवं नवंच
आयुष्यभर घरासाठी
वडील होऊन राहतात कवच

सावरण्यासाठीच असतात
त्यांचे मजबूत हात
असतात वडील तोवर
जाणवत नाहीत आघात

ऊन वारा पाऊस झेलत
वडील लकाकी हरवून जातात
उडून जातात पाखरं तेव्हा
वडील एकाकी होऊन जातात

दाटून येतो कंठ गळ्यात
पण अश्रू पापणीतून गळत नाही
आपण वडील झाल्याशिवाय
मोठेपण त्यांचं कळत नाही
----------------------------------
               
          💐    वडील  💐
बायको "गोड बातमी" सांगते ते
   ऐकून टचकन डोळ्यात पाणी येते 
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••

   नर्सने ओंजळीत ठेवलेला काही 
   पौंडाचा जीव जबाबदारीच्या प्रचंड 
   ओझ्याची जाणीव करून देतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••

   बायकोबरोबर जागवायच्या रात्री 
   डायपर बदलणे आणि पिल्लाला 
   कडेवर घेऊन फेऱ्या मारण्यात 
   व्यतीत होउ लागतात,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••

   मित्रांबरोबरच्या पार्ट्या आणि नाके 
   नीरस वाटून संध्याकाळी पावलांना 
   घराची ओढ लागते,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••

   "लाईन कोण लावणार" म्हणत 
   सिनेमाची टिकिटे टेचात ब्लॅकने 
   खरेदी करणारा तोच जेव्हा शाळेच्या 
   फॉर्मच्या लायनीत पहाटे पासून 
   तासंतास इमानदारीत उभा रहतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••

   ज्याला उठवताना गजर हात टेकतात 
   तोच जेव्हा पिल्लाचा नाजुक हात किंवा 
   पाय झोपेत आपल्या अंगाखाली येऊ 
   नये म्हणून रात्रभर सावध झोपू लागतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••

   खऱ्या आयुष्यात एका झापडित 
   कुणालाही लोळवू शकणारा पिल्लाबरो-
   बरच्या खोट्या फाइटिंग मध्ये त्याच्या 
   नाजुक चापटीनेदेखील गडाबडा लोळतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••••

   स्वतः कमीजास्त शिकला असला तरी 
   पोराला "नीट अभ्यास कर रे" असे 
   पोट तिडकिने सांगू लागतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••••

   आपल्याच कालच्या मेहनतीच्या 
   जोरावर आपला आज मजेत जगणारा 
   अचानक पोराच्या उद्यासाठी आपलाच 
   आज कॉम्प्रोमाइज करू लागतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••••

   ऑफिसात अनेकांचा बॉस बनून 
   हुकुम सोडणारा शाळेच्या POS मध्ये 
   वर्गशिक्षिकेसमोर कोकरु बनून, 
   कानात प्राण आणून तिच्या इंस्ट्रक्शन्स 
   आज्ञाधारकपणे ऐकत असतो.
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••

   आपल्या अप्रेझल आणि प्रमोशन-
   पेक्षासुद्धा तो शाळेच्या साध्या 
   यूनिट टेस्टच्या रिझल्टची देखिल 
   जास्त काळजी करू लागतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••

   आपल्या वाढदिवसाच्या ट्रीट पेक्षा 
   पोराच्या बर्थडे पार्टीच्या तयारीत 
   तो गुंगुन जातो,
  तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••

   गाडीतून सतत फिरणारा तो 
   पोराच्या सायकलची सीट पकडून 
   सायकलच्या मागे धावू लागतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••

   आपण पाहिलेली दुनिया, केलेल्या 
   चूका पोराने करू नयेत म्हणून 
   प्रिचिंग सुरु करतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••

   प्रसंगी पोराच्या कॉलेज अडमिशनसाठी 
   पैशाची थैली सोडतो किंवा याचनेकरिता 
   "कॉन्टेक्ट्स" समोर हात जोडतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••

