आपल्या वडिलांचं घरात असणे किती महत्त्वाच आहे . हे वडील नसल्यावरच कळतं . पोस्ट पूर्ण वाचा म्हणजे वडिलांची किंमत कळेल.
*वडील*
त्यांच्या खांद्यावर बसून
जग दिसतं आपल्याला नवं नवंच
आयुष्यभर घरासाठी
वडील होऊन राहतात कवच
सावरण्यासाठीच असतात
त्यांचे मजबूत हात
असतात वडील तोवर
जाणवत नाहीत आघात
ऊन वारा पाऊस झेलत
वडील लकाकी हरवून जातात
उडून जातात पाखरं तेव्हा
वडील एकाकी होऊन जातात
दाटून येतो कंठ गळ्यात
पण अश्रू पापणीतून गळत नाही
आपण वडील झाल्याशिवाय
मोठेपण त्यांचं कळत नाही
----------------------------------
💐 वडील 💐
बायको "गोड बातमी" सांगते ते
ऐकून टचकन डोळ्यात पाणी येते
तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••
नर्सने ओंजळीत ठेवलेला काही
पौंडाचा जीव जबाबदारीच्या प्रचंड
ओझ्याची जाणीव करून देतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••
बायकोबरोबर जागवायच्या रात्री
डायपर बदलणे आणि पिल्लाला
कडेवर घेऊन फेऱ्या मारण्यात
व्यतीत होउ लागतात,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••
मित्रांबरोबरच्या पार्ट्या आणि नाके
नीरस वाटून संध्याकाळी पावलांना
घराची ओढ लागते,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••
"लाईन कोण लावणार" म्हणत
सिनेमाची टिकिटे टेचात ब्लॅकने
खरेदी करणारा तोच जेव्हा शाळेच्या
फॉर्मच्या लायनीत पहाटे पासून
तासंतास इमानदारीत उभा रहतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••
ज्याला उठवताना गजर हात टेकतात
तोच जेव्हा पिल्लाचा नाजुक हात किंवा
पाय झोपेत आपल्या अंगाखाली येऊ
नये म्हणून रात्रभर सावध झोपू लागतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••
खऱ्या आयुष्यात एका झापडित
कुणालाही लोळवू शकणारा पिल्लाबरो-
बरच्या खोट्या फाइटिंग मध्ये त्याच्या
नाजुक चापटीनेदेखील गडाबडा लोळतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••••
स्वतः कमीजास्त शिकला असला तरी
पोराला "नीट अभ्यास कर रे" असे
पोट तिडकिने सांगू लागतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••••
आपल्याच कालच्या मेहनतीच्या
जोरावर आपला आज मजेत जगणारा
अचानक पोराच्या उद्यासाठी आपलाच
आज कॉम्प्रोमाइज करू लागतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••••
ऑफिसात अनेकांचा बॉस बनून
हुकुम सोडणारा शाळेच्या POS मध्ये
वर्गशिक्षिकेसमोर कोकरु बनून,
कानात प्राण आणून तिच्या इंस्ट्रक्शन्स
आज्ञाधारकपणे ऐकत असतो.
तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••
आपल्या अप्रेझल आणि प्रमोशन-
पेक्षासुद्धा तो शाळेच्या साध्या
यूनिट टेस्टच्या रिझल्टची देखिल
जास्त काळजी करू लागतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••
आपल्या वाढदिवसाच्या ट्रीट पेक्षा
पोराच्या बर्थडे पार्टीच्या तयारीत
तो गुंगुन जातो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••
गाडीतून सतत फिरणारा तो
पोराच्या सायकलची सीट पकडून
सायकलच्या मागे धावू लागतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••
आपण पाहिलेली दुनिया, केलेल्या
चूका पोराने करू नयेत म्हणून
प्रिचिंग सुरु करतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••
प्रसंगी पोराच्या कॉलेज अडमिशनसाठी
पैशाची थैली सोडतो किंवा याचनेकरिता
"कॉन्टेक्ट्स" समोर हात जोडतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••
"तुमचा काळ वेगळा होता, आता
जमाना बदलला, तुम्हाला काय कळ-
णार नाही. This is generation gap!"
असे आपणच केव्हातरी बोललेले संवाद
आपल्यालाच ऐकू आल्यावर आपल्या
बापाच्या आठवणीने हळवा होऊन मना-
तल्या मनात त्याची माफी मागतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••••••••
पोरगा शिकून परदेशी जाणार,
मुलगी लग्न करून परक्या घरी
जाणार हे दिसत असून त्याकरिता
स्वतःच प्रयत्न करतो
तेव्हा तेव्हा पुरुषाचा बाप होतो••••
पोर मोठी करताना आपण कधी
म्हातारे झालो हे लक्षात येत नाही
आणि लक्षात येते तेव्हा उपयोग नसतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••
कधी पोरांच्या संसारात अडगळ बनून,
कधी आपल्या म्हातारीबरोबर वृद्धा-
श्रमाची पानगळ बनून अगदीच नशीब-
वान असला तर नातवंडांसमवेत चार
दिवस रमून•••••••कसेही असले तरी
भावी पिढीला भरभरून आशीर्वाद देत
कधीतरी सरणावर चढतो,
तेव्हा पुरुषाचा बाप होतो•••••••••••!!
