माझ्या मराठीची गोडी

वाचकांना वाचनाची एक पर्वणी मिळावी . मराठी भाषेची गोडवी कळावी यासाठी केवळ हा एक प्रयत्न आहे कुणाला काही शंका असल्यास कृपया राग व्यक्त न करता कमेंटमध्ये सांगा व योग्य ते मार्गदर्शनही करा .

Breaking

गुरुवार, ११ जून, २०२०

एक प्रार्थना*

*एक प्रार्थना*

*तूच सांगीतला होता ना देवा*
*भगवतगीतेत समतेचा भाव*
*का मग माझ्या महाराष्ट्रात देवा*
*तुझ्या हृदयाचा विषमतेशी ठाव*

*काही लेकरं तुझी* 
*पुर पावसात मरतात*
*काहींच्या डोळ्यात पाणी*
*डोळे आभाळाकडे लावतात*

*एकीकडे दुष्काळाचा धाक दावून*
*मढ्यांना धगधग पेटवतोस*🔥
*तर कुठे ओला दुष्काळ पाडून*
*सरणाला कोरडेपणा न देतोस*

*सांग देवा तुझ्या अंतरीची*
*ममत्वी माता कुठे हरवलीस?*
*घरंदारं गुरं नदीला वाहवून*
*काय श्रावण साजरा करतोस?*

*घेऊन जा अतिवृष्टीवान ढगांना*
*मराठवाडा विदर्भाकडे🌧*
*बरस म्हणावं तेथे प्रेमाने🥰*
*माया ममता समतेने.*

*एक प्रार्थना तुजला देवा🙏🏻*
*ठेव महाराष्ट्र न देशाला सुखी*
*वरूणराज स्पर्शू दे धरेला🌏*
*फक्त संपन्न होण्यासाठी.*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
     *कवीः उपेंद्रराज देवढे*
*जि.प.शा.औरंगपूर ता.शहादा**जि.नंदुरबार*.


💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
कृपया पोस्ट वाचल्यानंतर शेअर करायला विसरू नका इतरांनाही वाचनाचा , मराठी भाषेच्या गोडीचा आनंद घेऊ द्या

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐


*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चला एक सुंदर प्रेरक अभिप्राय देऊन टाका..