   "तुमचा काळ वेगळा होता, आता 
   जमाना बदलला, तुम्हाला काय कळ-
   णार नाही. This is generation gap!" 
   असे आपणच केव्हातरी बोललेले संवाद 
   आपल्यालाच ऐकू आल्यावर आपल्या 
   बापाच्या आठवणीने हळवा होऊन मना-
   तल्या मनात त्याची माफी मागतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••

   पोरगा शिकून परदेशी जाणार, 
   मुलगी लग्न करून परक्या घरी 
   जाणार हे दिसत असून त्याकरिता 
   स्वतःच प्रयत्न करतो 
   तेव्हा तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••

   पोर मोठी करताना आपण कधी 
   म्हातारे झालो हे लक्षात येत नाही 
   आणि लक्षात येते तेव्हा उपयोग नसतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••

   कधी पोरांच्या संसारात अडगळ बनून, 
   कधी आपल्या म्हातारीबरोबर वृद्धा-
   श्रमाची पानगळ बनून अगदीच नशीब-
   वान असला तर नातवंडांसमवेत चार 
   दिवस रमून•••••••कसेही असले तरी 
   भावी पिढीला भरभरून आशीर्वाद देत 
   कधीतरी सरणावर चढतो,
   तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••••!!

    •••••••तमाम वडिलांना समर्पित. ..!!

(संग्रहित)

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


                *BABA*
 
लहान असल्यापासून आई मुलांना 
सांगत असते.......

इथे जाऊ नको-------बाबा मारेल,
तिथे जाऊ नको------बाबा मारेल
झाडावर चढू नको---बाबा मारेल,
नदीकडे जाऊ नको--बाबा मारेल,
शाळेत जा नाहीतर--बाबा मारेल

अभ्यासाला बस नाही तर
.............................बाबा मारेल
हे करू नको नाही तर........................ बाबा मारेल,
ते करु नको नाही तर.........................बाबा मारेल.

मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात. 

बाबांच्या भयाने शाळेत जातात.

बाबाने मारु नये म्हणून अभ्यास करतात.

बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात.

हळू हळू मुलं बाबां कडे दुर्लक्ष 
करुन आई वरच प्रेम करु लागतात.

मना मधून बाबांना काढून टाकतात.
आणि आईच्या चरणावर   सर्वस्व अर्पण करतात.

बाबां पासून चार हात लांबच राहतात.
मुलं आईच गाणं गातात.
मुलं आई वर कविता लिहितात. 

कोणतंच मुल बाबाला दुधा वरची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही, वासरांची गाय म्हणत नाही. 

बाबांसाठी मुलाकडे 'शब्दच' नसतात.

मुलाच्या पायाला ठेच लागली तरीही मुले "बापरे" म्हणत नाहीत.

स्वामी तिन्ही जगाचा "बाबांविना"
भिकारी होत नाही.

साने गुरुजीनांही "श्यामचा बाप" दिसत नाही.

आई घरात असली कि, घर कस भरल्यासारखं वाटतं.

मुलांना बाबा घरात असला की, मात्र स्मशान शांतता..................... !

मुलं शप्पथ सुद्धा आईचीच घेतात.
बाबा शप्पथेच्याही लायकीचा नसतो.

बाबा असतो केवळ मुलांच्या नावाच्या व आडनावाच्या मध्ये..........."नावापुरता"!

मुलं विठोबाला 'माउली' म्हणतात
धरणीला 'माय' म्हणतात. आणि देशाला 'माता' म्हणतात........ !

बाबा मात्र धरणीतून, देशातून आणि मुलांच्या मनातून केव्हाच झालेला असतो हद्दपार................  !

बाबा असतो कठोर, काळीज नसलेला, निर्दयी, मारकुटा........

बाबा असतो मुलांच्या स्वप्नात येणारा बागुल बुआ.............

बाबा म्हणजे केवळ रुपये, पैसे कमवण्याचे यंत्र. 

तेवढं.........काम त्याने केलं की, त्याचं कर्तृत्व संपलं.........