•••••••तमाम वडिलांना समर्पित. ..!!
(संग्रहित)
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*BABA*
लहान असल्यापासून आई मुलांना
सांगत असते.......
इथे जाऊ नको-------बाबा मारेल,
तिथे जाऊ नको------बाबा मारेल
झाडावर चढू नको---बाबा मारेल,
नदीकडे जाऊ नको--बाबा मारेल,
शाळेत जा नाहीतर--बाबा मारेल
अभ्यासाला बस नाही तर
.............................बाबा मारेल
हे करू नको नाही तर........................ बाबा मारेल,
ते करु नको नाही तर.........................बाबा मारेल.
मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात.
बाबांच्या भयाने शाळेत जातात.
बाबाने मारु नये म्हणून अभ्यास करतात.
बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात.
हळू हळू मुलं बाबां कडे दुर्लक्ष
करुन आई वरच प्रेम करु लागतात.
मना मधून बाबांना काढून टाकतात.
आणि आईच्या चरणावर सर्वस्व अर्पण करतात.
बाबां पासून चार हात लांबच राहतात.
मुलं आईच गाणं गातात.
मुलं आई वर कविता लिहितात.
कोणतंच मुल बाबाला दुधा वरची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही, वासरांची गाय म्हणत नाही.
बाबांसाठी मुलाकडे 'शब्दच' नसतात.
मुलाच्या पायाला ठेच लागली तरीही मुले "बापरे" म्हणत नाहीत.
स्वामी तिन्ही जगाचा "बाबांविना"
भिकारी होत नाही.
साने गुरुजीनांही "श्यामचा बाप" दिसत नाही.
आई घरात असली कि, घर कस भरल्यासारखं वाटतं.
मुलांना बाबा घरात असला की, मात्र स्मशान शांतता..................... !
मुलं शप्पथ सुद्धा आईचीच घेतात.
बाबा शप्पथेच्याही लायकीचा नसतो.
बाबा असतो केवळ मुलांच्या नावाच्या व आडनावाच्या मध्ये..........."नावापुरता"!
मुलं विठोबाला 'माउली' म्हणतात
धरणीला 'माय' म्हणतात. आणि देशाला 'माता' म्हणतात........ !
बाबा मात्र धरणीतून, देशातून आणि मुलांच्या मनातून केव्हाच झालेला असतो हद्दपार................ !
बाबा असतो कठोर, काळीज नसलेला, निर्दयी, मारकुटा........
बाबा असतो मुलांच्या स्वप्नात येणारा बागुल बुआ.............
बाबा म्हणजे केवळ रुपये, पैसे कमवण्याचे यंत्र.
तेवढं.........काम त्याने केलं की, त्याचं कर्तृत्व संपलं.........
असं असूनही बाबा मेल्यावर..........
मुलांच्या छातीत धडकी का भरते ?????????
का ओघळतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस.....!
का वाटतं मुलांना पायाखालची जमीन सरकल्या सारखी..........!
का वाटत मुलांना की आपण बेवारस झाल्या सारखं....!
का हंबरतात मुलं बाबा मेल्यावर......!
का मुलं घाबरतात बाबा मेल्यावर...............!
कथा, कादंबऱ्या आणि कवितेत कधीही नसलेला हा "पत्थरदिल" बाबा..................
प्रत्यक्षात जेव्हा नसलेला होतो,
तेव्हा का वाटत मुलांना की, ...........................
जी डोळे मिटून प्रेम करते त्याला प्रियकर म्हणतात. जी डोळे उघडून प्रेम करते त्याला मैत्रीण म्हणतात. जी डोळे बंद करून प्रेम करते त्याला बायको म्हणतात. आणि जी स्वतःचे डोळे बंद होईपर्यंत प्रेम करते त्याला "आई" म्हणतात. परंतु.
पण
डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो, त्याला पिता म्हणतात...
१ शेअर बाबांसाठी
पोस्ट आवडल्यास आपल्या फेसबूक इंस्टाग्राम व्हाट्सअप इत्यादी सोशल नेटवर्कवर इतरांना नक्की शेअर करा व त्यांनाही वाचनाचा आनंद घेऊ द्या . सबस्क्राइब करायला विसरू नका
धन्यवाद
-
🌹🌹🌹🌹🌹
बडीया
उत्तर द्याहटवा