असं असूनही बाबा मेल्यावर..........
मुलांच्या छातीत धडकी का भरते ????????? 

का ओघळतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस.....!

का वाटतं मुलांना पायाखालची जमीन सरकल्या सारखी..........!

का वाटत मुलांना की आपण बेवारस झाल्या सारखं....!

का हंबरतात मुलं बाबा मेल्यावर......!
का मुलं घाबरतात बाबा मेल्यावर...............!

कथा, कादंबऱ्या आणि कवितेत कधीही नसलेला हा "पत्थरदिल" बाबा..................
प्रत्यक्षात जेव्हा नसलेला होतो,
तेव्हा का वाटत मुलांना की, ...........................

जी डोळे मिटून प्रेम करते त्याला प्रियकर म्हणतात. जी डोळे उघडून प्रेम करते त्याला मैत्रीण म्हणतात. जी डोळे बंद करून प्रेम करते त्याला बायको म्हणतात. आणि जी स्वतःचे डोळे बंद होईपर्यंत प्रेम करते त्याला "आई" म्हणतात. परंतु.
                      पण 
 डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो, त्याला पिता म्हणतात...
 
१ शेअर बाबांसाठी
पोस्ट आवडल्यास आपल्या फेसबूक इंस्टाग्राम  व्हाट्सअप  इत्यादी सोशल नेटवर्कवर इतरांना नक्की शेअर करा व त्यांनाही वाचनाचा आनंद घेऊ द्या . सबस्क्राइब करायला विसरू नका 


                       धन्यवाद

                                 - 
🌹🌹🌹🌹🌹
जून २१, २०२०

पावसात कार बुडाली तर इन्श्युरन्स क्लेम कसा मिळवाल ?*

*पावसात कार बुडाली तर इन्श्युरन्स क्लेम कसा मिळवाल ?*

गेले दोन दिवस पडणार्‍या पावसाने अनेक गावात - शहरात  पूर आला आहे. शहरात अनेक नव्या वसाहतीत पाणी साचल्याने बर्‍याचजणांना  एका अनपेक्षीत संकटाला सामोरे जावे लागते आहे. हे संकट म्हणजे अगदी 'सेफ पार्कींग लॉट' किंवा 'ओपन गॅरेज' मध्ये उभ्या असलेल्या गाड्या पाण्यात बुडाल्या आहेत .या सर्व गाडी मालकांच्या समोर एक मोठा प्रश्न आ वासून उभा आहे तो म्हणजे *_या नुकसानीची भरपाई इन्शुरन्स कंपनी देणार का ?_*
जर तुमची गाडी नविन असेल तर तुमच्या गाडीची जोखीम सर्वसमावेशक म्हणजे 'काँप्रेहेन्सीव्ह रिस्क कव्हर' इन्शुरन्स कंपनीने घेतलेली असेल. जर कर्ज घेऊन गाडी घेतलेली असेल तर गाडीचा विमा *'काँप्रेहेन्सीव्ह'* असेल याची खात्री बाळगा कारण कर्ज देणार्‍या अर्थसंस्थांची ही अनिवार्य अट असते. 
पण.... पण ... पहिल्या काही वर्षांनंतर केवळ विम्याचा हप्ता (प्रिमियम) कमी भरायच्या हेतूने फक्त *'थर्ड पार्टी'* इन्शुरन्स घेतलेला असेल तर पाण्यात बुडालेल्या गाडीचे एकही रुपयाचे नुकसान इन्शुरन्स कंपनी भरून देणार नाही. 

*आता समजा, तुमच्या गाडीचा विमा सर्वसमावेशक आहे तर काय कराल ?*

गाडी जागेवरच उभी असेल तर ती तशीच ठेवा. जर वाहून दुसर्‍या जागेवर गेली असेल तर धक्का मारून बाजूला उभी करा. तुमच्या इन्शुरन्स कंपनीच्या हेल्प लाइनवर फोन करून तुमचे *नाव - पॉलीसी नंबर आणि गाडीचे लोकेशन* कळवा . कंपनीकडून सर्व्हेअर येऊन गाडीचे किती नुकसान झाले आहे याचा आढावा घेईल. जर जागेवर आढावा घेणे शक्य नसेल तर गाडी टो करून गॅरेजला पाठवली जाईल आणि नुकसानीचा अंदाज कंपनीला कळवून गाडी इन्शुरन्स कंपनीच्या खर्चात  दुरुस्त होईल.

आता या सगळ्या धावपळीत एक मोठी घोडचूक तुमच्या हातून होण्याची शक्यता आही ती म्हणजे _सर्व्हेअरला बोलावण्याच्या आधीच इग्नीशन मारून गाडी चालवण्याचा प्रयत्न करणे_. हे जर तुम्ही केलेत तर गाडीचे एंजीन 'हायड्रोलॉक' होईल. हायड्रोलॉक म्हणजे गाडी सुरु होताना एंजीनमध्ये पाणी घुसेल आणि _एंजीन 'सिझ' होईल_. एंजीन 'सिझ' झाले की ते कामातून जाईल.
इन्शुरन्स करारानुसार हा गाडी सुरु करण्याचा प्रयत्न आणि त्यातून झालेले एंजीनचे नुकसान *_'कॉन्सिक्वेंशिअल लॉस '_* म्हणजे तुमच्या हातून घडलेल्या चुकीमुळे *'मूळ कारणापेक्षा इतर कारणाने झालेले नुकसान'* या सदरात जाईल. परीणामी एंजीनचा येणारा खर्च कंपनी देणार नाही.  एकूण नुकसानीत एंजीन हाच मोठा खर्च असतो तोच मिळाला नाही तर इतर नुकसान भरपाई मिळूनही काहीच फायदा नाही.
तेव्हा लक्षात ठेवा, पाण्यात बुडलेली गाडी सुरु करण्याचा प्रयत्न करू नका !!! आता हाच *_हायड्रोलॉकींगचा_* धोका साचलेल्या पाण्यातून गाडी नेण्यात उद्भवू शकतो, अशा परीस्थितीतही इन्शुरन्स कंपनी क्लेम देण्यास बांधील नाही हे पण लक्षात ठेवा.
जर *_'अ‍ॅड ऑन '_* म्हणून एंजीनचा स्वतंत्र विमा त्याच पॉलीसीत घेतला असेल तर ही  *'कॉन्सिक्वेंशिअल लॉस'* अट लागू पडत नाही.
जून २१, २०२०

स्वतःला समर्थ बनवा

      एका गृहस्थाकडं त्याचा एक आंधळा मित्र गप्पा मारायला आला होता. गप्पा इतक्या रंगल्या की, अंधार कधी पडला ते त्या सद् गृह्स्थाला कळलेही नाही. 

मग मित्र जायला निघताच त्यानं त्याच्या हाती कंदिल दिला आणि तो मित्राला म्हणाला,"बाहेर खुप अंधार आहे.त्यामुळे तू हा कंदील घेवुन जा."

यावर तो आंधळा मित्र आश्र्चर्यान म्हणाला, "अरे बाबा, मी तर असा ठार आंधळा आहे.मला अंधार आणि उजेड सारखेच.मला या कंदिलाचा काय उपयोग…?

"हा कंदील तुझ्या साठी नाहीच. डोळस माणसासाठी आहे.या उजेडा मुळं कुणीही वाटसरू तुझ्या अंगावर आदळणार नाही."तो सद् गृहस्थ म्हणाला. हे आंधळ्या मित्राला पटलं. तो कंदील घेवुन चालू लागला.

मात्र थोड्याच वेळात एक माणुस त्याच्या अंगावर आदळला. संतापानं आणि आश्चर्यानं आंधळा मनुष्य ओरडला, "अरे , अरे, काय चाललंय तुझं ? माझ्या हातातला हा पेटता कंदील तुला दिसत नाही का ? "

त्यावर जास्तच आश्च्यर्यान तो वाटसरू म्हणाला ," अरे भाऊ, तुझा कंदील कधीच विझून गेलाय.हे तुझ्या लक्ष्यात नाही आलं…?"

हे ऐकताच आंधळा मोठ्यानं हसला आणि म्हणाला,"नाही लक्ष्यात आलं, पण आज एक गोष्ट मात्र कळली, उसना घेतलेला उजेड फार काळ आपल्या उपयोगी पडत नाही." 
इमेज शेअर करू शकता

म्हणून "अत् दिप भव" म्हणजे "स्वयंप्रकाशित व्हा"...!स्वतःलाच  समर्थ बनवा ,दुसऱ्याच्या जीवावर जगण्यापेक्षा स्वतः च्या हिमतीवर जगा.
पोस्ट आवडल्यास इतरांना नक्की शेअर करा व त्यांनाही वाचनाचा आनंद घेऊ द्या . सबस्क्राइब करायला विसरू नका आपल्या व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम इत्यादी सोशल मीडियावर नक्की शेअर करा धन्यवाद


                                 - 
🌹🌹🌹🌹🌹

शुक्रवार, १९ जून, २०२०

जून १९, २०२०

इथून पुढे फक्त त्यांनाच दीर्घ आयुष्य मिळेल !



*इथून पुढे फक्त त्यांनाच दीर्घ आयुष्य मिळेल !
--------------------------------

*तुम्हीच सांगा ........*
*हल्ली.. आपलं आजारी पडण्याचं प्रमाण थोडं जास्तच वाढलं का नाही ?*
*कधी पोटच दुखतं , कधी बी.पी.च वाढतो , कधी शुगर वर खाली होते*
*कधी हृदयाचे ठोके वाढून चक्करच येते* 
*करमत नाही , मन लागत नाही* 
*छातीत धडधड , मनात*
*भीती ....अशा एक ना अनेक तक्रारी .....!*

*कारणं काय तर म्हणे ....*
*अशुद्ध पाणी , कचरा , रासायनिक खतं , डासांची संख्या वाढणे ....वगैरे , वगैरे ...!*

*मग ......*
*मग वॉटर प्युरीफायर आलं , रूम फ्रेशनर आलं , डास प्रतिबंधक वड्या , उदबत्त्या , एवढंच काय घरा घरात डास मारण्याच्या बॅटी सुद्धा आल्या .....*
*काय परिणाम झाला ?* 
*डासं मेले पण आजारपण गेलं का ?* 
*नाही ........*
*मग...?*

*तुम्ही आम्ही काय केलं आहे...* 
*जाणते अजाणते पणे सर्वांशी कट्टी धरली आहे !*

*हल्ली माणसं एकमेकाला मोकळेपणाने बोलतच नाहीत ......हे खरं कारण आहे आजारी पडण्याचं !*
*सख्खे , चुलत , मावस*
*आई वडील , बहीण भाऊ*
*शेजारी , सहकारी ...या सर्वांशी आपण अबोला धरला आहे  !*
*ओळख आहे पण संवाद नाही*
*नातं आहे पण माया नाही*

*अवांतर , मोक्कार विषयावर आपण खूप गप्पा मारतो पण खरं दुःख कुणीही कुणाला सांगत नाही ......हे एक आपल्या वारंवार आजारी पडण्याचं कारण असू शकतं !*

*सगे सोयरे , घरकुल , गोकुळ*
*नातीगोती , हॅपी फॅमिली , आपली माणसं*  
*.....अशा गोंडस नावांनी आपण Whats app चे ग्रुप बनवले ....*
*पण त्यावर मनमोकळा संवाद होतोय का ?*
*मी दुःख सांगितल्यावर मला हसतील का ? अशी जर भीती वाटत असेल ....*
*मी Good news  सांगितल्यावर आनंदी होतील का नाही ? अशी जर भीती वाटत असेल .....*
*तर असे ग्रुप ,अशी नाती काय कामाची ?*

*लक्षात ठेवा हिलस्टेशनला , युरोप टूरला जाऊन relax होता येईल ....पण हलकं वाटू शकेल का ?*
*टेन्शन कमी होईल का ?*
*त्यामुळे वारंवार आजारी पडण्याची कारणे कदाचित ही तर नसतील ......*
*मनातल्या भावनांचा निचरा न होणे ...,*
*सकारण , विनाकारण प्रत्येक नात्या सोबत झालेली कट्टी ...,*
*खूप बोलावं वाटणे ...पण व्यक्त होण्यासाठी जागाच न उरणे ....*

*मग आता काय करावं ?*
*ज्या वादा मध्ये , अबोल्या मध्ये , फारसं तथ्य नाही असे वाद मिटवण्यासाठी स्वतः होऊन पुढाकार घ्यावा ....*
*व्यक्त व्हा , बोला , दो करा*
*कदाचित आपलं वारंवार आजारी पडणं थोडं कमी होईल*
*लक्षात ठेवा इथून पुढे फक्त त्याच माणसांना दीर्घ आयुष्य मिळेल .....जी माणसं हसण्याच्या आणि रडण्याच्या जास्तीत जास्त जागा निर्माण करू शकतील*
पोस्ट वाचून झाल्यावर नक्की शेअर करा व इतरांनाही वाचनाचा आनंद घेऊ द्या तसेच ब्लॉग ला सबस्क्राइब करायला विसरू नका म्हणजे नवीन पोस्ट टाकल्यानंतर लगेच तुम्हाला माहिती मिळेल धन्यवाद.
जून १९, २०२०

वडील

कृपया  हा लेख पूर्ण वाचा फारच छान लिहिलेला आहे 
*बापाला बघितलं आहे का?

मोठा झाल्यापासुन बापाला,
कधी मिठी मारून बघितलं आहे का? 
मारून बघा, 
ह्रुदय स्थिर होऊन जाईल.

मोठा झाल्यापासुन कधी 
बापाचा मुका घेऊन बघितला आहे का? 
घेऊन बघा, 
बापाची दाढी गालाला रुतल्यावर, 
बापा पेक्षा आपण अजुन छोटच आहे, 
याची जाणीव होऊन जाईल .

बापाची चप्पल होते म्हणुन कोणी बाप होत नाही, 
त्यासाठी आयुष्यभर दुय्यम स्थान घ्याव लागत , 
कधी घेऊन बघितलं आहे का  दुय्यम स्थान ? 
घेऊन बघा, 
बापाची किंमत कळुन जाईल .

बापाला बुढा, म्हातारा अस म्हणुन बघितल, 
साधु लोकांना बाबा म्हंटल, 
कधी बापाला बाबा म्हणुन बघितलं आहे का ? 
म्हणुन बघा, 
खऱ्या संतांची ओळख होऊन जाईल.

बापाचं घरावर नाव नाही, 
बापाचं हातावर नाव नाही, 
बापाचं छातीवर नाव नाही, 
बापाचं गाडीवर नाव नाही, 
स्वतःच्या घरात असुन देखील तो परका , 
कधी परका होऊन बघितला आहे का ? 
होऊन बघा, 
बाप किती खंबीर आहे याची जाणीव होऊन जाईल.

आई च प्रेम जास्त आणि बाबाचं कमी अस कधी नसत .
कधी सुर्य आणि चंद्र यांच्यातला 
साम्य बघितलं आहे का ? 
बघुन घ्या,  
दोघ ही प्रकाश देतात फक्त 
वेळा वेगवेगळ्या असतात.

बाप फक्त पाया पडण्यापुरता नसतो, 
त्याला कधी निरखून बघितलं आहे का ?
निरखून बघा, 
आयुष्यातील सर्वात मोठा मित्र तुमच्या समोर असतो.

*अशीच एक छोटीशी गोष्ट*

*एका पित्याने* आपल्या *मुलीचे* खूप चांगल्या प्रकारे संगोपन केलं. *खूप चांगल्या प्रकारे तिचे शिक्षण केलं*...   जेणेकरून मुलीच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यास मदत होईल.......

*काही काळानंतर ती मुलगी एक यशस्वी व्यक्ती बनली.*

आणि *एका मल्टी नैशनल कंपनीची सी.ई.ओ. झाली. उच्च पद ,भरपूर वेतन, सगळ्या सुख सुविधा तिला कंपनीकडून प्रदान झाल्या होत्या.*

*एके दिवशी असाच तिचा विवाह एका चांगल्या मुलाशी झाला तिला मुलंही झाली. तिचा आता आपला सुखी परिवार बनला.* 

*वडील म्हातारे होत चालले होते* एक दिवस वडीलांना आपल्या मुलीला भेटायची इच्छा झाली.. आणि ते मुलीला भेटायला तिच्या ऑफिस मध्ये गेले. *त्यांनी बघितलं की मुलगी एका मोठ्या व शानदार ऑफिसची अधिकारी बनलीय. तिच्या ऑफिसात हजारो कर्मचारी तिच्या अधीन राहून काम करत आहेत.* 

*हे सगळं बघून वडीलांची छाती अभिमानानं फुलली !*

ते म्हातारे वडील मुलीच्या कॅबिन मध्ये गेले. व *तिच्या खांद्यावर हात ठेवून उभे राहीले.* आणि प्रेमानं त्यांनी आपल्या मुलीला विचारलं की..... *"या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे "?* 
मुलगी स्मित हास्य करत, आत्मविश्वासाने म्हणाली. *"माझ्याशिवाय कोण असू शकतं बाबा ?"*

वडीलांना तिच्याकडून ह्या उत्तराची अपेक्षा नव्हती. त्यांना विश्वास होता की, त्यांची मुलगी गर्वाने म्हणेल की,,,,, 
*" बाबा, ह्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती तुम्हीच आहात. ज्यांनी मला एवढ्या योग्यतेचं बनवलं!"*
या विचाराने त्यांचे डोळे भरून आले. ते कॅबिनचा दरवाजा ढकलून बाहेर निघायला लागले. *पण न राहून त्यांनी परत एकदा वळून मुलीला विचारलं की,,,, परत सांग "या जगात सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती कोण आहे "?* 

मुलगी ह्या वेळेस म्हणाली की,,,, *"बाबा, तुम्हीच आहात ह्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती!"*


*वडील हे ऐकून आश्चर्यचकित झाले.....* व ते म्हणाले,,,, अगं, आताच तर तू *स्वतःला* जगातली सगळ्यात *शक्तिशाली* व्यक्ती म्हणत होतीस.... आणि आता *तू मला शक्तिशाली व्यक्ती* म्हणून सांगते आहेस ?"

मुलगी हसत त्यांना आपल्या समोर बसवत बोलली,,, *"बाबा, त्यावेळी तुमचा हात माझ्या खांद्यावर होता.* 

*ज्या मुलीच्या खांद्यावर किंवा डोक्यावर वडीलांचा हात असेल. तर ती मुलगी जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीच असेल ना? हो की नाही बाबा!"* 

वडीलांचे डोळे परत भरून आले. त्यांनी आपल्या मुलीला घट्ट छातीशी धरून करकचून मिठी मारली."....


खरंच आहे की,,,,,, *ज्याच्या खांद्यावर किंवा डोक्यावर वडीलांचा हात असेल....ती व्यक्ती जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती असते.*


*आपल्या प्रगती व उन्नतीने फक्त "आई-वडीलच " आपल्या प्रगतीवर खुश असतात.*.........🙏🏻🌹

😢पोस्ट वाचून झाल्यावर नक्की शेअर करा व इतरांनाही वाचनाचा आनंद घेऊ द्या तसेच ब्लॉग ला सबस्क्राइब करायला विसरू नका म्हणजे नवीन पोस्ट टाकल्यानंतर लगेच तुम्हाला माहिती मिळेल धन्यवाद.

    !*
🙏🏻😷🙏🏻😷🙏🏻😷

💐